Jalgaon Jilha Patrakar Sangh

Jalgaon Jilha Patrakar Sangh जळगाव जिल्हा पत्रकार संघ, जळगाव
कार्य?
(1)

16/11/2023
Pramod Patil
09/10/2023

Pramod Patil

खान्देशातील धडाडीचे सेवाव्रती पत्रकार स्व. नानासाहेब व्हि. सी. नेहेते यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव, अ. भा. मराठी पत्रका...
05/09/2023

खान्देशातील धडाडीचे सेवाव्रती पत्रकार स्व. नानासाहेब व्हि. सी. नेहेते यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव, अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष रंगाण्णा वैद्य(संपादक, दै. संचार, सोलापूर) यांच्या हस्ते, "पत्र महर्षी" पदवी देऊन करण्यात आला. शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या नानासाहेबांचा आज ५ सप्टेंबर रोजी १२१ वा जयंतीदिन! आमची नम्रता पूर्वक आदरांजली... 🙏🙏🙏💐💐💐

Narendra Nehete Ashok Bhatia Vijay Patil
Marathi Patrakar Parishad

Vijay Patil Ashok Bhatia Narendra Nehete
25/08/2023

Vijay Patil Ashok Bhatia Narendra Nehete

18/08/2023

*जळगाव जिल्हा पत्रकार संघ, जळगाव*थेट केंद्रीय नेतृत्वाने आता या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आहे. अधिकृत म्हणजे शासनमान्य स...
18/08/2023

*जळगाव जिल्हा पत्रकार संघ, जळगाव*

थेट केंद्रीय नेतृत्वाने आता या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आहे.

अधिकृत म्हणजे शासनमान्य संघटनेची ताकत अशी असते.

सध्या उठसुठ पत्रकार संघटना स्थापन करण्याचे पीक फोफावले आहे.

सत्ताधारी लोकांच्या पैशांवर एखादा कार्यक्रम आयोजित करुन पाचपन्नास लोकांना पुरस्कार दिले म्हणजे जबाबदारी संपत नाही.

संदिप महाजन जिल्हापत्रकार संघात सभासद नसतांना देखील जिल्हा पत्रकार संघाने सर्वात आधी या घटनेचा जाहिर निषेध करुन योग्य त्या व्यासपीठावरून हा मुद्दा लाऊन धरला होता.

पत्रकार संघ यासाठी महत्वाचा आहे,अंतर्गत वैचारीक मतभेद असू शकतात, पण अधिकृत संघटना जास्त महत्वाची असते.

• भारतातील वृत्तपत्र, माध्यमे, पत्रकारांची सर्वोच्च नियामक संस्था भारतीय प्रेस परिषद (PCI) ने घेतली स्यू-मोटो ॲक्शन; अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी शिंदे सरकारकडून मागितला अहवाल; किशोर पाटीलने पत्रकार संदीप महाजन यांना केलेल्या मारहाणप्रकरणी PCI ने स्थापन केली फॅक्ट फायंडिंग कमिटी

10/08/2023

*जळगाव जिल्हा पत्रकार संघ, जळगाव*

*जाहीर निषेध*

पाचोऱ्याचे आमदार यांनी पत्रकार संदीप महाजन यांना आधी फोन करून शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली , अश्लील भाषेतील संभाषणाचे समर्थनही जाहीर पणे केले. यावरच न थांबता त्यांनी हस्तकांकरवी भर रस्त्यात मारहाण ही केली. सदर घटनेचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारीत होत आहेत.

जळगाव जिल्हा पत्रकार संघ तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकार व पत्रकार संघटना यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून सदर घटनेचा निषेध करीत व्यक्त करण्याची गरज आहे.

सदर घटनेचा निषेध म्हणुन काळया फिती लावून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
पत्रकारांनी दिवसरात्र यांची चमचेगीरी केली पाहिजे,असे सध्याचे राजकारण झाले आहे, आमदारच जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत असेल व अत्यंत हीन दर्ज्याच्या शिव्या देत असेल तर ह्या महाराष्ट्राची वाटचाल तालीबानी वृत्ती कडे चाललेली आहे.

अशा ह्या प्रवृत्तीचा जळगाव जिल्हा पत्रकार संघ तिव्र निषेध करीत असून जिल्हधिकारी जळगाव यांना याबाबत सविस्तर निवेदन देण्यात येणार आहे.

या प्रवृत्तींचा बिमोड तेंव्हाच होईल जेंव्हा पत्रकार संरक्षण कायद्यान्वये या गुंडावर गुन्हा दाखल होईल.

सत्तेच्या लालूनचांगूल व फोडाफोडीच्या राजकारणामुळे या
प्रवृत्तींचा आत्मविश्वास बळावला असून आमचे काही ही होऊ शकत नाही , कायदा आमच्या खिश्यात आहे, गृहमंत्री आम्हाला भीतो असा अहंभाव सत्तेतील लोकांत निर्माण झाला आहे.

*या प्रवृत्तींचा जाहिर निषेध*

CMOMaharashtra Devendra Fadnavis Gulabrao Patil गुलाबराव पाटील Suresh Damu Bhole - Rajumama

06/08/2023

*जळगाव जिल्हा पत्रकार संघ, जळगाव*

*आमदाराचा निषेध*

पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकार श्री संदिप महाजन यांना अत्यंत हीन पातळी वरील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असा अभिमान बाळगणाऱ्या देशातील विधानसभा सदस्याने लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणवणाऱ्या वृत्तपत्राच्या घटकाला धमकावणे व त्याच्या अधिकारावर गदा आणण्याचा घोर अपराध केलेला आहे.

*आमदार या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्ती कडून ही भाषा मुळीच अपेक्षीत नाही.*

या बेलगाम लोकप्रतिनीधींवर अकूंश लागला पाहिजे, यापूढे कोणताही लोकप्रतिनीधी पत्रकारांना धमकावणे व शिवीगाळ करण्याचे कृत्य करणार नाही, यासाठी या आमदारांवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जळगाव जिल्हा पत्रकार संघ, जळगाव करीत आहे.

Jain Irrigation Systems Ltd.
04/07/2023

Jain Irrigation Systems Ltd.

29/06/2023

*जळगाव जिल्हा पत्रकार संघ, जळगाव.*

महाराष्ट्र शासन तर्फे 5 लाखांपर्यंत मोफत उपचार योजना

शासन आपल्या दारी निमित्ताने महाराष्ट्र शासनाने नुकताच निर्णय घेतला आहे. डोमेसाईल व रेशनकार्ड असणाऱ्यांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळेल. महाराष्ट्र शासनाचे जळगाव जिल्हा पत्रकार संघ तर्फे आभार.

परंतु यात अडचण अशी की, डोमेसाईल हे ज्यांच्या जवळ शाळा सोडल्याचा दाखला आहे किंवा जन्म दाखला आहे त्यांनाच हा दाखला काढता येतो. त्यामुळे बऱ्याच नागरिकांन जवळ जन्माची नोंद नाही तसेच शिक्षण नाही अशांना जन्म पुरावा देणे अशक्य होते.
तरी शासनाने याबद्दल दखल घेवून या योजनेपासून नागरिक वंचित राहू नये यासाठी उपाय शोधावा हि विनंती.

पुन्हा शासनाचे त्रिवार अभिनंदन.

विजय बापू पाटील
अशोक भाटिया
नरेंद्र नाना नेहेते
डॉ. गोपी सोरडे
दिलीप शिरुडे
भिका चौधरी
विवेक खडसे
पांडुरंग महाले
सर्व पदाधिकारी व सदस्य
जळगाव जिल्हा पत्रकार संघ, जळगाव

CMOMaharashtra Devendra Fadnavis

Suresh Damu Bhole - Rajumama
13/06/2023

Suresh Damu Bhole - Rajumama

16/05/2023

जळगाव जिल्हा पत्रकार संघ

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची बुधवारी पुण्यतिथी

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची 177 वी पुण्यतिथी बुधवार, 17 मे रोजी आहे.
त्यानिमित्त पत्रकार संघात उद्या संध्या. 5 वा. अभिवादन करण्यात येईल.
सर्व पत्रकारांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पत्रकार संघ तर्फे करण्यात आले आहे.

*दै. लोकमत चे समूह संपादक श्री विजय बाविस्कर साहेब*यांना सावनातर्फे बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल मनपू...
02/05/2023

*दै. लोकमत चे समूह संपादक श्री विजय बाविस्कर साहेब*
यांना सावनातर्फे बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल मनपूर्वक शुभेच्छा...

*जळगाव जिल्हा पत्रकार संघ*
ज्येष्ठ पत्रकार लढा समिति जळगाव.

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कारांची घोषणाप्रकाश बाळ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीरपुरस्कारार्थींमध्ये धुळ्या...
21/04/2023

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कारांची घोषणा

प्रकाश बाळ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

पुरस्कारार्थींमध्ये धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांचा समावेश

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा "दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार" यंदा ज्येष्ठ पत्रकार, चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांना देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आज मुंबईत केली.. परिषदेचे अन्य पुरस्कार देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहेत.. मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची विशेष बैठक काल परिषदेच्या मुंबईतील कार्यालयात पार पडली.. बैठकीत २०२२ चे पुरस्कार नक्की करण्यात आले.. त्यानुसार यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रकाश जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे.. २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.. यापुर्वी दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य, पंढरीनाथ सावंत आदि वरिष्ठ पत्रकारांना हा पुरस्कार दिला गेला आहे... प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे.. पत्रकार शशिकांत सांडभोर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टीव्ही पत्रकाराला दिला जाणारा पुरस्कार "न्यूज १८ लोकमत" चे मिलिंद भागवत यांना देण्यात येणार आहे.. पत्रकार प्रमोद भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा "प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार" सकाळचे पत्रकार मारूती कंदले यांना दिला जात आहे.. महिला पत्रकारांसाठी दिला जाणारा "सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कारासाठी" यावर्षी मॅक्स महाराष्ट्रच्या प्रियदर्शनी हिंगे यांची निवड करण्यात आली आहे.. अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार भगवंतराव इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार यंदा धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांना दिला जात आहे.. मराठवाड्यातील पत्रकारांसाठी असलेला नागोजीराव दुधगावकर पुरस्कार यावर्षी छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार स. सो खंडाळकर यांना देण्यात येत असून कोकणातील पत्रकारासाठीचा रावसाहेब गोगटे पुरस्कार संगमेश्वर येथील ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांना दिला जात आहे.. दत्ताजीराव तटकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रायगड जिल्ह्यातील पत्रकारास दिला जाणारा पुरस्कार न्यूज 18 लोकमतचे रायगड प्रतिनिधी मोहन जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे..मान्यवरांच्या उपस्थितीत मे च्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत पुरस्कार वितरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.. बैठकीस मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विभागीय सचिव दीपककैतके, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे आदि उपस्थित होते.. पुरस्कार प्राप्त सर्व पत्रकारांचे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे...



*****

Mukund Edake
14/04/2023

Mukund Edake

31/03/2023

*प्रत्येक गोष्ट महिलांनी आव्हान म्हणुन स्विकारावी - शांता वाणी*जळगाव - जिल्हा पत्रकार संघ व आम आदमी पार्टी महिला आघाडी य...
12/03/2023

*प्रत्येक गोष्ट महिलांनी आव्हान म्हणुन स्विकारावी - शांता वाणी*

जळगाव - जिल्हा पत्रकार संघ व आम आदमी पार्टी महिला आघाडी युवा अध्यक्ष अमृता नेतकर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी (दि.11) रोजी शहरातील विविध पत्रकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन दैनिक लोकशाहीच्या संपादिका सौ. शांता वाणी हया होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सौ. जयश्रीताई महाजन, डॉ. केतकी पाटील, डॉ. विजेता सिंग, डॉ. सविता नंदनवार, निलोफर देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक आम आदमी पार्टी महिला आघाडी युवा अध्यक्ष अमृता नेतकर यांनी करून देताना सांगितले की, जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना जागृत करणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सविता कानडे (तरुण भारत) , मुग्धा भुरे (न्यूज अँकर) , प्रेरणा पाटील संतोष (पुण्यनगरी) , दिक्षिता देशमुख (शौर्य) , जागृती भावसार ( न्यूज अँकर लोकशाही), निकिता भोई, कोमल पाटील, प्रांजल जगताप , अविता जोशी, दिपाली सोनावणे, सौ. मंगला साळुंखे या महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
भारत भुमी हि महिलांच्या कर्तुत्वाने गाजलेली भुमी आहे. कल्पकता मांडण्याची हातोटी महिलांमध्येच आहे. महीलांशिवाय पुरुष अपूर्ण असुन , महिलांचा आणि तोही महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आल्याबद्दल यावेळी महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी कायदेतज्ञ डॉ. विजेता सिंग यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, महीला व पुरुष यांची नाती म्हणजे सायकलीचे दोन चाक आहेत. त्यातील मागील चाकावर म्हणजे महिलांवर मोठी जबाबदारी असते. मी टू आंदोलन अंतर्गत 2001 पासून महिलांनी बोलायला सुरुवात केली . महिला अधिकाराची माहिती प्रत्येक महिलेला हवीच. मोबाईल प्रत्येक महीलेकडे असावा. आतापर्यंत महिलांना शोषित ठेवले गेले. ते कमी होवून विशेष कायद्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला आहे. त्यानंतर गोदावरी परिवाराच्या डॉ. केतकी पाटील, डॉ. सविता नंदनवार यांनी हि समयोचीत भावपुर्ण मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. जयश्री देवरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

09/03/2023

*जागतिक महिला दिननिमित्त*

8 मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने दि. 11 मार्च 2023 शनिवार रोजी जळगाव जिल्हा पत्रकार संघात समाजातील मान्यवर महिलांच्या हस्ते जळगावातील पत्रकारितेत योगदान असणारे प्रिंट मिडिया, इलेक्ट्रोनिक मिडिया, वेब मिडिया, छायाचित्रकार महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आले आहे.
तरी महीला पत्रकार पत्रकार यांनी दि. 10 मार्च 23 संध्याकाळी 5 वाजता आपल्या छायाचित्रासह आपण करीत असलेले पत्रकारितेतील ओळखपत्र व अर्ज पत्रकार संघात जमा करावे . म्हणजे आपले सत्कार करणे सोपे जाईल. असे आवाहन पत्रकार संघ तर्फे करण्यात येत आहे.

06/03/2023

*जागतिक महिला दिन*

जागतिक महिला दिननिमित्ताने जळगाव जिल्हा पत्रकार संघ व आम आदमी पार्टी सौजन्याने कार्यक्रम आयोजित करावयाचा असल्याने दि. ७/०३/२०२३ मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता पत्रकार संघात महिला पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी विनंती की उपस्थीती द्यावी.

Remembering Bade Bhau. Always and forever connected by heartstrings into infinity
25/02/2023

Remembering Bade Bhau.
Always and forever connected by heartstrings into infinity

*भावपुर्ण श्रद्धांजली* माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे 89 वय, पुणे येथे निधन झा...
24/02/2023

*भावपुर्ण श्रद्धांजली*
माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे 89 वय, पुणे येथे निधन झाले.

जळगाव जिल्हा पत्रकार संघ तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली...

अशोक भाटिया
विश्वस्त - जळगाव जिल्हा पत्रकार संघ.

21/02/2023

*जळगाव जिल्हा पत्रकार संघ*
*हिरक महोत्सवी वर्ष २३-२४*

यंदा हिरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सुरुवातीला पत्रकार संघ तसेच मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांचे सौजन्याने अधिवेशन काळात विधानसभा, मुंबई पाहणी दौरा, 2 दिवसीय अभ्यासदौरा आयोजित करण्यात आले आहे.
पत्रकार संघ सभासद, दैनिकाचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रतिनिधी यांनी आपली नाव ओळखपत्रासह त्वरित नोंदवावी.

तरी अधिवेशन काळात विधानसभा पाहणी दौरा या संदर्भात *दि. 23/02/2023 रोजी दुपारी 4 वाजता , पत्रकार भवन, बळीराम पेठ जळगाव येथे बैठक* आयोजित करण्यात आली आहे.
तरी विनंती की सर्व पत्रकार बांधवानी उपस्थित रहावे. असे आवाहन जळगाव जिल्हा पत्रकार संघ तर्फे करण्यात आले आहे.

*टीप:* इच्छुक उमेदवारांकडे पत्रकार संघ ओळख पत्र व स्वतः चे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी:
श्री नानासाहेब कमलाकर वाणी
श्री दिलीप शिरुडे : 9373007925

आपला,
अशोक भाटिया
9404050308

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त.दिनांक २०/२/२०२३ सोमवार रोजी जळगाव जिल्हा पत्रकार संघ आयोजित कार्य...
21/02/2023

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त.
दिनांक २०/२/२०२३ सोमवार रोजी जळगाव जिल्हा पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात.
तबला वादक श्री. योगेश संदानशिव.
तानपुरा- शिष्य प्रियंका मोराणकर शिरुडे व बासरी वर किर्तेश बाविस्कर.

20/02/2023

patrakar parishad

20/02/2023

को वॅक्सिंग चा पहिला दुसरा व तिसरा डोस देणे सुरू आहे ठिकाण पत्रकार भवन बळीराम पेठ तहसील कार्यालयाजवळ जळगाव

19/02/2023

Address

Baliram Peth Jalgaon
Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jalgaon Jilha Patrakar Sangh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jalgaon Jilha Patrakar Sangh:

Videos

Share


Other News & Media Websites in Jalgaon

Show All

You may also like