09/03/2022
🚩जय गुरुदेव दत्त🚩
लेकरू आईला भेटायला निघाले आहे.... 🥰
माऊलींनो खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर परत आपली बॅग सज्ज झाली आहे दत्त गुरूंच्या दरबारात जाण्यासाठी. बऱ्याच दिवसाची मनाला लागलेली ओढ आता पूर्ण होणारं आहे.आणि यावेळी सहा दिवसाची ट्रिप असणार आहे महाराजांनी यावेळी गिरनारी (गुजरात) क्षेत्री बोलावले आहे कारण त्यांच्या इच्छे शिवाय आपण त्यांच्या सानिध्यात पाऊल ही ठेऊ शकत नाहीत.
सत्य आणि शाश्वत मार्गाने चालत असताना प्रपंच आणि परमार्थ करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे आणि त्यातून आपण दोन्ही ही साध्य करून आपला जन्म सार्थकी लावायचा आहे. संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे तरी पण परिस्थिती कधी आडवी येत नाही असं मला वाटतं इच्छा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो.नाही तर खिशात लाखो रुपये असले तरी कारणे भरपूर देता येतात. सहा दिवसाची शेतीची कामे करताना खूप त्रास ही झाला पण त्यापेक्षा आनंद ही होतोय कारण एक एक क्षण जवळ येत आहे गिरनारीला डोळे भरून पाहण्यासाठी. डोळे मिटले तरी गिरनारीच दिसत आहे. उद्या सकाळी लवकरच यात्रेच्या प्रवासाला सुरुवात होईल , आम्ही आठ गुरुबंधू आणि सद्गुरु माऊली पण यावेळी आमच्या सदभाग्याने सोबतीला आहेत असा क्षण परत कधी येईल सांगता येत नाही त्यामुळे या अनमोल क्षणांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न असेल त्यामुळे youtube ला व्हिडीओ शक्यतो येणार नाही त्यामुळे माफी असावी.
🚩जय गुरुदेव दत्त 🚩