15/08/2021
“रावण” म्हणजे आसमंत भेदणारी महत्त्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैर्य, सामर्थ्य, न्याय-नितीमत्ता आदी गुणांनी संपन्न; बुद्धीच्या जोरावर स्वतःचं साम्राज्य उभं करणारा राक्षसांचा राजा “रावण”. रावण बहुजन संस्कृतीचा पाया रचणारा राक्षस की रक्षक. दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद या अनेक विषयात पांडित्य मिळवूनही खलनायल ठरवलेला. शिवाची भक्ती करणारा आणि आपल्या शक्तीच्या बळावर सोन्याची लंका निर्माण करणारा “रावण : राजा राक्षसांचा”
“कोण होता रावण? का पळवली सीता? रावण नायक का खलनायक? राम रावण यांच्यातील सांस्कृतिक संघर्ष का उभा केला गेला? या आणि असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळतात “रावण : राजा राक्षसांचा” या कादंबरीतून. नुकतीच प्रकाशित झालेली, हातोहात पहिली आवृत्ती संपलेली आणि रावणाविषयी विचार करायला लावणारी “शरद तांदळे” लिखित कादंबरी म्हणजे “रावण : राजा राक्षसांचा”.
सूंदर मुख्यपृष्ठ, विचार करायला लावणारे संवाद, सहज सोपी भाषा शैली, आणि सांस्कृतिक संघर्षांवर केलेले भाष्य ही कादंबरीची काही ठळक वैशिष्ट्ये नोंदवत कादंबरी आपल्याला घेऊन जाते सोन्याच्या लंकेत आणि विचारते मी खरोखर खलनायक होतो, की स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक.
मित्रानो, खरच रावणाविषयी जर खरी माहिती हवी असेल तर ही कादंबरी अवश्य वाचा पण त्याआधी हा व्हिडीओ पाहायला विसरू नका.
https://youtu.be/1dgfgMi1Tk8
रावणाला खरंच दहा तोंड होती का? || रावण- राजा राक्षसांचा || Ravan Raja Rakshasancha Sharad Tandaleखालील लिंकवर क्लिक करून घरबसल्या अमेझॉन वरू.....