VIDEO: खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे? संगमनेर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, नागरीकांचे हाल
संगमनेर तालुक्यातील पठार भागात रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पानोंडी घाट ते मांडवा फाट्यापर्यंत रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. साकुर चौफुली ते बिरवाडी फाट्यापर्यंत रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही अशी स्थिती झाल्याचा नागरिकांनी आरोप केलाय. दरेवाडी ते वरंवडी फाटाही अशीच भयानत परिस्थिती असून शेतकरी, नोकरदारांचा प्रवास खडतर झाला आहे.
आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांवर नागरिकांचा संताप, रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवरही गंभीर प्रश्नचिन्ह, रस्त्याचे काम झाले की दोन ते तीन महिन्यात रस्ता खराब होत असल्याच्या तक्रारी
#संगमनेर #रस्ते #Sangamner #Raod #Potholes #Ahmednagar
उन्हाळ्याच्या कडाक्यात प्रवाह फाउंडेशनचा अनमोल मदतीचा हात, जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना मोफत बुटांचे वाटप
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव पाट येथे, प्रवाह फाउंडेशनच्या वतीने गरजू व आर्थिक दुर्बल गटातील ६० विद्यार्थ्यांना मोफत बुटांचे वाटप करण्यात आले.
सोबतच मुलांना छत्रपती शिवाजी महाराज,शंभूराजे,राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत पुस्तकांचेही वाटप करण्यात आले.
#AhmednagarNews #Sangamner
VIDEO: संगमनेरमध्ये १० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग
संगमनेरमध्ये १० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटातील घटना, टेंम्पोतील प्रश्नपत्रिका जळून खाक, वाहनाचंही मोठं नुकसान, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, डोळासणे महामार्ग पोलीस व घारगाव पोलिसांची घटनास्थळी धाव, संगमनेर नगरपालिका व कारखान्याचे अग्नीशमन बंबही घटनास्थळी दाखल
#SangamnerNews #AhmednagarNews
VIDEO: संगमनेरमधील देवगाव परिसरात डीपीला भीषण आग
संगमनेरमधील देवगाव परिसरात डीपीला भीषण आग, वीज संयंत्र जळून खाक, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
#Fire #MSEB #Deogaon #Sangamner #SangamnerNews #AhmednagarNews #Ahmednagar
ऐन दिवाळीत अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला आग, भाऊबीजेच्या दिवशी १० जणांचा मृत्यू
धक्कादायक, अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात भीषण आग, भाऊबीजेच्या दिवशी १० जणांचा मृत्यू, रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात आग लागल्यानं अनर्थ, विभागात एकूण १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते
#Ahmednagar #Fire #AhmednagarNews
Nilesh Lanke Covid centre | 1100 बेड्ससह आमदार निलेश लंके कोरोना रुग्णांच्या मदतीला पुन्हा धावले