Belgaum Express Media

Belgaum Express Media Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Belgaum Express Media, News & Media Website, Belgaum.

16/11/2024
16/11/2024

जय भवानी जय शिवराय

बिच्चु गल्ली गाडेमार्ग शहापूर येथील बाल युवकांनी किल्ले अवचित गडा ची हुबेहुब प्रतिकृती साकारली या उद्घाटनाला उपस्थित म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे माजी अध्यक्ष शुभम शिळके आणि समितीचे निष्ठावंत कार्यकर्ता सुरज जाधव याचा हस्ते व गल्ली तील शिवभक्त आणि कार्यकर्ते यांच्या हस्ते सोहळा पार पडण्यात आला ( शिवनेरी युवक मंडळ )
बिच्चु गल्ली शहापूर

बेळगावच्या या भागात उद्या रविवारी वीजपुरवठा खंडित
16/11/2024

बेळगावच्या या भागात उद्या रविवारी वीजपुरवठा खंडित

बेळगावच्या या भागात उद्या रविवारी वीजपुरवठा खंडित बेळगांव: 10KV औद्योगिक उपकेंद्रातील वीज पुरवठा सकाळी 9 ते 17 वाजेप.....

बेळगावात अंगावरील कपडे काढून महिलेला मारहाण
16/11/2024

बेळगावात अंगावरील कपडे काढून महिलेला मारहाण

बेळगावात अंगावरील कपडे काढून महिलेला मारहाण बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावात एका महिलेला अर्धनग्न अवस.....

झाशींमध्ये रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू.झांशी : उत्तर प्रदेश मधील लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी...
16/11/2024

झाशींमध्ये रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू.
झांशी : उत्तर प्रदेश मधील लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी सकाळी नवजात शिशु विभागाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. तर १६ बालकं गंभीर जखमी झाले आहेत. ३७ बालकांना खिडकीच्या काचा तोडून वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याचे समोर आले. आगीची घटना घडताच रुग्णालयात गोंधाळाची स्थिती निर्माण झाली. कुटुंबीय आणि रुग्ण जीव वाचवण्यासाठी धावत होते, त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढले. आगाची घटना घडली त्यावेळी रुग्णालयाच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ नवजात बालकं होती.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती झाशीचे जिल्हा अधिकारी अविनाश कुमार यांनी दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला, त्याशिवाय सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

शतायुषी पुरुषोत्तम कुलकर्णी यांचे निधन बेळगाव मूळचे अम्मणगी  आणि सध्या क्वीन्स कोर्ट अपार्टमेंट, दुसरे रेल्वे गेट टिळकवा...
16/11/2024

शतायुषी पुरुषोत्तम कुलकर्णी यांचे निधन

बेळगाव

मूळचे अम्मणगी आणि सध्या क्वीन्स कोर्ट अपार्टमेंट, दुसरे रेल्वे गेट टिळकवाडी येथील रहिवासी पुरुषोत्तम सदाशिवराव कुलकर्णी (वय 102) यांचे दि. 16 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना जावई नातवंडे आणि पणतवंडे असा परिवार आहे. न्यू इंडिया एश्शुरन्स कंपनीचे निवृत्त व्यवस्थापक रत्नाकर कुलकर्णी यांचे ते वडील होत.

MRINALINI ENGLISH ACADEMYENGLISH FOR THE NEXT GENERATIONEnglish Speaking Course forStudents |ProfessionalsHousewives• BO...
16/11/2024

MRINALINI ENGLISH ACADEMY

ENGLISH FOR THE NEXT GENERATION

English Speaking Course for

Students |

Professionals

Housewives

• BOOST CONFIDENCE

• ADVANCE YOUR CAREER

Key features: Vocabulary/Grammar/ Fluency / Speaking Skills / Interview Skills

Join Now!

Contact:

+91 0831-4206386

+91 9620201748

#126/1, Bharat Nagar, 3rd Cross, Above Union Bank of India, Vadagaon, Belagavi 590005

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या,बालदिन सन्मान पुरस्काराचे वितरण बेळगाव- जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी च्या माध्यमातून दरवर...
15/11/2024

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या,बालदिन सन्मान पुरस्काराचे वितरण

बेळगाव-
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी च्या माध्यमातून दरवर्षी बालदिन सन्मान पुरस्काराचे वितरण केले जाते. याही वर्षी बाल दिनाचे औचित्य साधून 14 नोव्हेंबर रोजी हे पुरस्कार वितरित करण्यात आले स्व.श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ दिले जाणारे हे पुरस्कार यंदा महिला विद्यालय हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी प्रकाश सांबरेकर आणि भरतेश हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी स्नेहल किसन औशीकर यांना प्रदान करण्यात आले.
सुवर्ण लक्ष्मी सोसायटीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पायोनियर बँकेचे संचालक व जायंट्स इंटरनॅशनल चे विभागीय संचालक श्री अनंत लाड यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि श्यामची आई पुस्तक भेट देऊन अनंत लाड यांनी हे पुरस्कार वितरित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील या होत्या तर व्यासपीठावर सुवर्ण लक्ष्मीचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर ,सौ मनीषा मोहन कारेकर व सखीच्या विद्या सरनोबत या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत करून सखीच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला.
"गेल्या आठ वर्षात जायंट्स सखीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पडली आहे. इतर संघटना पेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा मानस ठेवून या संस्थेचे कार्य सुरू आहे. महिलांनी आत्मनिर्भर होण्याची गरज असून समाज त्यांच्या पाठीशी नेहमीच उभा आहे हे लक्षात घेऊन महिलांनी कार्यरत राहण्याची गरज आहे" असे विचार यावेळी बोलताना अनंत लाड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप विद्या सरनोबत यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. सूत्रसंचालन सौ मधुरा शिरोडकर यांनी केले कार्यक्रमास मोहन कारेकर, नम्रता महागावकर, चंदा चोपडे, शीतल पाटील, अर्चना कंगराळकर, दीपा पाटील, स्वाती फडके यांच्यासह अनेक सुवर्णलक्ष्मीचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते

*राजहंसगड किल्ला प्रतिकृती केलेल्या गोकुळ नगर मधील* *मुलामुलींचा सत्कार* गुडशेड रोड गोकुळ नगर येथील लहान मुलामुलींना अथक...
15/11/2024

*राजहंसगड किल्ला प्रतिकृती केलेल्या गोकुळ नगर मधील* *मुलामुलींचा सत्कार*

गुडशेड रोड गोकुळ नगर येथील लहान मुलामुलींना अथक परिश्रम घेत येल्ल्युर बेळगाव येथील किल्लाची सुंदर अशी प्रतिकृती तयार करून सर्वांची वाह वाह मिळवली.हा किल्ला तयार करणारा सर्वांचा बेळगाव रोलर स्केटिंग अकॅदमी तर्फे आकर्षक मेडल देऊन सुर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले
*सत्कार करण्यात आलेली नावे*
केदार बिर्जे,वर्धन वेरणेकर, सिध्दी जाधव, अमित पाटील, आर्या जाधव,दर्शन वाडेकर, द्रुव शिंदे,दिनेश वाडेकर

यावेळी अविनाश बिर्जे, सागर जाधव, गोकुळ नगर येथील महिला व नागरिक उपस्थित होते

चार वाहनांचा अपघात, एक जण जागीच ठारबेळगाव-निपाणी जवळील तवंदी घाटात पाच वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एक जण जागीच ठार, तर ...
15/11/2024

चार वाहनांचा अपघात, एक जण जागीच ठार

बेळगाव-
निपाणी जवळील तवंदी घाटात पाच वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एक जण जागीच ठार, तर अन्य 14 जण जखमी झाले आहेत. या अपघातात सर्व वाहनांचे मिळून एकूण दहा लाखापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या अपघातात रामायण भागु पारवाडकर (वय 65) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

तवंदी घाटात सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास पाच वाहनांचा भीषण अपघात झाला. ट्रकने दोन कार, एक क्रुझर, व एका दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे क्रुझर मधील प्रमोद पारवाडकर (वय 14), वैष्णवी घाडी (वय 25), विद्या पारवाडकर (वय 46), रेश्मा कुडतुरकर (वय 40), शंकर पारवाडकर (वय 28), संग्राम पारवाडकर (वय 12), सुहास पारवाडकर (वय 49) प्रियांका पारवाडकर (वय 25), प्रतिक्षा परवाडकर (वय 22), मोहन पारवाडकर (वय 27), स्वाती पारवाडकर (वय 35) आयेषा दळवी (वय 5), तसेच दुचाकी वरील संतोष बिटेगिरी (वय 40), व त्यांची पत्नी अंजना संतोष बिटेगिरी (वय 35), राहणार गडहिंग्लज, असे एकूण 14 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रुझर मधील मृत झालेला वृद्ध व जखमी झालेले सर्वजण खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील असल्याचे समजते.

MRINALINI ENGLISH ACADEMYENGLISH FOR THE NEXT GENERATIONEnglish Speaking Course forStudents |ProfessionalsHousewives• BO...
15/11/2024

MRINALINI ENGLISH ACADEMY

ENGLISH FOR THE NEXT GENERATION

English Speaking Course for

Students |

Professionals

Housewives

• BOOST CONFIDENCE

• ADVANCE YOUR CAREER

Key features: Vocabulary/Grammar/ Fluency / Speaking Skills / Interview Skills

Join Now!

Contact:

+91 0831-4206386

+91 9620201748

#126/1, Bharat Nagar, 3rd Cross, Above Union Bank of India, Vadagaon, Belagavi 590005.

*लक्ष्मण नारायण लोहार यांचे दु:खद निधन*लक्ष्मण नारायण लोहार ,खडेबाजारचे रहिवासी ,यांचे काल  अल्पशा आजार मुळे  आज 14 नोव्...
14/11/2024

*लक्ष्मण नारायण लोहार यांचे दु:खद निधन*

लक्ष्मण नारायण लोहार ,खडेबाजारचे रहिवासी ,यांचे काल अल्पशा आजार मुळे आज 14 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले आहे.
सदाशिव नगर स्मशानभूमीत 10.30 वाजता अंत्यसंस्कार केले जाईल.

बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे लाईन प्रकल्प* *श्री व्ही. सोमन्ना, माननीय रेल्वे राज्यमंत्री आणि जलशक्ती, बेळगावी-धारवाड नवीन ...
14/11/2024

बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे लाईन प्रकल्प*

*श्री व्ही. सोमन्ना, माननीय रेल्वे राज्यमंत्री आणि जलशक्ती, बेळगावी-धारवाड नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा*

बेळगाव - बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज बेळगाव येथील उपायुक्त कार्यालयात रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री श्री व्ही. सोमन्ना यांच्या अध्यक्षतेखाली विस्तृत आढावा बैठक झाली. हा महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प बेळगावी आणि धारवाड या प्रमुख जिल्ह्यांमधील रेल्वे संपर्क वाढवण्यासाठी तयार आहे, जो या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्याचे वचन देतो.

या बैठकीत प्रकल्पासाठी बेळगाव जिल्ह्यात एकूण 600 एकर, तर धारवाड जिल्ह्यात 288 एकर जागेची आवश्यकता असल्याची चर्चा झाली. बेळगावीचे उपायुक्त श्री मोहम्मद रोशन यांनी मंत्री महोदयांना आश्वासन दिले की, बेळगावमधील भूसंपादनाची प्रक्रिया मार्गी लागली असून, डिसेंबर 2024 पर्यंत 80% जमीन संपादित करणे अपेक्षित आहे आणि जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण संपादन करणे अपेक्षित आहे. दरम्यान, धारवाड जिल्ह्यात, 42 एकर क्षेत्र वगळता भूसंपादन प्रगतीपथावर आहे, ज्यासाठी कर्नाटक राज्य सरकार सक्रियपणे जमीन संपादित करते आणि लवकरात लवकर रेल्वेला सुपूर्द करते.

श्री. व्ही. सोमन्ना यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विलंब टाळण्यासाठी मुदतींचे पालन करण्याचे आणि संसाधन वाटपाचे अनुकूलतेचे महत्त्व अधोरेखित करून प्रयत्नांना गती देण्याच्या सूचना दिल्या. सुधारित कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षितता सुलभ करण्यासाठी बेलगावी जिल्ह्यात पाच रोड ओव्हर ब्रिज (ROB) आणि एक रोड अंडर ब्रिज (RUB) बांधण्याच्या योजनांसह, पायाभूत सुविधांचे समर्थन वाढवण्यावर देखील चर्चा करण्यात आली.

या आढावा बैठकीला माननीय खासदार श्री इराण्णा काडादी, श्रीमती इराणा काडादी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिव्या प्रभू, उपायुक्त धारवाड (व्हिडिओ लिंकद्वारे सामील झाले), श्री राहुल शिंदे, बेळगावीचे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री हर्ष खरे, हुबळी विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, श्री जे. सधर्मा देव रॉयल, मुख्य अभियंता (बांधकाम-II) हुबली, दक्षिण पश्चिम रेल्वे आणि कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळ (KIADB) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह.

ईशान करगुप्पीकर याला राज्यस्तरीय कराटेमध्ये सुवर्णबेळगाव :शहरातील टिळकवाडी येथील गोगटे पदवी पूर्व महाविद्यालयाचा विद्यार...
14/11/2024

ईशान करगुप्पीकर याला राज्यस्तरीय कराटेमध्ये सुवर्ण

बेळगाव :

शहरातील टिळकवाडी येथील गोगटे पदवी पूर्व महाविद्यालयाचा विद्यार्थी व कराटेपटू ईशान करगुप्पीकर याने नुकत्याच पार पडलेल्या एसजीएफआय 19 वर्षाखालील राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धा -2024 मध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.

गोगटे पदवी पूर्व महाविद्यालयाच्या प्रथम वर्षामध्ये शिकणाऱ्या ईशान करगुप्पीकर याने 19 वर्षाखालील दावणगिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतील आपल्या वजनी गटाची अंतिम फेरी जिंकून सुवर्णपदक हस्तगत केले. सदर कामगिरीमुळे ईशान याची आता राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत गोगटे महाविद्यालयाने संपादन केलेले हे पहिले सुवर्णपदक आहे. या चमकदार कामगिरीबद्दल केएलएस संस्थेचे सदस्य, गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. केरूर आणि प्राध्यापकवर्गाने ईशान करगुप्पीकर याचे खास अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. महाविद्यालयाचा कर्मचारी वर्ग तसेच वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांकडून देखील ईशान याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

14/11/2024

गर्लगुंजीत विद्यार्थनचा बस करिता रास्ता रोको

*40 व्या राज्य रोलर स्केटिंग स्पर्धा 2024 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले* कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 40 ...
14/11/2024

*40 व्या राज्य रोलर स्केटिंग स्पर्धा 2024 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले*

कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 40 वी राज्य रोलर स्केटिंग स्पर्धा आणि निवड चाचनी 2024 या मध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्स नी सहभाग घेतला होता
7 ते 11 नोव्हेंबर 2024 या दरम्यान या स्पर्धा म्हैसूर, बेंगळुरू आणि तुमकूर येथे आयोजित केल्या होत्या 15 जिल्ह्यातून एकूण 800 पेक्षा जास्त स्केटरनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. बेळगावच्या स्केटर्सनी 22 सुवर्ण, 10 रौप्य 20 कांस्य अशी एकूण 52 पदके जिंकली
*पदक विजेत्या स्केटरचे नाव*
*स्पीड स्केटर*
अवनीश कामन्नवर २ कांस्य
वीर मोकाशी १ कांस्य
आर्या कदम ३ कांस्य
भव्य पाटील १ कांस्य
सत्यम पाटील १ कांस्य
सौरभ साळोखे १ सुवर्ण, १ कांस्य
प्रांजल पाटील १ कांस्य
आराध्या पी १ सुवर्ण, १ कांस्य
अनघा जोशी १ रौप्य, १ कांस्य
जान्हवी तेंडूलकर २ रौप्य, १ कांस्य
विशाखा फुलवाले १कांस्य

*इनलाइन फ्री स्टाइल स्केटर*
हिरेन एस राज २ सुवर्ण
अथर्व हडपड २ रौप्य
अवनीश कोरीशेट्टी १ सुवर्ण, १ रौप्य
द्रीष्टी अंकले २ रौप्य
उज्वल साई २कांस्य
जयध्यान एस राज २ सुवर्ण
रश्मिता डी अंबिगा २ सुवर्ण
देवेन व्ही बामणे २सुवर्ण
अभिषेक नवले १ रौप्य

*रोलर डर्बी स्केटर*
अनुष्का शंकरगौडा १ सुवर्ण
खुशी घोटीवरेकर १ सुवर्ण
शेफाली शंकरगौडा १ सुवर्ण
अन्वी सोनार १ सुवर्ण
सई शिंदे १ सुवर्ण
शर्वरी दड्डीकर १ सुवर्ण
मुदालसिक्का १ सुवर्ण

*दीवांग आणि पॅरा स्केटर*
सई पाटील १ सुवर्ण
तीर्थ पाचापूर 1 सुवर्ण
सिद्धार्थ काळे १ सुवर्ण
विराज पाटील १ कांस्य
स्वयंम पाटील १ कांस्य

*अल्पाइन स्केटर*
साईराज मेंडके 1 रौप्य पदक

*आर्टिस्टिक स्केटर*
खुशी आगशीमणी 1 सुवर्ण 1 कांस्य

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका स्केटिंग रिंक,केएलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत असून या सर्व स्केटर्सना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरएसए यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

भारत विकास परिषदेच्यावतीने "ॲनिमिया"व्याख्यान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर  बेळगाव/      भारत विकास परिषदेच्या "ॲनिमिया मु...
14/11/2024

भारत विकास परिषदेच्यावतीने "ॲनिमिया"
व्याख्यान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव/
भारत विकास परिषदेच्या "ॲनिमिया मुक्त भारत" या राष्ट्रव्यापी आरोग्य अभियानांतर्गत बेळगाव शाखेतर्फे मंगळवारी ॲनिमियावर विशेष व्याख्यान तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. नीता देशपांडे तसेच गौरवान्वित अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. अरूण जोशी उपस्थित होते. सेंट्रा केअर हॉस्पिटलच्या सहयोगाने हा स्तुत्य उपक्रम येथील एस. बी. पाटील शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात राबविण्यात आला. यावेळी 125 जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पांडुरंग नायक यांनी अतिथिंची ओळख करून दिली. विनायक मोरे यांच्या हस्ते डॉ. नीता देशपांडे यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. नीता देशपांडे म्हणाल्या, रक्तात लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याने ॲनिमिया होतो. आहाराकडे नीट लक्ष न दिल्याने हा आजार होतो. आयर्न आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. शरीरात आयर्नच्या कमतरतेमुळे ॲनिमियासारखी गंभीर समस्या होऊ शकते. लोह, व्हिटॅमिनची कमतरता आणि क्रॉनिक आजारांमुळे ॲनिमिया होतो.
थकवा, कमजोरी, श्वास घेण्यास समस्या, पिवळी त्वचा, हृदयाचे ठोके नियमित नसणे, चक्कर येणे, छातीमध्ये वेदना, पाय आणि हात थंड पडणे, सतत डोकेदुखी ही ॲनिमियाची लक्षणे आहेत. यासाठी पौष्टिक आहार घेणं महत्वाचं आहे. आयर्न असलेले पौष्टिक धान्य, हिरव्या पालेभाज्या आणि ड्रायफ्रुट्स आहारात घ्यावे, असे डॉ. नीता देशपांडे यांनी सांगितले.
डॉ. अरूण जोशी म्हणाले, माणसाचे आरोग्य उत्तम असेल तर तो आयुष्यात काहीही करु शकतो. पोषक आहार तुमचे आरोग्य चांगले ठेवतो. आरोग्य उत्तम राहायला दररोज वेळेवर झोपणे, व्यायाम करणे, योग्य प्रमाणात चालणे या गोष्टी पण फायदेशीर ठरतात. मनाचं आरोग्य बिघडलं तर शरीराचं बिघडतं. त्यासाठी सतत हसत आनंदी रहा.
प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. यावेळी व्ही. एन्. जोशी, विनायक घोडेकर, कॅप्टन प्राणेश कुलकर्णी, चंद्रशेखर इटी, पी. जे. घाडी, शशिधर हिरेमठ, शानभाग, विनायक ताम्हणकर, जया नायक, रजनी गुर्जर, विद्या इटी, ज्योती प्रभू, रूपा कुलकर्णी, सपना मक्कन्नवर, सुचेता जोडत्ती, रतन अडिके आदि तसेच सेंट्रा केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Address

Belgaum

Alerts

Be the first to know and let us send you an email when Belgaum Express Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other News & Media Websites in Belgaum

Show All