28/06/2023
आ.दवणे सर
कालच्या लोकसत्तेच्या बातमीवरून आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपली निवड झाली नाही.
केवळ एकामताने आपली निवड न होणे ही घटना किती वेदना दायी, दुःखदायी व मनावर आघात होणारी अशीच आहे याची सल जेवढी ती तुम्हाला आहे तेवढीच ती मला स्वतःला व या जगात नसलेल्या माझ्या सुप्रिया ला आणि आमच्या नवचैतन्य प्रकाशनाच्या सर्व परिवाराला सुद्धा आहे.आपली साहित्यातील सेवा , परिश्रम व साहित्य चळवळ हाच आपला श्वास, ध्यास आणि विश्वास ही संकल्पना अहोरात्र उराशी बाळगून आपण जी साहित्याची व्रतस्त पणे , तपस्वी पणे तपश्चर्या व सेवा केलीत त्याच चीज व्हायला हवं होत तस झाल नाही.परंतु एक साहित्यिक म्हणून आपण आपले स्वतःचे नाव नवचैतन्य चे नाव व साऱ्या महाराष्ट्राचे नाव एका उंची पर्यंत नेऊन ठेवले आहेत हे कोणालाच नाकारता येणार नाही. व महाराष्ट्रात ज्या साहित्यिकांची प्रामुख्याने व अग्रक्रमाने नावे घेतली जातात त्यात सुद्धा आपला अग्रक्रम आहेच हे निश्चितच.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदाचे निवडीचे निकष हेच मुळात चुकीचे आहेत त्यामुळे आजपर्यंत काही अपवाद वगळता चुकीच्या व पात्रता नसलेल्या अध्यक्षांची निवड झालेली आहे आणि ती निवड आपल्या सर्वांच्या मनाविरुद्ध असली तरी आपल्याला मान्य करून घ्यावे लागते हे आणखी दुर्दैव आहे.
आपल्या स्वतःवर व आमच्या सर्वांवर हा जो आघात झालेला आहे त्याला सामोरे जाण्यावाचून सध्या तरी आपल्या हातात काही नाही परंतु एक निश्चित सांगतो की परमेश्वराने जरी एक दरवाजा बंद केला असेल तरी तो दुसरा दरवाजा कधी ना कधी नक्कीच उघडेल याची मला खात्री आहे .
दुर्दम्य आत्मविश्वास , प्रचंड इच्छाशक्ती , जीवापाड मेहनत करण्याची तयारी या त्रिसूत्री मुळे आपण कधीही कुढल्याही ध्येयापासून व यशापासून दूर जाणार नाही हे नक्कीच. शेवटी मोठा भाऊ म्हणून मी अस सुचवतो नाराज मुळी व्हायचं नसत, चैतन्य सदा फुलवायच असतं, पाय ओढले म्हणून परतायचं नसत , पुढे अन् पुढेच जायचं असत, आपले सामर्थ्य दाखवायचं असत , जीवनात खूप काही करण्याजोग असत आपण फक्त तिकडे लक्ष द्यायचं असत.
आपल्याला या साऱ्या गोष्टींपासून जो मनस्ताप झाला आहे तो हलका करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला बळ व शक्ती द्यावी .
आ.
शरद मराठे. नवचैतन्य प्रकाशन
9869027399/7738072361