४ओळी

४ओळी माझ्या स्वलिखीत ४ओळींचं स्वतंत्र पेज

या पानावर माझ्या सवलिखीत ’४ओळी’ प्रकाशीत केल्या जातील ! कोणत्याही साहित्याची चोरी ही त्या साहित्याची चोरी नसून तुमच्या प्रामाणिकतेची तुम्हीच केलेली चोरी आहे.

साहित्याचा आदर करा आणि त्या त्या साहित्यिकला ते ते श्रेय द्या !

धन्यावद ! :)

28/04/2024

Confirm तिकीटमध्ये ही कधीकधी promotion मिळतं हो हे खरंय !

फुल्लं रिजर्वेशन असतानाही तिकीट booking करणाऱ्या माझ्या अतिउत्साहाची कोकणकन्येच्या तात्काळ quota ने तितक्याच अतिऊत्साहाने हकालपट्टी केली.

हा जिव्हारी लागलेला घाव सावरंत मी डोळे मिटले आणि स्वप्नांत एखादी परी दिसावी तशी लालपरी अवतरली. डोक्यावर सामानाची रिंग, १ हातात F1 वालेही नांग्या टाकतील अशा पध्दतीने स्टेअरिंग धरलेला आणि आणि दुसऱ्या हातात जागतिक प्रसिध्दी लाभलेला तंबाखु तोंडात टाकणारा चालक, कितीही टेंशन असलं तरी प्रवाशांचं तिकीट शांतपणे पाहणारा वाहक हे जणु मला खुणावत होते, ''काय रे ? विसरलंस आमका? ''

बस्स मग काय ... डोळे उघडले माझे.

मोबाईल हातात घेतला आणि पुन्हा डोळे मिटुन लालपरी चं स्मरण केलं. डोळे उघडुन लगबगीने MSRTC चं App उघडलं. एरवी गंडणारं App झटकन् उघडलं मी ही लगबगीने तिकीट बुक करायला बस निवडली... आणि अहो भाग्यं चमात्कार व्हावा तशी १ seat available होती ती ही शेवटची. माझ्या मनाला जितका आनंद झाला असेल ना तितकंच दु:ख माझ्या पाठ आणि कमरेखालच्या भागाला झालं, जास्त विचार करण्यात वेळ घालवायचा नव्हता सुदैवाने तिकिट तर book झालं. पण रात्रंभर माझं मन, पाठ आणि कमरेखालचा भाग यांची वायफळ महाचर्चा रंगली होती.

रात्रीच्या महाचर्चेचा hangover सकाळपर्यंत उतरला नव्हता, संध्याकाळी लालपरीत पाय ठेउन त्या seat वर जाईपर्यंत ही महाचर्चा पुन्हा चालू झाली.

मी मुलीबरोबर निमुटपणे त्या seat वर विसावलो. वाहकाने तिकिट पाहिलं आणि मी त्यांना विनंती केली ''seat adjust होते का बघाल का? Plz''. त्यांनी खचलेल्या पण तितक्याच आत्मविश्वासी आवाजात प्रत्युत्तर दिलं,'' बघुया काय ता''. खरंतर त्याक्षणी ते ३ शब्दं मला कोणत्याही नेत्याने दिलेल्या आश्वासनापेक्षाही जास्त भक्कम आणि धाडसी वाटले. मावळत्या आशेने प्रवास सुरु असतानाच पुढच्या पाच मिनिटांत १कुटुंब मागच्या सीटवर आलं. त्या कुटुंबातील १ महिलेची seat नेमकी चालकाच्या मागे होती. पण कुटुंबातील ईतर मंडळींना सोडुन ती महिला पुढे बसण्यास तयार नव्हती, तितक्यात वाहक आले आणि सोप्प्या भाषेत मांडवली करुन त्यांना म्हणाले,'' तुमी तिथे जातालात की ह्यांका जाउक सांगु? ''. मी, ते कुटुंब आणि सहप्रवासी यांची अवस्था review घेतलेला खेळाड, निर्णय दिलेला पंच आणि दोन्ही संघ यांच्यासारखी झालेली, पण इथे माझ्याकडे निर्णयासाठी ५०% scope होता. मी क्षणाचाही विलंब न करता म्हणालो, '' माका चलतला, ह्यांका चलतला काय? '' त्या महिलेने आणि तिच्या अहोंनी काहीही नं म्हणता मला फक्त स्माईल दिली आणि दोन्ही संघांच्या बाजुने निर्णय लागला आणि सामना बरोबरीत सुटला. मी उभा राहिलो तसा पाठ आणि कमरेच्या खालच्या भागाने सुटकेचा निश्वास सोडला अगदी मनसोक्त
. आणि confirm तिकिटावर मिळालेलं promotion बघुन बऱ्याच जणांच्या भुवया ऊंचावल्या आणि मला बसमध्ये नाही तर corporate office मध्ये असल्याचा क्षणिक भास झाला.

©•••• ••• •• प्रथमेश सुरेश शिरसाट
#दृष्टीत_टिपलेली_दुनिया

05/05/2023

हापूसच्या प्रेमात जग सारे
आम्हीच ते रायवळ वेडे
चवीतला गोडवा तर वेगळाच्
पैसेही वाचतात थोेडे...

#४ओळी
©•••• ••• •• प्रथमेश शिरसाट

24/01/2023

अवकाळी बहरलेलं फुल
तात्तपुरतं समाधान देतं
वर आकाशाकडे पाहिल्यावर
मन मात्र हेलावून जातं

#४ओळी
©•••• ••• •• प्रथमेश शिरसाट

22/01/2023

कडवं बनतं चार ओळींचं
चार ओळींचाच परिच्छेद
फक्त रचना वेगळी
म्हणुनंच असेल हा भेद

#४ओळी
©•••• ••• •• प्रथमेश शिरसाट

नमस्कार,लक्ष्मिपूजनाच्या दिवशी कलाविष्कारची दिवाळी ई-अंकाची १३ वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आलीखालील लिंकवर क्लिक करुन आप...
29/10/2022

नमस्कार,

लक्ष्मिपूजनाच्या दिवशी कलाविष्कारची दिवाळी ई-अंकाची १३ वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली

खालील लिंकवर क्लिक करुन आपण कलाविष्कार, दिवाळी ई अंक, ऑक्टोबर - २०२२ नि:शुल्क डाऊनलोड करू शकता.

MediaFire is a simple to use free service that lets you put all your photos, documents, music, and video in a single place so you can access them anywhere and share them everywhere.

27/11/2021

खरंच, रडावं लागतं का?
मन हलकं व्हायला
मग, त्या आसवांनी कोणाला शोधायचं
आपलं मनोगत सांगायला ?

#४ओळी
©•••• ••• ••प्रथमेश सुरेश शिरसाट

25/05/2021

प्रतिबिंब माझेच होते
त्या आरश्याच्या तुकड्यांवर
कठीण होते स्वत:लाच ओळखणे
जमिनीवर विखुरल्यावर

#४ओळी
©•••• ••• •• प्रथमेश सुरेश शिरसाट

19/04/2021

हवाहवासा वाटणारा मृत्यु
हेच एक शाश्वत सत्य वाटायचं
आज स्मशान पाहिल्यावर
राहुनंच गेलं डोळे मिटायचं

©•••• ••• •• प्रथमेश सुरेश शिरसाट
#४ओळी

04/04/2021

स्वप्नं अनेक आहेत
पण कोणती पहायची ?
डोळे मिटल्यावर
संधी कुठे असते निवडायची?

©•••• ••• •• प्रथमेश शिरसाट
#४ओळी

02/04/2021

कोणांत कसं मिळायचं
हे रंगांना कुठे ठाऊक असतं
आपणंच त्यांची सरमिसळ करतो
खरंतर त्यांचं अस्तित्व अलिप्तंच असतं

©•••• ••• •• प्रथमेश शिरसाट
#४ओळी

08/02/2021

गुलाब खरेदीची गर्दी
यंदा दिसलीच नाही
कोमेजलेला गुलाबंही
पुन्हा उमलला नाही

•••• ••• •• प्रथमेश शिरसाट

#४ओळी

14/12/2020

ऐन हेमंतात
वर्षा ऋतू घुसू पाहतोय
मला कसली फिकीर
मी तरा चहाचा घोट घेतोय

#४ओळी
•••• ••• •• प्रथमेश शिरसाट

कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी ... यंदा आषाढी एकादशीनिमित्त केलेली अक्षररचना. विठुरायाला समर्पित 🙏🏽
01/07/2020

कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी ... यंदा आषाढी एकादशीनिमित्त केलेली अक्षररचना. विठुरायाला समर्पित 🙏🏽

16/06/2020

संपवून टाकावं का सगळं ?
हा विचारंच संपवता यायला हवा
पण तो विचार करायलाही
थोडा वेळ मिळायला हवा

#४ओळी
©•••• ••• •• प्रथमेश सुरेश शिरसाट

13/06/2020
03/01/2020

सावित्रीच्या कष्टानं
आज सावित्रीच घडताहेत
शिकलेल्या सावित्री मात्र
त्या सावित्रीलाच विसरताहेत

©•••• ••• •• प्रथमेश शिरसाट

03/01/2020

झाड एकटे उभे गर्दीत
थंडीत त्याला सांभाळेल कोण ?
निसर्गानेच घेतलाय वसा तयांचा
बनून धुक्याचे पांघरुण

©•••• ••• •• प्रथमेश शिरसाट

10/12/2019

मला ही लिहीता आलं असतं
लिहीलेलं वाचता अालं असतं
वाचलेलं सांगता आलं असतं.. जर मला बोलता अालं असतं

#४ओळी
©प्रथमेश शिरसाट

Address

Dombivli
421203

Alerts

Be the first to know and let us send you an email when ४ओळी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ४ओळी:

Share