Barshi Times

Barshi Times बार्शीकरांचं हक्काचं व्यासपीठ -
MH32D0011783

मिशन  #वाघोबा सुरू....!
15/01/2025

मिशन #वाघोबा सुरू....!

पंचायत समिती गटनेते सुंदरराव  #जगदाळे यांचं निधन #बार्शी - बार्शी पंचायत समिती गटनेते आणि आमदार दिलीप सोपल यांचे समर्थक ...
14/01/2025

पंचायत समिती गटनेते सुंदरराव #जगदाळे यांचं निधन

#बार्शी - बार्शी पंचायत समिती गटनेते आणि आमदार दिलीप सोपल यांचे समर्थक सुंदरराव जगदाळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते मूळ चारे गावचे रहिवाशी होते, मात्र व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यातही राहत.

त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर सकाळी 8 वाजता चारे गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

#भावपूर्ण श्रद्धांजली

आजचे श्री  #भगवंत-लक्ष्मी दर्शन...!
14/01/2025

आजचे श्री #भगवंत-लक्ष्मी दर्शन...!

14/01/2025

मकर #संक्रांतीनिमित्त महिलांची सकाळपासून पूजनासाठी #भगवंत मंदिरात गर्दी...

गोड  #गाजराचं गाव भांडगाव,  #संक्रातीच्या सणाचा असाही गोडवा #बार्शी - आपल्या तालुक्याशेजारील परांडा तालुक्यातील भांडगाव ...
14/01/2025

गोड #गाजराचं गाव भांडगाव, #संक्रातीच्या सणाचा असाही गोडवा

#बार्शी - आपल्या तालुक्याशेजारील परांडा तालुक्यातील भांडगाव हे गाजरासाठी प्रसिद्ध आहे. १००%नैसर्गिक अशी येथील गाजरांची ओळख, आरोग्यासाठी फायदेशीर ही गोड गाजर ठरतात. गाजरांचं हे पीक ९० ते १२० दिवसात काढणीसाठी येते, केवळ पावसाच्या पाण्यावर हे पीक कुठलीही फवारणी किंवा खते कीटकनाशके न वापरता येते. सध्या बाजारात लांब, संपक हायब्रीड गाजरं पाहायला मिळतात. त्यामुळे, संक्रांतीच्या सणानिमित्त या गाजराचाही गोडवा प्रसिद्ध आहे.

मकर संक्रात सणाला जसे तिळाचे महत्त्व असते, तसे गाजराचे पण तितकेच महत्त्वाचे स्थान असते. त्यामुळे, भांडगावच्या गोड धोड गाजरांची चर्चा होते. ही गाजरे बाजारपेठचा विचार केल्यास, प्रामुख्याने बार्शी, परांडा, वाशी, भूम, धाराशिव, करमाळा तालुक्यातील अनेक भागात विक्री केली जातात. संक्रात सणामुळे बाजारभावही चांगल्या प्रकारचा मिळत असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंद व समाधान पाहायला मिळते. याबाबत, भांडगावचे शेतकरी पुत्र
पृथ्वीराज ताकमोगे यांनी माहिती देत गाजरं खाण्यासाठी भांडगावला भेट देण्याचं आवाहन देखील केलंय.

14/01/2025

लहानपणी घरोघरी जाऊन
'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असं म्हणत हात पुढं करायचो,
यातच खरा गोडवा होता
मकर संक्रांत... !

आजोबाचं  #नातवावरलं शब्दरूपी प्रेम...!आयुष्याच्या प्रत्येक वळणाचा योग्य मार्गाने अनुभव घेत त्यात यश संपादित करण्याची तुझ...
13/01/2025

आजोबाचं #नातवावरलं शब्दरूपी प्रेम...!

आयुष्याच्या प्रत्येक वळणाचा योग्य मार्गाने अनुभव घेत त्यात यश संपादित करण्याची तुझी चाललेली धडपड ही सदैव अशीच सुरु राहो. ज्या क्षेत्रात तुला आवड आहे त्यामध्ये उत्तुंग भरारी घेण्याऱ्या तुझ्या जिद्दाला एक आजोबा म्हणून नेहमीच पाठबळ राहील. विजय तुला या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

खा. शरदचंद्र पवार

बार्शी टाईम्सवर करा व्यवसायाची  #जाहिरातसंपर्क - 8767486146           8668310067 #बार्शी
13/01/2025

बार्शी टाईम्सवर करा व्यवसायाची #जाहिरात
संपर्क - 8767486146
8668310067

#बार्शी

 #बार्शी तिथं सरशी ! जिल्हास्तरीय स्पर्धेत 5 प्रकारात  #बानपा कर्मचारी अव्वल #सोलापूर : नगर विकास विभाग सोलापूर जिल्हास्...
13/01/2025

#बार्शी तिथं सरशी ! जिल्हास्तरीय स्पर्धेत 5 प्रकारात #बानपा कर्मचारी अव्वल

#सोलापूर : नगर विकास विभाग सोलापूर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम 2024 - 25 अंतर्गत बार्शी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. या जिल्हास्तरीय स्पर्धेत 5 क्रीडा व सांस्कृतिक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत बार्शी तिथं सरशी असल्याचे बानपा कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले.

सोलापूर जिल्हास्तरीय स्पर्धेतील विशेष प्राविण्यबद्दल विजेत्या कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक व मेडल देऊन जिल्हा सह आयुक्त, सोलापूर वीणा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बानपा मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी सर्व कर्मचारी यांना मौल्यवान साथ देऊन स्पर्धेसाठी स्वतः उपस्थित राहून अभिनंदन केले.

कर्मचाऱ्यांनी समूह गायन, कॅरम, रांगोळी, फ्री स्टाईल स्विमिंग, 100 मीटर धावणे या 5 प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत बार्शीची सरशी सिद्ध केलीय.

#स्पर्धेतील विजेता कर्मचारी

1) नाटिका :- द्वितीय क्रमांक श्री. रवींद्र वाघमारे
तृतीय क्रमांक:- प्रकाश लंकेश्वर
2) बॅडमिंटन दुहेरी पुरुष:- तृतीय क्रमांक श्री योगेश कारंजकर श्री सागर नान्नजकर
बॅडमिंटन दुहेरी महिला द्वितीय क्रमांक अंकिता एकबोटे सलोनी बनसोडे
3) समूह गायन:- #प्रथम क्रमांक श्री संतोष कांबळे व श्री प्रकाश लंकेश्वर*
4) वैयक्तिक गायन:- तृतीय क्रमांक श्री प्रकाश लंकेश्वर*
5) कॅरम महिला स्पर्धा :- #प्रथम क्रमांक सलोनी बनसोडे व द्वितीय क्रमांक अंकिता एकबोटे
6) रांगोळी स्पर्धा :- #प्रथम क्रमांक अंकिता एकबोटे*
7) फ्री स्टाईल स्विमिंग:- #महिला प्रथम क्रमांक प्राणवी बोराडे
8) तीन किलोमीटर चालणे महिला :- अपेक्षा घुगे द्वितीय क्रमांक*
9) *100 मीटर धावणे महिला :- #प्रथम क्रमांक सलोनी बनसोडे*
10) बुद्धिबळ महिला:- तृतीय क्रमांक सलोनी बनसोडे

 #पथक दाखल, मोहीम सुरू....!
13/01/2025

#पथक दाखल, मोहीम सुरू....!

बार्शीपुत्र सचिन  #वायकुळेंना 'जागतिक परिषदेचे निमंत्रण'; तृतीयपंथीयांसाठीच्या कार्याचं मंथन #सोलापूर : बार्शीपुत्र लेखक...
12/01/2025

बार्शीपुत्र सचिन #वायकुळेंना 'जागतिक परिषदेचे निमंत्रण'; तृतीयपंथीयांसाठीच्या कार्याचं मंथन

#सोलापूर : बार्शीपुत्र लेखक आणि पत्रकार सचिन वायकुळे यांच्या तृतीयपंथी समाजसेवी कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. यंदाच्या वर्षी ३० व ३१ जानेवारी २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथे आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी परिषद होत आहे. या परिषदेत बार्शीचे तृतीयपंथी मार्गदर्शक सचिन वायकुळे यांना मार्गदर्शन करण्यासाठी पत्राद्वारे विद्यापीठाचे निमंत्रण मिळाले असून तृतीयपंथी व सामाजिक बदल यावर ते या परिषदेत बोलणार आहेत.

एकविसाव्या शतकात तृतीयपंथीयांचे जगणे, जगतिकस्तरावरील त्यांची प्रगती, दर्जा तसेच आरोग्य आणि संस्कृतिक स्वीकृती, समानता यावर ही जागतिक परिषद होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी परिषदेत तृतीयपंथी यांचे हक्क संरक्षण, मनसिक, शारीरिक आरोग्य तसेच रोजगार निर्मिती आशा विविध विषयांवर चिंतन, मंथन होणार आहे. या परिषदेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे अध्यक्ष डॉ. गौतम कांबळे, सचिव डॉ.प्रभाकर कोळेकर यांनी याचे उत्तम नियोजन केले आहे.

दरम्यान, याचबरोबर समन्वयक डॉ.ए. एल. भास्के, टी. एल. तांबोळी तसेच डॉ. तेजस्विनी कांबळे यांच्यासह वृत्तपत्रविद्या विभाग व इतर यासाठी परिश्रम घेत आहेत.

12/01/2025

मकर #संक्रांती बाजारपेठेत लगबग, महिलांचा उत्साह...!

 #गड्डा यात्रेला सुरुवात...!
12/01/2025

#गड्डा यात्रेला सुरुवात...!

 #ताडोबाची टीम....!
12/01/2025

#ताडोबाची टीम....!

11/01/2025

#बार्शीपुत्र संतोष देशमुख यांच्यासाठी #धाराशिव जन आक्रोश मोर्चा - ओमराजे कडाडले..!

#धाराशिव

कोरफळ्यातील  #हत्याकांडप्रकरणी आरोपीला जन्मठेप, 7 वर्षांनी निकाल       #बार्शी - तालुक्यातील मौजे कोरफळे  येथील आरोपी  अ...
11/01/2025

कोरफळ्यातील #हत्याकांडप्रकरणी आरोपीला जन्मठेप, 7 वर्षांनी निकाल

#बार्शी - तालुक्यातील मौजे कोरफळे येथील आरोपी अनिरुद्ध व्यंकट बरडे याने त्याच्या घरी सतत होत असलेल्या बायको व सावत्र आईच्या भांडणाला कंटाळून दि 9-2-2017 रोजी पहाटे 3-00 वाजण्याच्या सुमारास घरी झोपलेल्या सावत्र आई सखुबाई व मुलगा सुदर्शन यांना हातोड्याने मारून जागीच ठार केले. त्याची पत्नी रेश्मा हिचे पोटात कुकरीने मारून, कुकरी फिरवून बाहेर ओढून काढून गंभीर जखमी करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून काडीपेटीतील काडीने पेटवून दिले दवाखान्यात दाखल केल्यानंतर ती उपचारा दरम्यान मयत झाली. तसेच मुलगा अविनाश व मुलगी प्रतीक्षा यांनाही कुकरीने मारून जखमी केले. त्यानंतर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सदर बाबत आरोपीचे वडील व्यंकट पंढरीनाथ बरडे यांनी आरोपी अनिरुद्ध व्यंकट बरडे रा कोरफळे ता. बार्शी याचे विरुद्ध वैराग पोलीस ठाणेस गु.र.नं 51/2017 भा.द.वि.क 302,307,309 अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास तत्कालीन API मधुकर पवार, API राजकुमार केंद्रे व API रवींद्र खांडेकर यांनी करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी 16 साक्षीदार तपासण्यात आले. यातील आरोपीची बायको हिने दिलेला मृत्यूपूर्व जबाब, नेत्र साक्षीदार आरोपीची मुलगी, दुसरा मुलगा व डॉक्टर यांची साक्ष तसेच तपासी अंमलदार यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले परिस्थितीजन्य पुरावे हे सरकारी वकिल श्रीमती राजश्री कदम, श्री प्रदीप बोचरे यांनी मा. न्यायालयासमोर मांडले.

सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता एल.एस चव्हाण जिल्हा न्यायाधीश बार्शी यांनी आरोपी अनिरुद्ध व्यंकट बरडे रा कोरफळे ता. बार्शी यास भादविक 302 अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व 1,00,000/- रुपये दंड, यातील दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावास, भादविक 307 अन्वये दोषी ठरवून 10 वर्ष शिक्षा व 50,000/- रुपये दंड, यातील दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

सरकार पक्षा तर्फे श्रीमती राजश्री कदम यांनी कायदेशीर बाबीवर जोरदार युक्तिवाद केला व काम पाहीले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार कुणाल पाटील, स.पो.फौ शशिकांत आळणे यांनी वेळोवेळी साक्षीदार, पुरावे हजर ठेवण्याचे काम पाहिले. सदर केसमध्ये जालिंदर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी व कुंदन गावडे पोलीस निरीक्षक वैराग पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

वाघाची  #दहशत कायम...!
11/01/2025

वाघाची #दहशत कायम...!

 #कुणाबाबत असं घडलंय?
11/01/2025

#कुणाबाबत असं घडलंय?

Address

1806, Azad Chowck, Barshi, Dist/solapur
Barsi
413401

Telephone

+918767486146

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Barshi Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Barshi Times:

Videos

Share