31/10/2023
स्वर्गीय राजाभाऊ विनम्र अभिवादन
भाऊ तुमची खुप आठवण येते
आणि ती काय येणार नाही
इयत्ता ४थीत असल्या पासून तुमच्या सानिध्यात आलो
तुमच्या विचारांनी प्रेरित होऊन तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर एक निष्ठेने राहिलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
भाऊ तुमच्या जाण्याने बेल्हे गावाला नेतृत्व राहिलं नाही कुणी गावाला ठाम अशी दिशा दाखवणारा नेता राहीला नाही
आता बेल्हे गावचे 2023 ग्रामपंचायत इलेक्शन लागले पण गावाला ठाम दिशा दाखवेल असं नेतृत्व बेल्हे गावात कोणाकडेचं दिसत नाही याची खूप मोठी खंत वाटते
यावर आमचे मित्र गणेश जी चोरे सर यांनी शिवनेरी संवाद च्या माध्यमातून सांगीतलं दिशाहीन गाव नेतृत्वहीन जनता अगदी तशीच परिस्थिती बेल्हे गावची झाली आहे
जसं अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण जगाचा पोशिंदा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या भोवती फिरतय ना तसंच भाऊ बेल्हे गावचे राजकारण आज तुमच्या भोवती फिरतंय हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही
कारण भाऊ ज्यांना कधी तुमचे विचार सुद्धा तुम्ही असताना पटले नाहीत ना ते आज तुमच्या फोटोंना हार चढवून आज राजा भाऊंच्या विचारांचा पक्ष म्हणून मत मागताना दिसतात तुम्ही असताना तुमचे विचार कधीच पटले नाहीत तर तुम्ही नसताना सर्व गट पॅनल तुमच्या नावाचा आधार घेऊन आज मतदारांना भावनिक साथ घालत आहे हे कोणीही नाकारू शकत नाही
भाऊ तुमची किंमत आता विरोधकांना आणि बेल्हे गावाला कळली आहे
भाऊ तुम्ही कधी राजकारण केलं नाही तुम्ही काहींना धडा जरूर शिकवला
त्याची कारणही तशीच होती पण गोरगरिबांना तुमच्याकडून कधी त्रास झालाच नाही तुमच्याकडून पुन्हा सन्मानच भेटला लहान मुलगा असो किंवा वयस्कर माणूस असो तुम्ही त्याला आदरानेच जवळ करत होते लहान मुलगा असला तरी त्याला काय भाई काय चाललंय असेच प्रेमाचे उद्गार तुमच्या तोंडून असायचे
भाऊ त्यावेळेस तुम्हाला विरोध करायचा म्हणून प्रत्येक विलक्षण आलं की विरोधक बोलायचे राजाभाऊ गुंड आहे राजाभाऊ मुलांना वाईट व्यसन लावतो
पण भाऊ एक सांगू तुमच्याबरोबर जे सच्चे कार्यकर्ते होते ना एक सुद्धा वायला गेलेला नाही सर्वच्या सर्व आपल्या पायावर कुटुंबासह आज सक्षम आहेत भाऊ राजकारण करताना तुम्ही सुरुवात अगदी एकट्यापासून केली स्वतःच्या घरच्या विरोधात जाऊन तुम्ही मोठे धाडस राजकारणात केलं भाऊ तुमचं पहिलं बेल्हे ग्रामपंचायतचे विलक्षण सुद्धा आठवतंय तुमचा बेल्हे स्टैंड वरचं ते होल्डिंग आज पण डोळ्यासमोर दिसतंय त्यावर फक्त तुमचा एक फोटो आणि लिहिलेलं टायटल होतं हा एकटा राजा बाकी खेळ माकडांचा कारण सर्व नेते तुमच्या विरोधात होते
आज पण तसंच आहे कारण बेल्हे गावचे राजकारणच राजाभाऊ या नावाने घुटमळतय आज सर्वांनाच राजाभाऊ च्या नावाचा आधार घेऊन मत मागायला लागतंय म्हणून भाऊ बोलावं वाटतंय राजाच राज पण काल पण आज पण आणि उद्या पण
खऱ्या अर्थाने तुम्ही बेल्हे गावातील सर्व जाती धर्मातील मायबाप जनतेला तुम्ही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य बनवले यातूनच तुमचा मोठेपणा दिसून आला
तुमच्या जाण्याने बेल्हे गावची जी हानी झाली ती कधीही न भरून निघणारी आहे
भाऊ तुम्हाला विनम्र अभिवादन💐
जे पाहतोय जे अनुभवलय
तेच नमूद केलंय
आपलाच सुनील कणसे बेल्हे धन्यवाद🙏