![बायकोने नविन activa घेतली आणि गेले वर्षभर गाडी तशीच पडून राहिली म्हणून मी activa sell ची add टाकली, 'want to sell for Rs...](https://img3.medioq.com/181/825/543689831818254.jpg)
25/11/2024
बायकोने नविन activa घेतली आणि गेले वर्षभर गाडी तशीच पडून राहिली म्हणून मी activa sell ची add टाकली, 'want to sell for Rs. 30,000/-..'
कुणी 15 हजारांत मागितली, तर कुणी 26, तर एकाने 28 हजारात मागितली. पण मी जास्त पैसे येतील, या अपेक्षेने कुणालाच 'हो' म्हटले नव्हते...
थोड्या वेळाने एक काॅल आला आणि तो म्हणाला...
"साहेब, 30 हजार जमवण्याचा खूप प्रयत्न केला, पण 24 हजारच जमलेत. थोडं थांबाल का, माझा मोबाईल पण विकतो आणि किती पैसे येतात, ते बघतो.
पण activa मलाच द्या...
माझा मुलगा इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला आहे. शेवटचे एक वर्ष तरी त्याने गाडीवरून जावे, असे मला वाटते. नवी गाडी याच्या दुपटीहून जास्त किमतीला आहे, ती नाही घेऊ शकत..."
मी फक्त 'ok बघू', असे म्हणालो आणि फोन ठेवला...
नंतर थोडा वेळ विचार केला आणि call back करून म्हणालो, "जरा थांबा, मोबाइल विकू नका. उद्या सकाळी या घरी आणि गाडी घेवून जा, फक्त 24 हजारामध्ये......"
माझ्यासमोर 28 हजाराची आॕफर असताना पण मी त्या अपरिचित व्यक्तीला 24 हजारामधे activa देणार होतो....
आज त्या कुटुंबात किती आनंदी वातावरण असेल..? उद्या त्यांच्या घरी activa येणार ......
आणि यामध्ये माझा काहीच loss होत नव्हता... कारण मला परमेश्वराने खूप काही दिले आहे. आणि मी खूप समाधानी आहे माझ्या लाईफवर ..
दुसरे दिवशी 50, 100, 500 च्या नोटांची जुळवाजुळव करून ती व्यक्ती संध्याकाळी 5 वाजता माझ्याकडे आली.
सकाळपासून त्याचे पाच वेळा फोन... 'साहेब मी पैसे घेवून येतोय, पण गाडी कुणाला देवू नका..'
माझ्या हातात पैसे दिल्यावर, त्या वेगवेगळ्या नोटा बघून जाणीव झाली, की ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणावरून गोळा करून आणलेत....
ऑफरपेक्षा चार हजार कमी पत्करून पण आम्हाला काहीच वाईट वाटले नाही, उलट त्याच पैशातील 500 रूपयांची नोट काढून त्या व्यक्तीला देत माझी पत्नी म्हणाली, 'घरी जाताना मिठाई घेवून जा....'
डोळ्यात पाणी आणत त्यांनी आमचा निरोप घेत तो माणूस activa घेऊन गेला...
आपण सहज reply करतो, 'It's my activa'....
पण आज activa scooter विकताना कळलं...
Activa म्हणजे काय असतं ते..?
जीवनात काही व्यवहार करतांना फायदाच बघायचा नसतो 😊
आपल्या मुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो.
तात्पर्य :
ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देता आले पाहिजे.🙏
कोणी लिहिले माहिती नाही पण फारच छान आणि प्रेरणादायक आहे म्हणून आपणास शेअर केले