Mirchi Bhushan

  • Home
  • Mirchi Bhushan

Mirchi Bhushan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mirchi Bhushan, Radio Station, .

कथा पुनर्जन्माची...
13/09/2024

कथा पुनर्जन्माची...

कहाणी पुनर्जन्माची...
13/09/2024

कहाणी पुनर्जन्माची...

नाशिक करता खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट इंडियाच्या अंडर 19 क्रिकेट टीम मध्ये नाशिकच्या साहिल पारख ची निवड झाली आहे, याच टी...
05/09/2024

नाशिक करता खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट इंडियाच्या अंडर 19 क्रिकेट टीम मध्ये नाशिकच्या साहिल पारख ची निवड झाली आहे, याच टीम मध्ये राहुल द्रविड यांचा मुलगाही आहे नाशिककरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट ...
क्या बात है !

29/07/2024

आज माझ्या वाढदिवसा निमित्त तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल मनापासुन धन्यवाद*!
खरी श्रीमंती ही नात्यांची आणि आपण जमवलेल्या माणसांची असते, आपण आयुष्यात प्रेमाने किती माणसे जोडली आणि आयुष्याच्या किती काळा पर्यंत ती माणसं आपल्या सोबत प्रेमाच्या रेशमी धाग्याने जोडली राहतात....हाच काय तो आपल्या आयुष्याच्या बॅलन्सशिट मधला निव्वळ नफा....
आणि तो निव्वळ नफा मला दरवर्षीच भरपूर होतो याचा मला खूप आनंद आहे...
म्हणूनच... अतिशय आत्मीयतेने आपण सगळ्यांनी मनापासून दिलेल्या शुभेच्छा बद्दल पुनश्च धन्यवाद !
हे प्रेम असेच कायम राहो..
अहो प्रश्न शेवटी माझ्या निव्वळ नफ्याचा आहे😁
RJ भूषण

बाई ग...... मूव्ही टीम आज मिरची स्टुडिओ मध्ये...क्या बात है! भन्नाट मूव्ही असणारनक्की बघा 12 जुलैला .behere .gaikwad
09/07/2024

बाई ग...... मूव्ही टीम आज मिरची स्टुडिओ मध्ये...
क्या बात है! भन्नाट मूव्ही असणार
नक्की बघा 12 जुलैला

.behere .gaikwad

08/07/2024

बा.भा बोरकर यांना विनम्र अभिवादन!!
एक कविता बा.भा. बोरकरांची
जीवन त्यांना कळले हो...

"डंका हरिनामाचा"- 19 जुलैला येतोय एक भन्नाट मूव्ही , त्या टीम सोबत आज मिरची स्टुडिओ मध्ये दिलखुलास गप्पा...
08/07/2024

"डंका हरिनामाचा"- 19 जुलैला येतोय एक भन्नाट मूव्ही , त्या टीम सोबत आज मिरची स्टुडिओ मध्ये दिलखुलास गप्पा...



रेडिओ मिरची 98.3 आज 17 वा वर्धापनदिन ,त्यानिमित्त मिरची वरती प्रेम व्यक्त करण्यासाठी आज आवर्जून उपस्थित सन्माननीय व्यक्त...
06/07/2024

रेडिओ मिरची 98.3 आज 17 वा वर्धापनदिन ,
त्यानिमित्त मिरची वरती प्रेम व्यक्त करण्यासाठी आज आवर्जून उपस्थित सन्माननीय व्यक्ती...
येवढं प्रेम मिळायला ही नशीब लागत...
धन्यवाद !

नाशिक मध्ये आज रेडिओ मिरची ला 17 वर्ष पूर्ण झाले...तुम्ही सगळ्यांनी केलेल्या मनापासून प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद...
06/07/2024

नाशिक मध्ये आज रेडिओ मिरची ला 17 वर्ष पूर्ण झाले...
तुम्ही सगळ्यांनी केलेल्या मनापासून प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद...

When you have a pure soul, you do not lose people. People lose you...
05/07/2024

When you have a pure soul, you do not lose people. People lose you...

*1983 वर्ल्ड कपच्या... काही खास आठवणी*...उद्या 25 जून भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून 41 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्...
24/06/2024

*1983 वर्ल्ड कपच्या... काही खास आठवणी*...
उद्या 25 जून भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून 41 वर्ष पूर्ण होत आहेत,
त्या निमित्त त्या वेळी भारताच्या टीम मध्ये असलेले लोकप्रिय क्रिकेटर दिलीप वेंगसरकर सर यांचा मी घेतलेला स्पेशल इंटरव्यू उद्या सकाळी 98.3 मिरची वर तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.
त्या वर्ल्ड कप मध्ये घडलेले काही अजब किस्से जे आज पर्यंत समोर आलेले नाहीत,
नक्की ऐका रेडिओ मिरची 98.3 वर उद्या 25 जून सकाळी 9 ते 11
RJ भूषण 😁
रेडिओ मिरची 🌶️

22/06/2024

*बेगम अख्तर*
गुस्ताखी माफ करना....

साधारण १९४० सालची गोष्ट. लखनऊला ज्येष्ठ गझल गायिका बेगम अख़्तर यांच्या कोठीवर एक माणूस त्यांची गझल ऐकायला आला आहे. एरवी बेगम संध्याकाळी गात पण त्या दिवशी त्या माणसाची उर्दूविषयीची आणि गाण्याविषयीची समज बघून त्या गायला बसतात. ४-५ मिनिटानंतर तो माणूस बेगमच्या हार्मोनियमवर हात ठेवतो, त्यांचं गाणं थांबवतो आणि जाऊ लागतो. बेगम आश्चर्यचकित होऊन विचारतात, ‘‘मुझसे कोई गुस्ताख़ी हुई क्या?’’
त्यावर तो माणूस उत्तरतो, ‘’नाही, तुमचा रिषभ लागलेला मला आता कळला. याचा अर्थ तुमचा ‘सा’ कधीच लागून गेला. तुमचे स्वर हे इतके अद्भूत एकमेकांत मिसळले आहेत. आज मी हजार रुपये घेऊन आलो होतो. कारण माझ्याकडे तेवढेच आहेत. पण तुमच्या एकेका स्वरासाठी लाख रुपये दयावेत असे तुमचे स्वर आहेत. बेगम, मैरी औक़ात नही है की मैं आपका गाना सुनू’’.
हे वाक्य ऐकल्यावर बेगम अख़्तर ढसाढसा रडायला लागल्या आणि त्यानंतर सगळ्या मैफिली रद्द करुन बेगम फक्त त्या माणसासाठी रात्रभर गायल्या. तो माणूस होता रामूभैय्या दाते...दिवंगत ज्येष्ठ भावगीत गायक श्री. अरुण दाते यांचे वडील.

एखादया कलाकाराला याहून देखणी आणि उमदी दाद काय मिळू शकते? भाऊसाहेब पाटणकरांचा शेर या ठिकाणी आठवतोय..

दोस्तहो, मैफल अपुली रंगण्या जर का हवी
आम्हा नको सौजन्य, तुमची ज़िंदादिली नुसती हवी
ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा
ती ही अशी, ज्या वाहवाला दयावी अम्ही ही वाहवा...

दाद देणं, कौतुक करणं ही एक कला आहे आणि यासाठी मनाचा मोठेपणाही असावा लागतो. खरं म्हणजे मोकळ्या मनानं एखाद्याचं मनापासून कौतुक करणं हे किती सोपं असायला हवं पण ते तसं असताना दिसत नाही. ओशोंनी म्हटलंय, किसी की निंदा करो तो कोई प्रमाण नही मांगता, पर प्रशंसा करने पर हजार प्रमाण मांगे जाते हैं...एखादया गुणासाठी, यशासाठी, उपलब्धीसाठी सहजतेनं कौतुक करायला पैसे पडत नाही...पण शब्ददारिद्रयाचं काय करावं?

कुठलंही नातं सुदंर करायचं असेल, खोल आणि अर्थगर्भ करायचं असेल तर त्यासाठी एकमेकांना योग्य त्या ठिकाणी ॲप्रिशिएट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कौतुक झालं तर ऊर्जा मिळते, माणसाचा उत्साह वाढतो, काम करण्याची प्रेरणा मिळते...कौतुक, दाद हे माणसाला अधिक चांगलं सकारात्मक करतात. आणि किती छोटया छोटया गोष्टीचं कौतुक करता येऊ शकतं किंवा करायला हवं..तुमच्याकडे कामासाठी मदतनीस म्हणून येणाऱ्या बाईनं चांगला स्वयंपाक केला, छान भाजी केली आणि तुम्ही लगेच त्या बाईला सांगितलं तर त्यावेळी तीचा चेहरा बघा...केवढे आनंदाचे आणि समाधानाचे भाव दिसतील तीच्या चेहऱ्यावर…एकदा औषधांच्या दुकानात गेले होते, औषधं काढून देणारी बाई इतकी उत्साहानं आणि प्रसन्नतेनं काम करत होती...मी तीला दाद दिली तुम्ही किती प्रसन्न हसता...तीचा चेहरा ही दाद ऐकल्यावर काय उजळून गेला होता..

ज़रा हसकर किसीसे बात करनें में बुरा क्या है
नये रिश्ते बनानें का कोई मौसम नही होता...

ती बाई त्या क्षणी कायमची माझी होऊन गेली...
किती छोटया छोटया गोष्टींची नोंद घेतली जाऊ शकते..आणि घेतल्या जायला हवीसुद्धा...फ्लाईट जमिनीवर उतरवताना अनेकदा पायलट इतकं सुरेख आणि अलगद जमिनीवर उतरवतो मी आवर्जून एअर होस्टेसला सांगते पायलटला दाद दया माझ्याकडून फार सुरेख लँडिंग केलं..

हॉटेलमध्ये एखादा वेटर फारच अदबशीर आणि मॅनर्सनं वागणारा असतो त्यावेळी त्याच्या मॅनरिझमला दाद देणं...कोणी उत्कृष्ट पेहराव, किंवा पेहरावाची रंगसंगती केली असेल त्याला आवर्जून दाद देणं...समारंभाची आखणी उत्कृष्ट असेल त्याच्या आयोजनाला दाद देणं, कोणी सुरेख रांगोळी काढली असेल तर आवर्जून काढणा-या व्यक्तीला शोधून तीला ते सांगणे...हजार गोष्टी सांगता येतील....

कोणी जेवायला बोलवलं तर स्वयंपाकाला दाद देणं हा साधा कॉमन सेन्स आहे...अशी संवेदनशीलता आपण जाणीवपूर्वक विकसित करायला हवी...त्यासाठी जाणीवपूर्वक सौंदर्यदृष्टी पण विकसीत करावी लागते. गोष्टींमधलं सौंदर्य टिपणं, आणि ते टिपल्यावर त्याचं उमदेपणानं कौतुक करणं या दोन स्वतंत्र गोष्टी आहे. असं कौतुक जेव्हा आपण करतो तेव्हा व्यक्तीमधली चांगुलपणावरची श्रद्धा वाढत असते. हाताखालच्या लोकांचं किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं मुक्त मनानं कितीदा आपण कौतुक करतो... ते व्हायला हवं.

शिवाय मनापासून योग्य ती दाद देणं आणि खुशामत करणं यात खूपच फरक आहे. आपल्याला खुशामत किंवा लांगूलचालन करायचं नाहीये. अचूक आणि प्रामाणिक दाद दयायची आहे. आयबीएन-लोकमतला काम करत असतानाचा एक प्रसंग आठवतोय ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकरांचं निधन झालं होतं. फोनवर सुप्रसिद्ध कथा लेखिका मेघना पेठे या तेंडुलकरांबद्दल बोलत होत्या. बोलता बोलता त्या म्हणाल्या, चुका करणाऱ्या लोकांना तेंडुलकर हे नेहमी आपले वाटत राहिले...काय सुंदर वाक्य होतं..काय खोल वाक्य आहे..मी ते त्यांना आवर्जून सांगितलं...आणि ही नेमकी दाद दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधानाचे भाव होते ते सांगता येणार नाही...दाद देताना precision महत्वाचं...

नवरा-बायकोच्या नात्यामध्ये तर या कौतुकाला विशेष स्थान आहे. वेळोवेळी केलेल्या कामाची दाद दखल घेणे, त्याला दाद देणे अत्यंत महत्वाचे आहे. अनेकदा मी बघितले आहे की, काही नवरे वा बायका पण ठरवून आपल्या साथीदाराचं कौतुक करत नाही, त्याला दाद देत नाही. जाणीवपूर्वक अशा प्रकारे साथीदाराला कौतुकापासून वंचित ठेवल्या जात असेल तर ते क्रौर्य आहे.

मला लेखाच्या शेवटी एक प्रसंग सांगावासा वाटतो..विवाहपूर्व समुपदेशन शिबिरात एकदा गंमत म्हणून एक आजोबा गेले. त्यांनी शिबीरात छान सहभाग घेतला. नंतर शिबीर संपल्यावर आयोजकांना भेटण्यासाठी त्या आजोबांच्या पत्नी म्हणजे आजी आल्या. आणि आयोजकांना म्हणाल्या की मी तुम्हाला धन्यवाद दयायला आले आहे. आमच्या लग्नाला ५० वर्ष झालीत. पण ५० वर्षात पहिल्यांदाच यांनी (ते आजोबा म्हणजे त्यांचे पती) मला आवाज देऊन जवळ बसवून घेतलं. माझा हात हातात घेतला. आणि मला म्हणाले, आपल्या ५० वर्षांच्या सहजीवनात तू मला किती साथ दिली आहेस...अनेकदा माझ्याकडून तुझ्याकडे दुर्लक्ष झालं, तुला कष्ट पडले पण तू निभावून नेलं सगळं...तुला सांगतो तू मला खूप आवडतेस आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे...
हे सांगून एक क्षण त्या आजी थांबल्या आणि म्हणाल्या तुम्हाला मी धन्यवाद दयायला आली आहे. ५० वर्षांच्या कष्टाचं त्या दिवशी सार्थक झालं हो...असं म्हणून आजी ओक्साबोक्शी रडू लागल्या...

हे सांगायला ५० वर्ष का लागावे?…तेव्हा अगदी मुक्तपणे खुल्या मनानं कौतुक करा...व्यक्त होताना संकोच करू नका...गोष्टी योग्य वेळी आणि वेळेतच सांगायला हव्यात....त्या तशा केल्या नाहीत तर उसके बाद कहने का कुछ अर्थ ना रह जायें...असं होऊ शकतं...

*बता दे जो बताना है,अभी है वक़्त दिवाने,ज़ुबा पर बात लाने का,कोई मौसम नहीं होता...*🙏

"𝐍𝐚𝐭𝐮𝐫𝐞 𝐢𝐬 𝐥𝐨𝐯𝐞𝐝 𝐛𝐲 𝐰𝐡𝐚𝐭 𝐢𝐬 𝐛𝐞𝐬𝐭 𝐢𝐧 𝐮𝐬.”
02/06/2024

"𝐍𝐚𝐭𝐮𝐫𝐞 𝐢𝐬 𝐥𝐨𝐯𝐞𝐝 𝐛𝐲 𝐰𝐡𝐚𝐭 𝐢𝐬 𝐛𝐞𝐬𝐭 𝐢𝐧 𝐮𝐬.”



ग्रेट भेट ... आणि वार्तालाफ.. श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट चे कोषाध्यक्ष - स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज ...
31/05/2024

ग्रेट भेट ... आणि वार्तालाफ..
श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट चे कोषाध्यक्ष - स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज ...

30/05/2024

नाशिक ड्रग्स कॅपिटल झालं आहे का??
काय म्हणाले नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सर

नाशिक पोलीस आयुक्त मा. संदीप कर्णिक सर मिरची स्टुडिओ मध्ये.
29/05/2024

नाशिक पोलीस आयुक्त मा. संदीप कर्णिक सर मिरची स्टुडिओ मध्ये.

ACEF Global Customer Engagement Awardsमधे तब्बल १९ अवॉर्ड्स जिंकून मिरची बन गया है सिकंदर!
01/05/2024

ACEF Global Customer Engagement Awards

मधे तब्बल १९ अवॉर्ड्स जिंकून मिरची बन गया है सिकंदर!

Water Man of India Dr . Rajendra Singh sir in Mirchi Studio for an interview...Wow.... What a personality....
29/04/2024

Water Man of India Dr . Rajendra Singh sir in Mirchi Studio for an interview...
Wow.... What a personality....

        (add your city name to track the city wise activity pls)
29/03/2024





(add your city name to track the city wise activity pls)

K.K.Wagh College of agriculture.... Annual social day - Chief guest
15/03/2024

K.K.Wagh College of agriculture....
Annual social day - Chief guest

Congratulations!!!!  sir For Godavari Gaurav Puraskar....
10/03/2024

Congratulations!!!! sir
For Godavari Gaurav Puraskar....

सांगायला आनंद होतो की नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचा  ' कार्यसन्मान ' पुरस्कार मला प्राप्त झाला. सगळ्यांचे मनापासुन आ...
04/03/2024

सांगायला आनंद होतो की नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचा ' कार्यसन्मान ' पुरस्कार मला प्राप्त झाला.
सगळ्यांचे मनापासुन आभार !

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mirchi Bhushan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share