News HUB Online

  • Home
  • News HUB Online

News HUB Online Daily news update

24/09/2022

जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले, ‘हे’ असणार पालकमंत्री…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे.
इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे- सांगली,
संदिपान भुमरे -औरंगाबाद
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड, शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

ऐतिहासिक क्षण!एका मोठ्या संघर्षाला यश...लोकनेते मा. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात...आज आष्टी येथे, मुख्...
24/09/2022

ऐतिहासिक क्षण!
एका मोठ्या संघर्षाला यश...
लोकनेते मा. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात...
आज आष्टी येथे, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह नवीन आष्टी-नगर रेल्वे डेमू सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.

केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जी, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रीतमताई मुंडे, खा. डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार सर्वश्री सुरेश धस, राम शिंदे, लक्ष्मण पवार उपस्थित होते.

नवीन आष्टी-नगर ब्रॉडगेज लाईन मराठवाड्याच्या विकासाचा नवा मार्ग ठरेल. नगर आणि बीड जिल्हे जोडले गेले. शेतकरी, स्थानिक व्यापार, उद्योग यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.

आष्टी-नगर ही 66 किमी ब्रॉडगेज लाईन नगर-बीड-परळी वैजनाथ या 261 किमी ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे. या संपूर्ण प्रकल्पात केंद्र आणि राज्य सरकार यांचा 50-50 टक्के खर्चाचा वाटा आहे.

नगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने 2000 कोटी रुपये निधी दिले आणि राज्य सरकारकडून 1400 कोटी रुपये देण्यात आले. हा सर्व निधी आमच्या काळात दिला गेला. केंद्राचा सर्वाधिक निधी मा. मोदीजींच्या काळात मिळाला. मविआने मात्र निधी रोखला होता.

लोकनेते मा. गोपीनाथजी मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले सरकार येताच वेग मिळाला, त्वरेने निर्णय घेण्यात आले. गेल्या सरकारने रेल्वे प्रकल्पांना निधी देणे बंद केले होते. आता आमच्या सरकारने पुन्हा निधी देणे सुरू केले. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो!

मराठवाड्यातील बंधू-भगिनींचे नगरपासून परळी वैजनाथपर्यंतच्या रेल्वेचे हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल! हा केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिनच्या सरकारचाच निर्धार आहे!

मराठवाड्याच्या विकासासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे काम गतीने सुरु आहे. लातूर येथील कोच फॅक्टरीचेही लोकार्पण लवकरच होणार. त्यामुळे देशातील मेट्रो, नव्या गाड्यांचे कोचेस आता मराठवाड्यात तयार होतील. नव्या अर्थकारणाला चालना मिळेल.

  - शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरे घेणार #दसरामेळावा
23/09/2022

- शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरे घेणार

#दसरामेळावा

औरंगाबादचे 'संभाजीनगर';उच्च न्यायालयाने नामांतराविरोधातील याचिका फेटाळली
23/09/2022

औरंगाबादचे 'संभाजीनगर';उच्च न्यायालयाने नामांतराविरोधातील याचिका फेटाळली

  सुचवा..?
23/09/2022

सुचवा..?

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when News HUB Online posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share