TV Desh Darpan

  • Home
  • TV Desh Darpan

TV Desh Darpan TV Desh Darpan

09/07/2023
रोमांचित करणारा बुद्ध, भीम गीतांचा बहारदार कार्यक्रमबुध्द जयंती विशेष.इतरही बातम्या बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा, श...
07/05/2023

रोमांचित करणारा बुद्ध, भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम
बुध्द जयंती विशेष.
इतरही बातम्या बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करून कमेंट करण्यास विसरू नका.
आपण बघत रहा TV देश दर्पण, रहा दोन पाऊल पुढे धन्यवाद.

एस आर पी कॅंप येथे बुद्ध जयंती साजरीरमाई महिला मंडळाचा सहभागभिम, बुद्ध गितांच्या बहारदार मेजवानीने श्रोते मंत्र....

14/02/2023
20/01/2023

Dr. Ambedkar & Bhagatsingh

04/01/2023
01/01/2023
18/12/2022
दैनिक खोजमास्टर तथा TV देश दर्पण चे पालघर जिल्हा प्रतिनिधी नवल तेजराव सिरसाट यांना वाढदिवसाच्या अनंत मंगलमय हार्दिक हार्...
18/12/2022

दैनिक खोजमास्टर तथा TV देश दर्पण चे पालघर जिल्हा प्रतिनिधी नवल तेजराव सिरसाट यांना वाढदिवसाच्या अनंत मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎊🎉❤️🎉

https://youtu.be/J3xcp8E-XXY
08/09/2021

https://youtu.be/J3xcp8E-XXY

शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने भरवला पोळाहिंगणा तालुका जिल्हा नागपूरशेतकऱ्यांचा जीवाभावाचा सखा त्याचा सर्जा रा....

24/07/2021

िया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक परिसराकडे जाणारा मार्ग जिवघेणा! हिंगणा तालुका जिल्हा नागप....

13/01/2021

बंजारा बहुल दाभा आगरगांव ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक एक च्या उमेदवारांनी केली मतदारांना निवडून देण्याची विनंती.बंजारा बहुल व आदिवासी लोकसंख्या असलेला आणि पाच गावे मिळुन असा ह्या दाभा आगरगांव ग्रामपंचायतचा परिसर आहे येथे ग्रामपंचायत च्या नऊ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे.तेंव्हा वार्ड क्रमांक एक चे उमेदवार सुनील नागोराव सयाम, धनपाल चरण चव्हांन व सौ कांताबाई गजेसिंग जाधव यांच्या गावात जाऊन प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी सांगितले कि आमदार समिर मेघे व सरपंच रामराम राठोड यांनी केलेल्या विकासकामां मुळे मतदार आमच्याच पॅनल च्या उमेदवारांना विजयी करतील.

29/12/2020

हिंगणा MIDC येथील स्पेसऊड कंपनीला भव्य आग,लाखोचे नुकसान! जिवीत हानी नाही.
दुपारी तीन वाजता आग लागली, कारण समजू शकले नाही, सायंकाळी 7 वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती,अग्णशन दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते, कंपनी सुरू असताना आग लागलीच कशी याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

01/11/2020

जलयुक्त शिवार मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा- रमेशचंद्र बंग

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्री यांना विभागीय आयुक्त, व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन

हिंगणा विधानसभा क्षेत्रात तत्कालीन शासनाने जलयुक्त शिवार योजनेचे नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार करून काही विशिष्ट लोकांना, संस्थांना आर्थिक लाभ पोहोचविण्याचे कार्य केले या सर्व बाबींची एस आय टी मार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त संजीव कुमार,व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
निवेदनात हिंगणा विधानसभा क्षेत्रातील हिंगणा तालुका व नागपूर ग्रामीण तालुका येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली असून त्यात वेना नदीचे खोलीकरण करण्यात आले त्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी, एमआयडीसी हिंगणा, आर्ट ऑफ लिविंग यांचेसह इतर सेवाभावी संस्था व स्थानिक नागरिकांकडून लोकवर्गणी जमा करण्यात आली याच कामाकरिता तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत काही निधी दिला परंतु या कामासाठी एकूण खर्च किती व एकूण निधी किती जमा झाला याचा कोणताही हिशोब नाही तसेच सदर काम हे नियमानुसार झाली का? यासाठी सदर ग्रामपंचायत, नगर पंचायत यांचा ठराव घेण्यात आला का? ह्या कामाची गुणवत्ता व दर्जा तपासण्यात आला का? माझी वेना माझी गंगा ही संस्था सदर कामासाठी लोकवर्गणी करण्याकरिता शासनाने अधिकृत केलेली संस्था आहे का? असे प्रश्न निर्माण होत आहे तरी या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे.
तसेच तालुक्यातील रायपुर, जुनेवाणी, डेगमा (बु.), किन्ही (धानोली), हिंगणा, सावंगी (देवळी), पिपळधरा, धोकर्डा,कान्होलीबारा, आधी गावात जलयुक्त शिवार योजनेचे नियमबाह्य कामे करून भ्रष्ट्राचार करण्यात आला. तरी सदर कामाची एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावे असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग,माजी आमदार विजय घोडमारे, जि प महिला बालकल्याण सभापती उज्वला बोढारे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, सुचिता ठाकरे, वृंदा नागपुरे, राकापा हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रकाश नागपुरे, हिंगणा पंचायत समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, उपसभापती सुष्मा कावळे, पंचायत समिती नागपूर चे उपसभापती संजय चिकटे, राकापा हिंगणा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, नागपूर तालुकाध्यक्ष संजय कुंटे, विनोद ठाकरे आदी उपस्थित होते.

20/10/2020

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा! आम आदमी पार्टी ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!!

( हिंगणा तालुका जिल्हा नागपूर )

या वर्षी आवश्यकते पेक्षा जास्तच पाऊस झाल्याने सर्वच पीकांना मोठा फटका बसला बसला, यामध्ये पश्चिम विदर्भातील उडीद,मुग, सोयाबीन तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाडा या भागातील कपाशीचे पीक ( बोंड ) सडण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे, तेंव्हा महाराष्ट्र सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे मुख्यमंत्री यांच्या नावे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली नायब तहसीलदार ज्योती भोसले यांनी निवेदन स्विकारले निवेदन देते वेळी आम आदमी पार्टी लोकसभा स्लम संघटन संयोजक सचिन लोणकर बुल्लुजी बेहरा, प्रशांत पाटील,शामलाल कनोजिया, दिलीप चोखांद्रे कमलेश मानकर व दिपक डडमल इत्यादी उपस्थित होते. निवेदन पुढे असेही म्हटले आहे की सरकारने शेतकऱ्यांवर असलेले कर्ज माफ करुन ताबडतोब आर्थीक मदत करावी.

14/10/2020

64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणाने साजरा, *धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

11/10/2020

बाधाऱ्यांचे बोगस कामं! अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतानं !
( हिंगणा तालुका जिल्हा नागपूर )

बांधारे बांधण्यासाठी शासन करोडो रुपयांचा निधी हा संबंधित विभागांना वितरित करित असतो या मध्ये लघुसिंचन व पाटबंधारे विभाग असो कृषी विभाग किंवा इतरही विभाग, उद्देश हा असतो की, बांधाऱ्यांत साचलेले पाणी हे शेतीच्या उपयोगी यावे व जमीनीतील पाण्याची पातळी वाढावी पण बाधाऱ्यांत पाण्याचा ठणठणाट असल्याने हि योजना अधिकारी व ठेकेदार यांचे घर भरण्यासाठीच आहे की काय असा प्रश्न बोगस कामं बघीतल्यावर पडल्या वाचुन राहत नाही. तालुक्यातील सामाजिक संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी बांधाऱ्यांच्या बोगस कामांविरोत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागीतली असता हे बोगस कामं उजेडात आली., कृषी उपविभागीय अधिकारी यांनी स्वता पाहाणी केली असता बोगस कामं झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आली, संबंधित ठेकेदाराने जर ताबडतोब बांधारे दुरुस्त न केल्यास बांधारे बांधण्यासाठी लागलेली रक्कम वापस मागत नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येईल असे ते म्हणाले उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर तालुका कृषी अधिकारी मात्र बनवाबनवी ची उत्तरं देताना दिसली.

18/09/2020

कामगारांचे काम बंद आंदोलन!
वानाडोंगरी शहर दिसणार घाणीच्या विळख्यात!!
पगार दिला नाही म्हणुन पुकारला बंद.

( हिंगणा तालुका जिल्हा नागपूर )

वानाडोंगरी नगर परिषद मध्ये शंभराचेवर वर सफाई कामगार व वाहन चालक आहेत परंतु या कामगारांना दोन महिन्यापासुन वेतन दिले नसल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत होती म्हणून त्यांनी बुधवार पासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला.वानाडोंगरी नगर परिषदने सफाई चा ठेका हा नागपूर येथील खासगी कंपनी असेंट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था यांना दिला. कंपनी नगर परिषद कडून पेमेंट ची उचल करते परंतु कामगारांना मात्र वेळेवर पगार देत नाही, आताही कंपनीने कामगारांना दोन महिन्याचा पगार दिला नसल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे.प्रत्तेक कामगारांच्या नावे 16,500 येवढे वेतन नगर परिषद कडून काढल्या जाते परंतु कामगारांची मात्र नऊ हरावर बोळवण केली जाते,यात मोठ्या प्रमाणात दलाली खाल्ल्याजात असल्याचा आरोप कामगार करत आहेत,कोरोनाचा प्रादुर्भाव असतांनाही कामगारांना सुरक्षा साधनेही सदर कंपनी कडून पुरविल्या जात नाहीत त्या मुळे त्यांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे. अखेर बुधवार पासून सुरू झालेल्या संपकर्यांची भेट वानाडोंगरी नगर परिषद चे उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता यांनी डपिंग यार्ड ठिकाणी जाऊन घेतली असेंट संस्था चालकाला कर्मचारी यांच्या समस्या तात्काळ सोडन्या करीता अवगत के हेले. नियोजन सभापती भागवत काळे, सामाजिक कार्यकर्ते दादाराव मुडे, गजानन झाडे, आशिष अजमिरे या वेळी उपस्थित होते.

16/09/2020

एका शेतकऱ्याने रस्ता बंद केला!
इतरांच्या शेतातील पिक धोक्यात
( हिंगणा तालुका जिल्हा नागपूर )

सावळी (बिबी) येथील शेतकरी पुरुषोत्तम दागो जुनघरे , सुरेश दागो जुनघरे,गणपत जागोजी भुरले व छाया पुरुषोत्तम जुनघरे यांचे शेत आलेसुर (रिठी) परिसरात आहेत परंतु यांच्या शेता आगोदर पुंडलिक दमडू जुनघरे यांचे शेत आहे पुंडलिक जुनघरे यांनी इतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा रस्ता अडवल्या मुळे त्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप गणपत जागोजी भुरले व इतर शेतकऱ्यांनी केला.त्यांच्या म्हण्यानुसार सदर पांदन रस्ता हा पुर्वी पासुनच आहे आणि शेती सुध्दा वडिलोपार्जित आहे त्यामुळे पुंडलिक दमडू जुनघरे यांना हा रस्ता बंद करण्याचा कोणताही अधिकार नसताना त्यांनी विहिरीतील खोदलेला मलमा,मुरुम,दगड गोटे टाकून बंद केला व सिमेंटचे खांब सुध्दा रोवले. शेतात जाणारा रस्ता बंद झाल्याने भाजीपाला व इतर पिकांची नासाडी होत असुन शेतकऱ्यांचं मोठं आर्थीक नुकसान होत आहे तेंव्हा तहसीलदार साहेब यांनी मोका चौकशी करून आम्हाला न्याय्य द्यावा अशी मागणी पुरुषोत्तम दागो जुनघरे व इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

13/09/2020

एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्यीत तरुणाची हत्या सोहनकुमार उर्फ टायगर वय 24 वर्षअसे मृतकाचे नाव असून तो राहणार रामचंद्रपुर गोपालगंज बिहार चा असून हल्ली मुक्काम कार्तीक नगर,गजानन नगर पहाडीवर झोन चौक,एम आय डी सी.नागपुर आहे.

11/09/2020

ईसासनी ग्रामपंचायत घाणीच्या विळख्यात!
स्वछता अभियानाचे तिनतेरा!!
( हिंगणा तालुका जिल्हा नागपूर )

स्वछता अभियानाचा सर्वत्र गाजावाजा सुरू असताना आणि यासाठी शासनाचा भरपूर निधी खर्च होत असतांना सुध्दा ईसासनी ग्रामपंचायत मात्र याला अपवादच म्हणावी लागेल.गावात सरवत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून जागोजागी कचऱ्याचे ढीगारे,मेलेली जनावरे त्याच ढीगावर फेकने, सुमंगल विहार या मोठ्या अधिवास असलेल्या सोसायटीचे सिवर चे घान पाणी बाजुलाच असलेल्या पंचशील नगर या स्लम वस्तीतील मार्गावरुन वाहत नागरिकांच्या घरात शिरते तर कृष्णविहार सोसायटी शांतीनगर वार्ड नंबर सहा चे गडर चे पाणी ईसासनी वस्तीत शिरते त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,ईसासनी ग्रामपंचायत परिसर हा उच्चभ्रु व स्लम असा आहे येथे मोठमोठ्या इमारती तर झुग्गी झोपडी द्रुष्टी पथास पडतो सोसायट्यांनी मात्र येथिल गरिबांचे जगणे कठीण केले आहे असेच येथील परिस्थिती बघून लक्षात येते, सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या नंतरही ग्रामपंचायत स्वछतेच्या बाबतीत डोळेझाक करते यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी दिसून येते आहे.

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when TV Desh Darpan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share