NNTV Marathi

NNTV Marathi NNTV PRIVATE LIMITED ACN CABLE NETWORK CHANNEL NO 98
(8)

12/12/2023

महाराष्ट्र का सब से बड़ा आंदोलन

https://youtu.be/QIKaQIIIOeg?si=93a8mHDgO8f2-5Ni
12/12/2023

https://youtu.be/QIKaQIIIOeg?si=93a8mHDgO8f2-5Ni

मराठों को नहीं मिलेगा कभी भी आरक्षण ! आरक्षण के लिए रुला देने वाला बयान

15/11/2023

I hope this message finds you well. I am writing to share an important press release with you regarding the Shutdown in the Dharampeth Zone.

I've attached a press release (in both English and Marathi) regarding the same. NMC-OCW announces the scheduled cleaning of various water tanks within the Dharampeth Zone. The cleaning schedule is as follows:

(A) Friday, November 17, 2023: Seminary hills ESR

(B) Saturday, November 18, 2023: University Campus Sump

(C) Monday, November 20, 2023: Dabha ESR

(D) Tuesday, November 21, 2023: Tekdi Wadi Sump

Kindly find the attached document for the Press Release. In case of any additional information related to the press release, please do not hesitate to contact me.

We appreciate your attention to this matter and look forward to the possibility of your coverage. Thank you for your time and consideration.

29/10/2023

मुस्लिम ने शुरू किया नशा मुक्ति संकल्प । Nashe Ke Khilaaf Shuru Kiya Abhiyaan

29/10/2023
21/10/2023

आज काही कामानिमित्त इंदोरा या ठिकाणी जात असताना एक Go-Gas चा पंप मी पाहिला आणि डोक्यात सहज विचार आला की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक राहतात आणि आजू बाजूला रुग्णालय आणि व्यवसाय करणारे लोक आहेत त्या ठिकाणी प्रशासनाने ह्यांना मान्यता कशी दिली असावी आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची यांनी noc घेतली का हा विचार डोक्यात आला आणि मी सहज त्याच्या बाजूला असणाऱ्या Hope रुग्णालयात आणि काही नागरिकांना जाऊन विचार पुस केली तर त्यांनी सांगितले की आम्ही यांना कोणतीच noc दिलेली नाही मग प्रश्न निर्माण होतो की जर भविष्यात या ठिकाणी काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण ? या ठिकाणी मोठ्या प्रमाणत राहणाऱ्या परिवाराची काळजी कोण घेणार.?
कारण Go - Gas हा ज्वलनशील आहे कधीही स्पोट होऊ शकतो...?
माझा हा प्रश्न आहे की अशा ठिकाणी या पंपांना परवानगी देणे योग्य आहे का..? आणि योग्य आहे तर लोकांची परवा कोण करणार ..? असे पंप प्रत्येक शहरमध्ये आहेत याची चौकशी झाली पाहिजेत.🙏🏻

टीम एन एन टी वी

  नागपूर महानगरपालिका, नागपूर(जनसंपर्क विभाग)प्रसिद्धी                        ता. २० ऑक्टोबर २०२३‘स्वप्ननिकेतन’च्या ४८० ...
21/10/2023

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी ता. २० ऑक्टोबर २०२३

‘स्वप्ननिकेतन’च्या ४८० सदनिकांसाठी संगणकीय सोडत (लॉटरी) जाहीर
-

नागपूर, ता. २१ :

नागपूर महानगरपालिकेच्या झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या प्रकल्पातील ४८० सदनिकांसाठी शनिवारी (ता. २१) रोजी संगणकीय सोडत (लॉटरी) जाहीर करण्यात आली. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णतः पारदर्शक अशा संगणकीय सोडतीची प्रक्रिया पार पडली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मनपाचे मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, उपायुक्त श्री.निर्भय जैन, माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक श्री. महेश धामेचा, अधीक्षक अभियंता श्री मनोज तालेवार, सदनिकांचे विकासक श्री. गौरव अग्रवाल, इंडस इंड बँकचे विभागीय व्यावास्थ्पक श्री. सुनील उकळकर, एनईएमएलचे श्री. अक्षय भोसले, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्नील लोखंडे, कार्यकारी अभियंता सर्वश्री. सुनील उईके, अजय पाझरे, सुनील उईके, प्रतीक गायकवाड, श्रीमती पुष्पा जोगे, वैजयंती आडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संगणकीय सोडत प्रक्रियेद्वारा ज्यांची निवड झाली अशा सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर सदनिकांचे बांधकाम पूर्ण करून, सदर सदनिका त्यांना मालकांना सुपूर्द करू असे सांगितले. तरी ज्यांची निवड झाली अशा सर्वांनी पुढील कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करीत मनपाला सहकार्य करावे असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले.

प्रारंभी मनपाचे मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या प्रकल्पाची माहिती देत प्रकल्पाचे २० टक्के कार्य पूर्ण झाले असून, पुढील डिसेंबर पर्यंत संपूर्ण सदनिकांचे कार्य पूर्ण होऊन लाभार्थ्याना राहायला उपलब्ध होतील असे सांगितले. तसेच या सदनिका खरेदी करण्याकरिता ऑनलाईन माध्यमातून मनपाच्या पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित ४८० सदनिकांसाठी १८१९ अर्ज प्राप्त झाले असल्याचे सांगितले. याशिवाय पूर्णपणे पारदर्शक अशा संगणकीय सोडतीच्या प्रक्रियेची माहिती देखील श्री. राजीव गायकवाड यांनी दिली.

ज्या नागरिकांनी विहित मुदतीत नोंदणी शुल्कासह अर्ज सादर केले आहेत, असे सर्व नागरिकांनी संगणकीय सोडतीसाठी उपस्थित होते. संगणकीय सोडत सुरू करण्यापूर्वी संपूर्ण प्रक्रियेची माहिती असलेली चित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली. तसेच प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सदर करण्यात आले. नंतर मनपाचे माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक श्री. महेश धामेचा यांच्या हस्ते संगणकीय सोडत प्रक्रियेसाठी लागणारे क्रेडेनशिअलचा बंद लिफाफा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सुपूर्द करण्यात आला. एनईएमेलचे श्री. अक्षय भोसले यांनी या क्रेडेनशिअलद्वारे सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली. चार फेरीत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, लाभार्थ्यांची यादी व एकत्रित प्रतीक्षा यादी प्रदर्शित करण्यात आली. संगणकीय सोडतीची प्रक्रिया पूर्ण होताच ज्या लाभार्थ्यांना सदनिका प्राप्त झाली अशा सर्वांना नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे सदनिका माहिती देण्यात आली. निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी व एकत्रित प्रतीक्षा यादी नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी व एकत्रित प्रतीक्षा यादी मनपातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कक्षात देखील प्रदर्शित केली जाणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामठी रोडवरील पिवळी नदी जवळ मौजा वांजरा येथे नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘स्वप्ननिकेतन’ हे ४८० सदनिकांचे प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामध्ये २८.२१ चौ.मी./३०३.६५ चौ. फुट चटई क्षेत्रफळ असलेले 1BHK सदनिका आहेत. सदनिकेची एकूण बांधकामाची किंमत रु. ११,५१,८४५ (अंदाजीत) एवढी असून प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत शासनातर्फे रु. २,५०,००० रुपये अनुदान असून सदनिकेचे विक्री मूल्य रु. ९,०१,८४५ रूपये आहे. या व्यतीरिक्त इलेक्ट्रीक मिटर, जीएसटी, रजीस्ट्री किंमत, स्टॅम्प डयुटी, सोसायटी डीपॉझीट, ॲग्रीमेंन्ट सेल डीड करीता अतिरिक्त शुल्क अदा करावे लागेल.

प्रकल्पातील ४८० सदनिकांमध्ये ५० टक्के अर्थात २४० सदनिका अराखीव असून १३ टक्के अनुसूचित जाती, ७ टक्के अनुसूचित जमाती, ३० टक्के इतर मागास प्रवर्ग आणि ५ टक्के –समांतर आरक्षण दिव्यांग प्रवर्गाकरिता राखीव आहेत. प्रकल्पामध्ये बाग, कम्यूनिटी हॉल, लॉबी, लिफ्ट सह इतर सुविधाचा समावेश आहे #नागपूर

   #नागपूर महानगरपालिका, नागपूर(जनसंपर्क विभाग)प्रसिद्धी                        ता. 21 ऑक्टोबर 2023दीक्षाभूमी येथील मनपा...
21/10/2023

#नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी ता. 21 ऑक्टोबर 2023

दीक्षाभूमी येथील मनपा नियंत्रण कक्षाचे लोकार्पण

- मान्यवरांच्या हस्ते माहिती पुस्तकाचे अनावरण

नागपूर, ता.21

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी अभिवादनास येतात.अनुयायांना कसल्याही प्रकारची असुविधा होऊ नये याकरिता नागपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते लोकार्पण व माहिती पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी मनपातर्फे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मनपा नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे.

या कक्षाच्या लोकार्पण प्रसंगी सर्वश्री मुख्य अभियंता श्री राजीव गायकवाड उपायुक्त रविंद्र भेलावे,उपायुक्त घनकचरा व्‍यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले,सहायक आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता श्री मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्री. अजय मानकर, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ विजय जोशी, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे, श्रीकांत वाईकर यांच्यासह उपद्रव शोध पथकाचे जवान, मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांची सुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्णत: सज्ज झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यांनी संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेउन मुलभूत सुविधांमध्ये त्रुटी राहू नयेत याची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी दीक्षाभूमी परिसराची पाहणी करीत व्यवस्थेचा आढावा घेतला. या प्रसंगी त्यांनी परिवहन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देत उपायुक्त श्री. सुरेश बगळे यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

२४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा मुख्य समारंभ होणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांच्या संख्या लक्षात घेता २२ ते २५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दीक्षाभूमीवर येणा-या मार्गावर चार ठिकाणी मनपाचे आरोग्य तपासणी केंद्र, २४ तास रुग्णवाहिका, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेसाठी ६००च्या वर सफाई कर्मचा-यांची नियुक्ती, मदतीसाठी साहित्यभूषण अण्णाभाउ साठे स्मारकाजवळ नियंत्रण कक्ष, अग्निशमन पथक, शौचालयांची व्यवस्था, निवारा व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, परिवहन व्यवस्था आदी सर्व सुविधा मनपाद्वारे दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांसाठी करण्यात येत आहे.

दीक्षाभूमीकडे येणा-या मार्गांवर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावले जात आहेत. याशिवाय बाहेरून येणा-या अनुयायांना दीक्षाभूमीवर येण्यासाठी किंवा कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला जाण्यासाठी मनपाच्या परिवहन विभागाद्वारे विशेष ‘आपली बस’ ची व्यवस्था करण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरामध्ये सतत स्वच्छता राखली जाईल यासाठी ठिकठिकाणी कचरा कुंडींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय तीन पाळीमध्ये एकूण ६६४ स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच एकूण एक हजार कर्मचारी सेवेत तैनात आहेत. दीक्षाभूमी मार्गावर पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी १४० नळांची व्यवस्था करण्यात आली आहे. माता कचेरी परिसर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) येथे निवारा / विश्रांती गृहाची निर्मिती मनपाद्वारे करण्यात येत आहे. याशिवाय आपात्कालीन स्थितीमध्ये दीक्षाभूमी जवळील शाळांमध्ये निवारा व्यवस्था करण्यात येणार आहे.

मुलभूत सुविधांमध्ये महिला आणि पुरूषांसाठी ९०० पेक्षा अधिक स्वतंत्र प्रसाधन गृहांची व्यवस्था आयटीआय परिसर, दीक्षाभूमी परिसर आणि मध्यवर्ती कारागृहाच्या जागेमध्ये करण्यात आलेली आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा आणि त्यांना भेडसावणा-या अडचणी सोडविण्यासाठी साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक शेजारी मनपाचे नियंत्रण कक्ष उभारण्यात येत असून हे कक्ष २४ तास कार्यरत असणार आहे. तसेच नियंत्रण कक्ष येथिल दूरध्वनी क्रमांक - 0712/2432998 नागरिकाच्या सेवेत सुरू करण्यात आला आहे.

दीक्षाभूमीवर येणा-या सर्व बौद्ध अनुयायांना सुविधा प्रदान करण्यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे. दीक्षाभूमीवर येणा-या सर्व नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. संपूर्ण दीक्षाभूमी परिसर प्लास्टिकमुक्त घोषित करण्यात आलेला असून नागरिकांनी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळावा. परिसरात स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारी सेवारत राहणार आहेत. नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून कुठेही कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. इतरत्र कुठेही कचरा न टाकता तो परिसरातील कचराकुंडीमध्ये टाकावा व मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. या प्रसंगी जितेंद्र सिंह तोमर, रामभाऊ तिडके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

12/09/2023

■ सूचना के अधिकार कानून को झंड बनानेवाले , महाभ्रष्ट जन सूचना अधिकारी को भावपूर्ण श्रद्धांजलि..💐💐💐
नोट:- शासकीय अधिकारीं हा कोणताही पक्षाचा नसतो आणि मनपा. चे सहा. अधीक्षक डोमा भडंग यानी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत मा. किरण जी पांडव यांची व्हाट्सएप वर डीपी ठेवून नागरिकांसोबत उद्धाटपने बोलतो.

20/07/2023

Manipur Ladies Ko Bina Kapde Ke Ghumaya Road Pe। मणिपुर में महिलाओं ओर बच्चों के साथ अत्याचार चरम पे पहुंचा

*विभागीय क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधा निर्माण करणार* - आयुक्त  विजयालक्ष्मी बिदरी  नागपूर दि. 18 जुलै : विभागीय क्रीडा...
18/07/2023

*विभागीय क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधा निर्माण करणार*
- आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी
नागपूर दि. 18 जुलै : विभागीय क्रीडा संकुलामध्ये खेळांसाठी अद्ययावत व सुसज्य सुविधा निर्माण करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल उभारणीच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त आयुक्त तथा विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या उपाध्यक्ष विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्या बोलत होत्या. महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री यांचे प्रतिनिधी संदीप जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जनार्दन भानुसे, महानगरपालिकेचे नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटिल, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, पोलीस निरीक्षक विजय माहुरकर बैठकीला उपस्थित होते
बैठकीत वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याबाबत तसेच आमंत्रित सदस्य म्हणून राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक व खेळाडूंची निवड करण्यासंबंधी विविध मानकांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी विभागीय कार्यकारी समितीचे सदस्य तसेच क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

18/07/2023

शालेय जिल्हा,तालुका मनपास्तरीय क्रीडा स्पर्धा;
शारीरिक शिक्षकांच्या बैठकांचे आयोजन

नागपूर,दि.18 : राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद नागपूर अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2023-24 या सत्रातील शालेय तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन व नियोजन तसेच ऑनलाईन प्रक्रियेबाबत मार्गदर्शनाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील तसेच उर्वरित जिल्हयातील सर्व शारीरिक शिक्षकांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा तसेच महाविद्यालयांच्या बैठकीचे आयोजन 19 जुलै दुपारी 3.00 वाजता धनवटे नॅशनल महाविद्यालयात करण्यात आले आहे. कामठी व मौदा तालुक्याची संयुक्त बैठक कामठीतील पोरवाल महाविद्यालयात 21 जुलै दुपारी 12.00 वाजता होणार आहे. नागपूर ग्रामीण व हिंगणा तालुक्याची संयुक्त बैठक 25 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाडी येथे होईल. कळमेश्वर तालुक्याची बैठक 25 जुलै रोजी दुपारी दोन वाजता नगर परिषद हायस्कूल कळमेश्वर येथे होईल. काटोल व नरखेड तालुक्याची संयुक्त बैठक 26 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता नबीरा महाविद्यालय काटोल येथे होईल. सावनेर 26 जुलै दुपारी 3.30 तालुका क्रीडा संकुल सावनेर, कुही 27 जुलै दुपारी 12.30 ऋखडाश्रम विद्यालय कुही , उमरेड व भिवापूर तालुक्याची संयुक्त बैठक 27 जुलै रोजी दुपारी 3.00 वाजता तालुका क्रीडा संकुल उमरेड, रामटेक तालुक्याची 28 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता ग्रामपंचायत नगरधन, रामटेक येथे तर पारशिवनी तालुक्याची बैठक 28 जुलै रोजी दुपारी 3 वाजता साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी येथे आयोजित करण्यात येणार आहे.
क्रीडा स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त शाळा व महाविद्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.
******

18/07/2023

बीज भांडवल योजनेचा मातंग समाजातील उमेदवारांनी लाभ घ्यावा
सात लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध
नागपूर,दि. 18: जिल्हयातील मातंग समाजातील बारा पोट जातीतील अर्जदारांना स्वयंरोजगाराचे संधी उपलब्ध करून देण्याकरिता व समजातील लोकांचे जीवनमान उंचावण्याकरिता महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली असून त्या अंतर्गत मातंग समाजातील बारा पोट जातीतील लोकांना आर्थिक सहाय्य दिल्या जाते. चालू आर्थिक वर्षात बीजभांडवल योजनेंतर्गत 50 हजार ते 7 लाखपर्यंत जिल्हयाला 50 कर्ज प्रकरणाचे उद्दिस्ट प्राप्त झाले असून बीज भांडवल योजनेचा मातंग समाजातील उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे
या योजनामध्ये महामंडळाचा सहभाग (अनुदानासह 45 टक्के ) लाभार्थी सहभाग 5 टक्के तसेच बँकेचा कर्जाचा सहभाग 50 टक्के असतो महामंडळाच्या बीजभांडवल रकमेवर 4 टक्के व्याज दर आकारण्यात येतो व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याज दर असतो. अनुदान योजने अंतर्गत रुपये 5 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविण्यात येते. त्यामध्ये महामंडळाचे अनुदान 10 हजार रुपये असून उर्वरित कर्ज बँकेचे असते. या योजनेचे 75 कर्ज प्रकरणाचे उद्दिस्ट प्राप्त झाले आहे.
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीतील असावा, वयोमर्यादा 18 ते 50 असावी, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, दोन फोटो, रेशन कार्ड आधार कार्ड , घर कर पावती, कोटेशन, व्यवसायासाठी जागेचा पुरावा, प्रकल्प अहवाल इ. आवश्यक कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आयटीआयकॉलेज समोर बी विंग रूम नं.302, दक्षिण अंबाझरी रोड नागपूर येथे कार्यालयीन वेळेत येऊन कर्ज प्रस्ताव सादर करावे.
*****

18/07/2023

महिला समुपदेश केंद्रासाठी संस्थाकडून प्रस्ताव आमंत्रित
नागपूर,दि.18 : महिला व बालकावर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी महिला समुपदेशन करणे, त्यांना संरक्षण व मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत महिला समुपदेशन केंद्र चालविण्यात येतात. ईच्छुक संस्थांनी समुपदेशन केंद्राचे प्रस्ताव तीन प्रतीत 24 जुलैपर्यंत सादर करावे.
प्रस्ताव पोलीस स्टेशन उमरेड तालुका उमरेड येथील केंद्राकरीता मागविण्यात येत असून योजनेअंतर्गत महिला समुपदेशन केंद्र मान्यता प्रस्ताव अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत. संस्था नोंदणी अधिनियम 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणी आवश्यक. नोंदणीकृत संस्था महिला व बाल विकास क्षेत्रात किमान तीन वर्षे कार्यरत असावी, अहर्ता असणाच्या पात्र इच्छुक संस्थांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक, विहित नमुना अर्ज, संस्थेची संक्षिप्त माहिती, संस्थेच्या योजना व कार्याबाबतचा मागील तीन वर्षाचा वर्षनिहाय वार्षिक अहवाल, संस्थेचा मागील तीन वर्षांचा सनदी लेखापालाची स्वाक्षरी असलेला वर्षनिहाय लेखा परीक्षण अहवाल, संस्थेने समुपदेशनाचे कार्य केल्याबाबतचा कार्याचा स्वतंत्र अहवाल, सांख्यिकी माहिती, संस्थेचे मागील तीन महिण्याचे बँक स्टेटमेंट, संस्थेची घटना व नियमावलीची (घटनेत महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे हा उद्देश असावा) साक्षांकित प्रत जोडावी. अधिक माहितीकरीता महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधावा.
******

18/07/2023

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतीदिनी अभिवादन
नागपूर,दि. 18: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सुरेश पेंदाम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि. प. चंद्रपूर, अतुल वासनिक, सहाय्यक संचालक, वित्त व लेखा, रमेश सहारकर, लेखाधिकारी, सुखदेव कौरती समाज कल्याण अधिकारी, श्री. भारत मेश्राम, वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी, मनोहर उचे, प्रमुख लिपिक, दिपक कुसरे, श्री. टापरे, छाया बागडे, लीना सरोदे, निखिल मेश्राम, शैलेश चव्हाण, दिनेश सुखदेवे, अर्चना सातघरे, सारीका बोरकर, जयश्री धवराळ, ज्योती मानके, विक्रांत उसरबरसे, गणेश बच्चे, हेमंत खवशी, विवेक दांडेकर, झोड, विवेक गजभिये, टेकचंद गाखरे, गजानन शेळके, अमित कांबळे, रितेश भारती, सागर चव्हाण आदी प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
******

18/07/2023

दहावी व बारावी परीक्षेसाठी दक्षता पथकाची नियुक्ती
नागपूर, दि. 18 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-आगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) लेखी परीक्षा 18 जुलै ते 8 आगस्ट तसेच आय.टी. व जी.के. विषयाची आनलाईन परीक्षा 9 आणि 10 आगस्ट तसेच माध्यमक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी परीक्षा 18 जुलै ते 1 आगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे. या परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापूर्ण वातावरणात परीक्षा पार पाडणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकारांना आळा घेण्यासाठी अधिका-यांची दक्षता पथकात नियुक्त करण्यात आली आहे. या पथकात स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
दक्षता पथकामध्ये उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी पुजा पाटील, नायब तहसिलदार सोनाली पुल्लरवार, नायब तहसीलदार अमित निंबाळकर आणि नायब तहसीलदार प्रतिभा लोखंडे यांचा समावेश करण्यात आला आहे. नियुक्त दक्षता पथक नागपूर जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर महत्वाच्या पेपरच्या दिवशी उपद्रवी केंद्रांना भेटी देत गैरप्रकारांना प्रतिबंध घालणार आहेत.
*****

आज नागपुर म म पा आपली बस कत्राटी कामगार संघ सलग्न भारतीय मजदूर याच्या वतिनेे manniya suresh bagle, upayukt parivahan vib...
17/07/2023

आज नागपुर म म पा आपली बस कत्राटी कामगार संघ सलग्न भारतीय मजदूर याच्या वतिनेे manniya suresh bagle, upayukt parivahan vibhag, NMC nagpur याना कर्मचारी याच्या मागणी चे निवेदन देन्यात आली आहे
त्यानी पुढाकार घेवुन आपल्या मागण्या प्रशासन समोर ठेवुन लवकरात लवकर निवारण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे

आज नागपुर म म पा आपली बस कत्राटी कामगार संघ सलग्न भारतीय मजदूर याच्या वतिनेे उप-मुख्यमंत्री याचे सचिवालय येथे सन्दिप जी ...
17/07/2023

आज नागपुर म म पा आपली बस कत्राटी कामगार संघ सलग्न भारतीय मजदूर याच्या वतिनेे उप-मुख्यमंत्री याचे सचिवालय येथे सन्दिप जी जोशी याना कर्मचारी याच्या मागणी चे निवेदन देन्यात आली आहे
त्यानी पुढाकार घेवुन आपल्या मागण्या प्रशासन समोर ठेवुन लवकरात लवकर निवारण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे

पोलिस उपायुक्त (डीसीपी) सुदर्शन यांनी लैंगिक गुन्हापासून बालकांचे संरक्षक कायदा याविषयी मुलांना मार्गदर्शन केले. पोलिस प...
14/07/2023

पोलिस उपायुक्त (डीसीपी) सुदर्शन यांनी लैंगिक गुन्हापासून बालकांचे संरक्षक कायदा याविषयी मुलांना मार्गदर्शन केले. पोलिस प्रशासनाद्वारे चालविण्यात येणा-या ‘पोलिस दिदी, पोलिस काका’ या अभियानांबद्दल त्यांनी माहिती दिली. कोणताही बालक लैगिंक छळाला बळी पडायला नको म्हणून ‘पोक्सो’ कायदा, 'गुड टच, बॅड टच' या सर्व विषयांवर ‘पोलिस दिदी, पोलिस काका’ यांच्या मार्फत शाळा-शाळांमध्ये जाऊन जागृती केली जाते, असेही त्यांनी सांगितले.



मुलांसोबत गैरव्यवहार किंवा अत्याचार झाल्यास त्यांना न्याय मिळावा याकरिता शासनाने आणलेल्या ‘पोक्सो’ कायद्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून कायदा व अधिकार याविषयी जनजागृती केली जाते. कोणत्याही व्यक्तीसोबत दुष्कर्म घडल्यास, ती व्यक्ती आर्थिक दृष्ट्या मागास असेल तर त्याला न्याय मिळावा याकरिता मोफत वकील दिला जातो. कोणत्याही बालकासोबत काहीही अनुचित व्यवहार झाल्यास त्याने न घाबरता लगेच आपल्या पालकांना, शिक्षकांना किंवा निकटवर्तीयांना सांगितल्यास गुन्हेगार लवकर पकडला जाईल, असा सल्ला जिल्हा वकील संघ अध्यक्ष श्री. रोशन बागडे यांनी विद्यार्थांना दिला.



या कार्यक्रमाचे संचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक श्री. आनंद मांजरखेडे यांनी केले. आभार विधी स्वयंसेवक श्री. मुकुंद आडेवार यांनी मानले. कार्यक्रमात शिक्षक, शालेय विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका,नागपूर(जनसंपर्क विभाग)प्रसिध्दी पत्रक    दिनांकवीर बाजीप्रभू देषपांडे पुण्यतिथी निमित्तमनपा तर्फे वि...
14/07/2023

नागपूर महानगरपालिका,नागपूर
(जनसंपर्क विभाग)
प्रसिध्दी पत्रक दिनांक

वीर बाजीप्रभू देषपांडे पुण्यतिथी निमित्त
मनपा तर्फे विनम्र अभिवादन

छत्रपती षिवाजी महाराजांचे स्वराज्य उभारणीत ज्यांनी अतुल पराक्रमाने घोडखिंड अडवून ठेवली व महाराज सुखरूप गडावर पोहोचल्याची खात्री होताच आपला देह ठेवला असे नरवीर बाजीप्रभु देषपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त रामनगर चौक स्थित प्रतिमेला पुश्पहार अर्पण करून मनपाच्या विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी सर्वश्री. अमोल तपासे, अजय मुंजे, षैलेश जांभुळकर, मनपाचे अग्निषमन जवान आदी उपस्थित होते.

शासनाकडे प्रलंबित विषयांचा प्रधान सचिवांनी घेतला आढावानागपूर, ता. १४ : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत नागपू...
14/07/2023

शासनाकडे प्रलंबित विषयांचा प्रधान सचिवांनी घेतला आढावा

नागपूर, ता. १४ : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत नागपूर शहरातील विविध प्राधिकरणांच्या प्रलंबित विषयांचा नगर विकास विभागाचे प्रधान सचिव श्री. असीम गुप्ता यांनी शुक्रवारी (ता.१४) आढावा घेतला.

प्रधान सचिव श्री. असीम गुप्ता यांनी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहामध्ये मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रो आणि नागपूर स्मार्ट सिटीची बैठक घेतली. बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. मनोज सुर्यवंशी यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये पूर्व नागपूरचे आमदार श्री. कृष्णा खोपडे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव श्री. असीम गुप्ता यांचा मनपाचा मानाचा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देउन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सत्कार केला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकर आणि नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. मनोज सुर्यवंशी यांनी देखील श्री. असीम गुप्ता यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले.

रोजगार कि तलाश।विभागीयस्तर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 18 जुलैला आयोजननागपूर,दि. 13: कौशल्य विकास रोजगार व ...
13/07/2023

रोजगार कि तलाश।
विभागीयस्तर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 18 जुलैला आयोजन
नागपूर,दि. 13: कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय कार्यालयाच्या वतीने नागपूर विभागातील इच्छुक बेरोजगार युवक युवतींसाठी नामांकीत कंपन्यांमधील विविध रिक्त पदांसाठी नोकर भरती करण्यासाठी विभागीयस्तर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शहरातील श्रीनिकेतन आर्टस कॉमर्स कॉलेज, सैतवाल जैन संघटन मंडळ सभागृह, गणेश नगर येथे 18 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे.
या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त यांनी केले आहे.

*मराठी रंगभूमीच्या सक्षमतेसाठी बालरंगभूमीला प्रोत्साहन देणे आवश्यक*- उदय सामंत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार प...
12/07/2023

*मराठी रंगभूमीच्या सक्षमतेसाठी बालरंगभूमीला प्रोत्साहन देणे आवश्यक*
- उदय सामंत

 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार प्रदान

नागपूर दि. 12 : मराठी रंगभूमीला अधिक बळकट बनविण्यासाठी बालरंगभूमीला प्रोत्साहन देऊन सक्षम करणे आवश्यक असल्याचे मत उद्योग मंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेचा पुरस्कार वितरण सोहळा आज येथील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोतल होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय हिंदी संस्था संघाचे राष्ट्रिय अध्यक्ष अजय पाटील, नाटककार व दिग्दर्शक सतीश पावडे, परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, शेखर सावरबांधे, समाजसेवक दीपक मते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही सर्व नाट्य संस्थांची मातृसंस्था असून या संस्थेची सर्वांनी प्राधाण्याने सेवा करावी. व्यावसायिक रंगभूमीप्रमाणेच बालरंगभूमी, हौशीरंगभूमी, झाडीपट्टी, दशावतार यांनाही पुढे नेणे आवश्यक आहे. भविष्याच्या नाट्य परिषदेच्या उन्नतीसाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासनही श्री. सामंत यांनी दिले.
मराठी रंगभूमीवर आपले विशेष योगदान देणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील व विदर्भातील रंगकर्मींचा सन्मान व सत्कार दरवर्षी नागपूर शाखेतर्फे करण्यात येत असल्याचे परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि नागपूर शाखेचे कार्यवाह नरेश गडेकर यांनी प्रास्ताविकेत सांगितले तसेच नाट्य परिषदेच्या कार्याची माहिती दिली.
याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद पाठक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर अनेक वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत संजय वलिवकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार, निवेदन क्षेत्रात कार्यरत रूपाली मोरे यांना श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार,अनिल उर्फ बापू चणाखेकर यांना रंगसेवा पुरस्कार,मंदार मोरोणे यांना नाट्य समीक्षा पुरस्कार,आनंद भीमटे यांना सर्वोत्कृष्ट नाट्य लेखकाचा पुरस्कार,अमरकुमार मसराम यांना झाडीपट्टी ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार तसेच वर्षा शुक्ल (गुप्ते) यांना झाडीपट्टी श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योग मंत्री उदय सामंत आणि डॉ. गिरिश गांधी यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल आयोजकांतर्फे त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. दिवंगत नाटककार जयकुमार भुसारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त्त यावर्षीपासून सर्वोत्कृष्ट बालनाट्य लेखकास स्व. जयकुमार भुसारी स्मृती पुरस्कार देण्याची सुरूवात करण्यात आली. हा पहिला पुरस्कार गणेशकुमार वडोदकर यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन वैदेही चौरी यांनी केले.
कार्यक्रमाला आभा मेघे, निलेश खांडेकर, अविनाश सोनोने, रविंद्र भुसारी, राकेश खाडे, संदीप इटकेवार,अरविंद पाठक तसेच परिषदेचे पदाधिकारी व नाट्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

*राज्याच्या सर्वंकष उद्योग विकासाचे धोरण - उद्योग मंत्री उदय सामंत**उद्योग जगतासाठी फायदेशीर‘सर्वसमावेशक विकास नियंत्रण ...
12/07/2023

*राज्याच्या सर्वंकष उद्योग विकासाचे धोरण - उद्योग मंत्री उदय सामंत*

*उद्योग जगतासाठी फायदेशीर‘सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’*

नागपूर,दि. 12: उद्योग जगतासाठी ‘सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-2023 (सीडीसीपीआर)’ तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून उद्योगांना चालना मिळेल. उद्योग जगतासाठी ही नियमावली फायदेशीर असून राज्याच्या सर्वंकष उद्योग विकासाचे धोरण असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन उद्योगमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. विपीन शर्मा, मुख्य नियोजिका डॉ. प्रतिभा भदाणे यांच्यासह एमआयडीसी असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीचे (सीडीसीपीआर) कार्यशाळेचे आयोजन उपराजधानीत करण्यात येत आहे. ही बाब जिल्ह्यासाठी तसेच विदर्भासाठी गौरवास्पद आहे. नवउद्योजक वाढीसाठी ही नियमावली उपयुक्त आहे. उद्योजकांच्या गरजा लक्षात घेऊन एमआयडीसी क्षेत्रात उद्योग वाढीसाठी सीडीसीपीआरची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमातून रोजगार निर्माण करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. अमरावती येथे या कार्यशाळेचे आयोजनही आज करण्यात आले. टप्प्याटप्प्याने नाशिक, पुणे यासह राज्यभरात सीडीसीपीआरचे कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उद्योजक व कारखानदारांना सुलभरित्या उद्योग उभारता यावा, यासाठी ‘एक खिडकी योजना’ प्रभावीपणे राबविली जाणार आहे. या माध्यमातून उद्योजकांना 30 दिवसांत उद्योगाला लागणाऱ्या आवश्यक परवानग्या दिल्या जाणार आहेत. राज्यात नवीन उद्योग विकासाच्या दृष्टीने शासनाद्वारे सर्वंकष प्रयत्न होत असून परदेशी गुंतवणुकीतही महाराष्ट्र अग्रेसर आहे. गेल्या वर्षभरातील गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल तर कर्नाटक दुस-या क्रमांकावर आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा शुभारंभ करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेतून यंदा 13 हजार 226 उद्योजकांना सुमारे 550 कोटी अनुदान वितरित करण्यात आले आहे. या माध्यमातून सुमारे 30 हजार व्यक्तींना रोजगार मिळाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नागपूरसह विदर्भातील 11 जिल्ह्यातील उद्योगाचा आढावा घेण्यासाठी सर्व जिल्ह्यांना भेटी देणार असून सर्वच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचा आढावा घेऊन विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच जुन्या उद्योगांच्या पुनर्बांधणीसाठी सीडीसीपीआर नियमावली तयार करण्यात आली असल्याचे श्री. शर्मा यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी उद्योग जगतातील चंद्रपूर, वर्धा आणि नागपुरातील प्रतिनिधींनी उद्योगाविषयीची आपल्या अडचणी, समस्या मंत्रिमहोदयांसमोर मांडल्या. सीडीसीपीआरबाबतची सविस्तर माहिती श्रीमती भदाणे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.
******

12/07/2023

स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीने घेतला शहरातील स्थितीचा आढावा



नागपूर, ता. १२ : स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीद्वारे मंगळवारी (ता.१२) नागपूर शहरातील स्वाईन फ्लूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी मनपाचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. निलीमा वानखेडे, डॉ. दिपाली वाठ, डॉ. तपन बडोले आदी उपस्थित होत.



मे २०२३ ला रुग्णालयात भरती झालेल्या एका जेष्ठ रुग्णाचा २७ जून २०२३ रोजी एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला त्यासंबंधाने समितीद्वारे चर्चा करण्यात आली. सविस्तर चर्चेअंती सदर मृत्यू हा स्वाईन फ्ल्यू व त्यानंतर निर्माण झालेल्या गुतांगुतीमुळे झाला असा निष्कर्ष काढण्यात आला. मृतक रुग्ण ७० वर्षीय महिला असून त्यांना मधुमेह व रक्तदाब या सहव्याधी होत्या. सदर रुग्णाचे निकटवर्तीयांचा शोध घेतला असता कुठलाही संसर्ग आढळून आला नाही. रुग्णाच्या रहिवासी परिसरात १०० घरांचे देखील सर्वे करण्यात आले. मात्र स्वाईन फ्लू सदृष्य कोणीही रुग्ण आढळून आले नाही.



नागपूर शहरात जानेवारी २०२३ पासून एकूण २४ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झालेली आहे. जानेवारी महिन्यात ८ रुग्ण, फेब्रुवारी महिन्यात २ रुग्ण, मार्च महिन्यात ६ रुग्ण, एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी ४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी जानेवारी महिन्यात १, मे महिन्यात ३ असे एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून २० रुग्ण आजारावर मात करून सुखरूप घरी पोहचले आहेत. मृत्यू झालेले रुग्ण हे जेष्ठ नागरिक आहेत. तसेच त्यांना इतरही आजार होते व त्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊन त्यांचा मृत्यू झाला. करीता नागरिकांनी फ्लू सदृश लक्षणे असल्यास शक्य तेवढ्या लवकर जवळच्या मनपा दवाखान्यात किंवा नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले आहे.

स्वाईन फ्लू पासून होणारा धोका टाळण्यासाठी ही काळजी घ्या

- हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा
- सॅनिटायजरने हात निर्जंतूक करा
- गर्दीमध्ये जाणे टाळा
- गर्दीत जाण्याची गरज पडल्यास मास्क लावूनच घराबाहेर पडा

- खोकताना व शिंकताना तोंडावर रूमाल ठेवा

- वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू, जागांना निर्जंतूक करा

- पौष्टिक आहार घ्या

हे टाळा
- हस्तांदोलन अथवा आलिंगन

- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे

- मास्क न वापरता गर्दीत जाणे

Address

Kamal Chowk
Chowk

Alerts

Be the first to know and let us send you an email when NNTV Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NNTV Marathi:

Videos

Share


Other Media/News Companies in Chowk

Show All