Akluj City - अकलूज शहर

Akluj City - अकलूज शहर Akluj City Media
Social Media Promotion & Advertising Agency Social Media Promotion & Advertising Agency
(3)

अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात रयतेचा राजा शिवछत्रपती हे महानाट्य नुकतेच संपन्न झाले. हिंदवी स्वराज्याचे...
04/12/2024

अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात रयतेचा राजा शिवछत्रपती हे महानाट्य नुकतेच संपन्न झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगप्रवर्तक छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने अजय तपकीरे दिग्दर्शित, शंतनु मोघे आणि पल्लवी वैद्य यांच्यासह अकलुजच्या स्थानिक कलाकारांनी भूमिका केलेल्या महानाट्याला अकलूज वासियांनी उदंड प्रतिसाद दिला.

दोन दिवस चाललेल्या या महानाट्याने शिवछत्रपतींचा काळ समोर उभा केला. हे महानाट्य सादर करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती, शिक्षण प्रसारक मंडळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

#रयतेचा_राजा_शिवछत्रपती
#महानाट्य
#अकलूज
#शिवसृष्टी

01/12/2024

माढा विधानसभा नूतन आमदार अभिजित पाटील

23/11/2024
भाजपाचे राम सातपुते १२ व्या फेरीअखेर आघाडीवर...
23/11/2024

भाजपाचे राम सातपुते १२ व्या फेरीअखेर आघाडीवर...

भाजपाचे राम सातपुते १० व्या फेरीअखेर आघाडीवर..
23/11/2024

भाजपाचे राम सातपुते १० व्या फेरीअखेर आघाडीवर..

23/11/2024

टपाल मतदान मध्ये उत्तमराव जानकर आघाडीवर

22/11/2024

कोण असेल माळशिरस तालुक्याचा आमदार?
सांगा तुमचा अंदाज...

04/11/2024
आमचा असंख्य आणि समाधानी     ग्राहकांच्या प्रतिसादाने आणि आग्रहाने, प्रोजेक्ट 6 सुरू करत आहोत. वन अकलूजमध्ये 3 BHK अंडर क...
23/09/2024

आमचा असंख्य आणि समाधानी ग्राहकांच्या प्रतिसादाने आणि आग्रहाने, प्रोजेक्ट 6 सुरू करत आहोत.
वन अकलूजमध्ये 3 BHK अंडर कन्स्ट्रक्शन नवीन 3 बंगलो विकणे आहे.
अधिक माहिती साठी त्वरित फोन करा
M B Construction 9881925686 9767786486
प्लॉट साइज-1770 स्क्वायर फ़ीट(पावने २ गुंठे -कलेक्टर NA टी पि सैंक्शन)
✅ स्वतंत्र उतारा ७/१२
✅ २४ तास पाणी (स्वतंत्र बोअरिंग)
✅ वातानुकूलित परिसर
✅ टाउन प्लांनिंग मंजुरी असलेला प्लॉट
✅ सर्व बँकांचे लोन झटपट

बांधकाम चालू आहे ताबा 15 ऑगस्ट 2025, आजच भेट द्या
पत्ता : वन-अकलुज गट नंबर १०/३ कांतिलाल भवन जवळ स्वरूपनगर, यशवंतनगर, अकलूज, तालुका - माळशिरस, जिल्हा - सोलापूर

16/08/2024

लाडक्या बहिणीच्या योजनेच्या नादात दाजीचा दुष्काळ निधी गायब !
माळशिरस तालुक्यातील 30% शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी दिला नाही.

12/08/2024

वावडी महोत्सव निमगाव 2024
#अकलूज #माळशिरस #ब्रेकिंग #नागपंचमी2024

06/08/2024

यंदाच्या वर्षी विक्रमी अशा अवघ्या दहा दिवसात उजनी धरण तब्बल 108 टक्के भरले..

उजनी धरणातून 1 लाख 25 हजार  तर वीरमधून 33 हजार  609 क्युसेकचा विसर्गनदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी         पंढरपू...
05/08/2024

उजनी धरणातून 1 लाख 25 हजार तर वीरमधून 33 हजार 609 क्युसेकचा विसर्ग
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी

पंढरपूर : उजनी धरण व वीर पाणलोट क्षेत्रात सतत सुरु असलेल्या पावसामूळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून सायं.5.00 वाजता 1 लाख 25 हजार क्युसेकचा तर वीरधरणातून 33 हजार 609 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. संगम येथून दुपारी 3.00 वाजेपर्यंत 1 लाख 37 हजार 860 क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. भीमा नदी पात्रातील वाढती पाणी पातळी लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ झाल्याने दगडी पूल तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंद्रभागा नदी पात्रात सध्या 59 हजार 222 क्युसेक पाणी वहात आहे. संगम येथून येणाऱ्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी पात्रात रात्री 8.00 वाजले नंतर सुमारे 1 लाख 37 हजार क्युसेकने पाणी वाहणार आहे.
भीमा नदीवरील पंढरपूर तालूक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरुन होणारी वाहतूक बंद राहणार आहे.चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी. नदीपात्रात कोणीही उतरु नये. स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडलअधिकारी, पोलीस पाटील पुरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहनही उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
भीमा नदीपात्रात 1 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 443.600 पाणी पातळी मीटर) नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. 1 लाख 60 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 444.500 पाणी पातळी मीटर) गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. तर 2 लाख क्युसेक विसर्ग आल्यावर ( 445.500 पाणी पातळी मीटर) संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते. तर 2 लाख 25 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 446.300 पाणी पातळी मीटर) गोविंदपुरा येथे पाणी येते. 3 क्युसेक विसर्ग आल्यावर ( 447.850 पाणी पातळी मीटर) कबीर मठ पायथा, जुनी नगरपालिका इमारत या ठिकाणी सुमारे 1 ते 1.5 फुट पाणी येते. 3 लाख 25 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 448.200 पाणी पातळी मीटर) दत्तघाट, माहेश्वरी धर्मशाळा, महाव्दार घाट, कालिका मंदिर चौक या भागात सुमारे 1 फुट पाणी येण्यास सुरुवात होते. असे भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के हरसुरे यांनी सांगितले तसेच वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

000000

05/08/2024

उजनी धरणातून भीमानदीत 125000 क्यूसेक्स नी पाणी सोडण्यात आले आहे नदीकाठच्या लोकांनी खबरदारी घ्यावी

Address

Akluj City
Akluj
413101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akluj City - अकलूज शहर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Akluj City - अकलूज शहर:

Videos

Share