Majha Belgaum

  • Home
  • Majha Belgaum

Majha Belgaum Issues, articles about Belgaum and its surroundings with a flavour of local literature

22/11/2021

प्रताप कालकुंद्रीकर ‘स्वराज्य श्री’ चा मानकरी...........
कालकुंद्री येथे (ता . चंदगड) झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकरने ‘स्वराज्य श्री’ किताब पटकावला. राजकुमार दोरुगडे( बेळगाव) ‘बेस्ट म्युझिक पोझर’ , तर कोल्हापूरचा बसवाणी गुरव ‘बेस्ट मस्क्युलर पोझर’ ठरला . या स्पर्धेत कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यांतील 120 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
स्पर्धेचा निकाल असा 55 किलो गटात अवधुत निंगडे (कोल्हापूर), आकाश निगराणी, अल्ताफ किल्लेदार , शनुल अंकली , राजकुमार दोरुगडे ( चौघेही बेळगाव ). 60 किलो- बसवाणी गुरव ( कोल्हापूर), उमेश गंगणे, दिनेश नाईक, कौशिक मुज्जावर, चनय्या कलमट (सर्व बेळगाव). 61 ते 65 किलो - राकेश कांबळे (बेळगाव) रवी इंगवले (कोल्हापूर), आदित्य काटकर, शैलेश मासुळकर, ओमकार गोंडसे (तिघेही बेळगाव ) . 66 ते 70 किलो प्रताप कालकुंद्रीकर (कालकुंद्री ), युवराज जाधव ( कोल्हापूर ) , सुनील भातकांडे , संदीप पावले, द्वितेश थ् चौगुले ( तिघेही बेळगाव ).
71 ते 75 किलो राम बेळगावकर (बेळगाव), रोहित भोगण ( कागणी), महेश गवळी (बेळगाव), राहुल फिग्रेडो (कोल्हापूर ), ऋग्वेद भोसले (कोल्हापूर). 75 किलो अफ्रोज तहसीलदार (बेळगाव), गजानन काकतीकर, सौरभ मगदूम, प्रशांत भोसले (तिघेही कोल्हापूर ), प्रतीक बाळेकुंद्री ( बेळगाव ).
स्पर्धेसाठी पंच म्हणून राजेश वडाम ( कोल्हापूर ) व सुनील राऊत (बेळगाव) यांनी काम पाहिले. विजेत्यांना सरपंच छाया पाटील, उपसरपंच संभाजी पाटील , सुरेश घाटगे, अशोक पाटील, डॉ . राहुल पवार यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. विश्वास पाटील , प्रा . विनायक कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

23 जुलै 2021 बेळगाव जिल्हाकोविड मेडिकल बुलेटिन 90  -    कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण49  -   डिस्चार्ज रुग्ण828 -  सक्रिय रुग्ण
23/07/2021

23 जुलै 2021 बेळगाव जिल्हा
कोविड मेडिकल बुलेटिन

90 - कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण
49 - डिस्चार्ज रुग्ण
828 - सक्रिय रुग्ण

सक्रिय रुग्ण 812     मंगळवार दि. 20 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात 75 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. 148 रुग्णांना...
20/07/2021

सक्रिय रुग्ण 812
मंगळवार दि. 20 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात 75 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. 148 रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आले. सक्रिय रुग्ण संख्या 812 पर्यंत घसरली आहे. कोरोनाबाधितांची टक्केवारी 1.82 पर्यंत आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 4
बेळगाव- 32
बैलहोंगल- 0
चिकोडी- 9
गोकाक- 8
हुक्केरी- 14
खानापूर- 5
रामदुर्ग- 1
रायबाग- 1
सौंदत्ती- 0
इतर- 1

सक्रिय रुग्ण संख्या तीन आकडी       सोमवार दि.19 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात केवळ 38 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आ...
19/07/2021

सक्रिय रुग्ण संख्या तीन आकडी
सोमवार दि.19 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात केवळ 38 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. बेळगाव तालुक्यातील रुग्ण संख्येत घट झाली आहे. आज केवळ चिकोडी तालुक्यात दुहेरी आकड्यात रुग्णांची नोंद झाली आहे. तब्बल 236 रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आले. परिणामी सक्रिय रुग्ण संख्येत घट झाली आहे. 886 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाबाधितांची टक्केवारी 1.74 पर्यंत घसरल्याने दिलासा मिळाला आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 5
बेळगाव- 6
बैलहोंगल- 1
चिकोडी- 17
गोकाक- 0
हुक्केरी- 4
खानापूर- 2
रामदुर्ग- 1
रायबाग- 1
सौंदत्ती- 0
इतर- 1

दि. 18 / 7 / 2021बेळगाव जिल्हा कोरोना मेडिकल बुलेटिन पॉजीटिव्ह रुग्ण -       55डिस्चार्ज -               158सक्रिय रुग्ण...
18/07/2021

दि. 18 / 7 / 2021
बेळगाव जिल्हा कोरोना मेडिकल बुलेटिन
पॉजीटिव्ह रुग्ण - 55
डिस्चार्ज - 158
सक्रिय रुग्ण- 1,087

सक्रिय रुग्ण संख्येत घट       शुक्रवार दि.16 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात 70 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 2...
16/07/2021

सक्रिय रुग्ण संख्येत घट
शुक्रवार दि.16 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात 70 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 201 रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आले. परिणामी सक्रिय रुग्ण संख्येत घट झाली आहे. 1,470 रुग्ण उपचार घेत आहेत.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 3
बेळगाव- 22
बैलहोंगल- 6
चिकोडी- 26
गोकाक- 2
हुक्केरी- 3
खानापूर- 2
रामदुर्ग- 1
रायबाग- 3
सौंदत्ती- 0
इतर- 2

गोकाक, गोडचिनमलकी पर्यटकांना बंद      गोकाक, गोडचिनमलकी धबधबा आणि धुपदाळ बंधारा यासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर शनिवार,...
15/07/2021

गोकाक, गोडचिनमलकी पर्यटकांना बंद
गोकाक, गोडचिनमलकी धबधबा आणि धुपदाळ बंधारा यासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
पावसाळी पर्यटनाचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून गोकाक धबधब्याची ओळख आहे. घटप्रभा नदीवर असलेल्या या धबधब्याचे पावसाळ्यातील रौद्ररूप डोळ्यात साठवण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश यासह देशभरातून पर्यटकांची रीघ लागते. गोकाकपासून जवळ असणाऱ्या मार्कंडेय नदीवरील गोडचिनमलकी धबधबा आणि धुपदाळ बंधाऱ्यावरुन पडणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. तसेच खानापूर तालुक्यातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटक हजेरी लावतात.
काही दिवसांपूर्वी अनलॉक-3 मधून मोकळीक दिल्याने
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली होती. कोरोनाचा धोका अद्याप टळला नसून वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

रुग्ण वाढले, 140 बाधित        कोरोनाबधित रुग्ण संख्या बुधवारी पुन्हा वाढली आहे. दि.14 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात 140 नव्...
14/07/2021

रुग्ण वाढले, 140 बाधित
कोरोनाबधित रुग्ण संख्या बुधवारी पुन्हा वाढली आहे. दि.14 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात 140 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 73 रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आले. 2,070 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. बेळगाव आणि चिकोडी तालुक्यात पुन्हा रुग्ण वाढले आहेत.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 5
बेळगाव- 39
बैलहोंगल- 2
चिकोडी- 52
गोकाक- 4
हुक्केरी- 7
खानापूर- 7
रामदुर्ग- 7
रायबाग- 9
सौंदत्ती- 4
इतर- 4

जिल्ह्यात 32 रुग्ण        कोरोनाबधित रुग्ण संख्या आज  घटली आहे. सोमवार दि.12 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात केवळ 32 नव्या को...
12/07/2021

जिल्ह्यात 32 रुग्ण
कोरोनाबधित रुग्ण संख्या आज घटली आहे. सोमवार दि.12 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात केवळ 32 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 63 रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आले. सक्रिय रुग्ण संख्येने पुन्हा दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. 2,018 रुग्ण उपचार घेत आहेत. समाधानाची बाब म्हणजे बेळगाव तालुक्यातील रुग्ण घटले आहेत.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 2
बेळगाव- 10
बैलहोंगल- 2
चिकोडी- 13
गोकाक- 1
हुक्केरी- 2
खानापूर- 1
रामदुर्ग- 1
रायबाग- 1
सौंदत्ती- 0
इतर- 1

बेळगाव जिल्हा कोविड मेडिकल बुलेटिन दि. 9-7- 2021नवीन कोरोना रुग्ण ----   87डिस्चार्ज रुग्ण        ----   57सक्रिय रुग्ण ...
09/07/2021

बेळगाव जिल्हा कोविड मेडिकल बुलेटिन
दि. 9-7- 2021

नवीन कोरोना रुग्ण ---- 87
डिस्चार्ज रुग्ण ---- 57
सक्रिय रुग्ण ---- 1,991
चाचण्या ---- 3,954
लस ---- 24,587

पॉजिटीव्हीटीचा वाढला टक्का        निर्बंध हटवल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. बधितांचे प्रमाण पुन्हा 3 ट...
08/07/2021

पॉजिटीव्हीटीचा वाढला टक्का
निर्बंध हटवल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. बधितांचे प्रमाण पुन्हा 3 टक्क्यांवर पोचले आहे. बेळगाव जिल्ह्यात आज गुरुवार दि. 8 जुलै रोजी 176 नव्या रुग्णांची भर पडली. तर उपचारांती आज 121 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली असून ती 1,965 पर्यंत पोचली आहे.
आज जिल्ह्यात 4,598 जणांची चाचणी घेण्यात आली. बाधित होण्याचे प्रमाण 3 टक्क्यांवर पोचले आहे. जिल्ह्यात आज 7,453 नागरिकांना लस देण्यात आली.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 4
बेळगाव- 42
बैलहोंगल- 3
चिकोडी- 71
गोकाक- 5
हुक्केरी- 23
खानापूर- 3
रामदुर्ग- 0
रायबाग- 16
सौंदत्ती- 0
इतर- 9

रुग्ण संख्येचा आलेख चढता        कोरोनाबधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. आज बुधवार दि.7 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात 1...
07/07/2021

रुग्ण संख्येचा आलेख चढता
कोरोनाबधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. आज बुधवार दि.7 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात 120 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली असून ती 1,912 पर्यंत वधारली आहे. केवळ 63 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले.

रुग्ण संख्येत वाढ        बेळगाव जिल्ह्यात आज मंगळवार दि. 6 जुलै रोजी कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. बधितांचा आक...
06/07/2021

रुग्ण संख्येत वाढ
बेळगाव जिल्ह्यात आज मंगळवार दि. 6 जुलै रोजी कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. बधितांचा आकडा पुन्हा शतकी पार गेला आहे. 157 रुग्णांची आज भर पडली. तर उपचारांती आज 73 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. 1,860 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.
आज जिल्ह्यात 3,120 जणांची चाचणी घेण्यात आली. बाधित होण्याचे प्रमाण 2.69 पर्यंत वाढले आहे. जिल्ह्यात आज 18,658 नागरिकांना लस देण्यात आली.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 7
बेळगाव- 44
बैलहोंगल- 4
चिकोडी- 62
गोकाक- 9
हुक्केरी- 12
खानापूर- 4
रामदुर्ग- 1
रायबाग- 2
सौंदत्ती- 1
इतर- 11

जिल्ह्यात 95 रुग्ण         सोमवार दि.5 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात 95 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. 44 रुग्णां...
05/07/2021

जिल्ह्यात 95 रुग्ण
सोमवार दि.5 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात 95 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. 44 रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आले. जिल्ह्यात 1,781 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 19
बेळगाव- 29
बैलहोंगल- 2
चिकोडी- 43
गोकाक- 0
हुक्केरी- 1
खानापूर- 1
रामदुर्ग- 0
रायबाग- 0
सौंदत्ती- 0
इतर- 0

रुग्ण संख्या घटली        बेळगाव जिल्ह्यात आज रविवार दि. 4 जुलै रोजी केवळ 28 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. तर उपचारांती...
04/07/2021

रुग्ण संख्या घटली
बेळगाव जिल्ह्यात आज रविवार दि. 4 जुलै रोजी केवळ 28 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. तर उपचारांती आज 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. 1,733 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.
आज जिल्ह्यात 3,186 जणांची चाचणी घेण्यात आली. बाधित होण्याचे प्रमाण 2.52 पर्यंत घसरले आहे. केवळ बेळगाव तालुक्यात दुहेरी आकड्यात रुग्णसंख्या नोंद झाली आहे. अथणी, बैलहोंगल, रामदुर्ग, रायबाग, सौंदत्ती या तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 0
बेळगाव- 16
बैलहोंगल- 0
चिकोडी- 6
गोकाक- 1
हुक्केरी- 3
खानापूर- 2
रामदुर्ग- 0
रायबाग- 0
सौंदत्ती- 0
इतर- 0

दुकाने खुली राहणार रात्री 8 पर्यंत अनलॉक-3 सोमवारपासून      बेळगाव : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने लॉकडाउनवरील निर्बंध आण...
03/07/2021

दुकाने खुली राहणार रात्री 8 पर्यंत
अनलॉक-3 सोमवारपासून

बेळगाव : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने लॉकडाउनवरील निर्बंध आणखी शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बेळगावात सोमवारपासून अनलॉक-3 प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सर्व दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
अनलॉक-3 ची ही प्रक्रिया सोमवार दि. 5 जुलै पहाटे 5 ते दि.19 जुलै पहाटे 5 वाजेपर्यंत या कालावधीसाठी आहे. संचारबंदी रोज रात्री 9 ते पहाटे 5 या वेळेत राहणार आहे.

सुरू--
सर्व दुकाने, रेस्टॉरंट्स, कार्यालये रात्री 8 पर्यंत.
धार्मिक स्थळे खुली, फक्त दर्शनासाठी (सेवा राहणार बंद).
विवाह/कौटुंबिक कार्यक्रम (100 व्यक्तींसह ).
अंत्यसंस्कार - (20 व्यक्तीना परवानगी).
बार.
बस सेवा.
मेट्रो.
जलतरण तलाव. (फक्तखेळाडूंसाठी)

बंद--
शाळा / महाविद्यालये / कोचिंग संस्था.
धार्मिक मिरवणुका.
निषेध मोर्चा.
मेळावा.
राजकीय मोर्चा.
सिनेमागृह.
यापूढे वीकेंड कर्फ्यू नाही.

बधितांच्या संख्येत वाढ        कोरोनाबधितांच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून बरे होण्याचे प्रमाण घटले आहे.  आज शनिवार दि 3 ...
03/07/2021

बधितांच्या संख्येत वाढ
कोरोनाबधितांच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. आज शनिवार दि 3 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात 46 रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आले. तर 91 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या दीड हजारापेक्षा अधिक आहे. 1765 रुग्ण उपचार घेत आहेत.

वीकेंड लॉकडाउनमध्ये 'या' सेवा राहणार सुरू      कोरोनाचा धोका अद्याप कायम असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प...
02/07/2021

वीकेंड लॉकडाउनमध्ये 'या' सेवा राहणार सुरू
कोरोनाचा धोका अद्याप कायम असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून विकेंड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. बेळगावात शुक्रवार (2 जुलै) सायंकाळी ते सोमवार दि.5 जुलै रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे.
याकाळात बेळगावात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवार दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या वीकेंड लॉकडाउनमध्ये सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेत जीवनावश्यक वस्तुंच्या किराणा, भाजी, रेशन, डेअरी, बेकरी, फळ, चिकन, मटण, मासे विक्रीला मुभा राहणार आहे. शेतीशी निगडीत खरेदी-विक्री केंद्र, जनावरांचे खाद्य विक्री केंद्र सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेपुरतीच खुली राहतील. हॉटेल, रेस्टॉरंटना केवळ पार्सल सेवा देता येणार आहे. बँक व पोस्ट नियमानुसार सेवा सुरू ठेवण्यास मुभा राहिल.

143 कोरोनाबाधित रुग्ण      बेळगाव जिल्ह्यात रविवार दि. 27 जून रोजी 143 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 235 र...
27/06/2021

143 कोरोनाबाधित रुग्ण
बेळगाव जिल्ह्यात रविवार दि. 27 जून रोजी 143 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 235 रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आले. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,777 आहे.
आज जिल्ह्यात 4,112 जणांची चाचणी घेण्यात आली. बाधित होण्याचे प्रमाण 3.11% पर्यंत घसरले आहे. बेळगाव आणि चिकोडी या तालुक्यात दुहेरी आकड्यात रुग्णसंख्या नोंद झाली असून इतर तालुक्यात बधितांचे प्रमाण घटले आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 2
बेळगाव- 83
बैलहोंगल- 2
चिकोडी- 37
गोकाक- 2
हुक्केरी- 3
खानापूर- 2
रामदुर्ग- 1
रायबाग- 5
सौंदत्ती- 4
इतर- 2

115 कोरोनाबाधित रुग्ण      शनिवार दि. 26 जून रोजी बेळगाव जिल्ह्यात 125 रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आले. आज 115...
26/06/2021

115 कोरोनाबाधित रुग्ण
शनिवार दि. 26 जून रोजी बेळगाव जिल्ह्यात 125 रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आले. आज 115 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 1,872 आहे.
आज जिल्ह्यात 3,562 जणांची चाचणी घेण्यात आली. बाधित होण्याचे प्रमाण 3.14% पर्यंत घसरले आहे. केवळ बेळगाव आणि चिकोडी या तालुक्यात दुहेरी आकड्यात रुग्णसंख्या नोंद झाली आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 4
बेळगाव- 58
बैलहोंगल- 6
चिकोडी- 32
गोकाक- 2
हुक्केरी- 5
खानापूर- 4
रामदुर्ग- 1
रायबाग- 2
सौंदत्ती- 1
इतर- 0

सक्रिय रुग्णसंख्येत घट कायम        कोरोनाबधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतच असून आज शुक्रवार दि. 25 जून रोजी बेळगाव जि...
25/06/2021

सक्रिय रुग्णसंख्येत घट कायम
कोरोनाबधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतच असून आज शुक्रवार दि. 25 जून रोजी बेळगाव जिल्ह्यात 158 रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आले. तर केवळ 87 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 1,892 आहे.
आज जिल्ह्यात 3,462 जणांची चाचणी घेण्यात आली. बाधित होण्याचे प्रमाण 3.15% पर्यंत घसरले आहे. बेळगाव आणि चिकोडी या तालुक्यात दुहेरी आकड्यात रुग्णसंख्या नोंद झाली आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 1
बेळगाव- 27
बैलहोंगल- 5
चिकोडी- 34
गोकाक- 2
हुक्केरी- 3
खानापूर- 3
रामदुर्ग- 1
रायबाग- 5
सौंदत्ती- 6
इतर- 0

विकेंड लॉकडाउन कायम     अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण अद्याप कोरोना धोका टळलेला नाही, यासाठी विकेंड लॉकडाउन क...
25/06/2021

विकेंड लॉकडाउन कायम
अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण अद्याप कोरोना धोका टळलेला नाही, यासाठी विकेंड लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. शुक्रवार दि 25 जून सायंकाळी 7 ते सोमवार दि. 28 जून सकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत बेळगाव जिल्ह्यात विकेंड लॉकडाउन राहणार आहे.
या कालावधी अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या जीवनावश्यक आणि वैद्यकीय सेवांना मुभा राहणार आहे. किराणा, दूध, भाजीपाला, खाद्यपदार्थ, मद्य, मांस, मासळी, जनावरांचे खाद्य, रस्त्यावरील विक्रीला सकाळी 6 ते 2 वा. या कालावधीत सूट असणार आहे. हॉस्पिटलला जाणे, पूर्व परवानगी घेतलेले लग्न समारंभ यांना अनुमती असेल. उद्योग, व्यवसाय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रासह संचारास मुभा राहणार आहे.

सांबरा येथे लसीकरण यशस्वी       येथील प्राथमिक मराठी शाळेत आज कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. सुमारे 90 नागरिकांनी ...
24/06/2021

सांबरा येथे लसीकरण यशस्वी
येथील प्राथमिक मराठी शाळेत आज कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. सुमारे 90 नागरिकांनी दुसऱ्या डोसचा लाभ घेतला.
पहिली कोरोना प्रतिबंधक लस घेवून 84 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे कोणताही गोंधळ न होता शिस्तबद्धरित्या लसीकरण झाले. लसीकरण यशस्वी करण्यासाठी डॉ. हेमलता यांच्या मार्गदर्शनाखाली सिस्टर एस. एस. तिप्पनावर यांच्यासह आशा कार्यकर्त्या सुमित्रा तिम्मापूरमठ, अर्चना पाटील, गौरम्मा देसाई, रूपा कलखांबकर, गीता गोवनकोप, नीता धर्मोजी, सुनीता जोई, प्रियांका बजंत्री यांनी परिश्रम घेतले.

सक्रिय रुग्णसंख्या दोन हजाराच्या खाली        कोरोनाबधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतच असून आज गुरुवार दि 24 जून रोजी ब...
24/06/2021

सक्रिय रुग्णसंख्या दोन हजाराच्या खाली
कोरोनाबधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतच असून आज गुरुवार दि 24 जून रोजी बेळगाव जिल्ह्यात 253 रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आले. तर केवळ 98 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजाराच्या खाली आली असून 1,965 रुग्ण उपचार घेत आहेत.
आज जिल्ह्यात 4,775 जणांची चाचणी घेण्यात आली. बाधित होण्याचे प्रमाण 3.29% पर्यंत घसरले आहे. बेळगाव, हुक्केरी आणि चिकोडी या तालुक्यात दुहेरी आकड्यात रुग्णसंख्या नोंद झाली आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 3
बेळगाव- 41
बैलहोंगल- 1
चिकोडी- 31
गोकाक- 5
हुक्केरी- 10
खानापूर- 1
रामदुर्ग- 0
रायबाग- 5
सौंदत्ती- 1
इतर- 0

423 रुग्ण डिस्चार्ज        कोरोनाबधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतच असून आज बुधवार दि 23 जून रोजी बेळगाव जिल्ह्यात 423...
23/06/2021

423 रुग्ण डिस्चार्ज
कोरोनाबधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतच असून आज बुधवार दि 23 जून रोजी बेळगाव जिल्ह्यात 423 रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आले. तर 179 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 2,121 पर्यंत घसरली आहे.
आज जिल्ह्यात 4,876 जणांची चाचणी घेण्यात आली. बाधित होण्याचे प्रमाण 3.26% पर्यंत घसरले आहे. बेळगाव आणि चिकोडी या तालुक्यात रुग्णसंख्या अधिक आहे. इतर तालुक्यात बधितांचे प्रमाण घटले आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 8
बेळगाव- 56
बैलहोंगल- 9
चिकोडी- 48
गोकाक- 9
हुक्केरी- 11
खानापूर- 10
रामदुर्ग- 6
रायबाग- 15
सौंदत्ती- 2
इतर- 5

भीमसेन ढवळी यांचे निधन       मंगळवार पेठ, सांबरा येथील रहिवासी आणि सांबरा ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त पिडिओ भीमसेन सिद्धप...
22/06/2021

भीमसेन ढवळी यांचे निधन
मंगळवार पेठ, सांबरा येथील रहिवासी आणि सांबरा ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त पिडिओ भीमसेन सिद्धपा ढवळी (वय 68) यांचे मंगळवारी निधन झाले. मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी होणार आहे.

शंकर जत्राटी यांचे निधन       सांबरा, गणेश नगर येथील प्रगतशील शेतकरी, सांबरा पंचायतीचे माजी अध्यक्ष, देवस्थान कमिटीचे सद...
22/06/2021

शंकर जत्राटी यांचे निधन
सांबरा, गणेश नगर येथील प्रगतशील शेतकरी, सांबरा पंचायतीचे माजी अध्यक्ष, देवस्थान कमिटीचे सदस्य, जगन्नाथ सोसायटीचे सल्लागार आणि भाजप नेते शंकर यल्लाप्पा जत्राटी (वय61) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, भाऊ, बहिणी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. माजी जिल्हा पंचायत सदस्या लीला जत्राटी यांचे ते पती होत. रक्षा विसर्जन गुरुवारी होणार आहे.

417 रुग्ण डिस्चार्ज        कोरोनाबधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतच असून आज मंगळवार दि 22 जून रोजी बेळगाव जिल्ह्यात को...
22/06/2021

417 रुग्ण डिस्चार्ज
कोरोनाबधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतच असून आज मंगळवार दि 22 जून रोजी बेळगाव जिल्ह्यात कोरोना 417 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले.
तर 134 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 2,370 पर्यंत घसरली आहे. बाधित होण्याचे प्रमाण 3.69% पर्यंत घसरले आहे. केवळ बेळगाव, चिकोडी आणि गोकाक या तीन तालुक्यात रुग्णांची दुहेरी संख्या नोंद झाली आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
अथणी- 4
बेळगाव- 51
बैलहोंगल- 3
चिकोडी- 37
गोकाक- 10
हुक्केरी- 8
खानापूर- 1
रामदुर्ग- 5
रायबाग- 6
सौंदत्ती- 8
इतर- 1

19/06/2021

पावसाळी पर्यटनाच्या हक्काचे ठिकाण असणाऱ्या आंबोली येथील धबधबा प्रवाहित झाला आहे.

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Majha Belgaum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share