Comments
तू जेव्हा म्हणतेस ,
“तू नेहमीच असा वागतोस
मुद्दाम मला छळतोस ”,
तेव्हा तू मला आवडतेस..
तू जेव्हा म्हणतेस,
“मला तुझ्याशी बोलायचे नाही आता ..”आणि लगेच विचारतेस ,
“बोलतोस का आता ?”,
तेव्हा तू मला आवडतेस..
तू जेव्हा म्हणतेस,
“ परत जर असा वागलास तर..
मी तुला कायमची सोडून जाईन...
लक्षात ठेव ” ,
तेव्हा तू मला आवडतेस..
तू जेव्हा म्हणतेस ,
”मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय ..
आणि मला माहितीये की तुही माझ्याशिवाय..
”आणि पटकन मला मिठी मारतेस,
तेव्हा तू मला आवडतेस.
❤ प्रेमाची परिभाषा ❤
प्रेम म्हणून फक्त प्रेम करावं,
अन् मनावरच आघात व्हावं..
दोन दिसाचे पुसटसे स्वप्न,
अन् विरह नशिबी भेट मिळावं..!!
सात जन्माची आस बांधूनी,
क्षणातच स्वप्नभंग व्हावं..
जाती धर्माची ही बांधिलकी,
अन् नाजूक मन मोडल्या जावं..!!
जगभराचे जपून स्नेहबंध,
स्वप्नांनाही ग्रहण लागावं..
मन मारून दोघांनी जगावे,
अन् एकांती मरण मिळावं..!!
यालाच का हो प्रेम म्हणावं,
कधी न हसता रडतच जावं...
जगभराचा विचार करावं,
अन् मी ही प्रेमाला मुकावं...!!!
मग ही कसली प्रेमाची परिभाषा...???
-
👼🏼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼
फिरुन आज कोरले तुझेच नाव अंतरी,
रुसू नकोस लाडके तुलाच मानतो परी....
लता फुलात पाहतो तुझेच रुप देखणे,
कळी मधाळ हसते उन्हात वाढते जरी...!!!
-
👼🏼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼
खोलवर रुजलेल्या आठवणींना,
नव्याने मोहरताना पाहिलंय....
श्वासाचं प्रत्येक फूल सखे,
तुझ्या अस्तित्वाला वाहिलंय...!!!
-
👼🏼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼
तू माझ्याशी नाही बोललीस,
मला दुख होणार नाही...
तू माझ्याशी नाही हसलीस,
मला राग येणार नाही....
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
तू नाही दिलास reply ,
मला काही वाटणार नाही..
तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
तू विसरलीस मला,
मी तुला विसरणार नाही..
तू रडविलेस जरी मला,
तरीही मी रडणार नाही...
कारण तुला तर माहीतच आहे
कि
तुला सर्व माफ आहे...
तू सोडून गेलीस मला तरी मी वाट पाहणार,
कारण तुला तर माहीतच आहे कि
तुला सर्व माफ आहे...
कि तुला सर्व माफ आहे..
🙇🏼🙇🏼आठवणींची शाळा🙇🏼🙇🏼
तुझ्या सततच्या विचाराने,
मनाचा भरला होता माळा..
तरीच स्वप्नात भरली होती,
तुझ्या आठवणींची ती शाळा..!!
या शाळेतली मजा वेगळीच,
होते प्रत्येकाची ईच्छापुर्ती..
म्हणूनच की काय या शाळेत,
होते प्रत्येकाची इथे भरती..!!
त्या आठवणींच्या शाळेत,
होते तुझ्या सोबतींचे क्षण..
तुझ्या फक्त एका भेटीसाठी,
तरसणारे माझे हे वेडं मन..!!
वेड्या मनाच्या त्या शाळेत,
स्वप्नांचा सुंदर क्लास भरतो..
पण पहाट होताच अचानक,
स्वप्नक्लास एक भास ठरतो..!!
पहाटेच्या त्या अलार्मची,
घंटा केव्हाच वाजली होती...
अन् तुझ्या आठवणींची शाळा,
अगदी तेव्हाच सुटली होती...!!!
-
स्वलिखित...
👼🏼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼
थोड्याच दिवसात इतकं #नाव #कमावतो की #विचारलंच नाय पाहिजे #पोरगं #काम काय करतं... बोल्ले पाहिजे #घेऊन जा #हिला,,,👰🏻😘
"चुरा के #दिल #मेरा ,,,, 👭 #गोरिया #चली ,,,!!
#शोधा रे तिला,,,.... तुमच्या 😎 #भावाला जाम #आवड़ली ती..!!"😎
#शांत #बसलोय फक्त #बदनामी होईल म्हणून... #डोकं_फिरलं न
#घरातून #उचलून नेईन....कळलं????
सांग काय म्हणू मी तुला..??
परी म्हणावं तर उडून जाशील...
स्वप्न म्हणावं तर तुटून जाशील...
आयुष्य म्हणावं तर संपुन जाशील...
कविता म्हणावं तर कोणीतरी चोरुन नेईल...!!
मग काय म्हणू काय मी तुला...??
-
👼🏼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼
परी आजच्या तुझ्या आठवणीनं,
निसर्गात विचित्र विचित्र घडलंय....
तुझ्या आठवणीनं ते ढग सुद्धा,
खरंच आज पाणी पाणी रडलंय...!!!
-
👼🏼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼
आेल्याचिंब पावसात,
वीज अशी चमकली....
घाबरुन ती ही मग,
मलाच येऊन बिलगली...!!!
-
👼🏼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼