Hariti Publications

  • Home
  • Hariti Publications

Hariti Publications Publisher, Distributor of Books

दैनिक सामनामध्ये रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022  रोजी हरिती पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या समीना दलवाई यांच्या भटकभवानी य...
15/09/2022

दैनिक सामनामध्ये रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी हरिती पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या समीना दलवाई यांच्या भटकभवानी या पुस्तकातील लेख प्रसिद्ध झाला.
------------------------------------------------------------------
बुगू बुगू... फाड फाड...

स्वत:च्याच अंगावर चाबकाचे फटकारे मारणारा चित्त शुद्धीवर असलेला माणूस बघितलाय का? परवा दादरच्या मध्यमवर्गीय वस्तीत अचानक पोतराज समोर आला. अंगावर काटा यावा असं जातिव्यवस्थेचं हे स्वरूप. कमरेपर्यंत जटा वाढलेल्या, चेहऱ्यावर आणि उघड्या अंगावर राखेने रेघा ओढलेला, कमरेभोवती चिंध्या गुंडाळलेला अन् पायांत चाळ बांधलेला माणूस अनवाणी पायी फिरत भीक मागत असतो. हातातल्या लांब आसूडाने स्वतःच्या अंगावर सटासट फटकारे मारून घेत असतो. त्या फटकाऱ्यांचा आवाज आसमंतात घुमत राहतो. सोबत त्याची तरुण बायको, कोवळी लेकरं फिरत असतात. बायकोच्या गळ्यात ढोलकं. ती वाजवत असते. बुगू बुगू बुगू.... तिच्या पदराला मूल. कधी पोटात मूल. अशा अवस्थेत ती त्याच्या मागे भटकत राहते. आपल्या तरुण सुदृढ पुरुषाला ना धड बाई ना धड पुरुष अशा अवतारात बघत राहते.

कोण आहे पोतराज ? का असा फिरतो ? महाराष्ट्रातल्या जातीच्या उतरंडीत सर्वांत खालची जात मातंग (मांग), पहिला मुलगा मरीआईला सोडून पोतराज बनण्याची प्रथा आहे. त्याने मग कपाळावर देवाचा मळवट भरून कमरेला चिंध्या बांधून फिरत राहायचं. मरीआई भारी कडक देवी. खूप घाबरतात लोक तिला. तिच्या भगताच्या अंगात येतं तेव्हा तो स्वतःला फटकावतो. दाभणीने अंगावर टोचून घेतो. इतरांनाही धरतो. बेदम मारतो. उन्मत्त होतो. इतर वेळी बापडा गावात अन् शेतात मजुरी करून पोट भरतो. एकविसाव्या शतकातही मातंगांची परिस्थिती फार बदललेली नाही. शिक्षण, शेती, उद्योगधंदे यांपासून परंपरेनेच दूर ठेवलेला हा समाज. गावागावांत गरिबी, व्यसन अन् अंधश्रद्धा यांनी वेढलेला आहे.
मरीआईचा पगडा कमी तरी कसा होणार?

जातिव्यवस्थेने वरच्या जातीच्या सर्व उद्योगांची ऐषोआरामाची सोय करून ठेवलेली आहे. कष्टकरी जाती तयार करून आणि त्यांना फुकट कामाला लावून. गावगाड्यात महाराचं काम म्हणजे मेलेली ढोरं ओढून नेणं, ढोरांचं किंवा मातंगाचं ढोर फाडणं, मातंगाचं चामडी बनवणं आणि चर्मकाराचं त्या चामड्याच्या चपला बनवण्याचं.

पण मातंगांनी या समाजासाठी नुसतं फुकट राबून भागत नाही. मरावंही लागतं. महाराष्ट्रात फिरताना अनेकदा गावांच्या वेशीवर मांगीराचं देऊळ दिसतं. हा आपला खास इतिहास आहे. कधी चर्चेत न आलेला. गावात नवीन कोणतं काम हाती घेताना नरबळी दिला जाई. धरण बांधायचं, गावाची वेस उभारायची, विहीर खणायची तर नशिबाची साथ पाहिजे. मग मातंग कुटुंबातला थोरला मुलगा धरायचा आणि साग्रसंगीत पूजा करून त्याला तिथे गाडायचा. जिवंत. नंतर त्याला मांगीर बाबा म्हणून पुजायचा. तिथे मांगीराचं देऊळ उभारायचं.

फार पूर्वी नाही तर १९८० च्या दशकातही या समजुतीपायी मातंगांना नवीन विहिरीत काही कामाकरिता उतरवून मारल्याची उदाहरणं आहेत. पुढच्या वेळी कधी बघाल असं देऊळ तर कान देऊन ऐका. एखाद्या आईचा टाहो ऐकू येईल तुम्हाला.

समीना दलवाई
संभाजी भगत यांची कविता आठवते?
कसा गं बाई जातीचा ह्यो किल्ला, धर्माचा ह्यो किल्ला कोणत्या भक्तानं बांधला
कोणाच्या रक्तानं बांधला...

https://pustakshop.com/index.php?id_product=4806&rewrite=&controller=product

 ानीहमीद दलावाई ते नलिनी पंडित असा समृद्ध कौटुंबिक वारसा असलेल्या समीना दलावाई यांनी इंग्रजी साहित्य व्यवहारात विचारवंत ...
23/08/2022

ानी

हमीद दलावाई ते नलिनी पंडित असा समृद्ध कौटुंबिक वारसा असलेल्या समीना दलावाई यांनी इंग्रजी साहित्य व्यवहारात विचारवंत म्हणून स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. तनिष्क ज्वेलरीच्या निमित्ताने उद्भवलेला वाद असो की सेरेना विल्यम्स वरील चर्चा, मायावती यांनी उभारलेल्या पुतळ्यांचा वाद असो की सावरकरांवरील वादंग समीनाचे लेखन आपल्याला अत्यंत मार्मिकपणे सत्याचे अनेक पैलू दाखवते. बऱ्याचदा आपल्याही समजांना धक्के देत जात, वर्ग, लिंगभावाचा गुंता नेमकेपणाने उलगडते...

आपल्याला नेहमीच वैचारिक खुराक देणाऱ्या हरिती पब्लिकेशनने नुकतेच समीना दलावाई यांचे पहिले-वहिले मराठी पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यामुळे आता मराठी वाचकांनाही समीना दलवाई यांचे विचार वाचायला मिळणार आहेत. पुस्तकाच्या 'भटकभवानी' या नावानेच माझ्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे... पुस्तक हाती आल्यापासून लगोलग वाचायला घेतले आहे... तुम्हालाही वाचायचे असेल तर खालील लिंकवरून ते मागवू शकता...

शाहीर सचिन माळी

https://pustakshop.com/index.php?id_product=4806&rewrite=&controller=product

22/08/2022

*तुला आठवताना...*
पतीला शब्दरूपी जिवंत करणारी सावित्री
हरिती पब्लिकेशनचे नवे पुस्तक

👇
Lokmat ePaper - http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_PULK_20220822_9_5

*पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक*
https://pustakshop.com/index.php?id_product=4908&rewrite=-&controller=product

Lokmat Marathi Newspaper: Get Latest ePaper in Marathi with one of the most popular Marathi newspaper Lokmat. Click here to read Today's Lokmat ePaper in Marathi.

आदिवासी प्रश्नांवरील डॉ. विजय गायकवाड यांचं नवीन पुस्तक पूर्व-प्रकाशनासाठी उपलब्ध आहे.पुस्तकाचं नाव:- आदिवासींचे शिक्षणा...
11/08/2022

आदिवासी प्रश्नांवरील डॉ. विजय गायकवाड यांचं नवीन पुस्तक पूर्व-प्रकाशनासाठी उपलब्ध आहे.

पुस्तकाचं नाव:- आदिवासींचे शिक्षणातील समावेशन आणि वर्जितता - एक समाजशास्त्रीय आकलन
लेखक:- डॉ. विजय गायकवाड
प्रकाशन:- हरिती पब्लिकेशन्स

पुस्तकाचा सारांश:-
परंपरेनुसार, भारतीय समाजातील विशिष्ट समुदायांचे ज्ञान निर्मिती आणि ज्ञान ग्रहणाच्या प्रक्रियेत वर्चस्व असल्याने आदिवासी भागांमध्ये शिक्षणाचा प्रवास आडवळणाचा राहिला आहे. धोरणं तसेच विविध कृतीकार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासींना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन असला तरी संस्थात्मक स्तरावरील व्यवहार विपरीत राहिला असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना विविध पातळ्यांवर संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेत दिर्घकाळ टिकून राहण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. सदर ग्रंथ सामाजिकशास्त्रांचे विद्यार्थी, संशोधक, शासन सेवेतील अधिकारी, कर्मचारी तसेच आदिवासींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना निश्चित मार्गदर्शक ठरेल...

पुस्तक पूर्व-प्रकाशन सवलतीमध्ये उपलब्ध आहे.
-१ ते ४ प्रतींसाठी २०%
-५ किंवा ५ पेक्षा जास्त प्रतींसाठी ४०% सवलत उपलब्ध आहे.
-विद्यार्थ्यांसाठी प्रकाशनाकडून एकूण ३०% सवलत दिलेली आहे.
पोस्टेज खर्च अतिरिक्त.

खाली दिलेल्या लिंकवर फक्त क्लिक करून आमच्या वेबसाईटवरून पुस्तकाची सर्व माहिती मिळवू शकता आणि पुस्तक घरपोच मागवू शकता किंवा संपर्क करा 9422561999 या क्रमांकावर.

https://pustakshop.com/index.php?id_product=4886&rewrite=-&controller=product

Author: डॉ. विजय गायकवाडPublication: हरिती पब्लिकेशन्सCategory: सामाजिक Pages: 434Language: MarathiBinding: Paperback

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hariti Publications posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share