
20/01/2024
अक्क्या आणि भाल्याची गोष्ट
अक्क्या आणि भाल्या हे दोघे लंगोटी यार. भीक मागून पोटाची खळगी भरणे हा त्यांचा प्रपंच. पण ४ दिवसांपासून त्यांना भीक मिळेना, ४ दिवसांपासून अन्नाचा एक दाणाही त्यांच्या पोटात नव्हता. उपाशी पोट आणि भीक मिळेना म्हणून दोघेही तणावात होते. तेवढ्यात त्यांचा एक जुना मित्र त्यांना भेटतो आणि त्यांची विचारपूस करतो, विचारतो तुम्ही भीक कोणाच्या नावाने मागता? अक्क्या बोलतो मी अल्ल्हाच्या नावाने आणि भाल्या बोलतो मी रामाच्या नावाने. मित्राला त्यांची अवस्था/दुर्दशा बघवत नाही, म्हणून तो त्यांना एक युक्ती सांगतो, तो म्हणतो “तुम्ही दोघेही तुमच्या-तुमच्या नेत्यांकडे जा, आणि त्यांना सांगा की माझ्याकडे झेंडा घ्यायला पैसे नाहीयेत”, दोंघानीही तसेच केले आणि पुढच्या पाचव्याच मिनिटाला अक्क्याच्या टेबलावर बिर्याणी आणि भाल्याच्या टेबलावर पुरणपोळी आणि जिलबी बरोबर नवीन कपडे खिशात प्रत्येकी रु. १०००/-.
यातून काय शिकायला मिळालं तर अडचण कशीही कितीही मोठी असूद्यात, दृष्टिकोन बदला, मार्ग बरोबर निघतो. २-५ रुपये भीक मागणाऱ्यांच्या खिशात १००० रुपये, म्हणजे उपरवाला देता है तो छप्पर फाडके...
गोष्ट एवढ्यावर नाही संपली, यात पुढे अस झालं की, दोघांनाही आता नवी ओळख मिळालीय – ‘कार्यकर्ता’. मात्र आता हे लंगोटी यार, एकमेकांचे पक्के वैरी बनलेत. का कोणास ठाऊक? अस कसं झालं ते...