खान्देशी भाऊ

खान्देशी भाऊ खान्देशी भाऊ Founder,Owner and CEO Of Khandesh Vahini

31/01/2025

नवीन काँक्रीट स्लॅब पाणी मारत आहेत

30/01/2025

"काँक्रीट स्लॅब कसा टाकायचा? | DIY स्लॅब बनवा सोप्या पद्धतीने!"

How to Pour a Concrete Slab | DIY Concrete Shed Slab Step-by-Step
Learn how to pour a concrete slab for your shed or other structures with this step-by-step DIY guide! From site preparation and formwork to mixing, pouring, and finishing, we cover everything you need to know to ensure a strong and durable concrete foundation. Whether you're a beginner or have some experience, this video will help you build a solid slab with confidence.
Topics Covered:
✅ Concrete slab preparation
✅ Building and setting concrete forms
✅ Mixing and pouring concrete
✅ Leveling and finishing techniques
✅ Curing for maximum strength
Watch the full tutorial and build your own concrete shed slab today!
🔔 Don’t forget to LIKE, COMMENT, and SUBSCRIBE for more DIY construction videos!

29/01/2025

सेन्टिंग काम आणि ईलेक्ट्रिकल काम

29/01/2025

Khandeshi Contractor

🎉 Facebook recognised me as a consistent reels creator this week!
28/01/2025

🎉 Facebook recognised me as a consistent reels creator this week!

28/01/2025

27/01/2025

Khandeshi House Construction

27/01/2025

Khandeshi Ahirani Contracts

27/01/2025

Ahirani Contractor

26/01/2025

Construction

         #बाप #वडील #बाबा #पितृत्व #वडीलांचा_आदर #जीवनाचा_आधार #आभार #वडीलांचे_प्रेम
25/01/2025









#बाप
#वडील
#बाबा
#पितृत्व
#वडीलांचा_आदर
#जीवनाचा_आधार
#आभार
#वडीलांचे_प्रेम

शिक्षक आनंदन्ही पाम्हेर🌹🌹🌹🙏🌹🌹🌹**********************.. नानाभाऊ माळी            भटू भल्ता यंग्रट व्हता!यी जायी कोन्ह भी न...
24/01/2025

शिक्षक आनंदन्ही पाम्हेर
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
**********************.. नानाभाऊ माळी

भटू भल्ता यंग्रट व्हता!यी जायी कोन्ह भी नाव ल्हेत ऱ्हाये!याले गुद्धा मार!त्याले मांगेतीन आडा पायघाली पाड!कोनलें घोंकयवरी मार!कोनलें दप्तरवरी मार!मारामारीम्हा पटाइत भटूलें त्यान्हा यंग्रटपनामुये वर्गानां बठ्ठा पोरे किद्री जायेल व्हतात!भटू आठवीम्हा शिकी ऱ्हायंता!त्याले सर भी किद्री जायेल व्हतात!गंजज सावा त्यानंबापले बलायी धाडं!सांगी दख!त्यांन्हा वघ्रायेल गुन सांगी दखात!तरी त्याले गुन नयी यी ऱ्हायंता!पोऱ्या भल्ता इत्रायेलं व्हता!निस्ता उलटा कामे करत बठे!बाप ठोकी काढे!आर पुरानवरी शेपाली काढे!आंग निय्येगार व्हवापावूत ठोकी काढे!चांगला कुमचाडी काढेतं!चांगलीं चिमटी धरी कुथाडेतं!कितला मारझोड करी हो बाप भी?भटुले कटायीस्नी सरस्ना आंगे लायी देयेलं व्हता!पोऱ्या पक्का कोडगा व्हयी जायेलं व्हता!हुस्त्या मस्त्या करी बठ्ठा पोरेंस्लें भंगाडी सोडे!सरस्लेंभी भंगाडी सोडे!वर्गाम्हा येरमांगे येर लाइनशीर असा नेम्मन बठेचं नयी!बठनां भी व्हयी तें ठिकानवर ठायका असा बठे नयी!त्यानंमांगे-मव्हरे बठेल पोऱ्यास्लें बागीस्कन करकटक टोची,बोटे टोची उज्जी किद्रायी सोडे!चिंनभीन व्हयी बठ्ठास्लें तितरबीतर करत ऱ्हायें!भटू पापनपाड्या आन आलबत्त्या व्हता!बठ्ठा सरस्नी भी हात टेकी देयेलं व्हता!....

शिंदे सर त्या हायस्कुलम्हा नवीनच बदली येल व्हतात!वयख पायखम्हा तीन-चार दिन चालना ग्यात!पहिलाचं दिन भटुना वर्गावर तास लेवालें ग्यात!शिंदे सर फळावर लिखी,मव्हरे वर्गागंम दखी शिकाडी ऱ्हायंतात!त्यास्नी शिक्षकी पारखी नजरम्हा भटूनं वागनं नेम्मन दिखी उंथ!अशा दोन तीन दिन निंघी ग्यात व्हतीन!सरस्नी पारखी नजर बठ्ठ दखी ऱ्हायंती!वर्गाम्हा सर काहींचं बोलनात नयी!भटूनां खेय चालूच व्हता!यांनी कुडची व्हडं,त्याले बोटे टोचं, त्यान्ही चड्डी व्हड!हाऊ खेय चालूचं व्हता!एक दिन जश्या तास सुटना,भटुले आंगे बलायीस्नी सर बोलनात,'भटू!..माले शिक्षकस्टाफ रूमम्हा यीस्नी भेट!' तास सुटना शिंदे सर स्टाफ रूमम्हा चालना ग्यात!

भटू शिक्षक स्टाफ रूमम्हा घुसी ऱ्हायंता!घाबऱ्या घूब्र्या व्हयी ऱ्हायंता!आंगलें निख्खारं घाम फुटी ऱ्हायंता!एक एक जड पाय उखली शिंदे सरस्नी बलायेल खोलीम्हा जायी हुभा ऱ्हायंना!धस्कटनां मायेक मान खाली घाली हुभा व्हता!सर खुर्चीवर बठेल व्हतात!सर बोलनात,' भटू आथा यें भो!' सरस्नी त्यांनंडोकावर, खांदवर हात ठीस्नी आंगेनी खुर्चीवर बसाडी लिधं!माय जशी पोऱ्याले आमायी कोमायी जोडे व्हडी बसाडस तशी सरस्नी त्याले आंगे बसाडी लिधं!भटूलें हायी बठ्ठ आनंबक वाटी ऱ्हायंत,इचित्र वाटी ऱ्हायंत!नवल भी वाटी ऱ्हायंत!आतेपावूतं कोंथाज सरस्नी आशी मया लायेलं नयी व्हती!इत्रायेल पोऱ्यालें कोन मया लायी?तें जाऊद्या पन बापनी भी आशी मया लायी जोडे व्हडी बसाडेलं नयी व्हतं!

शिंदे सर बोली ऱ्हायंतात,'तू बठ्ठा पोरेस्मझार हुशार दिखस!पन वर्गाम्हा चित्तमन लायी बठस नही!यांले त्याले बोटे टोची बठ्ठा वर्गान्ह चित्त बिघाडी टाकस!' भटू हूं कां चुं बोलना नही!मातर डोयास्मा आंसूस्न डाबरं भरेलं व्हतं!डोयास्ना मोती गालवर नितरागुंता कायपात करी ऱ्हायंतात!भटू बोलना नही!शिंदे सरस्नी भी सांगानां आग्रोह करा नही!सर भटूनां डोकावर हात ठी बोलनात,'भटू जाय तू,वर्गाम्हा जायी बठ!'

शिंदे सर इचारमां पडी गयतात!भटूनां डबडंब डोया काय सांगी ऱ्हायंतात?आंसू' काय सांगी ऱ्हायंतात?पोऱ्या आसं काब्र वागी ऱ्हायना व्हयी? काहीतरी कारण व्हयी!..सर शाय सुटनी तशी यांय बुडावर गावमां निरुंग गल्ल्या-गुल्ल्यास्मा, पानीन्ह्या शेऱ्या वलांडत भटुना घर जायी भिडनात!मझारम्हायीन कावड लायेलं व्हतं!कडी वाजाडी!कडी हुगाडानां आवाज काने पडना!कोनतरी कावड!दार हुगाडता खेपे नेम्मन घरम्हायीन भटूनीं दारमा दख व्हतं!सरस्लें दखता बरोब्बर चमकायी गयता!घाबऱ्या घुबऱ्या घाबरी व्हयी गयता!सरस्नी भटुले इचार,'घरमा येवू कां भटू?' भटुनी सरस्लें घरमा लिस्नी चटई टाकी बसाडं व्हतं!भटूनी 'नानाsss' करीस्नी आवाज दिंथा!...

सयपाक घरम्हायीन भटूनंबाप भाहेर उनात!दोन्ही हात वल्ला पिटना भरेलं व्हतात!दोन्ही हातस्वरी परातम्हा पानी टाकी पिट मयेल नां हात दिखी ऱ्हायंतात!भटुनी बापसंगे वयख करी दिंथी,'नाना या मन्हा सायन्हा शिंदे सर सेतस!' आसं सांगी सरस्लें पेवागुंता पानी लेवालें घरमा पयना व्हता!भटूनीं माथनीम्हायीन गल्लास भरी पानी दिन्ह आनी दुकानावर च्यानीं पुडी,साखर लेवालें चालना ग्या!

तवलोंग दोन्हीस्न् बोलनं सुरू व्हयी जायेल व्हतं!भटूनां बाप नाना, बोली ऱ्हायंतात,' सर काय करतंस, नशीबचं खोटं से मन्ह!देड वरीस पहिलेंग कॅन्सरन्हा आजारम्हा बाईन्ही आवरी लींथं!आजारम्हा पानींगत पैसा खर्च व्हयी ग्यात!उपेग व्हयना नही!बाई मातर सर्गे महाल बांधालें चालनी गयी!मोठी पोरन्ह लगीन व्हयी जायेल से!तिन्हा सवसार सोडी कितला दिन आठे आम्हना बाप-बेटान्ह्या भाकऱ्या थापी!मन्ह जाऊद्या पन या कव्या पोऱ्यान्हा मनवर गह्यरा आसर व्हयी जायेल से!मन लहीरिंगत वागी ऱ्हायना!बाई गमी गयी तव्हयं दुन्यान्ह मनमन कर्ज व्हयी जायेल व्हतं!दारशे बांधेल दूध दुबती गाय मांगला वरीस्लें इकी टाकी!त्या वासरूवर भटूनां उज्जी जीव व्हता! गायवर जीव व्हता!आक्सी वावरम्हायीन तोचं चारा कापी लयी यें!चारा पानी दावत ऱ्हायें!वासरू च्यारीपाय उड्या मारे, त्यांनसंगे भटू भी उडया मारी खेयेत ऱ्हायें!गाय चालनी गयी!त्यान्ही माय चालनी गयी!भटूनां घरमा जीव गुदमराले लागे!उंडूक दाटी यें!गुमसुम व्हयी हुनकी हुनकी रडी लें!मी गंजज सावा समजाडी सांगं मी सोता छातीवर दगड ठी जगी ऱ्हायनू!पन भटूनीं मनलें इतलं लायी लेयेलं से का आते आवरात नही!कोनले जुमानत नयी!कोनं निरानाम आयकतं नही!त्यानं त्यान्हा धटपना करत बठस!कोनले ध्यानमा लेत नयी!दिनभर कायभी धंगडा करतं बठस!कव्हयं मव्हयं दिय्यावर ऱ्हातं नही,बेफाम व्हयी भितडालें डोकं ठोकत बठस!कव्हयं भाहेरतीन घर बठी उपादी लयी येस!सायमा नेम्मन जात नयी!गया तें तठे मारामाऱ्या करतं बठस!बाहेरनां झगडा घर लयी येस!गन समजाडी सांग!आते आवरात नयी!काय करो हायी गिरजदारीम्हा पडी जायेल से सर!' नाना बोलताबोलता डोयांस्म्हायीन आंसू गायेत कुडापा करी ऱ्हायंतात!

तितलम्हा दुकानावरतून भटू यी लाग्ना व्हता!नानान्ही मांगे तोंडं फिरायी आसूं पुसी इशय बदली लिंथा!अंधारं पडी जायेल व्हतं!जेवाना टाइम व्हता!शिंदे सर 'च्या' पीस्नी नींघनातं,भटू चौक पावूतं संगेमांगे पोहचाडालें गयथा!चालता बोलता सरस्नी इचारी लिंथ,'भटू गाय कोनले देयेलं सें रें ?' गायन्ह नाव काढताखेपे भटूनां डोयास्मझार टचकन पानी यी लाग्न व्हतं!गाय गावम्हाच इकेल व्हती!सर त्यास्ना घर निंघी गयतात!

दोन दिन मझारम्हा ग्यात!एक रोज दिनमाव्यांना वखतले भटून्ही त्यान्ही धव्वी वाकडशिंगी आवडती गाय आंगनंम्हा दखताचं हारके भरी नाचालें लाग्ना व्हता!आंगनंम्हा त्यानंधल्ला नाना आनी शिंदे सर उभा व्हतात!मुक्या पोऱ्यालें आभाय मोके व्हयी जायेल व्हतं!भटूनां दिलंम्हा उठेल वांवंधनं जमीनवर बठी जायेलं व्हतं!सुखन्हा चांद भटूनां दारसे उगेलं व्हता!कठोर दिलना नाना भटूलें आंगवर उखली गह्यरी गह्यरी रडी ऱ्हायंतातं!शिंदे सर बाप बेटाना आनंद दखी हासी खुशी घर निंघी ग्यतात!त्या दिन शिंदे सरस्लें एकदम सुखूनन्ही जप लाग्नी व्हती!मव्हरे एप्रिल महिनाम्हा शाळान्ह्या परीक्षा व्हयन्यात!में महिनाम्हा निकाल लाग्ना व्हता!भटू आठवीन्हा चार वर्गास्मझार पहिला येल व्हता!शिंदे सर आनंदम्हा व्हतात!शिक्षक आनंदन्ही पाम्हेर ऱ्हातंस!विध्यार्थीस्ना इकासम्हा आक्सी चांगलं तें पह्यरत ऱ्हातसं!विध्यार्थी देशन्हा भावी नागरिक ऱ्हास!शिंदे सरस्ना शिक्षकी आनभवनीं हायी खरी कमायी व्हती!
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
*****************************.. नानाभाऊ माळी
मु.पो.ता. शिंदखेडा, जि. धुळे
(ह.मु.हडपसर, पुणे-२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२३ जानेवारी २०२५

#खान्देशीबोली #आहिराणीकथा #खान्देशीगौरव #आहिराणीलेखन #मातृभाषा #खान्देशीकथा #ग्रामीणजीवन #खान्देशीसंस्कृती #लोककथा #आहिराणीसाहित्य

गिरड गावातील तरुणी अंजली कोळी 'बीएसएफ'मध्ये भरती, ग्रामस्थांकडून गौरवअंजली कोळीचा प्राचार्य व ग्रामस्थांकडून सत्कारगिरड ...
24/01/2025

गिरड गावातील तरुणी अंजली कोळी 'बीएसएफ'मध्ये भरती, ग्रामस्थांकडून गौरव

अंजली कोळीचा प्राचार्य व ग्रामस्थांकडून सत्कार

गिरड (ता. भडगाव), ता. २१ – गिरड येथील रहिवासी आणि जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी अंजली कोळी ही नुकतीच सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये भरती झाली आहे. तिच्या या यशाबद्दल गावात आनंद व्यक्त केला जात असून, प्राचार्य आणि ग्रामस्थांनी तिचा सन्मान केला.

प्राचार्यांनी दिला शाल व पुष्पगुच्छ

जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. पी. पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अंजली कोळीचा सत्कार केला. यावेळी नितीन पाटील, सचिन बोरसे, रमेश धनगर आणि सचिन कोळी यांसह मान्यवर उपस्थित होते.

कष्टकरी कुटुंबाची मुलगी गावाची शान

अंजलीचे आई-वडील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. त्यांच्या कष्टाचे फळ अंजलीने आपल्या यशाने गोड केले आहे. गिरड गावातील पहिली महिला बीएसएफ सैनिक होण्याचा मान अंजलीने मिळवला आहे.

संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थांचे कौतुक

अंजलीच्या या यशाबद्दल कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, उपाध्यक्षा डॉ. पूनम पाटील, सचिव प्रशांतराव पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी तिचे कौतुक केले. ग्रामस्थांनीही अंजलीच्या यशाचे जोरदार स्वागत केले आहे.


#गावाचा_आभिमान #महिला_सक्षमीकरण #सीमा_सुरक्षा_दल #प्रेरणा #कष्टाला_यश #सन्मान #गिरडगौरव

24/01/2025

Construction

21/01/2025
कळसूबाईच्या शिखरावर आदिवासी साहित्याचे वादळराजूर येथे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन संपन्नमहाराष्ट्रातील सर्वात उंच...
20/01/2025

कळसूबाईच्या शिखरावर आदिवासी साहित्याचे वादळ

राजूर येथे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन संपन्न

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, कळसूबाई, याच्या जवळील अँड. देशमुख महाविद्यालयात 19 जानेवारी रोजी राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. राजूरची लाल तांबट माती आदिवासी साहित्यिकांची खाण म्हणून ओळखली जाते. या भूमीने अनेक नामांकित आदिवासी साहित्यिक दिले आहेत.

नामांकित साहित्यिकांचा समृद्ध वारसा

राजूरच्या मातीत डॉ. गोविंद गारे, डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. संजय लोहकरे, तुकाराम धांडे, राजूभाऊ ठोकळ, डॉ. सुनील धनकुटे, राजू शनवारी, सीता भोजने, कैलास धिंढळे, दशरथ भोये यांच्यासारखे साहित्यिक घडले. या साहित्य संमेलनाचे संयोजक तानाजी सावळे यांनी या परंपरेला पुढे नेले.

साहित्य संमेलनाचे उद्घाटन

साहित्य संमेलनाचे अध्यक्षत्व बिगर आदिवासी असलेले, परंतु आदिवासी विचारधारा बाळगणारे राकेश वानखेडे यांनी केले. स्वागताध्यक्ष वसंत पिचड यांनी प्रमुख भूमिका मांडली, तर उद्घाटन साहित्यिक संजय दाभाडे आणि भोराबाई गांगड यांच्या हस्ते झाले.

पहिल्या सत्रातील विचारमंथन

पहिल्या सत्रात आदिवासी साहित्य व त्यातील कथा, कविता, तसेच आजची वास्तव स्थिती यावर चर्चा झाली. डॉ. सखाराम डाखोरे, आदिवासी साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुनील गायकवाड, आणि नितीन तळपळे यांनी यावर आपली मते मांडली. राकेश वानखेडे यांनी आदिवासी आणि दलित साहित्य प्रवाहावर भाष्य केले.

दुसऱ्या सत्रातील परिसंवाद

दुसऱ्या सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. "आदिवासी साहित्य आणि त्याची लक्षणे" या विषयावर साहित्यिक संजय दाभाडे, राजूभाऊ ठोकळ, डॉ. बापू चंदनशिवे, व रवी बुधर यांनी चर्चा केली.

तिसरे सत्र: काव्य महाकरंडक

तिसऱ्या सत्रात कवयित्री सीता भोजने यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी राज्यस्तरीय महाकाव्य संमेलन पार पडले. देवचंद महाले यांच्या कवितेला राज्यस्तरीय काव्य महाकरंडकाने सन्मानित करण्यात आले.

आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण

सह्याद्रीच्या कळसूबाईच्या अंगाखांद्यावर पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधव व माता-भगिनींनी आदिवासी ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला. त्यांनी आपल्या परंपरेची कला सादर केली.

मान्यवरांची उपस्थिती

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी संमेलनात उपस्थित राहून आदिवासी साहित्याबद्दल आदर व्यक्त केला.

संमेलनाच्या यशामागील सहकार्य

तानाजी साळवे, राजू ठोकळ, विशाल पोटीन्दे, जगन्नाथ साळवे, प्रा. नितीन तळमडे, जयेश पाटकर, सखाराम गांगड, जयंत पटेकर, जालिंदर आडे तसेच राजूर परिसरातील आदिवासी बांधवांनी या साहित्य संमेलनाच्या यशासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.



#कळसूबाईशिखर #आदिवासीसाहित्य #महाराष्ट्रसंस्कृती #सांस्कृतिकवारसा #आदिवासीकला #साहित्यसंमेलन #परंपरागतवेशभूषा #निसर्गआणिसंस्कृती #शिखरसोहळा

18/01/2025

Construction

Address

Erandol
425109

Website

https://khandeshvahini.in/

Alerts

Be the first to know and let us send you an email when खान्देशी भाऊ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category