SONK लोकवादी न्यूज

  • Home
  • SONK लोकवादी न्यूज

SONK लोकवादी न्यूज web press media

एकनाथ शिंदे |लोकमत -सर्वात शक्तिशाली राजकारणी पुरस्कार- 22
13/10/2022

एकनाथ शिंदे |लोकमत -सर्वात शक्तिशाली राजकारणी पुरस्कार- 22

14/05/2021
https://youtu.be/xuvZMZlgyQ8काळभैरवनाथ मंदिर, श्री क्षेत्र सोनके, ता. कोरेगाव, जि सातारा. येथील नाथांचे लग्न यात्रा सोहळ...
18/03/2021

https://youtu.be/xuvZMZlgyQ8

काळभैरवनाथ मंदिर, श्री क्षेत्र सोनके, ता. कोरेगाव, जि सातारा. येथील नाथांचे लग्न यात्रा सोहळा दरवर्षी अश्विन महिन्याच्या चवथ्या रविवारी असतो. हे एक जागृत देवस्थान आहे. एकदातरी अवश्य भेट द्या.

काळभैरवनाथ मंदिर, श्री क्षेत्र सोनके, ता. कोरेगाव, जि सातारा. येथील नाथांचे लग्न यात्रा सोहळा अश्विन महिन्याच्या च...

श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान -संत सोपानकाका समाधी  मंदिर सासवड पासून २३ किमी आंतरावर व  खंडेराया च्या जेजुरीपासून २४ किमी ...
04/03/2021

श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान -

संत सोपानकाका समाधी मंदिर सासवड पासून २३ किमी आंतरावर व खंडेराया च्या जेजुरीपासून २४ किमी अंतरावर वीर (ता. पुरंदर, जि. पुणे)हे गाव आहे. वीर गावी पूर्णगंगेच्या तिरावर श्री नाथ म्हस्कोबा मंदीर आहे. एका दगडी बांदकाम असनारे भव्य मंदिर आहे. हे भव्य मंदिर पूर्वाभिमुख आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात श्री नाथ-जोगेश्वरी यांच्या प्रसन्न मूर्ती आहेत. श्रीनाथ हे काशी अथवा सोनारीचे काळ भैरव असून ते कमळाजी नामक भक्तामुळे या ठिकाणी वास्त्यव्यास आले आहेत.

हा देव स्मशान भूमीत प्रगट झाल्याने यास म्हस्कोबा असेही म्हणतात.

आपला हा व्हिडीओ Like, Share करून आपला चॅनेल Subscribe करायला विसरू नका.

https://youtu.be/641FP7m_qM8

श्रीनाथ म्हस्कोबा!! श्री नाथ म्हस्कोबा प्रसन्न !! देवाधी देव शिव शंकर यांनी पृथ्वी तलवार अवतार घेतला तो कालभैरव वा.....

https://youtu.be/-_9cgYBgPA0
14/02/2021

https://youtu.be/-_9cgYBgPA0

कानिफनाथ मंदिर, बोपगाव, ता. पुरंदर, हे कानिफनाथांची तपोभूमी आहे. हे पुण्यापासून 21 कि. मी. अंतरावर आहे. येथील वैशिट्ये...

https://youtu.be/IGiEXMhctAs
02/02/2021

https://youtu.be/IGiEXMhctAs

# mastaniमस्तानी तलाव हा पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला वडकी गावाजवळचा एक तलाव आहे. या तलावाला ...

https://youtu.be/vy2g08EOJ0A
23/12/2020

https://youtu.be/vy2g08EOJ0A

पिंपोडे बु या गावापासून उत्तर दिशेला एक रस्ता घुमाई देवीकडे जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माळरान दिसेल. परंतु .....

https://youtu.be/xuvZMZlgyQ8
23/12/2020

https://youtu.be/xuvZMZlgyQ8

काळभैरवनाथ मंदिर, श्री क्षेत्र सोनके, ता. कोरेगाव, जि सातारा. येथील नाथांचे लग्न यात्रा सोहळा अश्विन महिन्याच्या च...

दिनांक - 07 व 8 नोव्हेंबर 2020 रोजी क्षेत्र चवनेश्वर ची यात्रा आहे. परंतु कोरोना प्रादुर्भाव च्या अनुषंगाने महाराष्ट्र स...
07/11/2020

दिनांक - 07 व 8 नोव्हेंबर 2020 रोजी क्षेत्र चवनेश्वर ची यात्रा आहे. परंतु कोरोना प्रादुर्भाव च्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार यंदा यात्रा काही ठराविक व कमी लोंकांमध्ये नियमाचे पालन करून होणार आहे.
चवणेश्वर क्षेत्रा विषयीचा घेतलेला आढवा.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र चवणेश्वर हे डोंगरावर वसलेले एकमेव गाव.समुद्रसपाटीपासून १३०० मी.उंच असलेल्या डोंगराचा आकार इंग्रजी आठ सारखा आहे.येथे असलेले निसर्गसौंदर्य व येथील देवस्थानामुळे हे ठिकाणं अलिकडे प्रसिद्ध होत आहे.

जशी या डोंगरानं शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची घोडदौड पाहिली तसाच स्वातंत्र्यवीरांचा त्याग ही पाहिला. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानही ही भूमी पावन झाली व स्वातंत्र्य सैनिक किसन वीरांनाही भूमिगत असताना याचं पुण्यभूमीनं आश्रय दिला.

सप्तर्षीपैकी भृगुऋषींनी कृष्णाकाठी तपश्चर्या केली व त्यांचे पुत्र च्यवणऋषींची तपोभूमी म्हणजे श्री क्षेत्र चवणेश्वर.इथे प्राचीन काळातील स्वयंभू शिवलिंग आहे. च्यवणऋषी हे आयुर्वेदाचे जनक. त्यांनी या जंगलातील अनेक औषधी वनस्पतींचा शोध लावला. याच ठिकाणी च्यवनप्राशची निर्मती झालीअसे म्हणतात. च्यवणऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली व कर्नाटकात जाऊन समाधी घेतल्याचा उल्लेख ग्रंथांमधून आढळतो. आज ही या ठिकाणी अनेक आैषधी वनस्पती आढळतात.

या ठिकाणी असलेलं मन तृप्त करणारं पाणी हे एक या ठिकाणचं वैशिष्ट्य सांगता येईल.मंदिरासमोर असलेलं पाण्याचं टाकं व डोंगरात असलेल्या झ-यांचं पाणी पिल्यानंतर मन तृप्त होतं.या ठिकाणचे थंड व अल्हाददायक हवामान क्षणभर पाचगणीचा भास निर्माण करते.

या ठिकाणी शिरगाव घाटाच्या बाजूला डोंगराच्या दक्षिणेला पांडवकालीन गुंफा आहेत.त्या मध्ये कायमस्वरूपी पाणी असते.उत्तर बाजूलाही ऋषी मुनी तपश्चर्या करीत असलेल्या ठिकाणी एक गुहा असून ती सध्या एका शिळेनं बंद केली असल्याचं सांगीतलं जातं. इथेच सुमारे 15 वर्षांपूर्वी संत संमेलन झाले होते त्या मध्ये पुसेगावचे मठाधिपती आत्मरामगिरी, सद्गुरू शंकर दगडे महाराज (अंधोरी) आणि गगनगिरी चे शिष्य आबानंद गिरी इ. अनेक साधू संत उपस्थित होते.

अशा या एेतिहासिक ठेवा लाभलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या श्री क्षेत्र चवणेश्वराची यात्रा दरवर्षी अश्विन महिन्यातल्या चौथ्या शनिवार व रविवारी भरते.येथे श्री चवणेश्वर ,श्री महादेव,श्री जानुबाई व गावाच्या पश्चिमेकडे एक कि.मी.वर श्री केदारेश्वराचं मंदिर अशी मंदिरं आहेत.ही मंदिरही भव्य असून गावाच्या सौंदर्यात भरच घालतात.यापैकी श्री महादेव व श्री केदारेश्वर ही पांडवकालीन असलेल्या मंदिरांचा तसेच श्री चवणेश्वर व श्री जानुबाई अशा सर्वच मंदिरांचा जिर्णोद्धार भाविकांच्या व दानशूर व्यक्तिंच्या सहभागातून झालेला आहे.

शनिवारी श्रींचा पालखीतून पारंपारिक वाद्यांच्या गजरात छबिना काढला जातो. या वेळी सासनकाठी नाचवितात. रविवारी सकाळी मानाची लोटांगण घालण्याची प्रथा आहे.

यात्रेसाठी गुळुंब,वाण्याचीवाडी,वरखडवाडी,कऱजखोप,सोनके,रणदुल्लाबाद,,मोरबेंद,हिवरे,तरडगाव या गावातून सासनकाठ्या येत असतात.मानाच्या सासनकाठ्यांची भेट व त्या नंतर निघणारा छबिना हे यात्रेचे मुख्य आकर्षण असते.

या ठिकाणी मंदिर परिसरात एक आंब्याचे झाड असून त्या झाडास शनिवारच्या छबिन्यावेळी मोहर व रविवारच्या छबिन्यावेळी आंबे येतात.या घटनेचे अनेकजणं साक्षीदार आहेत.

गावात यात्रेदिवशी शाकाहारी जेवण असते.तमाशासारखे कार्यक्रमही नसतात. त्यामुळे आेघानेच या ठिकाणी पशुहत्याबंदी व व्यसनमुक्तीचे काम होत आहे ही उल्लेखनिय बाब.

करंजखोपकडून श्री क्षेत्र चवणेश्वरकडे घाटातून जाणारा नागमोडी रस्ता.या रस्त्याला दिवसातून अपवादानेच दिसणारे एखाद दुसरे वाहन.मात्र यात्रेदिवशी या घाटातून हजारो वाहनांची वर्दळ असते.हजारो भाविक या दिवशी श्री चवणेश्वराचे दर्शन घेतात. पंचक्रोशीतील चाकरमाने आवर्जून या यात्रेला येत असतात.

शेवटी 'चांगभलं'च्या गजरात सासनकाठ्या आपापल्या गावाच्या दिशेने मार्गस्थ होतात.

https://youtu.be/Wn2mBsDCVzY

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र चवणेश्वर हे डोंगरावर वसलेले एकमेव गाव.समुद्रसपाटीपासून १.....

https://youtu.be/7Fe3R2HtCU4
13/10/2020

https://youtu.be/7Fe3R2HtCU4

अम्मवात व संधीवात असल्यास . आमवात व संधिवात असण्यानि रोज सकाळी सुंठ, गूळ व तूप यापासून तयार केलेलं सुपारीच्या आकार...

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when SONK लोकवादी न्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SONK लोकवादी न्यूज:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share