12/04/2024
ऐतिहासिक, सामाजिक, शुभवार्ता...
“देशप्रेमी” न्यूज नेटवर्कसाठी आजअखेर एकुण, २ हजार ९९७ रुपये जमा, २९ समाजबांधवांनी केली मदत, देशप्रेमी न्यूज नेटवर्कचा संपादक या नात्याने मी अमोल पांढरे आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे.
अमोल पांढरे यांच्या स्वाभिमानी पत्रकारितेवरचा समाजाचा विश्वास किती दांडगा आहे. त्याचे हे मुर्तीमंत उदाहरणं आहे. कोणत्याही जाहिरातीशिवाय केवळ होळकरी आणि फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठीच देशप्रेमी न्यूज नेटवर्क सुरु आहे. त्यामुळे बातमीदारीचा दर्जा पाहून, या चळवळीच्या न्यूज नेटवर्कला स्वतःहून आर्थिक मदत करण्यासाठी कांहीजणं पुढे आले. आणि त्यांनी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. पण नेहमीप्रमाणेच मी सुरुवातीला त्यासाठी नकार दिला होता. मात्र ई.टिव्ही. मराठी या वृत्तवाहिनासीठी ज्यांच्यासोबत मी कामं केले. ते माझे गुरुवर्य आणि चळवळीतले सहकारी मा. श्री. अनिल पवार सर, म्हणाले की, अमोल कुठपर्यंत पदरमोड करुन हे समाजकार्य करणार आहेस, आज ३३ वर्षाहून अधिक काळ लोटला. तरी तू आहे तिथेच आहेस, तिच चळवळ, तोच विचार आणि तिच तळमळं... पण शेवटी हा समाजाच्या उन्नतीचा आणि प्रगतीचा रथ आहे. एकट्याने ओढण्याऐवजी त्यामध्ये आमच्यासारखे लोकही सहभागी झाले तर कामं हलकं होईल. रथाला गती येईल. चळवळीला गती येईल. आणि आम्हालाही मदत केल्याचे समाधनं मिळेल. त्यामुळे तू जर कोण तुला मदत करत असतील तर ती आनंदाने स्वीकार... मगं मात्र माझा नाईलाज झाला. कारणं पवार सर स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते आहेत. त्याशिवाय शरद जोशी यांच्या चळवळीपासून ते प्रेरित होवून नोकरी सोडून शेतक-यांची चळवळ करत आहेत. आणि त्यांनी या चळवळींसाठी कसा निधी उभारला जातो ? प्रसारमाध्यमांसाठी कसा निधी उभारला जातो ? ते उदाहरणासह पटवून दिले. त्यामुळे मी त्यांचा सल्ला ऐकून, पहिल्यांदाच समाजासाठी सुरु असलेल्या आणि कोणत्याही जाहिरातीशिवाय चाललेल्या व देशभरात अत्यंत लोकप्रिय असलेल्या देशप्रेमी न्यूज नेटवर्कसाठी मदतीचे आवाहनं केले.
विशेष म्हणजे, देशप्रेमी न्यूज नेटवर्कचे सबस्क्रायबर्स हे तब्बल ७२ हजार ६०० हून अधिक आहेत. त्यामुळे ज्यांची मदत करण्याची मनापासून इच्छा आहे. त्यांनी जरी मदत केली, तरीही बातमीदारीच्या रथाला लागणारे इंधन सहज उपल्बध होईल. असेही आदरणीय अनिल पवार सर यांनी आवर्जून सांगितले होते. त्यानूसार मी, हे आवाहनं केले असता, अमोल पांढरे यांच्या समाजहितैषी आणि प्रामाणिक पत्रकारितेवर प्रेम करणा-या सर्व समाजातील समाजबांधवांनी जवळपास २ हजार ९९७ रुपयांची मदत केली आहे. ही मदत एकुण २९ जणांनी केलेली असून, त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे. या सर्वांचा मी, अत्यंत आभारी आहे. यापुढेही मदत आल्यास सुधारित यादी जाहीर केली जाईल...
१) सुधाकर शेंडगे – १००
२) सचिन हाक्के – १००
३) निवृत्ती हुडे – १००
४) महेश मासाळ – ( सांगोला ) – १००
५) किरण यमगर - १०१
६) बिरा संपत्ती वगरे - १००
७) संजय देवराव शिरगिरे - १००
८) निनावी – १ रुपया
९) विठ्ठल मारुती काळे – १००
१०)निवावी - २५ रुपये
११) निनावी – ३५ रुपये
१२) सचिन लक्ष्मण वाघमोडे - २०
१३) धनंजय रुपनवर – २०
१४) राकेश शिंदे – १००
१५) सुदाम भाऊसाहेब वाढमोडे – १००
१६) बाळासाहेब कोल्हे – ५ रुपये
१७) नारायण नरे साहेब – १ हजार रुपये
१९) पाटील साहेब – १०० रुपये
२०) अमोल रुपनवर – ५० रुपये
२१) राजाराम कोळेकर – १०० रुपये
२२) शरद बरकडे – ५० रुपये
२३) दत्तू धायगुडे – १०० रुपये
२४) नरेंद्र पाटील – १०० रुपये
२५) तुकाराम सोलंकर – १०० रुपये
२६) आनंदा व्हनमाने – १०० रुपये
२७) उमर सौदे – ८० रुपये
२८) शिवाजी पांढरे – १० रुपये
२९) बाळासाहेब काळे सर – १०० रुपये
आणखी कोणाला मदत करायची असल्यास ती या मोबाईल नंबरवरती पाठवावी...
गुगल पे / फोन पे – 9370845390
लवकरच भेटू आरेवाडी बिरोबा यात्रेच्या निमित्ताने... यात्रेतील बातम्यांच्या अनुषंगाने...
आपला मित्र, आपला कार्यकर्ता – अमोल पांढरे