Mantralay Mumbai-32

Mantralay Mumbai-32 महाराष्ट्र शासनाच्या बातम्या ऐकायला मिळतील https://youtube.com/channel/UC6R96SrtuuU0H1LHaqSTKWw

11/11/2023

देश का रक्षक

10/11/2023
भरोसा सेल च्या तत्कालीन महिला पोलीस अंमलदार श्रीमती सौ. सुनंदा सतदेवे उर्फ सुनंदा खोब्रागडे ह्या नंग्या, चोर, बदमाश, कुल...
08/11/2023

भरोसा सेल च्या तत्कालीन महिला पोलीस अंमलदार श्रीमती सौ. सुनंदा सतदेवे उर्फ सुनंदा खोब्रागडे ह्या नंग्या, चोर, बदमाश, कुलटा महिलांचा पक्ष घेत होत्या.
एका सामाजिक कार्यकर्त्याची खळबळजनक ग्राउंड रिपोर्टिंग.

प्रतिनिधी भंडारा वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत सभ्य घराण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांच्या भ्रष्टाचार...

२०४७ च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपूरचे योगदान राहील : पालकमंत्री श्री. मुनगंटीवारचंद्रपुरात ‘साद सह्याद्रीची...भूमी म...
30/08/2023

२०४७ च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपूरचे योगदान राहील : पालकमंत्री श्री. मुनगंटीवार
चंद्रपुरात ‘साद सह्याद्रीची...भूमी महाराष्ट्राची’ सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचा जागर


चंद्रपूर, दि.२५ : ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात ‘साद सह्याद्रीची...भूमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपुरकरांनी उत्साहपूर्ण वातावरणात देशभक्तीचा जागर करत डोळ्याचे पारणे फिटल्याची भावना व्यक्त केली.

२३ ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.05 वाजता भारताच्या वैज्ञानिकांनी चांद्रयान – 3 हे मिशन यशस्वी करून दाखविले. या गोष्टीचा जोश नागरिकांमध्ये होताच. त्यानंतर लगेच सुरू झालेल्या ‘साद सह्याद्रीची...भूमी महाराष्ट्राची’ या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात डौलाने फडकणारा तिरंगा आणि नागरिकांचा उत्साह अभुतपूर्व होता. सांस्कृतिक विभाग (म.रा.), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन चांदा क्लब ग्राऊंडवर करण्यात आले होते.

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पूजा सावंत तसेच प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांच्यासह जवळपास ३०० कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यात शिवराज्याभिषेक सोहळा, भारतीय स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, वारक-यांच्या वेशातील सादरीकरण, देवीचा जागर, अस्सल मराठी नृत्य, पोवाडा, सीमेवरील जवानांच्या वेशातील सादरीकरण अशा विविध नृत्यांनी आसमंत दणाणला. चांद्रयान मोहिमेचे यश, वैज्ञानिकांचे परिश्रमाचे फळ आणि देशभक्तीचा जागर असा त्रिवेणी संगम बुधवारी चंद्रपुरात अनुभवायला मिळाला.

२०४७ च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपूरचे योगदान राहील - पालकमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 9 ऑगस्ट 2023 पासून ‘मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गावपातळीपर्यंत हा उपक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सन 2047 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होणार आहे. 2047 च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपुरचे नक्कीच योगदान राहील, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

चांदा क्लब ग्राऊंड येथे ‘साद सह्याद्रीची...भूमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात भारताला भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त, समतायुक्त घडवायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. सद्यस्थितीत आपण भद्रावती येथून सीमेवरील आपल्या सैन्यासाठी बॉम्ब पाठवितो. चंद्रपुरात 122 एकर मध्ये असलेल्या सैनिक स्कूलमधून भविष्यात देशाच्या रक्षणासाठी हे सैनिक जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपले चंद्रपूर नेहमी अग्रेसर असले पाहिजे, चंद्रपुरचा गौरव वाढावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

०००

व्याज परतावा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटनइतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी...
29/08/2023

व्याज परतावा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन
इतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी योजनेचा लाभ घ्यावा - मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. २४ : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘गट कर्ज व्याज परतावा योजने’च्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.अध्यक्ष अतुल सावे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. राज्यातील इतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, स्वतःच्या उद्योग उभारणीतून समाजातील अन्य गरजू व्यक्तींनादेखील रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी आणि राज्याच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री श्री.सावे यांनी केले.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.चे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर, एसडीएफसी बँकेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष प्रिती शर्मा, महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री सावे म्हणाले की, राज्यातील इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश असलेल्या शासन प्रमाणिकरण प्राप्त गटांना स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरिता बँकेतर्फे देण्यात येणाऱ्या कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत देण्यात येणार आहे.या योजनेमुळे मोठया प्रमाणत रोजगार उपलब्ध होणार आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत प्रती गटास बँकेकडून जास्तीत जास्त १० लाख रुपये आणि उद्योग उभारणीकरिता बँकेमार्फत ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषीसंलग्न व पारंपरिक उपक्रम तसेच लघु उत्पादन व व्यापार / विक्री संदर्भातील लघु व मध्यम उद्योग त्याचप्रमाणे सेवाक्षेत्रातील गट या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि १५ लाख रुपये इतक्या रक्कमेच्या मर्यादेत व्याजाची रक्कम गटाच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळाद्वारे जमा करण्यात असल्याचे ही त्यांनी सांगीतले.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरीता वैयक्तिक व्याज परतावा योजना (रु.१०.०० लक्ष पर्यंत) देखील ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, बँकेमार्फत राबविण्यात येणाच्या या योजनेंतर्गत आतापर्यंत ४ हजार २७३ लाभार्थींना महामंडळामार्फत Letter of Intent (Lol) लाभ देण्यात आला आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या अधिक माहिती व सहभागाकरिता इच्छुकांनी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन योजनांचे पोर्टल या Menu वरील गट कर्ज व्याज परतावा या योजनेवर Click करुन माहिती घ्यावी, असे महामंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

0000

विधानमंडळाच्या सन्माननीय सदस्यांचा जर्मनी, नेदरलॅंड्स आणि यु.के. ला अभ्यासदौरा मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र विधानमंडळाच्या...
29/08/2023

विधानमंडळाच्या सन्माननीय सदस्यांचा जर्मनी, नेदरलॅंड्स आणि यु.के. ला अभ्यासदौरा


मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सन्माननीय सदस्यांसाठी दिनांक २४ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर,२०२३ या कालावधीत तीन युरोपीय देशांच्या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासदौऱ्यात २२ सन्माननीय सदस्य सहभागी झाले आहेत. या दौऱ्यात ०६ अभ्यासभेटी, बैठका होणार आहेत. या परदेश अभ्यास दौऱ्याला परराष्ट्र व्यवहार मंत्रालय,भारत सरकार, यांची मान्यता (Political Clearance) प्राप्त झाली आहे. अभ्यास दौऱ्यावरील सन्माननीय सदस्यांचे शिष्टमंडळाचे नेतृत्व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे करत आहेत. फ्रॅंन्कफर्ट (जर्मनी), ॲमस्टरडॅम (नेदरलँड्स) आणि लंडन (यु.के.) या शहरांना भेट देईल. एकूण २२ सन्माननीय सदस्यांमध्ये निम्म्या संख्येने म्हणजे ११ महिला सदस्या या शिष्टमंडळात सहभागी झाल्या आहेत.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालयाला तसेच अन्य अभ्यासभेटींचे आयोजन

अभ्यासदौऱ्यात प्रारंभी फ्रॅंन्कफर्ट येथे सामाजिक, सांस्कृतिक तसेच कृषी आणि दुग्धउत्पादन क्षेत्रातील तज्ञांबरोबर तसेच भारताचे उच्चायुक्त यांच्यासमवेत बैठक होईल. त्याचप्रमाणे जर्मनीत स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्य करणाऱ्या अभ्यासगटाबरोबर चर्चा-संवाद आयोजित करण्यात आली आहे.

ॲमस्टरडॅम येथे नेदरलॅंडच्या विविध क्षेत्रांतील तज्ञांबरोबर तसेच संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच (UN Women And Gender Equality Forum) सदस्यांसोबत अभ्यासभेट, चर्चा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भारताचे नेदरलॅंडमधील राजदूत यांचीही अभ्यासभेटीवरील सन्माननीय सदस्य भेट घेतील.

त्याचप्रमाणे लंडन येथे देखील भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच, लंडन, (UN Women Orgnisation And Gender Equality Forum in United Kingdom), लंडनमधील मराठी मंडळाचे पदाधिकारी, यु.के. पार्लमेंट मधील राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालय आणि महासचिव (Secretary-General, CPA Headquarters) यांच्या समवेतदेखील अभ्यासभेट आयोजित करण्यात आली आहे.

००००

सिनेसृष्टीतले बहुगुणी, सालस व्यक्तिमत्व हरपले – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना...
29/08/2023

सिनेसृष्टीतले बहुगुणी, सालस व्यक्तिमत्व हरपले – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना मंत्री श्री. मुनगंटीवार यांची श्रद्धांजली

मुंबई दि. २४: “भारतीय सिनेसृष्टीतले एक सालस व्यक्तिमत्व हरपले आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाच्या काळात चित्रपट सृष्टीसारख्या क्षेत्रात अतिशय उच्च स्थान निर्माण करतांना आणि आयुष्यभर ते स्थान कायम राखतानाही स्वतःवरील आणि आपल्या कुटुंबावरील भारतीय संस्कार जतन करणाऱ्या सीमाताई भारतीयांच्या कायम लक्षात राहतील,” अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनेत्री सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

“सीमाताईंच्या व्यक्तिमत्वात साधेपणा आणि सुसंस्कृत, सालसपणा ठासून भरला होता. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत रमेश देव, सीमा देव या दोघांनीही आपआपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते, त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका अजरामर म्हणाव्यात अशा आहेत. ईश्वर सीमाताईंना सद्गती देवो. या दुःखाच्या काळात मी देव परिवाराच्या सोबत आहे. या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ ईश्वर देव परिवारास देवो ही प्रार्थना करतो,” असे श्री.मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

०००

कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री हरपली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव या...
29/08/2023

कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री हरपली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. २४: मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

जपान दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सीमा देव यांच्या निधनाची बातमी समजताच ते भावूक झाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस अपल्या संदेशात म्हणतात की, ज्येष्ठ अभिनेत्री सीमाताई देव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. 'आनंद' चित्रपटातील त्यांची भूमिका संस्मरणीय होती. त्यांनी एक मोठा कालखंड गाजवला. गत वर्षीच रमेश देव आपल्यातून निघून गेले आणि आज सीमाताई! ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आज आपल्यातून निघून गेली आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या त्या साक्षीदार होत्या. यशाची शिखरे चढूनही त्यांच्यात असलेला नम्र भाव उल्लेखनीय होता.

त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत भूमिका साकारल्या. त्यांचे आपल्यातून निघून जाणे सिने जगतातील एका अध्यायाची अखेर आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

०००

Address

Bhandara
441905

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mantralay Mumbai-32 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mantralay Mumbai-32:

Videos

Share

Category


Other Bhandara media companies

Show All

You may also like