लेवा पाटीदार फाउंडेशनतर्फे सरदार पटेल चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
जळगाव लाईव्ह न्यूज | १५/०१/२०२५ | शहरातील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सरदार वल्लभभाई पटेल चषक स्पर्धेचे आयोजन दि. १४ ते १९ जानेवारी दरम्यान सागर पार्क मैदानात आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ८ सामने खेळले गेले. लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे हे सहावे पर्व आहे. स्पर्धेसाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री रक्षाताई खडसे या ब्रँड अँबेसिडर आहेत. स्पर्धेमध्ये २४ संघ सहभागी होत असून यंदा प्रथमच जिल्ह्यातील ग्रामीण भागातून प्रतिनिधित्व करणारे संघ सहभागी झालेत.
जळगाव शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नायलॉन मांजाच्या पाच चक्री जप्त केल्या.
#NylonManja #JalgaonPolice #JalgaonCity #Jalgaon
भुसावळ शहरात १० जानेवारीला गोळ्या घालून तरुणाची हत्या करण्यात आली होती. यानंतर हल्लोखोर फरार होते. अखेर हल्लेखोर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्यांच्याकडून 4 पिस्तूल अन् 3 काडतूस जप्त करण्यात आली आहे.
#Bhusawal #Police #MurderNews #JalgaonLive #JalgaonLiveNews
आशिया खंडातून क्रमांक एकची असलेली सहकारी पतसंस्था म्हणजे आपली जळगाव ग.स.सोसायटी.
या सोसायटीचे ६६वे अध्यक्ष म्हणून अजबसिंग सोनुसिंग पाटील यांची निवड झाली. निवड झाल्यानंतर सभासद हिताचा सर्वानुमते झालेल्या निर्णय अर्थातच राजमाता जिजाऊ शुभमंगल योजनेचा शिवारंभ करत निर्णयाची अंमलबजावणी करून राष्ट्रमातेस मानाचा मुजरा केला.
आज माझा तो अंदाज तंतोतंत खरा ठरवला; उद्धव ठाकरेंबाबत गिरीश महाजन काय म्हणाले..
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२५ । राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आम्हाला सोडून तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला, पवार साहेबांच्या जवळ जाऊन बसला, त्यावेळेस तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले होते. बाळासाहेबांचे विचार असे होते का? की काँग्रेस सोबत जाऊन बसा. मी आधीच बोललो होतो की तुमचा पक्ष संपलेला असेल त्यानुसार आज माझा शब्द तंतोतंत खरा ठरला असं मंत्री महाजन म्हणाले, तसेच जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पद सोडणार असल्याची जोरदारही त्यांनी भाष्य केलं. नेमकं काय म्हणाले ते पहा..
चाळीसगाव शहरात मध्यरात्री हवेत गोळीबार; संशयित सीसीटीव्हीत कैद, काय म्हणाले पोलीस अधिकारी? पहा..
#Chalisgaon #Firing #Crime #JalgaonLive #News
जळगावकरांसाठी 2025 मध्ये एक फायद्याची DEAL🤝
💃 EPIC स्टुडिओ घेऊन येत आहे :
Zumba आणि Aerobicsवर रुपये 5000चा Discount...
Dance आणि योगावर रुपये 3000चा Discount...
📞 संपर्क : 7709554587, 8484842700
📍 पत्ता : ३रा मजला इंडिया प्लाझा, डॉमिनोस पिझ्झाच्या वर स्वातंत्र चौक, जळगाव 425001
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
#DUPMC #DrUlhasPatil #DrKetkiPatil
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 10 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान !
जळगाव लाईव्ह न्यूज | ०८/०१/२०२५ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 33 वा पदवीप्रदान सोहळा आज राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडला. गुणवत्ता यादीतील 119 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले आहे. त्यातील दहा विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक राज्यपालांचे हस्ते सुवर्णपदके देण्यात आली. दरम्यान 211 विद्यार्थिनींची क्षमता असलेली मुलींचे वस्तीगृह क्रमांक चारचे उद्घाटन देखील आज राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले.
जळगाव एमआयडीसी भागातील मानराज मोटर मारुती सर्व्हिस शोरूमला आज सकाळी अचानक भीषण आग लागली. अग्निशामक विभागातर्फे आग आटोक्यात आली असून मात्र या आगीत करोडोचे नुकसान झाले आहे.
#ManrajMotars #MarutiShowroom #Jalgaon #JalgaonLiveNews
महाराष्टाचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जळगाव दौऱ्यावर असून त्यांचे जळगाव येथील विमानतळावर आगमन
#Jalgaon #Governor #CPRadhakrishnan #JalgaonLiveNews
धरणगावात एकाच रात्रीतून तीन बंद घरे फोडली, रोकडसह सोन्याचे दागिने लंपास !
धरणगाव शहरातील गौतम नगर भागात एकाच रात्रीतून तीन बंद घरे अज्ञात चोरट्याने फोडली आहेत. एका घरातून चोरट्याने सोने-चांदीचे दागिने असा एकूण ५४ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. तर इतर दोन घरातून देखील किरकोळ रोकड चोरी झाली आहे. एकाच रात्रीतून तीन घर फोडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी देखील होत आहे.
#Dharangaon #Jalgaon #JalgaonLive