सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर

  • Home
  • सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर

सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, News & Media Website, Ausa, .

शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीकडून निमंत्रण                                                 ...
25/06/2024

शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीकडून निमंत्रण
सह. अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर.

मुंबई (ता.25) आषाढी यात्रा दरवर्षी आषाढी शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन २०२४ यावर्षी आषाढी यात्रा बुधवार, दिनांक १७ जुलै, २०२४ रोजी आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्रीं विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज दिनांक 25 जून रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन तसेच मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधाबाबत माहिती घेवून आवश्यक त्या सूचना दिल्या. आषाढी यात्रा कालावधी दर्शन रांग, पत्राशेड, दर्शन मंडप, येथे येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांची तसेच यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे याबाबत केलेल्या नियाोजनाची माहिती मंदीर समितीचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली.

नांदेड: येथील नगरसेवक श्री.बालासाहेब देशमुख तरोडेकर यांच्या निवासस्थानी प.पू.सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा पा...
24/05/2024

नांदेड: येथील नगरसेवक श्री.बालासाहेब देशमुख तरोडेकर यांच्या निवासस्थानी प.पू.सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला, यावेळी माजी आमदार तथा नांदेड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान उमेदवार श्री.वसंतराव चव्हाण, नांदेड दक्षिणचे आमदार श्री.मोहनराव हांबर्डे, माजी आमदार श्री.हणमंतराव बेटमोगळेकर, पंढरपुर मंदिर समितीचे कार्यकारी आधिकारी श्री.बालाजी पुद्दलवाड, श्री.नितीन भाऊ शेटे, श्री.मेघराज बरबडे, श्री.दिलीप तोडकरी यांच्यासह ईतर मान्यवर व देशमुख परिवार उपस्थित होते.

18/05/2024
श्री नाथ संस्थान औसा यांच्या माघवारी पायी दिंडी सोहळ्याचे आज श्रीक्षेत्र गोपाळपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ...
11/02/2024

श्री नाथ संस्थान औसा यांच्या माघवारी पायी दिंडी सोहळ्याचे आज श्रीक्षेत्र गोपाळपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

अंबाजोगाई: यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे पद्मश्री शंकर बापूजी आपेगांवकर द्विदशक पुण्यस्मरण महोत्सव यांच्या ...
04/02/2024

अंबाजोगाई: यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे पद्मश्री शंकर बापूजी आपेगांवकर द्विदशक पुण्यस्मरण महोत्सव यांच्या वतिने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपुर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते प.पू.गुरूवर्य श्री.चैतन्य महाराज देगलूरकर यांना "पद्मश्री शंकर बापूजी वारकरी गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आला, यावेळी माजी मंत्री श्री.दिलीपराव देशमुख, बीडचे पालकमंत्री श्री.धनंजय मुंडे, आमदार श्री.रमेशप्पा कराड, ह.भ.प.श्री.श्रीरंग महाराज औसेकर, ह.भ.प.श्री.संदीपान महाराज हासेगावकर, श्री.उध्दव बापू आपेगांवकर यांच्यासह ईतर महाराज मंडळी व मान्यवर उपस्थित होते.

09/01/2024

जय श्रीराम !!

मुंबई: श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपुर येथील विकास कामाच्या संदर्भात वर्षा निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री...
04/01/2024

मुंबई: श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपुर येथील विकास कामाच्या संदर्भात वर्षा निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व मेघदूत निवासस्थानी उपमुख्यामंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांची मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी भेट घेऊन चर्चा केली तसेच त्यांचा मंदिर समितीच्या वतिने श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देऊन सत्कार ही केला, यावेळी राज्य मंत्री श्री.तानाजी सावंत, आ.विजयकुमार देशमुख मालक, माजी आ.पाशा पटेल, मंदिर समितीचे मुख्य अधिकारी श्री.राजेंद्र शेळके, मंदिर समितीचे कार्यकारी व्यवस्थापक श्री.बालाजी पुद्दलवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पंढरपूर:श्रीक्षेत्र पंढरपूर येथे शिव महापूराण कथाकार, भागवताचार्य पं.प्रदिप महाराज मिश्रा  यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची ...
29/12/2023

पंढरपूर:श्रीक्षेत्र पंढरपूर येथे शिव महापूराण कथाकार, भागवताचार्य पं.प्रदिप महाराज मिश्रा यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली, त्यानिमित्त मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर समितीच्या वतिने त्यांचा सत्कार केला, यावेळी श्री.गोरखनाथ महाराज, ह.भ.प.श्री.श्रीरंग महाराज औसेकर, श्री.आनंदराव संतपुरकर, श्री.गोविंदराव माकणे, श्री.कपिल माकणे, मंदिर समितीचे सदस्य, अधिकारी व ईतर मान्यवर उपस्थित होते.

औसा: श्री राम जन्मभूमी श्रीक्षेत्र आयोध्या येथून औसा येथील श्री राम मंदिर येथे आलेल्या अक्षता कलशाचे औसा येथे मिरवणूक का...
17/12/2023

औसा: श्री राम जन्मभूमी श्रीक्षेत्र आयोध्या येथून औसा येथील श्री राम मंदिर येथे आलेल्या अक्षता कलशाचे औसा येथे मिरवणूक काढण्यात आली, यावेळी सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, देवताळ संस्थानचे श्री.राजेंद्र गिरी महाराज, सौ.शोभाताई अभिमन्यू पवार, जेष्ठ नेते श्री.सुशीलदादा बाजपेयी, माजी नगराध्यक्ष श्री.किरणप्पा उटगे, माजी नगरसेवक श्री.सुनिलप्पा उटगे, श्री, बंडू कोद्रे यांच्यासह वारकरी व श्री राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

15/12/2023

निलंगा: सद्गुरू गुरूबाबा महाराज उत्सव निमित्त हाजेरीची किर्तन सेवा करताना ह.भ.प.श्री.श्रीरंग महाराज औसेकर

श्री नाथ संस्थान औसा पूढील श्री नाथषष्ठी महोत्सव बसवकल्याण तालुक्यातील श्रीक्षेत्र आलगुड येथे जाहीर झाला, त्यानिमित्त आल...
13/12/2023

श्री नाथ संस्थान औसा पूढील श्री नाथषष्ठी महोत्सव बसवकल्याण तालुक्यातील श्रीक्षेत्र आलगुड येथे जाहीर झाला, त्यानिमित्त आलगुड येथील समस्त ग्रासस्थांनी वाजत-गाजत निलंगा येथे येऊन महोत्सवाचे मानाचे नारळ घेतले.

तिन पिठ्यापासून चालणारा निलंग्यातील उत्सव
12/12/2023

तिन पिठ्यापासून चालणारा निलंग्यातील उत्सव

तिन पिठ्यापासून चालणारा निलंग्यातील उत्सव #औसेकर

ईश्वर प्राप्तीचे सर्वात सोपे मार्ग महाराजांनी सांगितले...ऐका सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे संपूर्ण किर्तन.......
07/12/2023

ईश्वर प्राप्तीचे सर्वात सोपे मार्ग महाराजांनी सांगितले...ऐका सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे संपूर्ण किर्तन....

ईश्वर प्राप्तीचे सर्वात सोपे मार्ग महाराजांनी सांगितले,औसेकर महाराजांचे संपूर्ण किर्तन #औसा ...

पंढरपूर: आज कार्तिकी एकादशी यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री.दे...
23/11/2023

पंढरपूर: आज कार्तिकी एकादशी यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी सौ.अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली आहे. तर, यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील श्री.बबन विठोबा घुगे आणि सौ.वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे. या पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत यांचा सत्कार करण्यात आला.

Address

Ausa

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share