Amey Pawar

Amey Pawar Researcher

12/10/2022

To fight the upcoming global famine which is already becoming a major concern for globalists all over the world, I/We have started a campaign with a goal to plant 10,00,000 trees which will help us be prepared for the dire distress that can hit us at any moment.
To support us with the campaign, you are requested to do a simple task. An individual will be needed to plant one tree within their vicinity or neighbourhood which are easy to grow, and has some trait to it which endorses the food supply chain.

#श्रीमंतMaharashtra

आगामी जागतिक दुष्काळाशी लढा देण्यासाठी जो जगभरातील जागतिकवाद्यांसाठी आधीच चिंतेचा विषय बनत आहे, मी/आम्ही 10,00,000 झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवून एक मोहीम सुरू केली आहे ज्यामुळे आपल्याला येणाऱ्या भीषण संकटासाठी तयार राहण्यास मदत होईल. कोणत्याही क्षणी.
मोहिमेत आम्हाला पाठिंबा देण्यासाठी, तुम्हाला एक साधे कार्य करण्याची विनंती केली जाते. एखाद्या व्यक्तीला त्यांच्या परिसरात किंवा शेजारच्या परिसरात एक झाड लावावे लागेल जे वाढण्यास सोपे आहे आणि त्यात असे गुणधर्म आहेत जे अन्न पुरवठा साखळीला मान्यता देतात.

#श्रीमंतमहाराष्ट्र

मी हा लेख काही महिन्यांपुर्वी लिहिला होता'बिटकॉइन’ने ‘मार्केट कॅपिटलायझेशन’च्या बाबतीत ‘फेसबुक’ला अलीकडेच मागे टाकले आहे...
17/09/2022

मी हा लेख काही महिन्यांपुर्वी लिहिला होता

'बिटकॉइन’ने ‘मार्केट कॅपिटलायझेशन’च्या बाबतीत ‘फेसबुक’ला अलीकडेच मागे टाकले आहे. लेखनाच्या वेळी अंदाजे $ १,१४८,४६०,०३०,४४० हा आकडा होता. या वर्षाच्या सुरुवातीला किमतीत किरकोळ घट झाली असूनही, ‘बिटकॉइन’ वेगाने वाढत आहे. गेल्या वर्षी ‘बिटकॉइन’मध्ये ३६० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे, तर ‘फेसबुक’ फक्त २२ टक्क्यांनी वाढले आहे. हे लक्षात घेतले पाहिजे, की ही तुलना फेसबुक, सार्वजनिकरीत्या सूचीबद्ध कॉर्पोरेशन आणि बिटकॉइन, आर्थिक मालमत्ता आणि विकेंद्रीकृत नेटवर्क यांच्यात आहे.
‘बिटकॉइन’ ही मागील दशकातील सर्वोत्तम कामगिरी करणारी मालमत्ता होती आणि या दशकाची जोरदार सुरुवात झाली आहे. या कॅलेंडर वर्षाच्या चौथ्या तिमाहीत प्रवेश करताना, ‘बिटकॉइन’ लक्षणीय वेग घेण्यास तयार आहे आणि आताच्या तुलनेत ते अधिक वाढेल. मागील काही चार्टचा अभ्यास करता कळून येते, की ‘बिटकॉइन’ चौथ्या तिमाहीत अनेकदा चांगली कामगिरी करतो.

‘बीटीसी’ची तुलना टॉप स्टॉकशी करताना, हे स्पष्ट होते, की बिटकॉइन हळूहळू यादीतील पहिल्या क्रमांकाकडे वाटचाल करीत आहे. ‘बिटकॉईन’ने ‘फेसबुक’ला मागे टाकत सध्या सहाव्या क्रमांकावर जागा पटकावली आहे. त्यानंतर गुगल, सौदी अरामको, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल हे मोठे स्टॉक आहेत.
आता २०२१ मध्ये ‘फेसबुक’ला त्याच्या स्थानापासून मागे टाकून असे दिसते, की बिटकॉइन या दशकासाठी देखील योग्य मार्गावर आहे. दुसरीकडे, कंपनीच्या तीन अॅपला सहा तासांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय झाल्यानंतर ‘फेसबुक’च्या मूल्यात पाच टक्क्यांची घट दिसून आली. या कारणास्तव सीईओ मार्क झुकेरबर्ग याची वैयक्तिक संपत्ती कमी झाली. कारण त्याने सुमारे सात अब्ज डॉलर गमावले, ज्यामुळे तो काही तासात ‘ब्लूमबर्ग’च्या अब्जाधीशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आला.
आता चौथ्या तिमाहीत बिटकॉइन आजच्या तुलनेत जास्त वाढण्यास तयार आहे. काही विश्लेषक असे सांगतात, की बिटकॉइन साधारणपणे वर्षाच्या चौथ्या तिमाहीत चांगली कामगिरी करतो या मागील काही वर्षातही हेच पाहायला मिळाले आहे.

सध्याचा तेजीतील बाजार २०२० च्या चौथ्या तिमाहीत सुरू झाला. अनेक लोक चौथ्या तिमाहीत विविध घटकांमुळे अधिक फायद्याची अपेक्षा करतात, जसे की मध्यवर्ती बँका पैशाचा पुरवठा वाढवतात किंवा एल साल्वाडोर यासारखे देश बिटकॉइनला वैध चलन म्हणून जाहीर करतात.
बिटकॉइनची आतापर्यंतची कामगरी बघता हे स्पष्ट आहे, की बिटकॉइन हळूहळू यादीतील पहिल्या क्रमांकाकडे चढत आहे. ‘फेसबुक’ला मागे टाकल्यावर आता ॲमेझॉन ‘मार्केट कॅप’च्या बाबतीत बिटकॉइनच्या अगदी समोर आहे
ॲमेझॉनच्या १.६३१ ट्रिलियन डॉलरच्या ‘मार्केट कॅप’ला मागे टाकणे, हा बराच मोठा पल्ला आहे. हे मूल्य ओलांडण्यासाठी, ‘बीटीसी’ला अंदाजे ५०-६० टक्के किंवा जास्त मिळणे आवश्यक आहे. तरी हळूहळू बिटकॉईन जगातील सर्वांत मौल्यवान मालमत्तेच्या या यादीत पुढे जाण्याची शक्यता दिसून येते.

-अमेय पवार

Lokmat, Sakal Times, Maharashtra Times, Loksatta I am willing to write on cryptocurrency, let me know if you are interested.

माझ्या आईने वाळलेल्या पानांचं खत (leaf compost) तय्यार करून त्यात आंब्याच्या कोया टाकून ही चित्तवेधक गोष्ट केली आहे पावस...
18/08/2022

माझ्या आईने वाळलेल्या पानांचं खत (leaf compost) तय्यार करून त्यात आंब्याच्या कोया टाकून ही चित्तवेधक गोष्ट केली आहे पावसाळा असल्यामुळे ह्या झाडांनी वाढीसाठी वेग पकडला आणि हो या खता मध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं.

09/06/2022

१० लाख झाडी आपण महाराष्ट्रात लावू शकतो का ?

  अंतर्गत आपण जवळपास १०० झाडी लावली आहेत, आकडा जरी छोटा असला तरी या झाडांवर वैयक्तिक लक्ष्य असल्याने त्यांचं संवरधन होइल...
06/06/2022

अंतर्गत आपण जवळपास १०० झाडी लावली आहेत, आकडा जरी छोटा असला तरी या झाडांवर वैयक्तिक लक्ष्य असल्याने त्यांचं संवरधन होइल, हि मोहीम चालु करुन तरुण पीढीने रिल्स, पबजी इ. सोडुन इत्तर संवेदन विषयांना घेऊन ते चिंताकुल आहेत हे दाखवले आहे. मला विश्वास आहे इत्तर दिग्गज लोकं आपण संकल्प केलेल्या 100,000 (sorry ९९,९०० 😜) वृक्ष लागवडीचा आकडा पुर्ण करतील.

धन्यवाद Lokmat    ला सपोर्ट केल्याबद्दल 🌳🙏🏽
05/06/2022

धन्यवाद Lokmat ला सपोर्ट केल्याबद्दल 🌳🙏🏽

मी लावली तुम्ही पण लावा आणि भविष्यात ऑक्सिजन आणि पाण्यावर टॅक्स देण्यापासून स्वतःला वाचवा !
05/06/2022

मी लावली तुम्ही पण लावा आणि भविष्यात ऑक्सिजन आणि पाण्यावर टॅक्स देण्यापासून स्वतःला वाचवा !

03/06/2022
धन्यवाद Sakal.   ला सपोर्ट केल्याबद्दल . ५ जुन (जागतीक पर्यावरण दिन) या दिवशी एक झाड लावुन त्याचा फोटो कमेंट बॅाक्स मधल्...
30/05/2022

धन्यवाद Sakal. ला सपोर्ट केल्याबद्दल . ५ जुन (जागतीक पर्यावरण दिन) या दिवशी एक झाड लावुन त्याचा फोटो कमेंट बॅाक्स मधल्या ग्रुप वर टाका.

20/05/2022

काय करतेस गं चीऊ?

या ५ जुनला १ वृक्षारोपण करुन या कमेंट्स सेकशन मधल्या ग्रुप वर फोटो टाकावे
18/05/2022

या ५ जुनला १ वृक्षारोपण करुन या कमेंट्स सेकशन मधल्या ग्रुप वर फोटो टाकावे

16/05/2022

१ लाख झाडे आपण लावु शकतो का? 🍀❤️

15/05/2022

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे * पर्यावरण रक्षति रक्षितः *

09/05/2022

100,000 zada lavaychiyet punya madhye

Possible ahe ka

Inspired by - abhi & niyu

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amey Pawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share