11/04/2023
बार्शी येथील #श्रीस्वामिनारायण मंदिर येथे तेरावा वर्धापन दिन मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न....
बार्शी |
श्रीस्वामिनारायण मंदिर येथे वर्धापन दिनानिमित्त दादर मुंबई येथील पूज्य प्रीतमप्रसाद स्वामी, सुबोधसागर स्वामी तसेच पुणे येथील पूज्य त्यागानंद स्वामी, पूज्य श्रुतीवल्लभ स्वामी व पूज्य निर्दोषनयन स्वामी हे उपस्थित होते. दुपारी चार वाजता महापूजा विधी व वर्धापन दिनानिमित्त मूर्तींना अभिषेकचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर देवाला वेगवेगळ्या १२५ पेक्षा जास्त अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, अध्यात्मिक भक्तीशिवाय माणसाचे आयुष्य सुखकर होऊ शकत नाही, त्यामुळेच तालुक्यातील कोणताच धार्मिक कार्यक्रम मी चुकवत नाही असे प्रतिपादनही त्यांनी केले. जेंव्हा पण आपण देवच्या दर्शनाला जातो तेंव्हा आपल्या मनामध्ये एक सकारात्मक विचार येतात तसेच कोणतेही चुकीचे काम होणार नाही याची प्रत्येक वेळेस जाणीव होते. बार्शी हे पौराणिक शहर असून समृद्ध असा धार्मिक वारसा या शहराला लाभलेला आहे. सर्व जाती-धर्माचे लोक एकमेकांचे सण-उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करतात. लवकरच बार्शीला विशेष तीर्थक्षेत्राचा दर्जा ही प्राप्त होणार असल्याचे सांगितले.
पूज्य त्यागानंद स्वामींनी संस्थेची माहिती देताना सांगितले कि, बी.ए.पी.एस. स्वामिनारायण संस्था ही विश्वव्यापी संस्था असून जगभर बाराशे पेक्षा जास्त मंदिरे, गांधीनगर व दिल्ली येथे अक्षरधाम मंदिर आहे. संस्थेला एनजीओ म्हणून युनोमध्ये कायम सदस्यत्व आहे.
आबुधाबी व अमेरीकेत देखील भव्य मंदिराचे काम चालू आहे. तसेच भूकंप, त्सुनामी, पूर, दुष्काळ, अशा संकटसमयी तातडीने मदत पोहचविण्याचे काम संस्था करते, तसेच करोनाच्या प्रादुर्भाव दरम्यान सर्व प्रकारचे आरोग्य सेवा, अन्नसेवा ,ऑक्सिजन सेवा पुरविल्या आहेत, युक्रेन युध्दावेळी भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यासाठी देखील संस्थेचा खुप मोठा वाटा आहे. लहान मुलांसाठी, युवकांसाठी, महिला व पुरूषांसाठी प्रत्येक रविवारी सत्संग सभा असते. संस्कार व संस्कृतीचे ज्ञान या सत्संगामधून दिले जाते.
तसेच बार्शीतील माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे, माजी नगरसेवक प्रशांत (मालक) कथले, भगवंत देवस्थानचे सरपंच दादासाहेब बुडूख, गोरक्षक धन्यकुमार पटवा, प्रसन्नदाता ट्रस्टचे अध्यक्ष व मुख्य यजमान कमलेशभाई मेहता, राहुल चांडक, इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामिनारायण मंदिर, बार्शीचे ट्रस्टी भरतभाई ठक्कर, महेंद्रभाई ठक्कर तसेच राजेश माळी, महादेव साळुंखे, सुभाष पूरोहित, प्रशांत ठक्कर, गणेश शिंदे, तेजस ठक्कर, अमित शेटे, अमोल पल्लोड, आशीष मल्होत्रा, विजय काकडे, कल्पेश चंदे, विमल सोमैया, इत्यादिनी परिश्रम घेतले.