13/11/2023
सकाळी उसाला पाणी देण्यासाठी वेदांत आफळे घाईगडबडीनं मळ्याकडे निघाला होता. अचानक त्याच्या वहाणेचा अंगठा तुटला. त्याला नीट चालता येईना. बाजूलाच तन्मय कुलकर्णी हा सफाई कामगार रस्ता झाडत होता.
’जवळपास कोणी चपला दुरुस्त करणारा आहे का’ असं वेदांतनं तन्मयला विचारलं. तन्मयला ते माहीत नसल्यानं त्यानं बाजूलाच असलेल्या उघड्या गटारात काम करत असलेल्या चिन्मय देशपांडेला हाक मारून चौकशी केली. तेव्हा घाणीनं माखलेल्या चिन्मयनं वेदांतला हवी असलेली माहिती दिली.
थोडं पुढे एका झाडाखाली दत्तोपंत जोशी चपला दुरुस्त करत बसले होते. त्यांच्याकडून वेदांतनं वहाणेचा अंगठा शिवून घेतला आणि तो पुढे निघाला. चोरून हातभट्टी लावणारे आणि बेकायदेशीर जुगार अड्डा चालवणारे चिंतोपंत ठेंगडी बाजूलाच उभे होते, पण वेदांतनं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही.
वाटेत त्याला पाठीवर धुण्याच्या कपड्यांचा मोठा गठ्ठा घेऊन घाटावर निघालेले लॉंड्रीवाले सुहास केळकर दिसले. त्यांच्या मागोमागच हातात धोपटी घेऊन घरोघरी जाऊन हजामती करणारे भार्गव काणे येत होते. डोक्यावर पाटी घेतलेली अंजोर शेवडे ’बिब्बं घ्या, शिकंकाई घ्या, मशेरी घ्या’ असा आवाज देत निघाली होती. तिच्याच मागून ललिता भागवत सुपं-टोपली-झाडू घेऊन येत होती...
(ब्राह्मणलॅंडमधील एक प्रसन्न सकाळ)
Gajoo Tayde यांच्या पोस्टवरून.