Mi Dahisarkar - मी दहिसरकर

Mi Dahisarkar - मी दहिसरकर मी दहिसरकर पेज दहिसर मधील अनेक लोकांन?

धाराशिव ला मिळणार 50 नवीन बसेस; धाराशिव-मुंबई, धाराशिव-बोरीवली दोन नवीन बसेस चा परिवहन मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ      ...
27/01/2025

धाराशिव ला मिळणार 50 नवीन बसेस; धाराशिव-मुंबई, धाराशिव-बोरीवली दोन नवीन बसेस चा परिवहन मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

आजचा दिवस आपल्या संविधानाच्या महानतेचा आणि देशासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा आहे...
26/01/2025

आजचा दिवस आपल्या संविधानाच्या महानतेचा आणि देशासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा आहे.आधुनिक भारताच्या प्रगतीचा पाया रचणाऱ्या संविधान निर्मात्यांना वंदन करत, आपण सर्वजण संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच जबाबदाऱ्या पाळण्याचा संकल्प करूया.

एकजूट, समता आणि बंधुत्वाची भावना टिकवून ठेवत, आपला भारत अधिक सक्षम व प्रगत बनवण्यासाठी प्रयत्नशील राहूया.

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🇮🇳
#प्रजासत्ताकदिन

Jio आपल्या ग्राहकांना मंद बुद्धी तर समजत नाही ना?काही दिवसांपूर्वी TRAI ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना आदेश दिला की, तुम्ही ...
26/01/2025

Jio आपल्या ग्राहकांना मंद बुद्धी तर समजत नाही ना?

काही दिवसांपूर्वी TRAI ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना आदेश दिला की, तुम्ही ग्राहकांसाठी 'फक्त फोन कॉल' सुविधा असलेला पॅक सुरू करावा...

तुम्हीच पहा, Jio ने काय केले 😂😂

त्यांचा पूर्वी 479 रुपयांचा एक पॅक होता, ज्यामध्ये 84 दिवस ( जवळपास 3 महिने ) अमर्याद फोन कॉल आणि एकूण 6GB इंटरनेट डेटा मिळत होता... तो पॅक बंद केला...

आणि, TRAI च्या आदेशाप्रमाणे 458 रुपयांचा नवीन पॅक लाँच केला, ज्यामध्ये 84 दिवसांसाठीच केवळ अमर्यादित फोन कॉल असतील...

म्हणजे फक्त 21 रुपये कमी करून TRAI च्या आदेशाचे पालन तर केले, पण आपल्या ग्राहकांना पुन्हा वेड्यात काढले...

तुम्हीच बघा, 6GB इंटरनेट डेटा साठी कंपनी 69 रुपये घेत असताना...नवीन पॅक फक्त 21 रुपयांनी स्वस्त 🤔🤔

Airtel ने काय दिवे लावले आहेत?? तुम्ही कमेंट मध्ये सांगा...

आनंद म्हणजे काय? एका प्रसिद्ध तुर्की कवीने एकदा त्याचा चित्रकार मित्र अबिदिन डिनो याला 'हॅपीनेस'चे चित्र तयार करण्यास सा...
26/01/2025

आनंद म्हणजे काय?
एका प्रसिद्ध तुर्की कवीने एकदा त्याचा चित्रकार मित्र अबिदिन डिनो याला 'हॅपीनेस'चे चित्र तयार करण्यास सांगितले.
चित्रकाराने शांतपणे झोपलेले कुटुंब चित्रित केले.
पलंगाचा एक पाय तुटून त्याला दोन विटांनी आधार दिला होता आणि त्यांच्या घराच्या जीर्ण छतावरून पावसाचे पाणी झिरपत होते.
एक छत्री त्यांना गळणाऱ्या पावसापासून वाचवत होती.
कौटुंबिक कुत्रा देखील बेडवर शांतपणे झोपला होता.
हे चित्र अजरामर आणि जगप्रसिद्ध झाले.
या पेंटिंगकडे खोलवर पाहताना, मित्रांनो, आनंदाचा खरा अर्थ काय याचा विचार करूया... हे चित्र पाहिल्यानंतर माझा विश्वास आहे की आनंद म्हणजे समस्या नसणे नव्हे, तर कठीण प्रसंग स्वीकारणे आणि त्यात शांतता मिळवणे.
परिस्थिती कितीही वाईट असली तरी तुमच्याकडे जे काही आहे त्यात चांगले पाहण्याचा प्रयत्न करा.
तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही योग्यरित्या वापरल्यास, तुम्हाला जे हवे आहे ते नैसर्गिकरित्या येईल.
मनःशांती ही बाह्य बाबींमध्ये नसून अंतर्गत बाबींमध्ये असते.
आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींबद्दल काळजी करणे थांबवा.
जेव्हा जेव्हा तुमचे हृदय जड वाटते तेव्हा ही पेंटिंग लक्षात ठेवा.....
be positive and be happy.....😊

अखेर प्रतिक्षा संपली .एक दोन दिवसाची नाही .चौदा वर्षांची प्रतिक्षा.... तब्बल चौदा वर्षांनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान...
18/01/2025

अखेर प्रतिक्षा संपली .एक दोन दिवसाची नाही .चौदा वर्षांची प्रतिक्षा.... तब्बल चौदा वर्षांनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काल सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला . आणि जन्मासाठी दिवस पण काय निवडला ... संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा स्थापना दिवस .
पण ह्याच्या जन्माचा प्रवास सोपा नव्हता. खूप खाच खळग्यांचा होता . आशा आणि निराशेच्या सीमेवरचा होता . आनंद आणि दु:खाचाही होता .
मानस आणि मानसी ही जोडी जुनागढ वरून 2022 मध्ये आणली होती .गेल्यावर्षी मानसी सिंहीण आजारी पडली .तब्बल 18 दिवस तिने काहीच खाल्ले नव्हते .बऱ्याच जणांनी तिची आशा सोडली होती .पण आम्ही काही जणांनी ठाम विश्वास ठेवून तिची अखंड शुश्रुषा केली .त्यातून ती बरी झाली . त्यानंतर मानस बरोबर तिचं मिलन केलं .त्या दोघांना एकत्र करणही सोपं नव्हतं . मानस सुरुवातीला डरकाळी फोडून तिच्या अंगावर धावायचा .तिला ओरबाडायचा .ही बिचारी घाबरून जायची .पण आम्ही धीर न सोडता त्यांना पुन्हा पुन्हा एकत्र करायचो .हळूहळू ते एकत्र रुळले आणि चक्क एकमेकांच्या प्रेमात पडले .मग तस सोपं झालं .गेल्यावर्षी गौरी ज्या दिवशी येतात त्या दिवशी त्यांचं मिलन सुरू झालं . प्राणी रक्षक Vaibhav Patil चा मला फोन आला .मी तशीच पिंजऱ्याकडे धावले .तर हे दोघे आखंठ प्रेमात बुडालेले .30 सप्टेंबरला यांचं शेवटचं मिलन झालं आणि मानसीचा मिलन काळ संपला .मग ती त्याच्यापासून दूर बसायला लागली .आता दोघांमध्ये ती वर्चस्व गाजवू लागली .मानस जर तिच्या जवळ आला तर ती पंज्याचा फटका द्यायची .मग हा बिचारा निमूटपणे दूर व्हायचा .आम्ही हे सगळे दिवस तिची काळजी घेत होतो .तिचा वाढीव आहार , बाळंतपणा मधील टॉनिक ची औषधं सगळं कसं वेळच्या वेळी . काल 108 दिवस पूर्ण झाले आणि तिला लेबर पेन चालू झाल्या .मी अखंड सीसीटीव्ही समोर बसून तिच्या एक एक क्षणाच निरीक्षण करत होते . तिच जमिनीवर लोळण ,पुन्हा पुन्हा मागे मान वळवून पिल्लू बाहेर आल की नाही ते पाहणं ,पुन्हा पुन्हा कळा देणं हे पाहत होते .संध्याकाळी माझा धीर सुटत चालला होता .मग मी उद्यानातील वाघाई देवीच्या देवळातही जावून आले .देवीला मनोमन सांगितलं ," बाई ग,तू उद्यानातील वाघांची देवी आहेस .माझी सिंहीण कितीवेळ झाला अडली आहे .तिला लवकर सोडव." आणि पुन्हा सीसीटीव्ही समोर बसून राहिले .जर आणीबाणीची वेळ आली तर काय करायचं याची संपूर्ण तयारी ठेवली होती .पण सुदैवाने ती वेळच आली नाही . काल रात्री तिने साडे नऊ वाजता पिल्लाला जन्म दिला .आमचे गार्ड Amit Rane रात्रभर पिंजऱ्याच्या बाहेर जागत होते . पहाटे तीन वाजता ती पिल्लाला दूध पाजायला लागली .मग आम्ही खऱ्या अ

एस. टी च्या ताफयात आल्या या नवीन बस 🙏🙏🙏कसा वाटला लुक मित्रांनो सांगा 🙏🙏
17/01/2025

एस. टी च्या ताफयात आल्या या नवीन बस 🙏🙏🙏कसा वाटला लुक मित्रांनो सांगा 🙏🙏

पुस्तकाला मिळालचं नाही काचेचं दुकान.. कारण महालात जन्मालाच नाही पुस्तक वाचणारा विद्वान.. #पुस्तकप्रेमी
15/01/2025

पुस्तकाला मिळालचं नाही काचेचं दुकान..
कारण महालात जन्मालाच नाही पुस्तक वाचणारा विद्वान..
#पुस्तकप्रेमी

महाराष्ट्र दोन्ही संघाची मोठ्या विजयाने सुरुवात
10/01/2025

महाराष्ट्र दोन्ही संघाची मोठ्या विजयाने सुरुवात

समृद्धी महामार्ग कसारा बोगदा आदिवासी चित्रकला पेंटींग❤️...
10/01/2025

समृद्धी महामार्ग कसारा बोगदा आदिवासी चित्रकला पेंटींग❤️...

8400 कोटींचा मालक तरीही मनाला शांती नाही. हिमालय गाठले, विनय हिरेमठने 515 कोटींचे पॅकेजही सोडले     मी श्रीमंत आहे, परंत...
10/01/2025

8400 कोटींचा मालक तरीही मनाला शांती नाही. हिमालय गाठले, विनय हिरेमठने 515 कोटींचे पॅकेजही सोडले

मी श्रीमंत आहे, परंतु मला हे माहीत नाही की आयुष्यात आता काय करायचे आहे, माझ्यासमोर आता कोणतेही ध्येयच नाही, आयुष्यातून कुठल्याही प्रकारची संतुष्टी मिळाली नाही. मनःशांतीही मिळाली नाही.
त्यामुळे आता हिमालयाची वाट धरत आहे… हे शब्द आहेत 8 हजार 400 कोटींच्या संपत्तीचा मालक असलेल्या 33 वर्षीय उद्योजक विनय हिरेमठ याचे.

इलिनॉय विद्यापीठात सॉफ्टवेअर इंजिनीयरिंगचे शिक्षण घेत असतानाच स्टार्टअप सुरू करण्याच्या विचाराने विनयला झपाटले होते. दोन वर्षांनंतर त्याने इंडिनीयरिंग अर्धवट सोडून सोशल मीडिया स्टार्टअप बॅकप्लॅनसोबत जाण्याचा निर्णय घेतला.याच ठिकाणी विनयला थॉमस आणि शाहेद खान भेटले आणि तिघांनी लूम या टेक कंपनीचा पाया रचला.

विनयची कंपनी करते काय?

विनयची कंपनी लूम हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म यूजर्सना शॉर्ट-फॉर्म व्हिडीओ बनवून ते शेअर करण्याची सुविधा देतो. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तब्बल दोन लाख व्यावसायिक आणि 1.4 कोटी यूजर्सना सेवा देत आहे. लूम या कंपनीला प्रचंड संघर्षही करावा लागला. दोन आठवडय़ांत ही कंपनी दिवाळखोरीत निघणार होती. कंपनी वाचवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केल्याचे विनयने सांगितले.
एका बडय़ा गुंतवणूकदाराला भेटलो आणि रोबोटिक्समध्ये काम केले, परंतु तिथेही मला प्रोत्साहन मिळू शकले नाही. सध्या भौतिकशास्त्र वाचतोय, पुढे शिकतोय. जेणेकरून भविष्यात आणखी मोठी कंपनी सुरू करू शकेन. कदाचित ही कंपनी लूम इतकी मोठी नसेल, परंतु आशा करतो की त्यातून मला संतुष्टी मिळेल.

निवडणूक काळात राजकीय नेत्यांच जनतेवरील प्रेम  #राजकारण  #विधानसभा  #निवडणूक   #दहिसर
18/11/2024

निवडणूक काळात राजकीय नेत्यांच जनतेवरील प्रेम

#राजकारण #विधानसभा #निवडणूक #दहिसर

दहिसरचा श्री
18/09/2024

दहिसरचा श्री

Irshalwadi Khalapur Landslide : रायगडच्या खालापुरमधून आतापर्यंतची सर्वात धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. रायगडच्य...
20/07/2023

Irshalwadi Khalapur Landslide : रायगडच्या खालापुरमधून आतापर्यंतची सर्वात धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. रायगडच्या इरशाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला असून १०० जणांचा आणखी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अतिशय चांगल्या आणि  मितभाषी स्वभावाचे असलेले मराठमोळे आंतरराष्ट्रीय  शरीर सौष्ठव पटू आशिष साखरकर यांचे दुःखद निधन झाले त...
19/07/2023

अतिशय चांगल्या आणि मितभाषी स्वभावाचे असलेले मराठमोळे आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पटू आशिष साखरकर यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने भारतीय शरीर सौष्ठव परिवाराचे खूप मोठे नुकसान झाले आहे . ईश्वर त्याच्या आत्म्यास सदगती देवो व त्याच्या परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....
भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐🙏🙏

साडी नेसलेल्या, कपाळाला कुंकू लावलेल्या व गळ्यात मंगळसूत्र घातलेल्या ह्या स्त्रिया कुणी गावठी, अडाणी किंवा घरकाम करणाऱ्य...
16/07/2023

साडी नेसलेल्या, कपाळाला कुंकू लावलेल्या व गळ्यात मंगळसूत्र घातलेल्या ह्या स्त्रिया कुणी गावठी, अडाणी किंवा घरकाम करणाऱ्या नसून इस्रोच्या शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी काल चांद्रयान -३ चे यशस्वी प्रक्षेपण केले. आपल्याकडे स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली टीशर्ट, जीन्स, बर्मुडा असे कपडे वापरणे ही पद्धत गेल्या काही वर्षांत रूढ झाली, त्यातील पोकळपणा ह्या स्त्री शास्त्रज्ञांनी दाखवून दिला. ह्याच शास्त्रज्ञांनी परवा चांद्रयानाच्या प्रक्षेपणाआधी बालाजीचे दर्शन घेतले होते. संस्कृती ही तंत्रज्ञानाच्या आड कधीच येत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा फोटो आहे. याउलट काही लोक थोडेसे शिकतात व स्वतःचा बडेजाव मिरवण्यासाठी देवधर्म, पुजा व अंत्यसंस्कार यांना अंधश्रद्धा म्हणतात‌. स्वतःचा अहंकार कुरवाळण्यासाठी कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे पांघरूण घेतात तर काहीजण विज्ञाननिष्ठ बना असे बरळत राहतात‌. पण प्रत्यक्षात अशा लोकांच्या गावी विज्ञानातील सामान्यज्ञान सुद्धा असत नाही; गप्पा मात्र सर्वज्ञानी झाल्याच्या असतात.

If you're in Mumbai and you care about the livelihoods of indigenous communities, this one's for you! Along with Hallu H...
16/07/2023

If you're in Mumbai and you care about the livelihoods of indigenous communities, this one's for you! Along with Hallu Hallu, Rang De is curating a Dahisar River walk and a Waarli Pada Tour!

oin us on a special event curated by Hallu Hallu and Rang De to explore the homeland of the Waarli Indigenous community. We will understand how the community interacts, integrates with the environment and how that is manifested into the art and livelihood of the Waarlis.

We will meet Waarli artists and learn their art. We will also devour seasonal tribal food specially gathered in monsoon.

Register today through the link (limited registrations) - https://lnkd.in/dtJp7kHA

30 July | Sunday | 9 AM - 2 PM

Meeting point : Sanjay Gandhi National Park, Borivali East, Mumbai

Do tag people in your network who would be interested.
This event has been designed to benefit and support the Waarli community.

ही तीन मुलं राकेश म्हात्रे, वैभव पाटील आणि अंकेश साटले दररोज नोकरी करतात आणि शनिवार - रविवार संध्याकाळी बोरीवली पूर्वेच्...
08/04/2023

ही तीन मुलं राकेश म्हात्रे, वैभव पाटील आणि अंकेश साटले दररोज नोकरी करतात आणि शनिवार - रविवार संध्याकाळी बोरीवली पूर्वेच्या शांतीवन परिसरात मराठी पुस्तकांचा स्टॉल लावतात. त्यांनी त्यांची बुलेट यासाठी एका स्टॉल मध्ये कन्व्हर्ट केलीये. ते मराठी पुस्तकांच्या प्रेमापोटी हे करतात. मी त्यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणाले की बोरिवलीत मराठी पुस्तकं इतक्या सहजपणे मिळत नाहीत. म्हणून त्यांनी 'बखर साहित्याची' हा छोटा उपक्रम सुरू केलाय आणि ते मराठी पुस्तकं विकतात. गेले २-३ रविवार मी हे पाहिलं की बरेच लोक पुस्तकं येऊन चाळताना दिसतात आणि नंतर विकत घेतात. त्यांच्या मते प्रसिद्ध लेखकांची मराठी पुस्तकं सहज उपलब्ध असतात. पण, सर्व विचारधारांची आणि सहजगत्या उपलब्ध नसणारी पुस्तकं पण त्यांचा विकायचा मानस आहे. हळूहळू उपक्रमाचा विस्तार सुरू आहे. पण, या भागात आलात तर सोना टॉकीज समोर त्यांच्या स्टॉलला नक्की भेट द्या.

pc : Sandesh Samant | संदेश सामंत (twitter)

स्वप्न तर सगळेच बघतात, स्वतः साठी व इतरांसाठी,आज आपण एक स्वप्न बघूया, देशासाठी, आपल्या सर्वांसाठी प्रजासत्ताक दिनाच्या ह...
26/01/2023

स्वप्न तर सगळेच बघतात, स्वतः साठी व इतरांसाठी,आज आपण एक स्वप्न बघूया, देशासाठी, आपल्या सर्वांसाठी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

Address

Borivli

Telephone

+917977456134

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mi Dahisarkar - मी दहिसरकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share