
03/07/2022
https://youtu.be/Bl3slbLtCOc
वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, पाचोरा (जळगाव) यांच्या वतीने हरीत क्रांतीचे प्रणेते,शेतकऱ्यांचे कैवारी, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, बंजारा भुषण कै. वसंतरावजी नाईक (मा.मुख्यमंत्री, म. रा.) यांच्या 109 वी जयंती निमित्त सामाजिक सेवा या उद्देशाने मोफत भव्य नेत्र रोग तपासणी व रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रथम वसंतरावजी नाईक साहेब यांच्या प्रतिमेचे श्री. बी. बी. धाडी, सर(जिल्हाध्यक्ष) यांच्या हस्ते पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. शुभहस्ते फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी समाजातील ज्येष्ठ नागरिक श्री. मेहताबसिंग नाईक (संचालक-जे.डी.सी.सी.बँक, जळगाव), श्री. भारमलभाऊ नाईक (जिल्हा प्रसिध्दी प्रमुख), श्री. राजेन्द्र राठोड (जिल्हा कार्यकारिणी सदस्य), श्री. संजय राठोड (तालुका अध्यक्ष-वं.ना.अ.क.सं.पाचोरा), श्री. वासुदेव चव्हाण (ता.उपाध्यक्ष),, श्री. चरणसिंग चव्हाण (ज्येष्ठ नागरिक), गोपाल चव्हाण (सदस्य), व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, पाचोरा या पदाधिकारी यानी परिश्रम घेतले.