Digital Velha Samachar

Digital Velha Samachar १९९७ पासूनचे भोर, वेल्हा, मुळशी तालुक्याचे आपलं हक्काचं बातमीपत्र.
(1)

26/01/2024
25/10/2023

*ऑनलाइन मार्गदर्शन*
* दि 26/10/2023 वेळ - सायं 7 वा*

*विषय -माहिती अधिकार कायदा-ग्राहकांना येणाऱ्या अडचणी*
*मार्गदर्शक-श्री दीपक पाचपुते, अहमदनगर*
meet.google.com/qei-iajr-jky
या लिंकवर क्लिक करा व जॉईन व्हा

*आयोजक : ग्राहकराजा परिवार*

Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.

22/10/2023

*सुप्रभात*
*ऑनलाइन मार्गदर्शन*
*आज दि 22/10/2023 वेळ - सायं 7 वा*

*विषय -व्यसनमुक्ती*
*मार्गदर्शक-सौ साधना पाटील,शिराळा, जि सांगली*
meet.google.com/qei-iajr-jky
या लिंकवर क्लिक करा व जॉईन व्हा

*आयोजक : ग्राहकराजा परिवार*

Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.

28/08/2023
Follow this link to join my WhatsApp group:
23/09/2022

Follow this link to join my WhatsApp group:

WhatsApp Group Invite

31/08/2022

*२५ वर्ष पूर्ण करणारे*

*भोर,वेल्हा,मुळशीतील एकमेव साप्ताहिक*

*आता जगाच्या कानाकोपऱ्यातून*

*केव्हाही,कुठेही वाचू शकता*

*साप्ताहिक वेल्हा समाचार*

लवकरच स्वतःची वेबसाईट सुरू करीत आहे

08/06/2022

*ग्राहकराजा online मार्गदर्शन पुष्प 101 वे*

*आर्थिक फसवणूक, लुबाडणूक झाल्यावर ग्राहक न्यायालयात दाद मागता येते.ग्राहक न्यायालय (Consumer Court)नेमके आहे तरी काय ?ग्राहक न्यायालयात केस कशी दाखल करावी ?*

या विषयावर सविस्तर मार्गदर्शन

*रविवार दि 12/06/2022*
सायंकाळी 7 ते 8.30
8.30 ते 9 प्रश्नोत्तरे

*मार्गदर्शक- मा अजय भोसरेकर,मा अध्यक्ष ग्राहक मंच, लातूर*

meet.google.com/wni-ivss-zfn
या googl meet लिंक वर
-आयोजक:
*प्रबोधन,प्रशिक्षण आणि सुसंवाद करणारे ग्राहकराजा प्रकाशन*

*पहिल्या 100 जणांना प्रवेश*

Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.

सूत्र संचालन कसे असावे यासाठी वाचा https://migrahakrajaa.blogspot.com/2022/06/blog-post.html
02/06/2022

सूत्र संचालन कसे असावे यासाठी वाचा https://migrahakrajaa.blogspot.com/2022/06/blog-post.html

सूत्रसंचालन कसे असावे -श्री अजित वाराणशीवार,पुणे सूत्रसंचालन करताना आपले सूत्रसंचालन / निवेदन ओघवते, प्रभ...

22/05/2022

महावितरणची अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी बिले, त्या संदर्भातील महत्त्वाची संपूर्ण माहिती व संघटनेच्या वतीने महत्वाच्या सूचना (कृपया प्रसिद्धीसाठी)
___________________________________________________________________________
मुंबई दि. २० - राज्यातील सर्व वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिले महावितरण कंपनीने लागू केली आहेत. यासंबंधी ग्राहकांमध्ये अद्यापही खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांच्या माहितीसाठी, हितासाठी व सोयीसाठी संबंधित सर्व तरतुदी व संघटनेच्या वतीने सूचना जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
सुरक्षा ठेव रक्कम पूर्वी एक महिन्याच्या बिलाइतकी होती. आता ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ही रक्कम भरण्यासाठी विनियमामध्ये सहा हप्त्यांची तरतूद केली आहे. तथापि महावितरणने स्वतःच्या सोयीसाठी ही सवलत डावलून हप्ते न देता ग्राहकांनी एकरकमी संपूर्ण रक्कम भरावी अशी मागणी बिले लागू केली होती. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने विनियमातील तरतूद जाहीर केली व एकरकमी भरणा मागणीवर आक्षेप घेतला. त्यानंतर लागलीच कंपनीने ग्राहकांना सहा हप्त्यांत रक्कम भरता येईल असे एसएमएस SMS पाठविण्यास सुरुवात केली आहे. तथापि हे एसएमएस SMS सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचलेले नाहीत, असे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी सोबत दिलेल्या तपशीलवार माहितीच्या आधारे योग्य व आवश्यक तो निर्णय घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
सुरक्षा ठेव आणि प्रीपेड/प्रीपेमेंट मीटर आणि आगाऊ पेमेंट पद्धत याबाबत संबंधित विनियम
विनियम क्रमांक १३ सुरक्षा ठेव -
विनियम क्रमांक १३.२ अंतिम परंतुक -
"परंतु आणखी असे की, पूर्व भरणा केलेले मीटर्स बसवण्या प्रकरणी, वितरण परवानाधारकाकडून सुरक्षा अनामत घेण्यात येणार नाही आणि ग्राहक पूर्व भरणा करण्यासाठी आयोगाने मंजूर केल्याप्रमाणे सूट/ प्रोत्साहन-अधिदान मिळण्यासाठी पात्र राहील."
【 MERC ने विनियमासोबत जाहीर केलेल्या "कारणांची मीमांसा" मधील वरील विनियमाशी संबंधित माहितीचा पॅरा खालीलप्रमाणे,
10.1.3 विश्लेषण आणि आयोगाचा निर्णय -
सुरक्षा ठेव रकमेमध्ये बदल करण्याचे कारण स्पष्टपणे खुलासा निवेदनामध्ये, मसुद्याच्या विनियमांसह स्पष्ट केले आहे. शेवटच्या बिलिंग सायकलच्या पहिल्या दिवसापासून ग्राहकाने ऊर्जा बिलाचा भरणा करेपर्यंत, २ महिन्यांची सुरक्षा ठेव, वीज वापराचा कालावधी कव्हर करण्यासाठी पुरेशी आहे म्हणून ही वाढ प्रस्तावित केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या संदर्भात संबंधितांच्या सूचनांमध्ये तथ्य आढळत नाही. तसेच, प्री-पेड मीटर बसवण्याची निवड करणार्‍या ग्राहकांसाठी, वीज बिल आधी भरले जात असल्याने सुरक्षा ठेवीची गरज नाही. त्यामुळे आयोगाने या संदर्भातील प्रस्तावित विनियमामध्ये कोणताही बदल केलेला नाही.】
विनियम क्रमांक १३.७ -
"सुरक्षा अनामत भरलेल्या ग्राहकाने त्यानंतर जर पूर्व भरणा केलेल्या मीटरद्वारे पुरवठा घेण्याचा पर्याय स्वीकारला तर, अशी सुरक्षा अनामतीची रक्कम, अशा ग्राहकाकडून येणे असलेली सर्व रक्कम वजा केल्यानंतर, अशा ग्राहकास परत करण्यात येईल किंवा अशा ग्राहकाच्या खात्यामध्ये पूर्व भरणा केलेल्या क्रेडिटचा एक भाग म्हणून मानण्यात येईल, ज्यामधून भविष्यातील त्याच्या वीज वापराची रक्कम वजा करण्यात येईल."
विनियम क्रमांक १६.५ देयकाचा भरणा -
विनियम क्रमांक १६.५.१२ -
"पूर्व भरणा केलेल्या मीटरच्या बाबतीत, परवानाधारक आयोगाच्या संबंधित आदेशांनुसार ग्राहकाला सूट/प्रोत्साहन-अधिदान देईल." सध्याच्या आयोगाच्या आदेशानुसार वीज आकार व इंधन अधिभार यामध्ये अतिरिक्त ५% सूट उपलब्ध आहे.
विनियम क्रमांक १६.६ आगाऊ भरणा -
विनियम क्रमांक १६.६.१ -
"वितरण परवानाधारक ग्राहकांना पुरवठा केलेल्या वीजेसाठीच्या आकारांचा आगाऊ भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देईल."
विनियम क्रमांक १६.६.२ -
"वरील विनियम १६.६.२ नुसार आगाऊ भरणा केल्यानंतर, वितरण परवानाधारक आगाऊ म्हणून घेतलेल्या रकमेची ग्राहकाला पोच पावती देईल."
विनियम क्रमांक १६.६.३ -
"ही व्यवस्था स्वीकारलेल्या ग्राहकाच्या देयकामध्ये, ग्राहकाकडून जमा करण्यात आलेली अनामत रक्कम, प्रत्येक देयक चक्रानंतर समायोजित करण्यात आलेली वीज आकारांची देय रक्कम आणि शिल्लक राहिलेली अनामत रक्कम, दाखविण्यात येईल."
विनियम क्रमांक १७ - वीजेचा पुरवठा पुर्ववत करणे -
विनियम क्रमांक १७.३ -
"पूर्व भरणा केलेली रक्कम संपल्यानंतर वीज पुरवठा आपोआप खंडित होण्याची व्यवस्था पूर्व भरणा मीटर्स मध्ये करण्यात येईल. तथापि यास पुरवठा खंडित झाल्याचे मानण्यात येणार नाही आणि मीटर जेव्हा रिचार्ज करण्यात येईल तेव्हा पुरवठा पूर्ववत करण्यात येईल."
ग्राहकांना माहिती व मार्गदर्शनपर सूचना —
१. ग्राहकांना शक्य असेल तर अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी रक्कम एकरकमी भरता येईल.
२. ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम भरणा करण्यासाठी विनियमांनुसार ६ हप्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे ही रक्कम ६ समान मासिक हप्त्यांत भरता येईल. त्यासाठी कोणत्याही कार्यालयात अडचण येणार नाही.
३. ज्या ग्राहकांची रक्कम मोठी आहे व कोरोना नंतरच्या आर्थिक अडचणीमुळे रक्कम हप्त्याने भरणेही शक्य नाही, अशा ग्राहकांनी पत्राद्वारे प्रीपेड मीटर पर्यायासाठी अर्ज करावा. प्रीपेड मीटरसाठी सुरक्षा ठेव आवश्यक नाही. तसेच प्रीपेड मीटर ग्राहकांना अतिरिक्त ५% वीज दर सवलत उपलब्ध आहे.
४. कृपया अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित कार्यालयाच्या सही शिक्क्याची पोचपावती घ्यावी.
५. अर्ज केल्यानंतर महावितरण कंपनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीसाठी आग्रह वा सक्ती करु शकत नाही.
६. देयक रक्कम भरण्यासाठी कोणता पर्याय निवडायचा हा ग्राहकांचा हक्क आहे. त्यामुळे महावितरण ग्राहकांची कोणत्याही पर्यायाची मागणी नाकारू शकत नाही.
७. आगाऊ पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु ५% वीजदर सवलत मिळणार नाही. तसेच सुरक्षा ठेव किती आवश्यक आहे वा नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे हा पर्याय योग्य नाही.
८. प्रीपेड मीटरसाठी लघुदाब वीज ग्राहकांनी संबंधित विभागाचे (Division) कार्यकारी अभियंता यांचेकडे अर्ज करावा. ऊच्चदाब ग्राहकांनी संबंधित जिल्ह्याचे (मंडल/Circle) अधीक्षक अभियंता यांचेकडे अर्ज करावा.
कृपया प्रसिद्धीसाठी प्रताप होगाडे
मुंबई दि. २० मे २०२२ अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

26/04/2022

जन्म-मृत्युची माहिती कोठे दयावी?

ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे.

वरील मुदतीच्या आत जन्म-मृत्युची नोंद व माहिती वेळेवर देणे कायद्याने सक्तीचे आहे. वरील मुदतीत नोंद करून लगेच दाखला मागितल्यास तो मोफत मिळतो.

वरील मुदतीत नोंद केली परंतु दाखला घेतला नसल्यास तो मिळविण्याकरता शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे पडतात. जन्म अथवा मृत्यूचा दाखला नियमाप्रमाणे पैसे भरून पोस्टाने मागविता येतो.

जन्म मृत्युची नोंद मुदतीत न केल्यास विलंब शुल्क पडते. म्हणूनच जन्ममृत्यूची नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे.

मृत्यू नोंद : तसेच मृत्यूच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे

मृत्यू नोंद तसेच मृत्यूच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे... काय आपल्याला मृत्यू ची नोंद करून मृत्यू चा दाखला प्राप्त करायचा आहे ? भारतामध्ये जन्म तसेच मृत्यू नोंद करणे आता कायद्याने बंधनकारक आहे. आपण येथे एखाद्या मृत व्यक्तीचा दाखला काढण्यासाठी आवशक कागदपत्रांची माहिती घेणार आहोत.

मृत्यूची नोंद करून मृत्यूचा दाखला मिळवणे यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मृत्यूचा दाखला हा अनेक ठिकाणी उपयोगी येतो, वंशावळ, कोर्टातील कामांसाठी विशेष करून शेती संदर्भात असणाऱ्या विविध गोष्टींसाठी मृत्युच्या दाखल्याची गरज भासते. तसेच विमा पॉलिसी इतर ठिकाणीदेखील मृत्युच्या दाखल्याची मागणी केली जाते.

मृत्यूचा दाखला काढणे सोपे आहे त्याच्यासाठी ग्रामसेवक यांचा मृत्यू नोंद नसलेल्या दाखला शंभर रुपये चे स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र तसेच तहसीलदाराचे सही व शिक्का आवश्यक असते. नजीकच्या सेतू कार्यालयात जाऊन तेथून आपण फॉर्म घेऊन तो बिनचूकपणे भर आणि खाली दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून हा फॉर्म कार्यालयात सबमिट करा.

मृत्यू नोंद - मृत्यूच्या नोंदणीसाठी तसेच मृत्यू दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे -

१. ग्रामसेवक यांचा मृत्यू नोंद नसलेचा दाखला

२. १००/- रू. च्या स्टॅम्पव प्रतिज्ञापत्र तहसिदार सही व शिक्का

३. मंडल अधिकारी यांचे रिपोर्ट

४ AP रिपोर्ट

५. रेशन कार्ड झेरॉक्स

६. आधार कार्ड झेरॉक्स

७. फोटो

जन्म-मृत्युची नोंद नसल्यास जन्म-मृत्यु ची घटना ज्या ठिकाणी घडली आहे. त्याकरिता जन्म व मृत्यू झालेल्या ठिकाणाचा पुरावा सादर करुन संबंधित जन्म-मृत्यू नोंदणी विभाग कसबा पेठ येथील मा.निबंधक यांच्याकडून विहित नमुन्यातील नोंद आढळून येत नसल्याचे अनुपलब्धता प्रमाणपत्र (नमुना १०) देण्यात येते व त्यासोबत लागणारी विहित कागदपत्रे मा. कोर्ट यांचेकडे सादर करावे लागतात.

जन्म-मृत्युच्या नोंदीमध्ये लेखन प्रमादामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे हि जन्म-मृत्यु नोंदणी विभाग कसबा पेठ येथे मा. उपनिबंधक यांचेकडे सादर केल्यानंतर सदर दुरुस्ती प्रकरणे मा.निबंधक तथा वैद्यकिय अधिकारी, मुख्य इमारत, मा. निबंधक यांचाकडून दुरुस्ती पत्रावर स्वाक्षरी करण्यात येते. तद्‌नंतर जन्म-मृत्यु नोंदणी विभाग,मा.निबंधक तथा आरोग्य अधिकारी, पुणे मनपा यांचे मान्यतेने दुरूस्त करण्यात येते. तद्‌नंतर जन्म-मृत्युचे प्रमाणपत्र वर नमूद केलेल्या क्षेत्रिय कार्यालयांकडील नागरी सुविधा केंद्र येथून आवश्यक तितक्‍या दाखल्यांची आवश्यक ती फी भरल्यानंतर उपलब्ध होतात.

22/04/2022

TDR चे मुल्यांन २०२२.२३

या पुर्वी TDR चे मुल्यांकन कसे करायचे य बाबत कोणत्याही मार्गदशक सुचना नव्हत्या. परंतु या वर्षाच्या मार्गदर्शक सुचना क्र.४८ मध्ये स्पष्ट नमुद केले आहे TDR जंगम मालमत्ता असल्याने त्या विभागातील जमीनीच्या दराच्या ३०% दराने मुल्यांकन करावयाचे आहे.

आता पर्यत जंगम मालमत्ते चे मुल्यांकना बाबत विभागाकडुन कोणतेही सुत्र निश्चित केले नव्हते.

उदा.

विभाग ११ जमिन दर 42000 चाै मि
TDR 2000 चाै मि विक्री

म्हणुन
2000 x 42000 x 0.30 =25,200,000

या किंमतीवर २५(अ)प्रमाणे ३% मु शु
व ३०००० नो.फी

टिप १) जर दस्तात मोबदला कमी असला
तरी वरील सुत्राप्रमाणे किंमत काढणे
२) जर सुत्रानुसार येणा-या किंमती हुन मोबदला जास्त असेल तर मोबदल्याच्या किंमती वर मु.शु घ्यावा.
3) कच्चा/पक्का याचा विचार करावयाचा नाही
४) तो कोठे वापरणार त्याचा विचार करायचा नाही

बांधकामात टीडीआर म्हणजे काय? हे कस काम करत?

विकास हक्कांचे हस्तांतरण (TDR) म्हणजे जमिनीच्या मालकाने त्याग केलेल्या किंवा समर्पण केलेल्या क्षेत्राच्या प्राधान्याने काही अतिरिक्त बिल्ट अप एरिया उपलब्ध करून देणे, जेणेकरून तो अतिरिक्त बांधलेले क्षेत्र एकतर स्वत: वापरू शकेल किंवा गरजेनुसार दुसऱ्याला हस्तांतरित करू शकेल. एका मान्य रकमेसाठी अतिरिक्त तयार केलेल्या क्षेत्राचे.

TDR हा रिअल इस्टेट उद्योगातील एक महत्त्वाचा कच्चा माल मानला जाऊ शकतो कारण तो विकासकाला संबंधित ठिकाणच्या प्रचलित नियमांनुसार परवानगी असलेल्या फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) च्या वर आणि वर बांधण्याची परवानगी देतो. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आणि जागेच्या उपलब्धतेच्या अभावामुळे, TDR ला विशेषत: शहरांच्या उपनगरीय भागात जास्त महत्त्व आहे.

जेव्हा सरकार पायाभूत सुविधांचे प्रकल्प तयार करण्यासाठी वैयक्तिक जमिनीच्या पार्सलचे अनिवार्य संपादन करते तेव्हा जमीन मालकांना भरपाई देणे आवश्यक असते. सरकारने दिलेली भरपाई ही बाजारभावापेक्षा कमी असते आणि म्हणूनच त्यांनी हस्तांतरणीय विकास हक्क ही संकल्पना मांडली. हे अधिकार प्रमाणपत्रांच्या स्वरूपात प्राप्त केले जातात, जे मालक स्वत: साठी वापरू शकतात किंवा रोख रकमेसाठी बाजारात व्यापार करू शकतात.

विकासाच्या टप्प्यावर आधारित, शहराचे पूर्ण विकसित, मध्यम विकसित आणि विरळ विकसित अशा विविध झोनमध्ये वर्गीकरण केले जाते. हस्तांतरणीय विकास हक्क सामान्यतः पूर्ण विकसित झोनमधून इतर झोनमध्ये हस्तांतरित केले जातात आणि उलट नाही. उदाहरणार्थ, मुंबईसारख्या शहराच्या बाबतीत, आयलँड सिटीमध्ये (म्हणजे दक्षिणेकडील भाग) निर्माण होणारा टीडीआर उपनगरीय भागात (म्हणजे उत्तरेकडील भाग) विकासासाठी वापरला जाईल. अशा वापराचे मूळ तत्व म्हणजे अविकसित क्षेत्रांचा विकास करणे हे देखील आहे.

हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) चा उद्देश :

शहरी भागात सार्वजनिक उद्देशासाठी विशेषतः रस्ता रुंदीकरण, उद्याने आणि खेळाची मैदाने, शाळा इत्यादींसाठी भूसंपादनाची प्रक्रिया
किचकट, खर्चिक आणि वेळखाऊ आहे. आवश्यक वेळ कमी करण्यासाठी आणि एक प्रक्रिया सक्षम करण्यासाठी, जी वर नमूद केलेल्या आरक्षणाच्या उद्देशांसाठी जमीन संपादन करण्यासाठी फायदेशीरपणे व्यवहारात आणली जाऊ शकते.

हस्तांतरणीय विकास हक्कांचे प्रकार (TDR):

प्रामुख्याने, चार प्रकारचे TDR तयार केले जातात:

• रस्ता TDR.

• आरक्षित भूखंड टीडीआर.

• झोपडपट्टी TDR.

• हेरिटेज TDR.

बहुतेक शहरांमध्ये, बहुतेक बांधकाम कामे झोपडपट्टीच्या टीडीआरच्या मदतीने होतात.

Address

At. Po. Nasarapur Tal. Bhor
Bhor
412213

Telephone

+919421034968

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Velha Samachar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digital Velha Samachar:

Videos

Share


Other Media/News Companies in Bhor

Show All