Shaurya Gatha News

Shaurya Gatha News ताज्या बातम्यासाठी शौर्य गाथा न्युज च्या पेज ला लाईक करा.

 #वंचित बहुजन आघाडी तर्फे धाराशिव लोकसभेसाठी  #भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी जाहीर.
11/04/2024

#वंचित बहुजन आघाडी तर्फे धाराशिव लोकसभेसाठी #भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी जाहीर.

19/02/2024

बार्शी:-
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या३९४ व्या जयंतीनिमित्त आ.राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते आरती संपन्न.

सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवंत मंदिर बार्शी येथे शिवजन्मोत्सव सोहळा आनंदात संपन्न झाला. बार्शी तालुक्याचे आमदार आदरणीय श्री राजेंद्रजी राऊत यांच्या शुभ हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले भगवंत मंदिरातील बडवे व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.आरती झाल्यानंतर प्रसादाने सांगता झाली. भगवंत आरती मंडळ हे मंदिरामध्ये धार्मिक उपक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमही राबवत असते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता भगवंता आरती मंडळातील सदस्य महेश अण्णा राऊत नागेश भैय्या जाधव किशोर रुद्रा योगेश कोल्हे शुभम घाडगे सचिन लोकरे बाळराजे देशमुख व सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

त्रिमुर्ती प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव 2024छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वरुढ  मूर्तीची भव्य दिव्य पारंपारिक मिरवणूक स...
19/02/2024

त्रिमुर्ती प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव 2024
छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वरुढ मूर्तीची भव्य दिव्य पारंपारिक मिरवणूक सोहळा. पार पाडण्यात आला. मिरवणुकी मध्ये विशेष आकर्षण असे

1.स्वरशंभू ढोल पथक 2.झंकार बँजो3) महाराष्ट्र बँजो लाईट व शारपी4).मर्दानी खेळ 5).कर्नाटकी भाऊल्या6).जिव्हाळा ग्रुप लेझिम संघ सासुरे. अश्या प्रकारे मिरवणूक काढण्यात आली, व प्रतिष्ठान ने आणण्यात आलेल्या मूर्तीची पूजा, सचिन वायकुळे , सर, नगरसेवक विजय चव्हान सर, युवा ग्रुप चे अध्यक्ष सुशांत चव्हान, मंडळाचे अध्यक्ष बबलू साळुंखे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, अतुल आदी उपस्थीत होते..
मिरवनुक पार पाडण्यासाठी मंडळीतील सर्व सदस्यांना परिश्रम घेतले.

शिवजयंती निमित्त बार्शीत स्वच्छता मोहीम संपन्न.वृक्ष संवर्धन समितीचा स्तुत्य उपक्रम.बार्शी येथे वृक्ष संवर्धन समितीकडून ...
17/02/2024

शिवजयंती निमित्त बार्शीत स्वच्छता मोहीम संपन्न.
वृक्ष संवर्धन समितीचा स्तुत्य उपक्रम.
बार्शी येथे वृक्ष संवर्धन समितीकडून श्री शिवाजी महाविद्यालय परिसरात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्या समोरील परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत सर्व शिव परिसर साफ करण्यात आला समोरील रस्ता स्वच्छ करून तसेच रस्त्यावरील दुभाजकात वाढलेले गवत काढून हा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. वृक्ष संवर्धन समितीकडून तीन वर्षापासून या स्वच्छता मोहिमेचे आयोजन शिवजयंतीच्या निमित्ताने करण्यात येते. गुरुवारी या मोहिमेची सांगता छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला जलाभिषेक घालून करण्यात आली. गेली पाच वर्ष वृक्ष संवर्धन समिती शहर आणि परिसरात झाडे लावून ती संवर्धित करत आहे तसेच विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त स्वच्छता मोहीम राबवून महापुरुषांना अनोखी आदरांजली समितीकडून वाहण्यात येते. या स्वच्छता मोहिमेत बार्शी शहरातील विविध संघटना शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामात बार्शी नगरपालिकेने देखील मोलाचे सहकार्य केले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, बार्शी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद, अतुल पाडे, राहुल तावरे, उमेश नलवडे,राणा देशमुख,डॉ.सचिन चव्हाण, अक्षय घोडके, योगेश गाडे समर्थ काळे,समर्थ तुपे चंद्रकांत चोबे,अक्षय भोईटे, गणेश कदम,आनंद धुमाळ, ओंकार राजमाने,अजित नडगिरे,संतोषकुमार गायकवाड,महेश बकशेट्टी, यश कदम, अमृत खेडकर,सायरा मुल्ला, अनुसया आगलावे,सुनील फल्ले,प्रज्वल मोरे यांनी परिश्रम घेतले.

16/02/2024

बार्शी कडकडीत बंद
मराठा समजाच्या आव्हानाला प्रतिसाद देत बार्शीतील व्यापारी व नागरिकानीं कडकडीत बंद पाळला.

26/01/2024

एच. डी. एफ. सी. बँक बार्शी शाखेत लागली आग
शॉट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज.

श्री. राम भक्ताची स्वप्नपूर्ती अयोध्या नगरीत भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते रामल्लला ची प्राणप्रतिष्ठाप...
22/01/2024

श्री. राम भक्ताची स्वप्नपूर्ती अयोध्या नगरीत भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते रामल्लला ची प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम संपन्न...💐💐👌👌👍👍

बार्शी नगरपरिषदे कडून उद्या 22/01/2024 रोजी सर्व प्रकारचे मास विक्री बंद ठववण्याचे आव्हान.
21/01/2024

बार्शी नगरपरिषदे कडून उद्या 22/01/2024 रोजी सर्व प्रकारचे मास विक्री बंद ठववण्याचे आव्हान.

*अ.भा.सोमवशी क्षत्रिय* *कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळ.*   *यांचे प्रेरणेने**सोमवंशी क्षत्रिय कासार समाज,बार्शी. आयोजित...
21/01/2024

*अ.भा.सोमवशी क्षत्रिय* *कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळ.*
*यांचे प्रेरणेने*
*सोमवंशी क्षत्रिय कासार समाज,बार्शी. आयोजित*
*कासार -,मॅरेथॉन २०२४*
वर्ष ५ वें
*एक धाव रामासाठी!एक धाव स्वतः साठी!!*
*एक तास आपल्या आरोग्यासाठी||एक तास*
*समाजासाठी ||*
*आज सकाळी ७ वाजता* *कासार मॅरेथॉन श्री कालिका* *मंदिरातून सुरू झाली त्यात सर्व कासार समाजातील* *महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर होती,कासार मॅरेथॉन व श्री राम उत्सव हे* *दोन्ही एकत्र आल्यामुळे उत्साह जास्त,त्यात घोषणा,जय कालिका,,जय* *श्री राम यामुळे संपूर्ण फेरी मंगलमय रीतीने करीत श्री* *भगवंत दर्शन ,श्री राम दर्शन, माहेश्वरी श्री राम मंदिर दर्शन* *करीत संपूर्ण नगरप्रदक्षिणा अतिशय छान प्रकारे पार* *पडली,, मंदिरात फेरी आल्यानंतर डॉ, श्री. प्रशांत* *विठ्ठलराव मोहिरे,यांची शिवशक्ती बँकेवर संचालकपदी नेमणूक झाली* त्यामळे त्यांचा समाजाचे वतीने शाल श्रीफळ,देऊन सत्कार केला
*नंतर श्री कालिका मंदिरात अंकित रासने,प्रकाशित श्री कालिका दिनदर्शिका चे* *वितरण केले,,नंतर नाष्टा ,चहा, घेऊन कार्यक्रमाचा समारोप* *केला,कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष श्री.राजेंद्र नाभिराज* *येवणकर यांनी व सर्व महिला व पुरुष मंडळींनी केले*
*सो. क्ष.कासार समाज,बार्शी*

मारहाण प्रकरणी पृथ्वीराजसिंह रजपूत याचा अटकपूर्व जामीन मंजुरबार्शी (प्रतिनिधी)- येथील रिंग रोडवर दोन मोटारसायकल स्वारात ...
20/01/2024

मारहाण प्रकरणी पृथ्वीराजसिंह रजपूत याचा अटकपूर्व जामीन मंजुर

बार्शी (प्रतिनिधी)- येथील रिंग रोडवर दोन मोटारसायकल स्वारात गाडीचा कट बसल्याने त्यातील आरोपीने तु माझ्या गाडीला कट का मारला म्हणून बाजुस पडलेल्या दांडक्याने मारुन फिर्यादिस जखमी केल्याची घटना घडली. यात जखमी विश्वेश्वर दगडु भोकरे याचे फिर्यादीवरून पृथ्वीराजसिंह राजपूत याचे विरुद्ध बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी रजपूत याचा अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी येथील मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी मंजूर केला आहे.

मे. न्यायालयात पृथ्वीराजसिंह उर्फ शुभम रजपुत (रा. गोविंद दाळमिलजवळ सुभाषनगर, बार्शी) याने अटकपूर्व अर्ज सत्र न्यायालयात दाखल केला होता. १० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास विश्वेश्वर हा त्याचे मोटारसायकल वरून रिंग रोड वरून जात असताना समोरुन गल्लीत राहणारा ओळखीचा शुभम रजपुत हा त्याचे मोटारसायकलवरुन येत होता. त्यावेळी शुभम हा अचानक समोर आल्याने आमचे दोघांचे मोटारसायकलाचा एकमेकांना कट बसला. यामुळे फिर्यादी व आरोपी यामध्ये भांडण होऊन आरोपीने फिर्यादीस जबर मारहाण केली याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरूद्ध भा.द.वी. कलम 324 326 504 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यात अर्जदार आरोपीने मे. जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. सदर प्रकरणी अर्जदार यांचे वतीने वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेऊन तो युक्तिवाद ग्राह्य धरून अति जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एल. एस. चव्हाण साहेब यांनी सदरचा अर्ज मंजूर केला. यात अर्जदारतर्फे ॲड. आकाश तावडे व ॲड. सुहास कांबळे यांनी काम पाहिले.

पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले; पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत  #सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखलबार्शी -जबाबदारी ...
20/01/2024

पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले; पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत #सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल

बार्शी -

जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केलेप्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. किरण माने, प्रोजेक्ट मॅनेजर, स्वयम शिक्षण प्रयोग रा. धाराशिव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उमेद अभियान अंतर्गत काम करणाऱ्या महिलांचे मानधन न मिळाल्याबाबत हिंदवी समाचार चे संपादक धीरज शेळके यांनी बातमी प्रसारित केली होती. त्यानंतर बार्शी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी याबाबत लवकरच तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर बराच काळ काहीही कारवाई न झाल्यामुळे पत्रकार धीरज शेळके यांनी स्वयम शिक्षण प्रयोग प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांना त्याबाबत प्रतिक्रिया मागितली असता, वार्तांकन केल्याचा राग मनात धरून किरण माने यांनी संपादक पत्रकार धीरज शेळके यांना धक्काबुक्की करत धमकावले. तसेच वार्तांकन चालू असताना वार्तांकनासाठी वापरण्यात येत असलेला मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी सदर प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने याचे विरोधात भादवि कलम 323, 504, 506 तसेच महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा कलम 3 व 4 अन्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी करीत आहेत.

2017 साली अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत दाखल झालेला सोलापूर जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे.

बहुप्रतिक्षित शिवसृष्टी येथे बसवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीची भव्य दिव्य स्वागत पदयात्रा,उद्या,व...
20/01/2024

बहुप्रतिक्षित शिवसृष्टी येथे बसवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीची भव्य दिव्य स्वागत पदयात्रा,
उद्या,
वार:-रविवार,
दिनांक:- २१-१-२०२४ रोजी,
वेळ:-सायंकाळी ५ वाजता,
स्थळ:-श्री शिवाजी महाविद्यालय येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्ती पासून निघणार आहे,
तरी तमाम शिवभक्तांनी पांढरा शर्ट व भगवी टोपी घालून सहकुटुंब सहपरिवार छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती असे आवाहन अयोजका कडून करण्यात आले आहे.
आयोजक:-समस्त बार्शी शहर व तालुक्यातील शिवभक्त🙏🏻
जय शिवराय🙏🏻

त्रिमुर्ती प्रतिष्ठान आयोजित, त्रिमुर्ती चषक -2024भव्य टेनिस बॉल  तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धावर्ष -4 थे प्रथम पारितोषि...
13/01/2024

त्रिमुर्ती प्रतिष्ठान आयोजित, त्रिमुर्ती चषक -2024
भव्य टेनिस बॉल तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धा
वर्ष -4 थे
प्रथम पारितोषिक - रोख ,1,21000लाख रु
भराडीया क्रिकेट क्लब, मोहोळ
द्वितीय पारितोषिक - सदभावणा क्रिकेट क्लब, हवेली
तृतीय पारितोषिक - एस एस क्रिकेट क्लब खेड
चौथे पारितोषिक - जय बजरंग क्रिकेट क्लब, धाराशिव
ऑरेंज कॅप चा मानकरी - प्रथमेश राठोड
पर्पल कॅप चा मानकरी- कृष्णा चौधरी
सामनावीर - प्रथमेश राठोड
प्रथम पारितोषिक - मां.स्वप्नील (भैया) काळे. राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष बार्शी व मां. विनोद टेकाळे मालक समर्थ मार्केटिंग, बार्शी
यांच्या हस्ते पाितोषिक वितरण करण्यात आले.
स्पर्धेचा शुभारंभ - ध्यानेश्वर उदारे साहेब व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

पारितोषिक वितरण समारंभास
उद्योजक - सुरेश शेठ कात्रेला
नगरसेवक - महाराज चव्हाण, रितेश अण्णा वाघमारे, सतीश अंधारे, महेश देशमुख, सचिन वायकुळे, आबासाहेब वळसंगे, कुणाल भाऊ साळुंखे, शेख सर,शुभम शेठ भारडीया, सुशील बेंद्रे,
महेश देवा मालक, ADV अनिल पाटील सर आदी.उपस्थित होते.
स्पर्धेचे समालोचन - अभिजीत राऊत, शंकर पवार सर, इर्शाद बागवान,यांनी केले तर पंच म्हणून- दीपक पिळगावकर, सलीम शेख
गुण लेखकाचे काम - प्रतिक शिंदे व स्वप्नील गवळी यांनी केले..

कार्यक्रम यशस्वी रित्या पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद बबलू साळुंखे व उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,
आणि मंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले..
अध्यक्ष- बबलू साळुंखे यांनी त्रिमुर्ती प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानले.

*राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त*  *त्रिमुर्ती प्रतिष्ठान, बार्शी* *कडून**भव्य दिव्य असे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे...
08/01/2024

*राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त*
*त्रिमुर्ती प्रतिष्ठान, बार्शी*
*कडून*
*भव्य दिव्य असे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन*

या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक - सुरेश शेठ कत्रेला, काकासाहेब ठोंबरे,
अशोक हेडा, समीर भैया वायकुले सतीश शेठ अंधारे,शुभम (शेठ) भराडिया विनोद टेकाळे शुभम भैया जाधव आबासाहेब वळसंगे,ADV अनिल पाटील या सर्व मान्यवरांचे हस्ते त्रिमुर्ती चषक चे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी पदाधिकारी यांचे आभार त्रिमुर्ती प्रतिष्ठान चे अध्यक्ष, प्रमोद बबलू साळुंखे यांनी आभार मानले, व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांना प्रारिश्रम घेतले.

*स्व.सुशिल-शितल राऊत यांच्या स्मरणार्थ ४१३ रक्तदात्यांचे रक्तदान!*स्व.सुशिल व शितल राऊत यांच्या स्मरणार्थ गेल्या ११ वर्ष...
05/01/2024

*स्व.सुशिल-शितल राऊत यांच्या स्मरणार्थ ४१३ रक्तदात्यांचे रक्तदान!*

स्व.सुशिल व शितल राऊत यांच्या स्मरणार्थ गेल्या ११ वर्षांपासून स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या ही वर्षी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अखंडपणे बारा वर्षे रक्तदाते रक्तदान करतात यामुळे रक्तदात्यांची मनोभावी सेवा रक्तदान शिबिरामध्ये केली जाते व विविध पद्धतीने सेवा देण्याचे काम करण्यात आले.या रक्तदान शिबिराची तयारी गेल्या एक महिन्यापासून सुरू होती.या रक्तदान शिबिरामध्ये ग्रामीण भागातील व शहरातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व व्यापारी तसेच विद्यार्थी,महिला व इतर सर्व स्तरातील रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ४१३ रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धांजली वाहिली.

या राऊत बंधूंचे २०१२ साली अपघाती निधन झाले पण त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींशी असलेले नातेसंबंध व त्यांनी जोडलेली नाळ टिकवण्याचं काम मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठान गेल्या ११ वर्षापासून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे.या रक्तदान शिबिरात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते सहभागी होत आहेत गेल्या ११ वर्षात या रक्तदान शिबिरात विक्रमी रक्तदान होते.यावर्षी ४१३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांच्या उदंड प्रतिसादामुळे रक्तदान शिबिर रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.यामध्ये २३ महिलांनी तसेच एकत्रित ४ जोडप्यांनी, ५ डॉक्टरांनी,बार्शी शहर व ग्रामीण मधील ४ पोलीस बांधवांनी, बार्शी वकील संघातील ५ वकील बांधवांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी जय शिवराय प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने गेल्या एक महिन्यापासून अथक परिश्रम घेतले जात होते.या रक्तदान शिबिरास प्रतिष्ठित मान्यवरांनी देखील भेटी दिल्या यामध्ये आमदार राजेंद्र राऊत,
स्मार्ट अकॅडमीचे सचिन वायकुळे,
डॉ कुमार जगताप,मा नगरसेवक विजय चव्हाण सर,मा नगरसेवक श्री संदेश काकडे,
राज-विजय क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सदस्य,आरसीसी क्रिकेट क्लब सदस्य, जाणीव फाउंडेशन,मेडिकल असोसिएशन,मावळा ग्रुप,एकवीराई ग्रुप,सदस्य यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले.
तर मा नगरसेवक श्री विजय (नाना) राऊत,चेअरमन मा रणवीर (भैय्या) राऊत,
मा.नगराध्यक्ष अॅड.असिफ (भाई) तांबोळी,डॉ.संजय अंधारे,
डॉ सुनिल फटाले सर डॉ सचिन करळे सर,भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे,मा गट नेते दिपक राऊत मा नगरसेक मदन गव्हाणे मा नगरसेवक संतोष बारंगुळे,त्याचबरोबर प्रतिष्ठित व्यापारी,पत्रकार बांधव व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.या रक्तदान शिबिरासाठी परिश्रम किरण राऊत,राजेश राऊत, रावसाहेब यादव,राजन ठक्कर, सचिन ललवाणी,सुधिर राऊत,अल्ताफ सय्यद ,किरण कोकाटे,विजय राऊत,कार्याध्यक्ष सुमित
नाकटिळक,कार्यउपाध्यक्ष सुनील शेलार,सचिव सुरज वाणी,विनायक हांडे,गणेश पन्हाळकर,आकाश तावडे,बाबासाहेब बारकुल, नागराज सातव,विनायक घोडके,विकास पौळ,अविनाश वैदय,सागर राऊत,माधव जाधव,अजित पाटील,अनिल शेलार,अमोल वाणी,मनोज मोरे,गणेश वाणी,डॉ राहुल शेळके,विनीत नागोडे,अमित नागोडे,सुहास गुंड,संकेत वाणी,राहुल वडेकर,वैभव विधाते,कृष्णा शिंदे,अक्षय अंबुरे,किरण नान्नजकर,सागर माने,अजित खुणे,प्रशांत नागरगोजे,सचिन राऊत,सागर माने,सतिश राऊत,निखिल गरड,दिप उपळकर,संदेश भोंडे,राहुल जाधव,दयानंद शिंदे,अमित चव्हाण,त्याच बरोबर भगवंत ब्लड बँकेचेचे श्री गणेश जगदाळे,अशपाक काझी या सर्वांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन व नियोजन करण्यात आले.🙏🏻

 #वृत्तपत्र संपादक संघ व डिजिटल मिडिया प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीत पत्रकार दिनानिमित्त ७ जानेवारी ला का...
05/01/2024

#वृत्तपत्र संपादक संघ व डिजिटल मिडिया प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीत पत्रकार दिनानिमित्त ७ जानेवारी ला कार्यक्रमाचे आयोजन.

30/12/2023
 #बार्शीत मोठी घटना; पत्नी अन् मुलाची हत्या करून शिक्षक पतीने घेतला गळफास..!बार्शी शहरातील उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट ...
28/11/2023

#बार्शीत मोठी घटना; पत्नी अन् मुलाची हत्या करून शिक्षक पतीने घेतला गळफास..!

बार्शी शहरातील उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे शिक्षक पतीने आपल्या शिक्षक पत्नीचा गळा कापून व आपल्या पाच वर्षाच्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवून हत्या केली. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने बार्शी शहरात मोठी खळबळ उडाली.

अतुल सुमंत मुंढे (वय ४०), तृप्ती अतुल मुंढे (वय ३५) ओम सुमंत मुंढे (वय ५) असे त्या मयत तिघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. दोघेही उपळाई रोडवरील आपल्या घरात वरच्या मजल्यावर राहत होते. खालच्या मजल्यावर अतुल मुंढे यांचे आई- वडील राहतात. वरच्या मजल्यावरील कोणीही खाली न आल्याने अतुल यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी सकाळी वर जावून पाहिले असता ही घटना उघडकीसआली. त्यानंतर तात्काळ बार्शी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहेत. या घटनेने बार्शी शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे मोठी गर्दी झाली आहे.

 #श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली..!!आईराजा ...
18/10/2023

#श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली..!!

आईराजा उदो उदो...!!

💥सुवर्ण संधी...💥सुवर्ण संधी...💥सुवर्ण संधी...बार्शीतील सुप्रसिद्ध श्री. गणेश वस्त्रदालनाच्या चौथ्या वर्धापनदिना निमित्त ...
15/10/2023

💥सुवर्ण संधी...💥सुवर्ण संधी...💥सुवर्ण संधी...

बार्शीतील सुप्रसिद्ध श्री. गणेश वस्त्रदालनाच्या चौथ्या वर्धापनदिना निमित्त व नवरात्र, दसरा, दिवाळीसाठी आपल्या असंख्य ग्राहक परिवारासाठी 👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦व परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी
घेऊन आले आहेत कपडे खरेदीवर लाखोंची बक्षिसे जिकण्याची सुवर्ण संधी ✨✨

आपल्या व आपल्या हक्काच्या श्री. गणेश वस्त्र दालनाला एक वेळ अवश्य भेट द्या व खरेदी वरती सुवर्ण संधीचा लाभ घ्या...

Shaurya Gatha News

#श्रीगणेशवस्त्रदालन

बार्शीमध्ये 6 ऑक्टोबर रोजी होणार मराठ्यांचा एल्गार मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताची जय्यत तयारी!मराठा आरक्षणासाठी गेल्या...
02/10/2023

बार्शीमध्ये 6 ऑक्टोबर रोजी होणार मराठ्यांचा एल्गार

मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताची जय्यत तयारी!

मराठा आरक्षणासाठी गेल्या दीड महिन्यापासून जीवाची पर्वा न करता लढा देणारा ढाण्या वाघ मनोज जरांगे पाटील यांची बार्शीमध्ये 6 ऑक्टॉबर रोजी दमदार एंट्री होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज एकत्र करून, जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची श्री शिवाजी महाविद्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती स्मारकजवळ जाहीर सभा होणार आहे. त्या नियोजनासंदर्भात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आलीय. बार्शीमध्ये सकल मराठा समाज जागृत झाला असून, हजारोंच्या संख्येने मराठा समाज उपस्थित रहाणार असून, रेकॉर्डब्रेक सभेची आतुरता बार्शीकरांना लागली आहे. सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. गावोगावी, खेड्यापाड्यात, वाड्या, वस्तीवर जाऊन सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागृती करून जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले जात आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तरी जास्तीतजास्त मराठा बांधवांनी या लढ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने करण्यात आले आहे.

Shaurya Gatha News

 #दुचाकी वरील अपघातग्रस्तांसाठी सरसावले  #भगवंता सेना दल... बार्शी शहरातील परंडा रस्त्यावर वैदु वस्ती शेजारी, दोन दुचाकी...
22/09/2023

#दुचाकी वरील अपघातग्रस्तांसाठी सरसावले #भगवंता सेना दल...

बार्शी शहरातील परंडा रस्त्यावर वैदु वस्ती शेजारी, दोन दुचाकींचा अपघात झाला. दोन्ही दुचाकी वरील दुचाकी स्वार दुचाकीसह रस्त्यावरती पडले होते. यावेळी एका दुचाकी स्वाराला भोवळ येऊन तो काही वेळ बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. रस्त्याच्या कडेला व ये - जा करणाऱ्या लोकांनी गर्दी करून फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. त्याचवेळी भगवंत सेना दलाचे सदस्य स्वप्निल पवार घटनास्थळी उपस्थित झाले. स्वप्निल पवार यांनी घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने, लागलीच सदरील दुचाकी स्वराला रस्त्याच्या बाजूला घेऊन प्राथमिक उपचार केला. स्वप्निल पवार यांच्या प्रयत्नाने काही वेळातच सदरील युवक शुद्धीवर आला. भगवंत सेना दलाच्या माध्यमातून आत्तापर्यंत विविध अपघातातील नऊ व्यक्तींना जीवनदान मिळाले आहे. बार्शी शहर आणि परिसरामध्ये आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी 9922914009 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन भगवंत सेना दल प्रमुख धिरज शेळके यांनी केले आहे. बार्शी शहर आणि तालुक्यातून विविध स्तरातून भगवंत सेना दलाच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

  Cup Final : सिराजपुढे लंकेचं लोटांगण,  #भारताला विजयासाठी केवळ 51 धावांच आव्हान.
17/09/2023

Cup Final : सिराजपुढे लंकेचं लोटांगण, #भारताला विजयासाठी केवळ 51 धावांच आव्हान.

 #छत्रपती संभाजीनगर आणि  #धाराशिव नामांतरवर अखेर शासनाकडून शिक्कामोर्तब शासनाचा आदेश निघाला ...
16/09/2023

#छत्रपती संभाजीनगर आणि #धाराशिव नामांतरवर अखेर शासनाकडून शिक्कामोर्तब

शासनाचा आदेश निघाला ...

लालबागच्या राजाचे मनमोहक रूप.Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal Shaurya Gatha News
16/09/2023

लालबागच्या राजाचे मनमोहक रूप.
Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal

Shaurya Gatha News

बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीत 406  प्रकरणी तडजोड  3  कोटी 4 2लाख 8 हजार  344 रुपयांची वसुली ...-------बार्शी...
14/09/2023

बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीत 406 प्रकरणी तडजोड 3 कोटी 4 2लाख 8 हजार 344 रुपयांची वसुली ...
-------
बार्शी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार बार्शी तालुका विधी सेवा समिती, व बार्शी वकील संघ, यांच्या संयुक्त विद्यमानाने
तालुका विधी सेवा समिती,अध्यक्ष, तथा जिल्हा
न्यायाधीश मा.जयेंद्र चंद्रसेन जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण 406 प्रकरणे तडजोडीने मिटवून त्यात 3 कोटी 42 लाख 8हजार 344र रु.ची वसुली झाली.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये बार्शी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी असे 4057 व दाखलपूर्व 5230 असे 9287 प्रकरणे ठेवण्यात येऊन यात दाखल पूर्वमधील 32 प्रकरणे तडजोडीने निकाली काढून त्यात 13 लाख 61 हजार 141रु. वसुली तसेच प्रलंबित प्रकरणातील 374 खटले तडजोडीने निकाली काढून त्यात सुमारे 3 कोटी 28 लाख 47 हजार 203 रु. इतकी वसुली करण्यात आली.

या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी बार्शी न्यायालयातील
एकूण पाच पॅनल तयार करण्यात आले त्यात जिल्हा न्यायाधीश- 2 मा. श्री.एल.एस.चव्हाण , मा.न्या. रेवती एम.कंटे , मा. न्या.एस.बी.विजयकर , मा.न्या.जे.आर.पठाण, मा.न्या.गायत्री एस.पाटील या पाच न्यायिक अधिकारी यांचे पँनल करण्यात येऊन त्यात न्यायालयीन कर्मचारीही नियुक्त करुन त्यांच्याद्वारे तडजोड प्रकरणे मिटविण्यात आले.

महावितरण कंपनीची जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या 07 खटल्यांमध्ये तडजोड होऊन त्यात 72 हजार रु.ची वसुली तर 138 बाउन्स झालेल्या चेकच्या 22 प्रलंबित प्रकरणातील तडजोड होऊन त्यात सुमारे 10 लाख 44 हजार रु.ची वसुली, तर बँकेच्या रिकव्हरीच्या 49 प्रकरणी तडजोड होऊन त्यात 3 कोटी 20 लाख वसुली झाली आहे . तर दाखलपूर्व 32 प्रकरणी 13 लाख 61 हजार 141 रु.वसुली झाली आहे. या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये तडजोडपात्र दिवाणी, फौजदारी स्वरुपाची प्रकरणे तसेच विविध राष्ट्रीयकृत बँका, फायनान्स, बार्शी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची दाखलपुर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली होती.

Shaurya Gatha News

04/09/2023

जालना येथे मराठा समाजावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बार्शी बंदच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने
एसटी स्टँड चौक
येथे रस्ता रोको ठिय्या आंदोलन...

04/09/2023

जालना येथे मराठा समाजावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बार्शी बंदच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने
एसटी स्टँड चौक
येथे रस्ता रोको ठिय्या आंदोलन...

Shaurya Gatha News

04/09/2023

जालना येथे मराठा समाजावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बार्शी बंदच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने
छत्रपती शिवरायांचा मूर्ती परिसर जवाहर हॉस्पिटल कंपाउंड ते एसटी स्टँड चौक पर्यंत निषेध
रॅली व एसटी स्टँड चौक
येथे रस्ता रोको ठिय्या आंदोलन

 #सोलापूर_ग्रामीण_जिल्हयातील_सर्व_नागरिकांना_जिल्हा_प्रशासनाचे_वतीने_आवाहन.आपल्या जिल्हयात शांतता राखण्यासाठी आपण सर्वां...
02/09/2023

#सोलापूर_ग्रामीण_जिल्हयातील_सर्व_नागरिकांना_जिल्हा_प्रशासनाचे_वतीने_आवाहन.

आपल्या जिल्हयात शांतता राखण्यासाठी आपण सर्वांनी कृपया प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती...

Address

Barsi
413401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shaurya Gatha News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category