ATN Akola Times News

ATN Akola Times News Latest breaking news, Local News, Other News

31/10/2024
22/09/2024

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय .दर महिन्याला दहा हजार रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणार आहे .यामुळे 507 कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे. या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे. या योजने करता बँकेचे कर्मचा-यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाही.

06/04/2024

अकोला-क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने महानगरात क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले जेयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.स्थानीय अशोक वाटिका येथे संपन्न पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष सुभाष सातव,अक्षय नागापुरे,अॅड. प्रकाश दाते,कार्याध्यक्ष लक्ष्मण निखाडे, प्रकाश तायडे, जयंतराव मसने,प्रा. डॉ. संतोष हुशे, अॅड. महेश गणगणे, प्रवीण वाघमारे, अभिलाष तायडे, उमेश मसणे, मनोहर उगले, संजय तडस आदी उपस्थित होते.दि 11 एप्रिल रोजी सायं. 5 वा. सिटी कोतवाली चौकापासून भव्य पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही रॅली सिटी कोतवाली, गांधी चौक, प्रमिलाताई हॉल, मुख्य बस स्थानक मार्गे अशोक वाटीका येथे येऊन तेथे रसिलिकसमारोप होईल. या रॅलीमध्ये सर्वच सामाजिक संघटनांनी व्हावे असे आवाहन करण्यात आले.यात अखिल भारतीय माळी महासंघ, माळी युवा संघटना, क्षत्रिय माळी परिषद, फुले ब्रिगेड युवक संघटना, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, समता पर्व, फुलमाळी संघटना, वनमाळी संघटना, समता परिषद, मुख्याध्यापक संघ, परिट समाज, चर्मकार समाज,

*Lok Sabha elections : वंचित बहुजन आघाडीकडून 9 उमेदवार जाहीर !*
27/03/2024

*Lok Sabha elections : वंचित बहुजन आघाडीकडून 9 उमेदवार जाहीर !*

Lok Sabha elections आत्ताची मोठी बातमी राजकारण Lok Sabha elections : वंचित बहुजन आघाडीकडून 9 उमेदवार जाहीर ! admin March 27, 2024 Spread the loveLok Sabha elections: लोकसभा नि....

22/03/2024

दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना ईडी ने अटक केल्यानंतर या अटकेच्.....

22/03/2024

अखिल भारतीय काँग्रेस नेते राहुलची गांधी तसेच प्रियंका गांधी यांची हॉटेल ताज मुंबई येथे अकोला जिल्हा काँग्रेस कम....

20/03/2024

संगीत, चित्रपट आणि कला

09/03/2024

युवाशक्तीला कलेक्शन,कम्युनिकेशन व कौन्सिलिंग च्या सुरेख संगमाची गरज-डॉ चव्हाण

युट्युब ला पाहण्यासाठी 👇
https://youtu.be/9rBt4RFAgdk?si=ebLSPu1phAkrzUYa

19/02/2024

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून काढण्यात आली भव्य मिरवणूक , #शिवजयंती

16/02/2024

सण-उत्सवांचे 13 दिवस ध्वनीक्षेपक वापरास रात्री 12 वा. पर्यंत मुभा

*– AKOLA TIMES -*

04/02/2024

दोन देशी कट्टयांसह ०९ जिवंत राउंड जप्त...अकोट शहर पोलीसांची तसेच स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

सविस्तर वाचण्यासाठी लिंक क्लिक करा 👇https://akolatimes.com/?p=214

30/01/2024

अकोला- परम सुखाचे स्वरूप हे साक्षात संत व भगवंत आहेत. किंबहुना भगवंत व संत हे सुखाचे साक्षात आगार आहेत. मात्र आपण अशा आगाराच्या शोधात न पडता संसार रुपी सागरात इतरत्र सुखाचा शोध घेत असतो.सांसारिक दृष्ट्या याला आंधळेपण म्हणतात. कारण संसारातील साधने ही खऱ्या सुखाची स्तोत्रे नाहीत. ती एक तत्कालीन व्यवस्था असून सुखाचा खरा शोध व बोध हा संत,भगवंताच्या जवळ असल्याचा हितोपदेश आळंदी येथील हभप चकोर महाराज बाविस्कर यांनी केला. निवृत्तीनाथ महाराज भागवत सेवा समिती जि.प. नगर खडकी व अखंड हरिनाम सप्ताह किर्तन महोत्सव समिती जि. प. नगर खडकी यांच्या वतीने येथील हनुमान मंदिर प्रांगणात
हभप गणेश महाराज पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन महोत्सवास महिला पुरुष भाविकांच्या उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Live
27/01/2024

Live

2.1M Subscribe rs 7.5k VideosYouTube's news destination featuring comprehensive up-to-date coverage on the latest top stories, Akola city news,Akola today ne...

28/07/2023

How to use TubeBuddy YouTube : तुम्ही प्रकाशक असाल किंवा YouTube चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही पोस्ट जरूर वाचावी.

https://akolatimes.com/archives/213How to use TubeBuddy YouTube  वर व्ह्यूज मिळवून जास्त पैसे कमावा
23/06/2023

https://akolatimes.com/archives/213
How to use TubeBuddy YouTube वर व्ह्यूज मिळवून जास्त पैसे कमावा

How to use TubeBuddy YouTube : तुम्ही प्रकाशक असाल किंवा YouTube चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही पोस्ट जरूर वाचावी.

“Community Support To TB Patient” उपक्रमंतर्गत विप्र युवा वाहिनी गणेशोत्‍सव मंडळाने घेतले टीबीचे 10 रुग्‍ण पोषण आहाराकरि...
31/08/2022

“Community Support To TB Patient” उपक्रमंतर्गत विप्र युवा वाहिनी गणेशोत्‍सव मंडळाने घेतले टीबीचे 10 रुग्‍ण पोषण आहाराकरिता 1 वर्षासाठी दत्‍तक. , via Akola Times https://akolatimes.com/community-support-to-tb-patientcommunity-support-to-tb-patient-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%bf/

अकोल्यात ‘सामर्थ्य’कडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प– घरगुती गणेशोत्सवासाठी आकर्षक सजावट स्पर्धा; वृक्षरोपण व संवर्ध...
31/08/2022

अकोल्यात ‘सामर्थ्य’कडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प

– घरगुती गणेशोत्सवासाठी आकर्षक सजावट स्पर्धा; वृक्षरोपण व संवर्धनाची विशेष मोहीम







अकोला : पर्यावरण व जनजागृतीपर आकर्षक देखावा-सजावट स्पर्धा ‘सामर्थ्य’च्यावतीने आयोजित करण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सोबत घेऊन सामर्थ्य फाउंडेशन वृक्षरोपण व संवर्धनाची विशेष मोहीम देखील राबविणार आहे.



सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘सामर्थ्य’च्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गणेशोत्सवात भक्तिभावाबरोबरच पर्यावरणाशी बांधिलकी जपण्यात गणेश भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘सामर्थ्य’ने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत विविध पुरस्कार देऊन विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. संपूर्ण मातीची गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट व जनजागृतीपर देखावा करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. सर्धेत सहभागासाठी समन्वयक प्रवीण पळसपगार (८७८८२१३२७७) व सुर्यकांत बुडकले (९९७५१७१२७७) यांच्याशी संपर्क साधावा. नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता वाढत आहे. गणेशभक्तांनी सजावटीचे अनेक कल्पक मार्ग शोधले आहेत. याच कल्पकतेला चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती ‘सामर्थ्य’च्यावतीने देण्यात आली.

सामर्थ्य फाउंडेशनकडून यावर्षी आतापर्यंत दीड हजारावर वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाची मोहीम निरंतर सुरूच आहे. आता गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखील यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळांना नि:शुल्क रोपाचे वाटप करून त्यांना वृक्षारोपण व संवर्धनासाठी प्रोत्साहित केले जाईल. गणेश भक्तांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सामर्थ्य फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

संकल्पपत्र भरून घेणार

घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेत सहभागी स्पर्धक पर्यावरणस्नेही उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छूक असल्यास एक वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्याचे संकल्पपत्र संस्थेकडे भरून देऊ शकतो. स्पर्धकाला ‘सामर्थ्य’ नि:शुल्क रोपटे उपलब्ध करून देईल.

The post घरगुती गणेशोत्सवासाठी आकर्षक सजावट स्पर्धा; वृक्षरोपण व संवर्धनाची विशेष मोहीम appeared first on ATN.

घरगुती गणेशोत्सवासाठी आकर्षक सजावट स्पर्धा; ----सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने पूर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्य...

“Community Support To TB Patient” उपक्रमंतर्गत विप्र युवा वाहिनी गणेशोत्‍सव मंडळाने घेतले टीबीचे 10 रुग्‍ण पोषण आहाराकरि...
31/08/2022

“Community Support To TB Patient” उपक्रमंतर्गत विप्र युवा वाहिनी गणेशोत्‍सव मंडळाने घेतले टीबीचे 10 रुग्‍ण पोषण आहाराकरिता 1 वर्षासाठी दत्‍तक.

अकोला दि. 31 ऑगस्‍ट 2022 – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MOHFW) यांच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजना अंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत हे उदिष्टपूर्ती करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम राबवत आहे. अकोला महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत क्षयरोग दुरीकरणाचे काम सुरु आहे.

सदर उदिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने सामाजातिल विविध स्तरावर काम करणा-या संस्था आणि व्यक्ती सोबत समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. केंद्रिय क्षयरोग विभाग, (MOHFW) ने “Community Support To TB Patient” हा उपक्रम सुरु करण्‍यात आला आहे. सदर उपक्रमाची उद्दिष्टे, टीबी रुग्णांचे उपचार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी उपचाराखालील रुग्णास अतिरीक्त मदत प्रदान करणे, 2025 पर्यत क्षयरोग मुक्त भारत उदिष्टपूर्ती करण्याच्या अनुषंगाने सामाजिक सहभाग वाढवणे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) च्या माध्यमातून उपचाराखालील रुग्णास अतिरिक्त मदत प्रदान करणे, या प्रमाणे आहे. या कार्यक्रमाव्दारे, क्षयरोग दुरीकरणाच्या प्रयत्नामध्ये व्यक्ती/ सामाजिक संस्थाचा सहभाग वाढवणे, क्षयरोगाशी संबंधित समाजातील भीती जनजागृती व्दारे कमी करणे, उपचाराखालील क्षयरुग्णांना पोषण आहार पुरवठा करणे असे परिणाम अपेक्षित आहेत.

त्‍या अनुषंगाने आज दि. 31 ऑगस्‍ट 2022 रोजी गणेश स्‍थापनेच्‍या शुभमुहुर्तावर या उपक्रमामध्‍ये निक्षय मित्र म्‍हणून विप्र युवा वाहिनी गणेश मंडळ, अकोला यांनी पुढाकार घेउन अकोला महानगरपालिकेच्‍या क्षयरोग कार्यालय अंतर्गत उपचार घेत असलेले शहरी भागातील 5 आणि ग्रामीण भागातील 5 असे एकुण 10 टीबी रुग्‍णांना मंडळाच्‍या पदाधिकारी यांनी पुढील एक वर्षासाठी पोषण आहार करिता दत्‍तक घेतले आहे. यावेळी मंडळाच्‍या सर्व पदाधिका-यांचे शहर क्षयरोग अधिकारी तथा मनपा वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.अस्मिता पाठक जिल्‍हा क्षयरोग अधिकारी डॉ.मनीष शर्मा यांनी मंडळावर भेट देउन सत्‍कार केला आहे.

यावेळी मंडळाचे अध्‍यक्ष सुमित शर्मा, अॅड.सौरभ शर्मा, अॅड.गिरीराज जोशी, विदुर शर्मा, गोपाल शर्मा, अखिल व्‍यास, मनपा क्षयरोग कार्यालयाचे उमेश पदमने, वसंत उन्‍हाळे आदिंची उपस्थिती होती.

या उपक्रमांतर्गत सहभाग नोंदविण्यासाठी शहर क्षयरोग अधिकारी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून अथवा [email protected] या ईमेल आयडीवर किवा कार्यालय पत्ता – शहर क्षयरोग कार्यालय, नारायणीदेवी शर्मा कन्या पाठशाळा या ठिकाणी भेट देउन निक्षय मित्र होण्‍यासाठी संपर्क साधण्‍याचे आवाहन मनपा क्षयरोग अधिकारी यांनी केले आहे.

————————————————————————————————————

गणेशोत्‍सव – 2022, मनपा एक खिडकीतून आजपर्यंत एकुण 297 परवानग्‍या देण्‍यात आल्‍या.

अकोला दि. 31 ऑगस्‍ट 2022 – अकोला शहरात गणेशोत्‍सव मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्‍यात येतो. त्‍यासाठी लागणा-या विविध विभागाचे परवानगी देण्‍याकरिता शहरातील गणेश मंडळांना अधिक सोईचे व्‍हावे तसेच या कामात सुसुत्रता येण्‍याचे अनुषंगाने गणपती उत्‍सव – 2022 करिता मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिकेच्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्‍य सभागृह येथे दि. 22 पासून ते 31 ऑगस्‍ट 2022 पर्यंत शासनाच्‍या निर्देशानुसार सर्व परवानग्‍या एकाच छता खाली मिळविण्‍यासाठी एक खिडकी योजना प्रणाली कार्यान्‍वीत करण्‍यात आली होती.

याव्‍दारे आज दि. 31 ऑगस्‍ट 2022 शेवटच्‍या दिवशी पर्यंत एकुण 297 गणपती मंडळांना परवानग्‍या देण्‍यात आली आहे. यावेळी अकोला महानगरपालिका नगर रचना विभागाचे सहा.नगररचनाकार राजेंद्र टापरे, कनिष्‍ठ अभियंता अक्षय बोर्डे, तुषार जाने, रितेश टेकाडे, प्रतीक कटियारमल, अग्निशमन विभागाचे शुभम वाघ, शुभम बोराडे, शहर वाहतुक शाखेचे दिलीप उमाळे, जुने शहर पोलीस ठाण्‍याच्‍या महिला पोलीस कर्मचारी सुषमा रंगारी, सिटी कोतवाली पोलीस ठाण्‍याच्‍या महिला पोलीस कर्मचारी आरती क्षीरसागर तसेच महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनीच्‍या कर्मचा-याची उपस्थिती होती. तसेच अकोला शहरातील सर्व गणेश भक्‍तांनी कोरोना प्रतिबंधामक उपाययोजनांचे पालन करून हा सण उत्‍साहाने साजरा करण्‍याचे आवाहन अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे करण्‍यात आले आहे.

—————————————————————————————————————-

The post “Community Support To TB Patient” उपक्रमंतर्गत विप्र युवा वाहिनी गणेशोत्‍सव मंडळाने घेतले टीबीचे 10 रुग्‍ण पोषण आहाराकरिता 1 वर्षासाठी दत्‍तक. appeared first on ATN.

"Community Support To TB Patient"---आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MOHFW) यांच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजना अंतर्गत

बी.डी.डी.चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलिसांना केवळ १५ लाख…., via ATN https://akolatimes.com/15-lakh-only/
31/08/2022

बी.डी.डी.चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलिसांना केवळ १५ लाख…., via ATN https://akolatimes.com/15-lakh-only/

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when ATN Akola Times News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ATN Akola Times News:

Videos

Share

Nearby media companies