14/10/2024
श्री पद्मनाभ हरीआमोणकर यांनी आपण गोवा क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष असल्याचा केलेला दावा, आज सोमवार, दि. १४/१०/२०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला व श्री अजित परब व इतर आठ जण ह्यांच्या समितीला मान्यता देण्यात आली. अगोदर ह्याच प्रकारे त्यांनी म्हापसा कोर्टात व उच्च न्यायालयात सुद्धा असाच दावा केला होता आणि तिथे सुद्धा अश्याच त-हेने त्यांची पराभूत झाली होती. श्री अजित परब व इतर आठ जणांच्या वतीने समाजाचे मुख्य सल्लागार, ॲड. श्री सुहास म. वळवईकर यांनी बाजू मांडली. समाजाच्या घटनेनुसार श्री पद्मनाभ आमोणकर ह्यांची १८ समिती सदस्यांची निवडणूक बेकायदेशीर व अनधिकृत पद्धतीने निवडून आल्याचे सर्वोच्च न्यायालयासमोर दाखवून देण्यात आले.