Jamkhed Live

Jamkhed Live जामखेड परिसरातील खबर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच 'Jamkhed live'
(6)

जामखेडकरांनो, शालेय साहित्य खरेदी करा आणि मिळवा प्रत्येक खरेदीवर सरप्राईझ गिफ्ट...आजच संपर्क करा - शिवम सेल्स, मेन रोड, ...
19/06/2024

जामखेडकरांनो, शालेय साहित्य खरेदी करा आणि मिळवा प्रत्येक खरेदीवर सरप्राईझ गिफ्ट...

आजच संपर्क करा - शिवम सेल्स, मेन रोड, शनी चौक, जामखेड
☎️ 8793305151 / 9422267799

तर मंडळी बिंदास्तपणे व्यक्त व्हा !        😎
19/04/2024

तर मंडळी बिंदास्तपणे व्यक्त व्हा !

😎

कर्जत जामखेडचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या MIDC संदर्भात नुकतीच मंत्री उदय सामंत यांची बैठक पार पडली. प्रस्तावित पाटगाव य...
12/12/2023

कर्जत जामखेडचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या MIDC संदर्भात नुकतीच मंत्री उदय सामंत यांची बैठक पार पडली. प्रस्तावित पाटगाव येथील MIDC वादग्रस्त असल्याने रद्द करण्याचा निर्णय झाला अजून 15 दिवसांच्या आत नवीन जागा शोधण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याची, आ. राम शिंदे यांची माहिती.

एकाच कुटुंबातील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू; खर्डा येथील घटनाजामखेड लाईव्ह ब्रेकिंगपाझर तलावातील पाण्यात बुडुन एकाच कुटु...
05/10/2023

एकाच कुटुंबातील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू; खर्डा येथील घटना

जामखेड लाईव्ह ब्रेकिंग

पाझर तलावातील पाण्यात बुडुन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खर्डा गावाजवळील आंतरवाली फाटा येथे घडली आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिण भावांसह चुलत भावाचा समावेश आहे. दिपक ज्ञानेश्वर सुरवसे (16 वर्षे), सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (14 वर्षे ) तर कृष्णा परमेश्वर सुरवसे (16वर्षे) असे तिघांची नावे असून ते खर्डा गावातील रहिवाशी होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खर्डा येथील सुरवसे कुटुंबातील वृध्द व्यक्तीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. यामुळे सुतकातील कपडे धुण्यासाठी कुटुंबातील महिला खर्ड्यापासुन तीन कीमी अंतरावर असलेल्या आंतरवाली फाटा येथील पाझर तलावात गेल्या होत्या. यावेळी ज्ञानेश्वर, सानिया व कृष्णा तिघेही त्यांच्या मदतीसाठी आले होते.

कपडे धुत आसताना दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास सानिया हीचा पाय घसरून ती पाण्यात पडली. मात्र तीला पोहता येत नसल्याने ती पाण्यात बुडू लागली. हे पाहताच तिला वाचवण्यासाठी तीचे भाऊ दिपक व कृष्णा यांनीही पाण्यात उड्या घेतल्या. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर मोफत अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...
28/09/2023

गणपती बाप्पा मोरया...
पुढच्या वर्षी लवकर या...

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषू सर्वदा ॥श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सव निमित्त सर्...
19/09/2023

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषू सर्वदा ॥

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, ई पीक पाहणीच्या कालावधीत मुदतवाढ जामखेड लाईव्ह ब्रेकिंगई पीक पाहणीच्या कालावधीत सरकारने मुदतवाढ के...
16/09/2023

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, ई पीक पाहणीच्या कालावधीत मुदतवाढ

जामखेड लाईव्ह ब्रेकिंग

ई पीक पाहणीच्या कालावधीत सरकारने मुदतवाढ केली असून आता 25 सप्टेंबरपर्यंत शेतकरी आपली ई पीक पाहणी करू शकणार आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीचा लाभ मिळवायचा असेल तर ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे. यासाठी शेतकऱ्यांना 1 ऑगस्ट 2023 ते 15 सप्टेंबर 2023 असा 45 दिवसांचा कालावधीची मुदत दिली होती. मात्र ई पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी पाहून व पीक विम्यापासून कोणी वंचित राहू नये यासाठी सरकारने ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी वेळेत नोंदवावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर मोफत अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1

मनोज जरांगेंचे उपोषण मागे, जरांगेची समजूत काढण्यात मुख्यमंत्री यशस्वीजामखेड लाईव्ह ब्रेकिंगमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज...
14/09/2023

मनोज जरांगेंचे उपोषण मागे, जरांगेची समजूत काढण्यात मुख्यमंत्री यशस्वी

जामखेड लाईव्ह ब्रेकिंग

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्‍वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले. आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले आमरण उपोषण देखील मागे घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते.

मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले असून, त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यंमत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी देखील आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. विशेष म्हणजे आमरण उपोषण मागे घेतले असले तरीही साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर मोफत अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1

सर्व शेतकरी बांधवाना बैलपोळा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!
14/09/2023

सर्व शेतकरी बांधवाना बैलपोळा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!

कर्जतच्या शेतकऱ्याचा कारनामा, मिरचीच्या पिकात गांजाची लागवडजामखेड लाईव्ह ब्रेकिंगकर्जत पोलिसांनी अळसुंदे परिसरात गांजाची...
12/09/2023

कर्जतच्या शेतकऱ्याचा कारनामा, मिरचीच्या पिकात गांजाची लागवड

जामखेड लाईव्ह ब्रेकिंग

कर्जत पोलिसांनी अळसुंदे परिसरात गांजाची शेती करणाऱ्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सव्वाचार लाख रुपयांचा गांजा जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत अळसुंदे ते कोर्टी रस्त्याच्या बाजुस एकाने त्याच्या शेतात गांजा पिकाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून गांजा जप्त केला.

या कारवाईमध्ये 4 लाख 29 हजार 820 रुपये किंमतीचा सुमारे 21 किलो वजनाचा ओलसर झाडे हिरव्या रंगाचा गांजा जप्त केला. बाळू मारुती गार्डी (वय 45 वर्षे, रा. अळसुंदे, ता. कर्जत) याने त्याच्या गट नंबर 330 मधील शेतात मिरचीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर मोफत अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1en85

आ. राम शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेत दिला उपोषणाला पाठिंबाजामखेड लाईव्हजालन्यामधील आंतरवाली सराटी येथे मराठा समा...
10/09/2023

आ. राम शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेत दिला उपोषणाला पाठिंबा

जामखेड लाईव्ह

जालन्यामधील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या उपोषणाला आ. राम शिंदे यांनी भेट दिली. कर्जत-जामखेड मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह त्यांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी रात्री उशिरा भेट दिली. आ. शिंदे व पदाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत त्यांच्या उपोषणास पाठिंबा दिला.

यावेळी जरांगे पाटील यांनी आ. शिंदे यांचे आभार मानत म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आ. राम शिंदे यांनी आपल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे. आज तुम्ही आशिर्वाद दिला आणि आम्हाला पाठबळ दिले. त्यामुळे आम्ही शंभर टक्के आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी माजी सभापती डाॅ. भगवान मुरुमकर, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, ॲड प्रविण सानप, बिभीषण धनवडे, अमित चिंतामणी, अशोक महारनवर, राहूल चोरगे, सह आदी उपस्थित होते.

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर मोफत अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1en85

कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेची आत्महत्याजामखेड लाईव्ह ब्रेकिंगकर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील सामूहिक ब...
10/09/2023

कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेची आत्महत्या

जामखेड लाईव्ह ब्रेकिंग

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आत्महत्या केली. शिंदे हा कोपर्डी घटनेचा दोषी असून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज पहाटेच्या सुमारास त्याने येरवडा कारागृहात बराकमध्ये स्वत:च्या कपड्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस पहाटे गस्तीवर गेले असताना पोलिसांना शिंदेचा मृतदेह आढळून आला. आरोपीने गळफास घेतल्यानंतर काही वेळातच ही माहिती तुरुंग प्रशासनाला कळाली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली. दरम्यान, आरोपी जितेंद्र शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेल्याची माहिती आहे.

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर मोफत अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1en85

जामखेड लाईव्ह / लोकल बुलेटिन👉 ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी आहेत त्यांना ‘कुणबी’ दाखला दिला जाणार...
07/09/2023

जामखेड लाईव्ह / लोकल बुलेटिन

👉 ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी आहेत त्यांना ‘कुणबी’ दाखला दिला जाणार, लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

👉 राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला, यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला

👉 आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश, मिरजगावात होणार उपजिल्हा रुग्णालय, निविदा प्रक्रिया सुरु, 10 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर

👉 जामखेड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून डासांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ, शहरात मोठ्या प्रमाणावर तापीची साथ, डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण

👉 हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा नुकसान भरपाईच्या 25 टक्के आगाऊ रक्कम, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आ. रोहित पवार यांनी केली होती मागणी

👉 शिक्षकदिनी गुरूदक्षिणा म्हणून शाळेस एक लाख दोन हजार सहाशे एक रुपयांची देणगी, मिशन आपुलकी अंतर्गत सारोळा येथील भिमराव सांगळे यांनी दिली देणगी

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर मोफत अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1en85

चौंडीत धनगर आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरूजामखेड लाईव्हमराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन आक्रमक बनले असताना आता धन...
06/09/2023

चौंडीत धनगर आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू

जामखेड लाईव्ह

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन आक्रमक बनले असताना आता धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटला आहे. यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून चौंडीत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा यशवंत सेनेचे राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची सत्ता येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत या आंदोलनातही फडणवीस यांनाच लक्ष्य केल्याचे आढळून आले. दरम्यान, आमदार रोहित पवार उद्या येथे येऊन आंदोलकांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर मोफत अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा.

Business Account

रविवारी जामखेड बंद ! मराठा समाजाची बंदची हाकजामखेड लाईव्हउद्या, रविवार (3 सप्टेंबर 2023) रोजी मराठा समाजाने जामखेड बंदची...
02/09/2023

रविवारी जामखेड बंद ! मराठा समाजाची बंदची हाक

जामखेड लाईव्ह

उद्या, रविवार (3 सप्टेंबर 2023) रोजी मराठा समाजाने जामखेड बंदची हाक दिली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ हा बंद असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

आज सकाळी जामखेड तहसील कार्यालयासमोर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना निवेदन देण्यात आले. या बंदला तालुक्यातील विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर मोफत अपडेट हवे असतील तर पुढील नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून HI मेसेज करा. 9158 403 402

31/08/2023
सुप्रिया सुळेंची राजकीय गोची झाली, आ. राम शिंदे यांची टीकाजामखेड लाईव्हआजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांन...
30/08/2023

सुप्रिया सुळेंची राजकीय गोची झाली, आ. राम शिंदे यांची टीका

जामखेड लाईव्ह

आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी होणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी काल केली. यावर राजकीय पटलातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. "हे 'जुमला' सरकार असून 200 रुपये कमी करून काय होणार आहे? आमचं सरकार सत्तेत असताना, 400 रुपये प्रति सिलिंडरचे दर होते. आज ते 1150 रुपये आहेत. त्यामानाने जवळपास 500 रुपये किंवा 700 रुपयांनी भाव कमी करायला हवे होते. हा सगळा निवडणूक 'जुमला' असल्याची, टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली.

यावर आमदार राम शिंदे यांनी सुळे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. "सुप्रिया सुळेंची राजकारणाची गोची झाली आहे, म्हणून त्यांचे असे वक्तव्य येत आहे. अनेकदा दर वाढले तर का वाढले आणि दर कमी झाले तर का झाले, असं विरोधक विचारतात. मात्र पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. त्यामुळे आता गॅस सिलेंडरवरील दर 200 रुपयांनी कमी करण्यात आल्याचे", शिंदे म्हणाले.

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर मोफत अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1en85

रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा...! #रक्षाबंधन
30/08/2023

रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा...!

#रक्षाबंधन

मागणी येईल तिथे टँकर सुरु करा, पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रशासनाला सूचनाजामखेड लाईव्हअहमदनगर : आतापर्यंत सरासरीपेक्...
29/08/2023

मागणी येईल तिथे टँकर सुरु करा, पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रशासनाला सूचना

जामखेड लाईव्ह

अहमदनगर : आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. परिणामी टंचाईग्रस्त गावांतून टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल होतील. बीडीओकडून प्रस्ताव दाखल झाल्यास पाच दिवसांत मंजूर करा. याबाबत हलगर्जीपणा दिसून आल्यास प्रांताधिकारी, तहसीलदार, बीडीओ यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत दिला. यावेळी आ. राम शिंदे हेही बैठकीला उपस्थित होते.

आ. राम शिंदेनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

कर्जत, जामखेड तालुक्यांतून टँकरसाठी प्रस्ताव दाखल होऊही ते मंजूर का होत नाहीत, टँकर मंजूर करू नका, असे कोणी सांगितले का, असा प्रश्न उपस्थित करून आमदार शिंदे यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना धारेवर धरले.

कर्जतला खासगी टँकर कोणाचे?

जामखेड, कर्जत तालुक्यांत फोटो छापलेले खासगी टँकर सुरू आहेत का, असा सवाल पालकमंत्री विखेे पाटील यांनी तहसीलदार व बीडीओंना विचारला. याबाबत आपणास काही माहिती नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. तुम्ही मख्यालयी राहता की पुण्याहून येता, असा सवाल विखे यांनी करीत अधिकार्‍यांना सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. फोटो लावून पाणीवाटप करणारे खासगी टँकर जेथे धावत असतील, तेथे सरकारी टँकर सुरू करण्याचे आदेश त्यांनी अधिकार्‍यांना दिले.

जिल्ह्यात चाराछावण्या सुरू करणार

जनावरांसाठी छावण्यांऐवजी चाराछावण्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. चारा उपलब्ध झाल्यानंतर गरजेनुसार शासन चाऱ्याची खरेदी करून शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था करणार आहे. कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्यावे, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले.

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर मोफत अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1en85

नागरिकांनो सावधान ! चोरट्यांचा सुळसुळाट वाढलाजामखेड तालुक्यात एकाच दिवशी सहा ठिकाणी घरफोडीजामखेड लाईव्हजामखेड तालुक्यात ...
28/08/2023

नागरिकांनो सावधान ! चोरट्यांचा सुळसुळाट वाढला
जामखेड तालुक्यात एकाच दिवशी सहा ठिकाणी घरफोडी

जामखेड लाईव्ह

जामखेड तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. एकाच दिवशी विविध सहा ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. खर्ड्यात रात्री तर राजुरी, धानोरा, अरणगाव, पारेवाडी व कोल्हेवस्ती येथे दिवसा घरफोडी झाली आहे. यात एक जण गंभीर जखमी झाले असून लाखोंचा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे.

खर्डा येथील गोलेकर लवण येथे 27 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास स्वयंपाक खोलीचा दरवाजा तोडून चोरटयांनी घरफोडी केली. यात चोरटयांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा दोन लाख पाच हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चोरट्यांच्या हल्ल्यात मुरलीधर गहीनीनाथ गोलेकर (वय ५७) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर रविवारी भरदिवसा राजुरी, धानोरा, अरणगाव, पारेवाडी व कोल्हेवस्ती येथे घरफोडी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर मोफत अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1en85

शेतकऱ्यांनो सावधान ! लंपीचा प्रादुर्भाव वाढला, तालुक्यात दहा पॉझिटिव्ह, दोन जणावरांचा मृत्यूजामखेड लाईव्ह / शेतीमातीकाही...
27/08/2023

शेतकऱ्यांनो सावधान ! लंपीचा प्रादुर्भाव वाढला, तालुक्यात दहा पॉझिटिव्ह, दोन जणावरांचा मृत्यू

जामखेड लाईव्ह / शेतीमाती

काही महिन्यांपासून गायब असलेल्या लंपी स्किन आजाराने जामखेड तालुक्यात पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यात मागील काही दिवसांत दहा जनावरे पॉझिटिव्ह आढळून आले असून दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. याच कारणास्तव शनिवारी भरणारा जनावरांचा आठवडी बाजार प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील एकुण जणावरांची संख्या 74500 एवढी आहे. या मध्ये गायवर्गाची एकुण संख्या 59 हजार 951 एवढी आहे. मागील वर्षी 3781 जनावरे पॉझिटिव्ह आढळून आली होती. तर 232 जनावरांचा मृत्यू झाला होता. ज्या शेतकऱ्यांची जनावरे लंपी आजाराने ग्रस्त असतील त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात मोफत उपचार घ्यावेत, आपला गोठा व परीसर स्वच्छ ठेवावा, पॉझिटिव्ह जनावरांना वेगळे ठेवत जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर मोफत अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1en85

उद्याचा जनावरांचा आठवडे बाजार बंद राहणार, मात्र...जामखेड लाईव्ह / ब्रेकिंग26 ऑगस्ट 2023 रोजी भरणारा जामखेडचा जनावरांचा आ...
25/08/2023

उद्याचा जनावरांचा आठवडे बाजार बंद राहणार, मात्र...

जामखेड लाईव्ह / ब्रेकिंग

26 ऑगस्ट 2023 रोजी भरणारा जामखेडचा जनावरांचा आठवडे बाजार बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले. इतर जनावरांचा बाजार बंद असला तरी, शेळी मेंढी बाजार मात्र नियमित सुरु राहणार आहे.

जामखेड तालुका, परिसरातील बातम्या व माहिती सबंधित दररोज आपल्या व्हॉट्सअपवर अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा.

Business Account

जामखेड बाजार समितीच्या संचालकावर प्राणघातक हल्ला, दोघा जणांविरोधात गुन्हे दाखलजामखेड तालुका व परिसरातील बातम्या व माहिती...
25/08/2023

जामखेड बाजार समितीच्या संचालकावर प्राणघातक हल्ला, दोघा जणांविरोधात गुन्हे दाखल


जामखेड तालुका व परिसरातील बातम्या व माहिती आपल्या व्हाट्सअँपवर दररोज अपडेट हवे असतील तर पुढील लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1en85


😎

चांद्रयानाचं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झालं आहे. त्यानंतर विक्रम लँडरने चंद्राचे पहिले फोटो पाठवले आहेत. इस्रोने हे फ...
23/08/2023

चांद्रयानाचं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झालं आहे. त्यानंतर विक्रम लँडरने चंद्राचे पहिले फोटो पाठवले आहेत. इस्रोने हे फोटो ट्विटरवरून शेअर केले आहेत.

तातडीने ई-पीक पाहणी करून घ्यावी, अन्यथा मिळणार नाही पीक विमा !जामखेड लाईव्ह | शेती मातीजामखेड तालुका व परिसरात अनेक ठिका...
21/08/2023

तातडीने ई-पीक पाहणी करून घ्यावी, अन्यथा मिळणार नाही पीक विमा !

जामखेड लाईव्ह | शेती माती

जामखेड तालुका व परिसरात अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके जळू लागली आहेत. तर काही ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांसाठी विमा हा एकमात्र पर्याय दिसू लागतो. त्यातही यावर्षी शासनाने 1 रुपयात पीकविमा उपलब्ध करून दिल्याने मोठ्या प्रमाणात विमा भरला गेला आहे. मात्र फक्त विमा भरून उपयोग नाही तर त्यासोबत पीक पाहणी करणे देखील गरजेचे आहे. तरच तुम्हाला पीक विम्याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे 25 ऑगस्टच्या आतमध्येच शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

ई-पीक पाहणी करण्याची प्रक्रिया

१. सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले-स्टोअरवर जायचे आहे. तिथे E-Peek Pahani सर्च करून ई-पीक पाहणीचे व्हर्जन-2 इन्स्टॉल करायचे आहे.

२. हे अँप ओपन केल्यानंतर तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे. जसे की, जामखेडला महसूल विभाग नाशिक आहे.

३. महसूल विभाग निवडल्यानंतर तुम्हाला सांकेतांक क्रमांकासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला दिलेली माहिती (जिल्हा, तालुका, गावाचे नाव) निवडून पुढे जायचे आहे.

४. मग पहिले, मधले किंवा आडनाव, तसेच खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता. इथे गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करून खाली तो क्रमांक टाकायचा आहे आणि मग शोधावर क्लिक करायचे आहे.

५. मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक तपासून समोर जायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर सांकेतांक पाठवा नावाचे पेज ओपन होईल.

६. आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे, अशी सूचना तिथे दिलेली असेल. पण, तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटण दाबा, मोबाईल नंबर टाका आणि मग पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.

७. आता तुम्ही गेल्या वर्षी या अॅपवर नोंदणी केली असेल, तर तुमची नोंदणी आधीच झाली आहे, तुम्हाला पुढे जायचे का, असा मेसेज तिथे येईल. पण तुम्ही यंदा पहिल्यांदाच नोंदणी करणार असाल तर तसा मेसेज इथे येणार नाही.

८. इथल्या हो या पर्यायावर क्लिक करा. मग खातेदाराचे नाव निवडा. सांकेतांक विसरलात यावर क्लिक करा आणि मग सांकेतांक क्रमांक टाका.

९. आता पीक पाहणीच्या अॅपवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करू शकता. इथे पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मग खाते क्रमांक, गट क्रमांक निवडला की लागवडीखालील जमिनीचे एकूण क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र तिथे आपोआप येईल.

१०. पुढे खरीप हंगाम निवडून, पिकाचा वर्ग जसे की निर्भेळ पीक आहे की मिश्र पीक किंवा इतर ते निवडायचे आहे. त्याचा प्रकार, पिकांची नावे आणि क्षेत्र हेक्टर आरमध्ये टाकायचे आहे.

११. एकदा का ही माहिती भरून झाली की पुढे जल सिंचनाचे साधन जसे की विहीर, तलाव हे निवडायचे आहे. त्यानंतर सिंचन पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे.

१२. पुढे अक्षांश रेखांश मिळवा वर क्लिक करायचे आहे. आणि मग शेवटी फोटो काढावर क्लिक करून पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो तुम्हाला तुमच्या शेतातून अपलोड करायचा आहे.

१३. फोटो काढून झाला की बरोबरच्या खुणेवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही जी माहिती भरली, ती तुमच्यासमोर दाखवली जाईल. त्याखालच्या स्वयंघोषणेवर तुम्हाला क्लिक करून पुढे जायचे आहे.

१४. पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे, अशी सूचना येईल. ठीक आहे म्हणायचे आहे.

१५. त्यानंतर पिकांची माहिती पाहा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती पाहू शकता.

अशाचप्रकारे दुसऱ्या एखाद्या गटातल्या पिकांची नोंद करायची असेल तर आता सांगितलेली प्रक्रिया तुम्हाला पुन्हा करावी लागेल.

हा मेसेज जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून पीक विम्यापासून कोणी वंचित राहणार नाही.

आपल्याला जामखेड तालुका व परिसरातील बातम्या, माहिती आणि इतर गोष्टी सबंधित दररोज अपडेट हवे असतील पुढील व्हॉटसअप लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1en85

आपल्याला जामखेड तालुका व परिसरातील बातम्या, माहिती आणि इतर गोष्टी सबंधित दररोज अपडेट हवे असतील तर आजच Jamkhed Live परिवा...
20/08/2023

आपल्याला जामखेड तालुका व परिसरातील बातम्या, माहिती आणि इतर गोष्टी सबंधित दररोज अपडेट हवे असतील तर आजच Jamkhed Live परिवारात सामील व्हा..

पुढील व्हॉटसअप लिंकवर क्लिक करून HI मेसेज करा. https://wa.link/t1en85

हा मेसेज जास्तीत जास्त जामखेडकराना शेअर करा.

पीक विमा योजनेला मिळाली मुदतवाढ, 3 ऑगस्टपर्यंत भरता येणार अर्जJamkhed Live परिवारात सामील होण्यासाठी 9158 403 402 या व्ह...
31/07/2023

पीक विमा योजनेला मिळाली मुदतवाढ, 3 ऑगस्टपर्यंत भरता येणार अर्ज

Jamkhed Live परिवारात सामील होण्यासाठी 9158 403 402 या व्हाट्सअँप क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून Hi करा तसेच आपल्या परिसरातील व्हाट्सअँप ग्रुपमध्ये हा नंबर ऍड करा.

Address

Jamkhed
413201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jamkhed Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jamkhed Live:

Videos

Share


Other Media/News Companies in Jamkhed

Show All