Ambedkar Facts

  • Home
  • Ambedkar Facts

Ambedkar Facts This page elaborates Ambedkarism. All our posts are genuine & Varified.
(1)

07/11/2024
प्रत्येकाने शेयर करा. आंबेडकरवादी म्हणून अभिमानाची बाब आहेच. पण प्रत्येक भारतीयांसाठीही अभिमानाची बाब आहे.
01/11/2024

प्रत्येकाने शेयर करा. आंबेडकरवादी म्हणून अभिमानाची बाब आहेच. पण प्रत्येक भारतीयांसाठीही अभिमानाची बाब आहे.

31/10/2024

         # prakash ambedkar news
31/10/2024

# prakash ambedkar news

व्याख्याते जगदीश ओहोळ - Jagdish Ohol Jagdish Ohol
27/10/2024

व्याख्याते जगदीश ओहोळ - Jagdish Ohol Jagdish Ohol

मी काही खूप कसलेला लेखक वगैरे नाही. त्यामुळे जगदीश ओहोळ यांच्यासारख्या तगड्या लेखकाच्या पुस्तकाची समीक्षा करण्याचे धाडस करणार नाही.

बाबासाहेबांवरची मी अनेक पुस्तके वाचली, परंतु सद्यस्थितीत बाबासाहेबांचं महत्त्व एकदम अचूकपणे अधोरेखित करणार "जग बदलणारा बापमाणूस" हे सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे. त्यामुळे या पुस्तकाबद्दल मला वाटणाऱ्या भावना या लेखांमधून मी आपल्यासमोर मांडत आहे.

खरंतर जगदीश सरांनी हे पुस्तक मला भेट म्हणून पाठवलं होतं. त्यानंतरच्या काळात नवीन नोकरीच्या कारणामुळे, व नोकरीच्या प्रशिक्षणामुळे काही काळ मला हे पुस्तक वाचता आलं नाही. मात्र हे पुस्तक मी सोबत ठेवलं होतं. नोकरी वरती जॉईन झालो. त्यानंतर लगेचच संध्याकाळी जो वेळ मिळू लागला त्यात हे पुस्तक वाचायला सुरुवात केली. जसं पुस्तक वाचायला सुरुवात केली तशी पुढे आणखी वाचण्याची इच्छा वाढत गेली. आणि अगदी थोड्याच‌ काळात पुस्तक वाचून पूर्ण केलं.

जगदीश ओहोळ यांनी मांडलेले बाबासाहेब आजच्या पिढीसमोर एक प्रेरणा म्हणून उभे राहतात. जगामधील अनेक मोठे मोठे तत्त्वज्ञ हे अमेरिका इंग्लंड या देशामधून आहेत. याचे कारण असे की हे देश, विरोधी विचारधारा असली तरीही आपल्या देशातील या तत्त्वज्ञानी लोकांचे तत्त्वज्ञान जपून ठेवतात आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवतात. तसेच जगभरात आपल्या देशातील या तत्त्वज्ञ लोकांचा प्रसार करतात.

आपल्या देशात मात्र याउलट परिस्थिती पाहायला मिळतो. बाबासाहेबांसारखं सर्वव्यापी व्यक्तीत्व एका जातीअंताच्या लढाई पुरते मर्यादित करून ठेवलं जातं. बाबासाहेबांचं व्यक्तित्व हे जातीयंतासाठी तर महत्त्वाचं आहेच परंतु त्यांनी इतर अनेक मुद्द्यांवर प्रखर विचार मांडले आहेत आणि काम उभे केले आहे.

जगदीश ओहोळ यांच्या पुस्तकांमधून बाबासाहेबांचे विविध पैलू समोर येतात. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती लिहिली गेलेली बरीचशी चरित्र पुस्तके ही एका वेगळ्या भाषेच्या वापरामुळे फक्त एका जातीपूरती सिमित राहतात. परंतु जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले हे पुस्तक फक्त एका समाजापुरतं मर्यादित न राहता. सर्वांपर्यंत बाबासाहेब पोहोचवण्याचं एक प्रभावी साधन आहे.

आजच्या तरुण पिढीने हे पुस्तक नक्की वाचावं. यातील बाबासाहेब समजून घ्यावेत. आपल्या ओळखीतील इतर सर्वांपर्यंत हे पुस्तक पोहोचवाव. हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवेळी बाबासाहेब तुमच्यासमोर एक प्रेरणा स्तंभ म्हणून उभे राहतील.

जगदीश ओहोळ सर हे अप्रतिम पुस्तक लिहून नव्या पिढीसमोर बाबासाहेबांची नव्याने प्रेरक प्रतिमा उभी केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद !

आपलाच,
सागर हनुमंत कांबळे
Ambedkar Facts
दि:२७/१०/२०२४

(Sorry for spelling mistakes if any.)

24/10/2024

Rahul Makhare
15/10/2024

Rahul Makhare

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ambedkar Facts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ambedkar Facts:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share