घटनेचा तीव्र शब्दात निषेध,
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करू..
चोरीच्या गुन्ह्यातील एका मूकबधिर आरोपीने 17 वर्षीय श्याम गजानन सोळंके याच्याकडे संशयित म्हणून इशारा दिल्याने रहिमापूर पोलिसांनी श्याम याला जबर मारहाण केली. त्याच्या आई-वडिलांसोबत सुद्धा असभ्यवर्तन केले. याप्रकरणी श्यामच्या आई-वडिलांनी येवदा पोलिसात तक्रारीसाठी धाव घेतली. तर त्यांची तक्रार सुद्धा घेतली नाही. श्याम हा पिंपळखुटा येथील रहिवाशी असून सासनच्या जावरकर विद्यालयात इयत्ता बारावीत प्रवेशित आहे. कुठलीही ठोस बाब नसताना त्याला रहिमापूर पोलिसांनी अशा प्रकारे जबर मारहाण करणे हे कायद्याच्या चौकटीत न बसणारी बाब आहे. हा आदिवासी समाजावर अन्याय असून पोलिसांची अशा प्रकारची दडपशाही कधीच खपवून घेतली जाणा. नाही या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करत
शहानुर नदीपात्रात वाहून गेलेल्या मृतक समिउल्ला खान यांच्या कुटुंबाला शासनाकडून मदत प्राप्त..
अखेर नकुल सोनटक्के यांच्या मागणीला यश..
प्रतिनिधी येवदा/ : दर्यापूर तालुक्त्यातील येवदा येथे दि.२० सप्टेंबर रोजी शहानुर नदीपात्रात वाहून गेल्याने सामिउल्ला खान या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची संपूर्ण येवदा गावात हळहळ व्यक्त झाली. मृतदेहाची शोधमोहीम राबविण्याकरिता ग्रामपंचायत येवदाचे उपसरपंच मुजम्मील जमादार यांनी पुढाकार घेतला व अकोला येथील बचाव पथक पाचरण केले. अखेर दुसऱ्या दिवशी समीउल्ल्हा खान यांचा मृतदेह शहानुर नदीपात्रात मिळाला. येवदा येथील सामाजिक कार्यकर्ता नकुल सोनटक्के यांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर व निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोळके यांची प्रत्यक्ष भेट घेवून मृतक शेत
रणधुमाळी येवदा जिल्हा परिषद सर्कलची...
येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत मुजम्मिल जमादार बाजी मारणार : सूत्रांची माहिती.
मुस्लिमांचा वोट बँक म्हणून वापर.. सामाजिक कार्यकर्ता एहसानुद्दिन यांचा खळबळजनक आरोप..
वाहून गेलेल्या शेतकरी युवकासाठी नकुल सोनटक्के मैदानात
धरण प्रशासनाविरुद्ध मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
मदतही देण्याची केली विनंती
अमरावती : दर्यापुर तालुक्यातील येवदा येथील शहानुरनदीत 35 वर्षीय शेतकरी युवक वाहून गेल्याची धक्कादायक घटना 20 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी आक्रमक होत सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी धरण प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडल्याचा गंभीर आरोप करत संबंधितांविरुद्ध मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे केली व संबंधित कुटुंबीयांना मदत द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे 37 वर्षीय शेतकरी समीउल्ला खान जहागीर खान हे शेतात गेले असता नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ते शहानुर नदीत वाहून गेल
खावटीयोजनेतून निकृष्ठ दर्जाच्या किटचे वाटप
- सामाजिक कार्यकर्ता नकुल सोनटक्के यांंनी केला प्रकार उघड
- जिल्हाधिकार्यांकडे चौकशीची मागणी
अमरावती : आदिवासी विकास विभागाकडून लाभार्थ्यांना खावटी योजने अंतर्गत निकृष्ठ दर्जाच्या अन्नधान्याच्या किट वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी शुक्रवारी (ता.16) उघडकीस आणत याप्रकरणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी चौकशी कऱण्याची मागणी केली आहे.
दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे आदिवासी विकास विभागाअतंर्गत खावटी अनुदान योजनेमार्फत जीवनावश्यक अन्यधान्यांच्या किट वाटप करण्यात आल्या. त्यामध्ये येवदा येथील लाभार्थी सुनिल दारासिंग मालवे यांनाही ही किट देण्यात आली. त्याकिटमध्ये देण्यात आलेले धान्य संबंधित विभागाकडून अतिशय निकृष्ठ दर्जाचे देण्यात आल्याची तक्रार मालवे
Karale Mastar
यारे पोट्टेहो..
खद-खद मास्तर नीतेश कराळे येत आहेत आपल्या भेटीला...कुठे येवद्याला.. (ता.दर्यापूर, जि.अमरावती) कधी : २१ मार्च सायंकाळी ७ वाजता चला तर मग भेटुयात