माझं नगर MAZA NAGAR

माझं नगर MAZA NAGAR राजकारण, समाजकारण,औद्योगिक क्षेत्र , खेळ , मनोरंजन आणि विविध ताज्या बातम्यांसाठी

पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने परिमल निकम यांचा सत्कारशासनाच्या वतीने निकम यांना मिळालेला पुरस्कार सर्व नगरकरांच्या दृष्टीने...
14/04/2024

पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने परिमल निकम यांचा सत्कार
शासनाच्या वतीने निकम यांना मिळालेला पुरस्कार सर्व नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद - प्रकाश थोरात

#अहमदनगर - राज्य शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महापालिकेचे अभियंता परिमल निकम यांना मिळाल्याबद्दल पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती उत्सवानिमित्त शहरातील मार्केटयार्ड चौकात झालेल्या जयंती कार्यक्रमाच्या ठिकाणी निकम यांचा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे व प्रकाश थोरात यांनी सत्कार केला. यावेळी संदिप पवार, सुरेश बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता संजय गायकवाड, ब्राम्हणे, संजय मंडलिक, जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे आदी उपस्थित होते.
प्रकाश थोरात म्हणाले की, परिमल निकम यांना शासनाच्या वतीने मिळालेला पुरस्कार हा सर्व नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. निकम यांनी शासकीय सेवेत सामाजिक कार्यात दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. आंबेडकरी चळवळीत निकम परिवाराचे मोठे योगदान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी निकम यांचे अभिनंदन करुन पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
#माझंनगर

लोकसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादीशिर्डीतुन सदाशिव लोखंडेंना संधी
28/03/2024

लोकसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी
शिर्डीतुन सदाशिव लोखंडेंना संधी

24/03/2024

आहिल्यानगर:
सुजयच्या नावातच जय आहे - खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

#माझंनगर

24/03/2024

आहिल्यानगर:
कोणी एका व्यक्तीची निवडणुक नसुन ही एक विचाराची निवडणुक - खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

#माझंनगर

Zomato Deepinder Gooyal Marriage: फुड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी मॅक्सिकन मॉडल ग्रेशिया मुनोझशी ...
22/03/2024

Zomato Deepinder Gooyal Marriage:
फुड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी मॅक्सिकन मॉडल ग्रेशिया मुनोझशी विवाहबंधनात आडकले आहेत.

कोण आहे ग्रेशिया मुनोझ?
जानेवारीमध्ये ग्रेशिया मुनोझ दिल्लीतील प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली आणि तिथले फोटोही शेअर केले होते. त्यानुसार, २०२२ मध्ये अमेरिकेच्या मेट्रोपॉलिटन फॅशन वीकची विजेता आहे. ग्रेशियाने दीपिंदर गोयल यांच्याशी दुसरा विवाह केला आहे.
#माझंनगर

सर्वेक्षण झाले मानधनाचं काय?𝐀𝐡𝐞𝐦𝐚𝐝𝐧𝐚𝐠𝐚𝐫: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजासो...
22/03/2024

सर्वेक्षण झाले मानधनाचं काय?
𝐀𝐡𝐞𝐦𝐚𝐝𝐧𝐚𝐠𝐚𝐫: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजासोबत खुला प्रवर्ग व मागासवर्गीय कुटुंबांचे सर्वेक्षण केले; परुंतु सर्वेक्षण केलेल्या कर्मचाऱ्यांना ठरेलेले मानधन अद्याप अदा झालेलं नाही. नगर जिल्ह्यात सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांनी १० लाख कुटुंबाचे सर्वेक्षण केले होते. त्यासाठी १० हजारांप्रमाणे सुमारे १० कोटींच्या मानधनाची मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्ष देण्याला ओबीसी समाजाचा विरोध होता. अशात मराठा, खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय आयोगाने घेतला.
त्यानुसार २३ जानेवारी २०२४ रोजी राज्यभर हे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने केवळ ९ दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण केलं. सर्वेक्षण करण्यासाठी आयोगाने प्रश्नावली तयार केली. या प्रश्नावलीत १५४ प्रश्न होते. जिल्ह्यातील सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांनी १४ तालुके, भिंगार कटक मंडळ आणि नगर मनपा हद्दीत हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत करण्यात आले.
दरम्याण, सर्वेक्षण होऊन आता दिड महिना उलटला तरी अद्याप मागासवर्ग आयोगाकडून राज्य कर्मचाऱ्यांना मानधनाची रक्कम देण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मानधनाबाबतची मागणी आयोगाकडे करण्यात आलेली आहे परंतु अद्याप काहीही हालचाल नाही.
प्रती कर्मचारी १० हजार मानधन
आयोगाकडुन ३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या १०० कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी १० हजार रुपये, तर मागासवर्ग कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी प्रतिकुटुंब १० रुपये मानधन देण्यात येणार होते. याशिवाय सर्वेक्षणासाठी काम करणाऱ्या शासकीय लिपिकांना एका महिण्याच्या मुळ वेतनाच्या ५० टक्के मानधन देण्यात येणार होते.
#माझंनगर

ज्वारीला कवडीमोल भाव, उत्पादन खर्चही निघेना शेतकरी हवालदील:𝐀𝐡𝐞𝐦𝐚𝐝𝐧𝐚𝐠𝐚𝐫: अहमदनगर बाजार समितीत सध्या ज्वारीला २५०० ते ४०००...
22/03/2024

ज्वारीला कवडीमोल भाव, उत्पादन खर्चही निघेना शेतकरी हवालदील:
𝐀𝐡𝐞𝐦𝐚𝐝𝐧𝐚𝐠𝐚𝐫: अहमदनगर बाजार समितीत सध्या ज्वारीला २५०० ते ४०००/- रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मात्र, उत्पादनात घट झाल्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने परिसरातील शेतकीर हवालदील झाले आहेत. यंदा पाऊस कमी प्रमाणात झाला. त्यामुळे रब्बीतील वारी उत्पादनात मोठी घट पहायला मिळाली. शेतकऱ्यांचे खर्च आणि उत्पादनाचे गणित बिघडले. एकरी जिरायतात दोन ते तीन क्विंटल आणि बागायतात पाच ते सहा क्विंटल ज्वारीचे उत्पादन मिळाले. शेतकऱ्यांनी एकरी सरासरी २१ हजार रुपये खर्च आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान मिळाले आहे. यामध्ये काढणीवेळी जाणवलेल्या मजूर टंचाईमुळे खर्चात वाढ झाल्याचे समजते.

𝐀𝐧𝐧𝐚 𝐇𝐚𝐳𝐚𝐫𝐞'𝐬 𝐟𝐢𝐫𝐬𝐭 𝐫𝐞𝐚𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐨𝐧 𝐀𝐫𝐯𝐢𝐧𝐝 𝐊𝐞𝐣𝐫𝐢𝐰𝐚𝐥 𝐚𝐫𝐫𝐞𝐬𝐭:"मला अत्यंत दुःख झाले..." - अण्णा हजारे स्पष्टच बोलले𝐀𝐡𝐞𝐦𝐚𝐝𝐧𝐚𝐠𝐚𝐫:...
22/03/2024

𝐀𝐧𝐧𝐚 𝐇𝐚𝐳𝐚𝐫𝐞'𝐬 𝐟𝐢𝐫𝐬𝐭 𝐫𝐞𝐚𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐨𝐧 𝐀𝐫𝐯𝐢𝐧𝐝 𝐊𝐞𝐣𝐫𝐢𝐰𝐚𝐥 𝐚𝐫𝐫𝐞𝐬𝐭:
"मला अत्यंत दुःख झाले..." - अण्णा हजारे स्पष्टच बोलले
𝐀𝐡𝐞𝐦𝐚𝐝𝐧𝐚𝐠𝐚𝐫: राळेगण सिद्धि येथुन निवेदन जारी करक अण्णा हजारे म्हणाले, 'मला अत्यंत वाईट दुःख झाले आहे की, अरविंद केजरीवाल सारखा माणूस, जो माझ्यासोबत काम करत होता, आम्ही दारुबंदीसाठी आवाज उचलला होता, तो आज मद्य धोरण बनवत आहे. याचे मला वाईट वाटते.
दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटला प्रकरणात गुरुवारी अटक करण्यात आली आहे. ED अंमलबजावनी संचालनालयाने अटक केली. यासंदर्भात समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया देत केजरीवाल यांच्या अटकेला, त्यांच्या कर्माचे फळ म्हटले आहे. एव्हढेच नाही, तर कधीकाळी केजरीवाल दारुबंदीसाठीच्या अंदोलनात आपल्यासोबत होते आणि आता ते मद्य धोरण बनवू लागले आहेत, असे म्हणत अण्णा हजारेंनी दुःख व्यक्त केले आहे.

दोन तासांचा चौकशीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind kejariwal यांना अटक!
21/03/2024

दोन तासांचा चौकशीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind kejariwal यांना अटक!

Address

Suryanagar
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझं नगर MAZA NAGAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share



You may also like