Daily Charchakshu

  • Home
  • Daily Charchakshu

Daily Charchakshu Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Daily Charchakshu, Media/News Company, .

अमृतवाहिनीत 15 व 16 मार्चला मेधा महोत्सवाचे आयोजनआ.थोरात, प्रा.नितीन बानगुडे सह विविध सिने कलावंतांची उपस्थितीसंगमनेर प्...
13/03/2024

अमृतवाहिनीत 15 व 16 मार्चला मेधा महोत्सवाचे आयोजन
आ.थोरात, प्रा.नितीन बानगुडे सह विविध सिने कलावंतांची उपस्थिती

संगमनेर प्रतिनिधी
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व मा. आ डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाने देशात लौकिक मिळवलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होत असलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा मेधा सांस्कृतिक महोत्सवाचे शुक्रवार दिनांक 15 मार्च ते शनिवार दिनांक 16 मार्च 2024 या कालावधीत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सौ. शरयूताई देशमुख म्हणाल्या की, युवानेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून मागील सात वर्षापासून अमृतवाहिनीत मेधा महोत्सव होत असतो. यामध्ये शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, डॉ.रघुनाथ माशेलकर,आयपीएस अधिकारी विश्वास पाटील, कृष्णप्रकाश, सिनेअभिनेता विवेक ओबेराय, सिनेअभिनेत्री मानसी नाईक,सोनाली कुलकर्णी,शेखर सुमन, अध्ययन सुमन, हास्य सम्राट भाऊ कदम, कुशल बद्रिके, संस्कृती बानगुडे, श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे यांसह विविध कलाकारांनी सहभाग घेतला आहे.

यावर्षी हा मेधा महोत्सव शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 व शनिवार दिनांक 16 मार्च 2024 या कालावधीत अमृतवाहिनीतील मेधा मैदानावर होत आहे.यामध्ये शुक्रवार दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 11 वा. प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे, आयआयटी मुंबईचे प्रा.डॉ.क्षितिज जाधव, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, विश्वस्त मा. आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. शरयूताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत मेधा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर संध्याकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध दोन मराठी सिने अभिनेत्री उपस्थित राहणार आहे.

शनिवारी सकाळी 11 वाजता मार्गदर्शनासाठी भारतीय हॉकी संघातील स्टार खेळाडू युवराज वाल्मिकी उपस्थित राहणार आहे. तर संध्याकाळी 6 वा. विविध चित्रपट अभिनेत्यांच्या उपस्थितीत दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम व म्युझिकल स्पोर्ट होणार आहेत.

या कार्यक्रमात मिमिक्री, डान्स, ग्रुप डान्स,गायन,वादन,ड्रामा, पेंटिंग,व्याख्याने याशिवाय विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य दिव्य मेधा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. हा मेधा महोत्सव विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजन केला असून या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. विवेक धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्यंकटेश,मेधाचे समन्वयक प्रा.जी.बी.काळे,प्राचार्य डॉ.मनोज शिरभाते, डॉ.मच्छिंद्र चव्हाण, डॉ.बी.एम.लोंढे,शितल गायकवाड,सौ.जे.बी.सेट्टी,अंजली कन्नवार, विलास भाटे, डॉ.जे.बी.गुरव,प्राडॉ.विलास शिंदे, प्रा वाळे यांचे सह विविध विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी विशेष परिश्रम घेत आहेत.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमृतवाहिनी संस्थेच्या सर्व विभागांच्या वतीने करण्यात आले आहे.

65 वर्षीय आजीने एकविराच्या क्रिकेट स्पर्धेत घेतला  खेळण्याचा आनंदमहिला दिनानिमित्त आयोजित क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत 25...
09/03/2024

65 वर्षीय आजीने एकविराच्या क्रिकेट स्पर्धेत घेतला खेळण्याचा आनंद

महिला दिनानिमित्त आयोजित क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत 2500 महिलांचा सहभाग

संगमनेर प्रतिनिधी
युवक काँग्रेसच्या नूतन अध्यक्ष व कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत तालुक्यातील 2500 महिलांनी सहभाग घेतला असून आज वडगाव लांडगा येथील 65 वर्षीय सौ . सुमन बाळासाहेब लांडगे यांनी फलंदाजी व क्षेत्ररक्षणात आपले कौशल्य दाखवताना या स्पर्धेचा आनंद घेतला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशन च्या वतीने क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा सुरू आहेत.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 65 वर्षीय आजी मैदानात उतरतात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. वडगाव लांडगा विरुद्ध पिंपळगाव या संघामध्ये पाच शटकांची मॅच झाली. यामध्ये प्रथम वडगाव लांडगा कडून सलामीसाठी 65 वर्षीय सुमन बाळासाहेब लांडगे मैदानात येतात उपस्थित सर्व महिला व मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला. आजींनी पहिला बॉल अत्यंत सुंदर खेळून काढला तर दुसऱ्या बॉलवर दोन रन काढून संघाची सुरुवात केली. पुन्हा दोन बॉल खेळून काढल्यानंतर सहाव्या बॉलवर खणखणीत चौकार मारला. 65 व्या वर्षी अत्यंत तंदुरुस्तीने व आनंदाने मैदानात उतरताना सर्व युवतींना प्रोत्साहित केले. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावसंख्येवर पिंपळगाव कोंझिरा संघाला आव्हान दिले.

यानंतर एक्स्ट्रा कव्हर ला सुंदर क्षेत्ररक्षण करताना आजींनी क्रिकेट प्लेअरची टोपी घालून सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करताना या क्रिकेट खेळाचा आनंद घेतला .या खेळात पिंपळगाव कोंजीरा संघ विजयी झाला. मात्र आजीच्या सहभागाने हा संघ सर्वांची मने जिंकून गेला

यावेळी बोलताना सौ सुमन लांडगे म्हणाल्या की, आमचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका सुजलाम सुफलाम बनवला आहे. तालुक्यात शांततेचे व विकासाचे वातावरण आहे .महिला दिनाच्या निमित्ताने डॉ जयश्रीताई थोरात यांनी सर्व महिला भगिनींना एकत्र करत या स्पर्धेचे आयोजन केले आहे. आज या ठिकाणी 2500 महिला उपस्थित आहेत. खेळातून आरोग्य चांगले राहते .जुन्या काळामध्ये कष्ट केले जायचे. त्यामुळे महिलांचे आरोग्य चांगले असायचे .आता शहरी महिलांची कष्टाची सवय कमी झाली आहे. मात्र मैदानी खेळ खेळल्याने आरोग्याला चांगला फरक पडणार आहे .

मागील वर्षी मी या स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. आणि त्यावर्षी निश्चय केला होता की मी पुढील वर्षी खेळेल .मागील चार दिवस गावात सराव करून आज या स्टेडियम मध्ये खेळण्याचा मला खूप आनंद मिळाला आहे.

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लहान मुलींसह अनेक महाविद्यालय युवती आणि स्त्रियांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. सर्वांच्या सहकार्याने सहभागाने ही स्पर्धा यशस्वी ठरत असून महिलांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. महिलांमध्ये आरोग्य जाणीव जागृती निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश असून वर्षभर महिलांसाठी विविध उपक्रम सुरू राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या

यावेळी सर्व विजेत्या संघांसह 65 वर्षीय सुमन लांडगे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

जागतिक महिला दिन ( सौ.दुर्गा सुधीर तांबे )संपूर्ण जगामध्ये ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जगात...
07/03/2024

जागतिक महिला दिन ( सौ.दुर्गा सुधीर तांबे )

संपूर्ण जगामध्ये ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील इतिहासात स्त्रियांना कुठलेही हक्क सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी कोणी ना कोणी समाजसुधारकांनी त्यासाठी तीव्र लढा दिला व त्यातूनच जगभर आज स्त्रियांना समानता, स्वतंत्र,मतदानाचा अधिकार त्यातूनच राजकारण समाजकारण धार्मिकता यात प्रवेश मिळाला आहे. म्हणूनच नवनवीन येणाऱ्या प्रश्नांसाठी महिलांना अजूनही संघटित होऊन लढावे लागणार आहे. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्रि कामगारांनी रूटगर्ल्स चौकात निदर्शने केली.

कामगार स्त्रियांच्या मागण्या होत्या की, कामाचे तास कमी करून दहा तास ठेवावे. वेतन वाढ द्यावी. कामाच्या जागी सुरक्षितता असावी. या मागण्यांबरोबर लिंग,वर्ण, मालमत्ता, शैक्षणिक पार्श्वभूमी व मतदानाचा हक्क असावा अशा मागण्यांची चळवळ तेव्हापासून सुरू झाली. यानंतर 08 मार्च 1910 रोजी डेन्मार्क मधील कोपन हेगण या राजधानीच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिलांची परिषद भरली. त्याचे नेतृत्व वलारा झेटकीन या कम्युनिस्ट महिलेने केले. 17 देशांचे प्रमुख 100 महिलांनी यात भाग घेतला होता. त्यात महिलांना समानता, समान वेतन, कामाचे कमी तास, महिलांना शिक्षण, आरोग्य, मालमत्तेच हक्क, कामाच्या जागी सुरक्षितता, मतदानाचा हक्क इत्यादी ठराव मांडण्यात आले. त्यातच 08 मार्च हा दिवस कामगार महिलांनी केलेल्या मागण्यांचे आंदोलनाचे स्मरण म्हणून हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा करावा असे कम्युनिस्ट नेत्या वलसारा झेट किन यांनी मांडला व मंजूर करण्यात आला. तेव्हापासून जगातील त्या दिवसाचे महत्त्व वाढले. यानंतर या चळवळीमुळे 1918 इंग्लंडमध्ये 19 19 मध्ये अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

त्यानंतर 1975 साली आपली जागतिक संघटना युनोने त्यात पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात सुरुवात झाली. 1975 हे वर्ष युनोने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्याची जाहीर केले. त्यात वर्षभरासाठी एक संकल्पना जाहीर करून ते वर्षभर ते राबावे असे जाहीर केले. त्याप्रमाणेच तीन रंग महिला दिनासाठी जाहीर केले जांभळा रंग म्हणजे न्याय व प्रतिष्ठा, हिरवा रंग म्हणजे अशा, आणि पांढरा रंग म्हणजे पावित्र्य अशा संकल्पना मांडल्या.

तेव्हापासून संकल्पनेने नुसार महिला दिन साजरा होऊ शकला महिला दिन फक्त ८ मार्च रोजी साजरा न करता १ मार्च ते 31 मार्च पर्यंत चालतो. नवीन वर्षाची दिलेली संकल्पना वर्षभर राबवायची असते. यावर्षी संकल्पना आहे महिलांच्या समावेशस प्रेरणा देणे. समानतेतील अडथळे तोडण्यासाठी रुढीवादी परंपरांना आव्हान देण्यासाठी या वर्षाची संकल्पना आहे. यावर्षीचा रंग आहे जांभळा लैंगिक समानता महिला आणि मुलींचे सक्षमीकरण, निरोगी जीवनासाठी आरोग्य सुविधा, आर्थिक समानता यासाठी ही संकल्पना आहे.

युनोने WHO (जागतिक आरोग्य संघटना) यांनी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे महिलांचे मृत्यूचे प्रमाण घटत आहे. WHO ही जागतिक आरोग्य संघटना जगाला आजारापासून व इतर सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य सेवा देण्यासाठी नागरिकांचे आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते. महिलांसाठी ही आरोग्य संघटना खूप काम करते. आणि म्हणून सर्व महिलांनी युनो W.H.O ( आरोग्य संघटना ) आपल्याला रोज कायम सांगते त्याचा अभ्यास आपण करून तशा प्रकारचे प्रशिक्षण तळागाळातील स्त्रियांपर्यंत पोहोचवणे म्हणजे खरा महिला दिन. भारतीय स्त्रिया खूप भाग्यवान आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे संविधानाने अनेक हक्क न मागता मिळालेले आहेत. मतदान मालमत्ता इत्यादी अधिकार मिळाला. हिंदू कोड बिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सर्व जाती धर्मातील महिलांना जाचक रूढी परंपरा पासून सुटका व्हावी, घटस्फोटीत महिला विधवा महिलांचे जीवन भयानक व अपमानित होते. त्यातून त्यांचे जीवन इतर महिलांसारखे मानवी मूल्यातून व्हावे. विधवा परिचकता स्त्रियांना पुनर्विवाह असे ठराव मंजूर करण्यात आले. त्यासाठी विरोध झाला पण त्यांनी हे काम सर्व जाती धर्मातील स्त्रियांसाठी केले. त्यासाठी त्यांनी खूप लढा दिला. राजा मोहन राय यांनी सतीची चाल बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले.

क्रांतीसुर्य महात्मा फुले,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून खूप त्रास, कष्ट सहन केले. छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी खूप मदत केली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी सर्व जाती धर्मातील स्त्रियांना समानता देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, यांनी स्त्रियांना सन्मानाची आदराची वागणूक दिली. सुरक्षितता दिली. मधल्या काही वर्षात सोनोग्राफी मुळे मुलींची जन्म पूर्वीच हत्या करण्यात आली. मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलगी असेल तर गर्भपात करण्यात आले. त्यातून पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्या समानता राहिली नाही व आपण आज भारतात अनेक तरुणांचे लग्न होत नाही. कारण मुलीच नाही म्हणून इतर भयानक प्रकार समाजात वाढले त्यासाठी गर्भपातावर कठीण शिक्षा झाल्याने हे प्रमाण थोडे कमी झाले. आज स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले. परंतु स्त्रियांना परत धार्मिकेकडे नेत्यांचा समाज कंटकांचा प्रयत्न आहे. यासाठी स्त्रियांनी जागृतीने डोळसपणे अभ्यास करून ही नवीन बंधने जुगारून दिली पाहिजे. आपल्या सर्वांनी एकमेकीचा आदर सन्मान केला पाहिजे. एकमेकींची काळजी घेतली पाहिजे. महिला दिन फक्त ८ मार्चलाच एक दिवस न करता ही संकल्पना सांगितलेली आहे ती वर्षभर राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला समाज सुधारकांच्या कष्ट त्रास जगातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्याचे आहे.

जसा बैलपोळा एकच दिवस साजरा होतो व वर्षभर बैलांकडून त्याला चापकाने मारून काम करून घेतो तसे महिला दिन एकच दिवस साजरा न करता स्त्रियांसाठी मुलींसाठी वर्षभर अनेक संघटना स्त्रियांनी सक्षमीकरणाचे काम चालू ठेवले पाहिजे. कुटुंबांमधून समाजात त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे आता आपण रोजच महिला दिन साजरा करून महिलांना अधिक सक्षम बनवूया महिला वर्षभरासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

खासदार अमोल कोल्हे यांचे आमदार निलेश लंकेंना 'तुतारी' चे निमंत्रणलंके यांच्या अहमदनगर लोक सभा मतदार संघातील भूमिकेकडे लक...
07/03/2024

खासदार अमोल कोल्हे यांचे आमदार निलेश लंकेंना 'तुतारी' चे निमंत्रण

लंके यांच्या अहमदनगर लोक सभा मतदार संघातील भूमिकेकडे लक्ष

अहमदनगर :- आमदार निलेश लंके यांनी नगर दक्षिण मध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी वाजववी. आमदार लंके यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सांगत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लंके यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी साकडे घातले.
खासदार अमोल कोल्हे यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे. आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने नगर शहरात गेले चार दिवस शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते. त्याचा समारोप सोमवार रात्री झाला. समारोप प्रसंगी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार निलेश लंके यांना हे निमंत्रण दिले. गेली चार दिवस आयोजित केलेले हे महानाट्य विविध राजकीय नेत्यांच्या भेटीने व लंके कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष देण्यातून चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेले तुतारीचे निमंत्रण महत्त्वपूर्ण ठरते. आमदार निलेश लंके सध्या अजितदादा गटात आहेत. तर खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटात आहे. मात्र नगरची जागा भाजपकडे असून तेथे खासदार डॉ. सुजय विखे प्रतिनिधित्व करतात. आमदार निलेश लंके नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? की अजितदादा गटातून शरद पवार गटाकडे जाणार का? या चर्च होत आहे.

इस्त्राइलमधील तज्ज्ञांकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन; जयहिंद लोकचळवळीने घेतला पुढाकारडॉ.सुधीर तांब...
07/03/2024

इस्त्राइलमधील तज्ज्ञांकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन; जयहिंद लोकचळवळीने घेतला पुढाकार

डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला अभिनव उपक्रम

शेतकऱ्यांना मिळाला भरभराटीचा कानमंत्र

संगमनेर प्रतिनिधी
जयहिंद लोक चळवळ कृषी विभाग आणि भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, संगमनेर वनस्पती शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन जयहिंद लोकचळवळीचे अध्यक्ष मा. आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यशाळेत नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरवण्यात आलेले जयहिंद लोकचळवळ कृषी विभागाचे मार्गदर्शक डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचे विशेष योगदान तज्ज्ञ मार्गदर्शकांना उपलब्ध करण्यात आले. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना सुधीर तांबे यांनी शेती समोरील आव्हाने आणि हवामान व बाजारभाव यांची अनिश्चितता यावर भाष्य करत जयहिंद लोकचळवळीच्या वतीने एकात्मिक शेतीसारख्या प्रकल्पांची केलेली उभारणी, शेतीमधील विविध पिकांच्या SOP ची प्रभावी अंमलबजावणी आणि आधुनिक शेतीसाठी आवश्यक गुड प्रॅक्टिसेस यांचा अंतर्भाव शेतीत होण्यासाठी जयहिंद लोकचळवळ आग्रही असते असे उपस्थित शेतकरी आणि मार्गदर्शक चेरी शेरॉन यांच्यासमोर मांडले. डॉ. तांबे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या या प्रयत्नांची प्रशंसा करत इस्राइल येथील शेरॉन चेरी (तज्ज्ञ संचालक इस्राइल कृषी विभाग) यांनी सदर कार्यशाळेस उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांस मार्गदर्शन केले.

इस्राइलमधील तंत्रशुद्ध शेतीचे आणि विविध आव्हानांचा सामना करून केल्या जाणाऱ्या उत्कृष्ट शेतीचे अनुभव कथन करताना शेरॉन चेरी यांनी सांगितले की, "ते स्वतः नेगेव या वाळवंटी प्रदेशात भाजीपाला आणि चेरी, टोमॅटोची दर्जेदार शेती करतात. सरासरी 50 मिलिमीटर पेक्षाही कमी पाऊस होणाऱ्या या प्रदेशात ते शासनाकडून समुद्राचे रिव्हर्स ऑसमॉसिस प्रक्रिया केलेले शेती योग्य पाणी विकत घेऊन शेतीसाठी वापरतात. पिकांस लागणारी खते ही पाण्यासोबतच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दिली जातात. पिकांवरील बुरशीजन्य आजार तसेच मुळांची चांगली वाढ व्हावी यासाठी ते ओझोनेशन या प्रक्रियेचा वापर तेथे फवारणीद्वारे तसेच ठिबक सिंचनाद्वारे शेतीमध्ये करतात. मात्र शेतीसाठी उपयुक्त असणारी पाण्यातील नैसर्गिक तत्व या प्रक्रियेसाठी प्रतिकूल ठरतात. त्यामुळे ती प्रक्रिया भारतामध्ये करणे अधिक क्लिष्ट आहे," असे त्यांनी नमूद केले.

आपल्या शेतीविषयक अनुभवांविषयी पुढे बोलताना शेरॉन चेरी यांनी म्हटले की, "तेथील जमीन कुठेही उपजाऊ नसून जमीन पूर्णतः रेतीयुक्त आहे. 99.9% कुठलेही सेंद्रिय कर्ब तसेच पिकास उपयुक्त अशी खनिजे आणि सूक्ष्मजीव या जमिनीत आढळत नाही. मात्र कंपोस्टच्या मदतीने ते आवश्यक ती मूलद्रव्य पिकास उपलब्ध करून देतात. संरक्षित शेती प्रकारात पॉलिहाऊस आणि शेडनेट पद्धतीचा अवलंब त्यांच्या शेतीमध्ये करतात. तसेच स्वतः विकसित केलेले तंत्रज्ञान वापरून तेथील तापमान नियंत्रित देखील करतात. पॉलिहाऊसच्या दोन पडद्यांमध्ये हवा भरून ते तेथील तापमान नियंत्रित करतात. तसंच नेगेव वाळवंटातील कृषी संशोधन केंद्राची मदत घेऊन शेतीची मशागत, जोपासना तसेच सर्व व्यवस्थापन ते आधुनिक आणि तंत्रशुद्ध पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या शेतीमध्ये पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने ते करतात. तसेच त्यात ठिबक सिंचन तुषार सिंचनाचा प्रामुख्याने वापर करतात. शेडनेट, पॉलीहाऊस येथे परागीभवनासाठी ते स्थानिक मधमाशीच्या प्रजातींचा वापर करतात," असे चेरी यांनी स्पष्ट केले.

शेरॉन चेरी यांच्या मार्गदर्शनातील इतर ठळक मुद्दे :

१. कीटकांच्या नियंत्रणासाठी ते मित्र किडीचा देखील वापर त्यांच्या शेतीमध्ये करतात.

२. ते स्वतः त्यांचे उत्पादन वेगवेगळ्या मॉलमध्ये तसेच शॉपमध्ये कोणाच्याही मध्यस्थीशिवाय थेट विक्री करतात. त्याचा त्यांना मोठा फायदा होतो. तशी व्यवस्था तेथील शासनाने पुरस्कृत केल्याने ते अधिक फायदेशीर होते.

३. पिकाची गुणवत्ता त्याचे उत्पादन आणि हंगामाची निवड या त्रिसूत्रीमुळे त्यांना इतर शेतकऱ्यांपेक्षा अधिक नफा होतो.

४. तुम्ही जर संघटित पद्धतीने म्हणजेच गट शेती किंवा सहकार याच्या सहाय्याने जर शेती उपयोगी बाबींची खरेदी तसेच विक्री केल्यास अधिक नफा त्यातून होऊ शकतो.

५. इस्राइल शासन शेतकऱ्यास कुठलीही थेट आर्थिक मदत करत नाही. मात्र प्रत्येक पिकाचा विमा शासनाकडून काढला जातो, त्याचवेळी पिकावर शासनाकडून वाजवी कर देखील वसूल केला जातो.

६. इस्राइल शासनाकडून शेतकऱ्यांस त्यांच्या मालाच्या विक्रीचे कुठलेही बंधन नसते. त्यामुळे शेतकरी त्यांच्या मालाच्या विक्रीचे धोरण स्वतः ठरवू शकतो आणि त्याचा त्याला निश्चित फायदा होतो.

७. शासनाकडून अद्ययावत शेती तंत्रज्ञान तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांस उपलब्ध करून दिले जाते. हे इस्त्राइलमधील उत्तम शेतीचे गमक आहे. त्याच पद्धतीचे संशोधन आणि तंत्रज्ञान भारतीय कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले तर भारतातील शेती नक्कीच फायदेशीर होईल.

८. भारतात होणारा पाऊस शेतीसाठी मुबलक आहे. कारण सरासरी ५० मिलीमीटर पाऊस झाला तरी योग्य नियोजन केल्यास आणि तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ते पाणी शेतीला पुरू शकते आणि त्यातून चांगल्या पद्धतीने शेती करता येऊ शकते.

यावेळी शेतकऱ्यांच्या देखील सर्व शंकांचे निरसन कार्यशाळेत तज्ज्ञांकडून केले गेले.

डॉ. सुधीर तांबे यांनी इस्राइल मधील शेतकरी त्यांच्या व्यवसायात किती समाधानी आहेत? असे विचारले असता तेथील सुमारे 80% शेतकरी हे समाधी समाधानी असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण चेरी शेरॉन यांनी सर्वांसमोर मांडले.

दरम्यान, या कार्यक्रमास जयहिंद लोकचळवळ आणि सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे, रोमिफ इंडिया चे संचालक डॉ. प्रशांत नाईकवाडी, श्री रमेश गुंजाळ स. म. भा. थो. सहकारी साखर कारखाना संचालक, प्राचार्य डॉ .दीनानाथ पाटील ,उपप्राचार्य डॉ बाळासाहेब वाघ, विश्व हायटेक नर्सरी चे वीरेंद्र थोरात, प्रगतिशील शेतकरी आनंदा नाथा गाडेकर, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी तुकाराम गुंजाळ, संदीप गुंजाळ , संदीप पवार, संजय वाकचौरे, रवींद्र लेंडे, संगमनेर व अकोले तालुक्यातून आलेले प्रगतिशील व कृतिशील शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र शासन वसंतराव नाईक पुरस्कार मिळालेले प्रशांत नाईकवाडी व तुकाराम गुंजाळ यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन जयहिंद लोकचळवळ कृषी विभाग प्रमुख डॉ अभयसिंह जोंधळे यांनी केले तर आभार दिनानाथ पाटील यांनी मानले.

डॉ.जयश्री थोरात यांची युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड संगमनेरमध्ये युवापर्वाची सुरुवातनिलेश थोरात यांना जिल्हा ...
06/03/2024

डॉ.जयश्री थोरात यांची युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड

संगमनेरमध्ये युवापर्वाची सुरुवात

निलेश थोरात यांना जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी

संगमनेर प्रतिनिधी
कॅन्सर तज्ञ आणि युवानेत्या डॉ. जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कृणाल राऊत, महाराष्ट्राचे युवक कॉंग्रेस प्रभारी उदयभानू, जिल्हा प्रभारी रोहित कुमार आणि सहप्रभारी एहसान खान यांनी ही निवड जाहीर केली. युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी डॉ. जयश्री यांच्या निवडीची घेषणा केली.

डॉ.जयश्री थोरात या सुपरीचित कॅन्सर तज्ज्ञ असून, त्या मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. अभ्यासू आणि सेवाभावी वृत्तीमुळे अल्पावधीतच त्यांनी कॅन्सर उपचाराच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला. आज त्या कॅन्सर रुग्णांना टाटा हॉस्पिटल आणि एसएमबीटी हॉस्पिटल येथे योग्य उपचारांच्या बाबतीत मार्गदर्शन करतात.

ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांवर उपचार करत असताना डॉ. जयश्री यांच्या लक्षात आले की जनजागृती अभावी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला अनेक महिला बळी पडत आहे. या गंभीर प्रश्नावर व्यापक काम करण्याच्या हेतूने त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर आधारित एकविरा फाउंडेशन ची स्थापना केली. महिलांसाठी आरोग्य शिबिरे, व्यावसायिक प्रशिक्षण, बचत गटांना मार्गदर्शन, सायकल वाटप, शालेय साहित्याचे वितरण, क्रीडा स्पर्धा, गुणदर्शन कार्यक्रम आदी माध्यमातून त्यांनी संगमनेर तालुक्यात महिला आणि मुलींसाठी अल्पावधीत मोठे काम उभे केले आहे. सामाजिक कार्यासोबतच लोकनेते बाळासाहेब थोरात यांना मदतरूप भूमिका घ्यायला त्यांनी सुरुवात केली.

युवा संवाद या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील 153 गावातील प्रमुख युवक कार्यकर्त्यांच्या, दीडशेहून अधिक बैठका घेऊन त्यांनी संवाद साधला. युवासंवाद च्या माध्यमातून समोर आलेल्या बहुतांश प्रश्नांची यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी सोडवणूक केली. त्या वेळीच युवकांनी डॉ. जयश्री यांना युवक काँग्रेस अध्यक्षपद स्विकारण्याचा आग्रह केला होता, त्यानंतर डॉ. जयश्री या युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या होत्या.

डॉ. जयश्री यांनी कार्यकर्ता बनून संघटनेचे काम करण्याला प्राधान्य दिले ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या रूपाने युवक काँग्रेसला अभ्यासू, उच्चशिक्षित आणि सेवाभावी चेहरा मिळाला असल्याची भावना, युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी व्यक्त केली.

संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष निलेश थोरात यांची अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून, संगमनेर सारख्या व्यापक तालुक्यात काम करण्याचा निलेश थोरात यांचा अनुभव जिल्ह्याच्या युवक काँग्रेसला नक्की उपयोगी पडेल असा आशावाद, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी व्यक्त केला.

युवक कार्यकर्त्यांचा आग्रह
डॉ. जयश्री थोरात यांची सेवाभावी वृत्ती आणि प्रश्न सोडवण्याची हातोटी यामुळे प्रभावित झालेल्या युवक कार्यकर्त्यांनी डॉ. जयश्री यांना युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पद स्वीकारण्याची गळ घातली. यापूर्वी युवक काँग्रेसने घेतलेल्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मागील वर्षी महाराष्ट्रात आलेल्या भारत जोडो यात्रेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, तेव्हापासूनच त्या काँग्रेस पक्ष संघटनेत सक्रिय झाल्या होत्या. डॉ. जयश्री यांच्या निवडीने युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

काँग्रेसचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार
काँग्रेसचा विचार हा माझ्या कुटुंबात गेल्या शंभर वर्षांपासून रुजलेला आहे. राजकारणात सत्ता आल्या आणि गेल्या मात्र माझे वडील लोकनेते बाळासाहेब थोरात हे कायम काँग्रेस विचारांशी बांधिल राहिले. काँग्रेसचा विचार हा शाश्वत आहे आणि तो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा आहे, ही बांधिलकी त्यांनी माझ्यातही रुजवली आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष संघटनेत काम करण्याची संधी मला मिळालेली आहे, शेवटच्या माणसापर्यंत काँग्रेसचा विचार पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहील.संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात युवकांचे संघटन मजबूत करण्यावर माझा भर राहील. माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी काँग्रेस पक्ष आणि नेतृत्वाचे आभार मानते.

महिला दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धेत 1050 महिलांचा सहभागडॉ.जयश्री थोरात यांनी केली क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेच्या तयारीची ...
06/03/2024

महिला दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धेत 1050 महिलांचा सहभाग

डॉ.जयश्री थोरात यांनी केली क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेच्या तयारीची पाहणी

संगमनेर प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकविरा फाउंडेशनच्या वतीने संगमनेर शहर व तालुक्यातील महिलांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये 90 क्रिकेट संघाच्या सहभागासह 1050 महिला सहभागी होणार असून या स्पर्धेच्या जय्यत तयारीची पाहणी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी केली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 ते 10 मार्च 2024 या काळात महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. यासाठी मैदानाची जय्यत तयारी करण्यात आली असून या मैदानाची व तयारीची पाहणी कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केली. यावेळी समवेत डॉ.वृषाली साबळे, सौ.ज्योती थोरात, सुरभी मोरे, प्राजक्ता घुले,विशाखा पाचोरे, शर्मिला हांडे, स्वामिनी वाघ, अहिल्या ओहोळ,डॉ.सुरभी असोपा, तृष्णा आवटी, मयुरी थोरात, पूजा थोरात, शिल्पा गुंजाळ, ऐश्वर्या वाकचौरे ,शीला पंजाबी ,मुख्याधिकारी श्रीराम कु-हे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

जागतिक महिला दिनानिमित्त होणाऱ्या महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत 90 संघांचा सहभागा असून या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी सकाळी 9 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ सुधीर तांबे, सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे,कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, श्रीमती सुवर्णाताई मालपाणी, सौ.शरयू ताई देशमुख आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेबरोबरच महिलांची आरोग्य तपासणी ही या ठिकाणी होणार आहे. यावेळी नामवंत स्री रोग तज्ञ व कॅन्सर तज्ञ उपस्थित राहून महिलांची तपासणी करणार आहेत.

संगमनेर तालुक्यातील खेडोपाडी तसेच संगमनेर शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये महिलांचा क्रिकेट उत्साह मोठा दिसून येत असून यासाठी गावोगावी महिलांची प्रॅक्टिस सुरू आहे. या स्पर्धेत प्रथम बक्षीस 7777 द्वितीय बक्षीस 5555 व तृतीय बक्षीस 3333 ठेवण्यात आले असून लहान गट ,मोठा गट व खुला गट असे तीन गट मधून हे सर्व बक्षिसे दिले जाणार आहेत .त्याचबरोबर मोफत लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले असून लकी ड्रॉची कुपनही स्पर्धेच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.

तरी महिला दिनानिमित्त होणाऱ्या आरोग्य शिबिर व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि रस्सीखेच स्पर्धेसाठी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.जयश्रीताई थोरात व एकविरा फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

महिला आरोग्य तपासणी शिबिर
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाच्या स्वतंत्र दालनामध्ये येणाऱ्या सर्व महिला भगिनींची तज्ञ स्री रोग तज्ञ व कॅन्सरतज्ञ यांच्या उपस्थितीमध्ये विविध तपासण्या होणार असून अधिक उपचार व पुढील तपासणी करता एसएमबीटी क्लिनिकच्या माध्यमातून उपचार केले जाणार असल्याचे या शिबिरामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पाचशेवर अर्ज आल्यास बॅलेटवर निवडणुका? मराठा समाजाचा पाचशे उमेदवार देण्याचा निर्णयअहमदनगर : विरोधी पक्षांकडून आधीच बॅलेट ...
04/03/2024

पाचशेवर अर्ज आल्यास बॅलेटवर निवडणुका? मराठा समाजाचा पाचशे उमेदवार देण्याचा निर्णय

अहमदनगर : विरोधी पक्षांकडून आधीच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी होत असताना आता राज्यात सकल मराठा समाज लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावातून दोन उमेदवार देणार आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान ५०० उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ‘ईव्हीएम’वर मर्यादा आहेत. अशा स्थितीत निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही होईल, असे निवडणूक अधिकारी सांगत आहेत.
तज्ज्ञांच्या मते या समस्या असतील- मोठ्या प्रमाणात ईव्हीएम उपलब्ध करणे कठीण - बुथनिहाय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, वाढत्या कर्मचारी संख्याबळाची समस्या- एवढी मोठी मतदार यादी ‘ईव्हीएम’वर असेल तर मतदार संभ्रमित होऊ शकतो.- राजकीय पक्षांच्या प्रभावावर परिणाम होऊ शकतो.

ईव्हीएम मशीनवर ३८४ उमेदवारांसाठी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यापेक्षा जास्त उमेदवार असतील तर ईव्हीएमला मर्यादा आहेत. लोकसभा निवडणुकीत पाचशे उमेदवार असतील तर त्याबाबत वरिष्ठांकडून जे निर्देश येतील त्यानुसार कार्यवाही होईल.- राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर

लंडनच्या शिष्टमंडळाची अमृत उद्योग समूहास भेटसंगमनेरचा सहकार पॅटर्न जगासाठी अनुकरणीयसंगमनेर (प्रतिनिधी)--ग्रामीण भागातील ...
03/03/2024

लंडनच्या शिष्टमंडळाची अमृत उद्योग समूहास भेट

संगमनेरचा सहकार पॅटर्न जगासाठी अनुकरणीय

संगमनेर (प्रतिनिधी)--ग्रामीण भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्त्वावर उभ्या केलेल्या सहकाराने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शीपणे केलेल्या रचनात्मक वाटचालीमुळे संगमनेरचे हे सहकारचे मॉडेल हे भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय असल्याचे गौरवोदगार लंडनमधील शिष्टमंडळाने काढले आहे.

युरोपमधील व लंडनमधील शिष्टमंडळाने सहकाराच्या अभ्यास दौऱ्यासाठी संगमनेरच्या विविध सहकारी संस्थांना भेटी दिल्या. यामध्ये लंडन विद्यापीठाचे डीन जिरेमी स्मिथ, वरिष्ठ पत्रकार नाथाली मायरोथ, चैतन्य मार्कपवार, हे होते त्यांचे समवेत विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ सुजित खिलारी, संभाजी वाकचौरे आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.

यावेळी या शिष्टमंडळाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, राजहंस ॲक्वा ,अमृतवाहिनी बँक ,शेतकी संघ यांसह विविध शैक्षणिक संस्थांना ही भेटी दिल्या.

याप्रसंगी प्रोफेसर जेरेमी स्मिथ म्हणाले की, भारतातील ग्रामीण भागात सहकार चळवळीतून मोठे आर्थिक परिवर्तन झाले आहे. आणि याचे मोठे उदाहरण हे संगमनेर तालुका आहे. सहकारामुळे अगदी लहान लहान व्यक्तींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येते. काँग्रेस लीडर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथील साखर कारखाना दूध संघ शैक्षणिक संस्था याचबरोबर सर्व सहकार आणि तालुक्याचा होणारा विकास हे मॉडेल ठरणारे आहे. या सहकाराचा अभ्यास करून युरोपमध्येही हा पॅटर्न राबवता येणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्टीतून हा सहकार उभा केला आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातील सर्व संस्था या अत्यंत सक्षमपणे काम करत आहेत. सर्व सभासद, उत्पादक, शेतकरी कामगार या सर्वांचे हित जोपासले जात असून यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेत भरभराट आहे. ग्रामीण विकासातून आर्थिक समृद्धी निर्माण झाल्याने जागतिक पातळीवरील सर्व बँका संगमनेर शहरात असल्याचेही ते म्हणाले

यावेळी रणजीतसिंह देशमुख यांनी राजहंस दूध संघाची तर बाबा ओहळ यांनी कारखान्याची माहिती दिली. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सर्वांचे आभार मानले.

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीत नितीन गडकरींचं नाव नाहीभाजपाचे राष्ट्रीय महासचिव या...
02/03/2024

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीत नितीन गडकरींचं नाव नाही

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण ३४ मंत्र्यांना स्थान देण्यात आलं आहे. मात्र पहिल्या यादीत नितीन गडकरींना स्थान नाही. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विनोद तावडे यांनी भाजापाच्या उत्तर प्रदेशमधील ५१, पश्चिम बंगालमधील २०, मध्य प्रदेशमधील २४, गुजरातमधील १५, राजस्थानमधील १५, केरळमधील १२, तेलंगणामधील ९, आसाममधील ११, झारखंडमधील ११, छत्तीसगडमधील ११, दिल्लीमधील ५, जम्मू काश्मीरमधील २, उत्तराखंडमधील ३, अरुणाचल प्रदेशमधील २, गोव्यातील १, त्रिपुरामधील १, अंदमान निकोबारमधील १ आणि दिव-दमणमधील एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.
भाजपाने आज जाहीर केलेल्या यादीत एकूण २८ महिलांना उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुन्हा एकदा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना दिसणार आहेत. तर भाजपाने हेमा मालिनी यांनाही उमेदवारी घोषित केली आहे. हेमा मालिनी या मथुरा लोकसभा मतदारसंघातून निडवणूक लढवणार आहेत. मात्र नितीन गडकरी यांचं नाव या यादीत कसं नाही? याची चर्चा आता रंगली आहे.

नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली. दरम्यान, असे असले तरी नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत स्थान दिले नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांना दुसऱ्या यादीत उमेदवारी घोषित करण्यात येणार का? किंवा भाजपचे यामागे काही धक्कातंत्र आहे? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

आ. थोरात यांनी निळवंडेचे कालवे केल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद – इंद्रजीतभाऊ थोरातसंगमनेर प्रतिनिधीअनेक अडचणीवर मात क...
02/03/2024

आ. थोरात यांनी निळवंडेचे कालवे केल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद – इंद्रजीतभाऊ थोरात

संगमनेर प्रतिनिधी
अनेक अडचणीवर मात करत आ.बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण पूर्ण केले. धरणाच्या कालव्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळवला. परंतु काही नेते कालवे पूर्ण होताच त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे. हे लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी ओळखले असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामुळे झालेली निर्णय धरण आणि कालव्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन कारखान्याचे संचालक इंद्रजीतभाऊ थोरात यांनी केले आहे.

देवगांव येथे बधरा पाणी पुजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अमृतवाहिनी बँकेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे, कैलास पानसरे ,रामदास पा.वाघ ,सरपंच अर्चनाताई लामखडे ,सुनिता पावसे, मेजर प्रकाश कोटकर, डॉ प्रमोद पावसे, बाळासाहेब शिंदे ,रावसाहेब कोटकर, नानासाहेब वर्पे आदीं उपस्थित होते .

यावेळी इंद्रजीतभाऊ थोरात पुढे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी मा.विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने निळवंडे धरणाच्या कामाला गती मिळाली अनेक अडचणीवर मात करून काम पूर्ण केले. धरणामध्ये पहिल्यादा 2014 ला पाणी अडविण्यात आले. परंतु त्यानंतर सरकार गेले व निळवंडे धरणाच्या कालव्याची कामे पूर्णता ठप्प झाली. भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कोणतीही काम झाले नाही. परंतु 2019 ला पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आले त्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा कालव्याच्या कामांना गती देण्यास सुरुवात केली. जयंत पाटील अर्थमंत्री असल्यामुळे त्यांनी निधीची कमतरता पडू दिली नाही. कालव्यांचे कामात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कालवे पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडण्याची तयारी चालू असतानाच पुन्हा एकदा सरकार बदलले आणि भाजप पुन्हा सत्तेवर आले. धरणात 10 टीएमसी पाणी असून सुद्धा कालव्यांना पाणी सोडण्यात येत नव्हते म्हणून आ. बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनाचा इशारा देत विधानसभेमध्ये सरकारला धारेवर धरले त्यामुळे दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले.

1 फेबुवारीला राहुरी तालुक्यासाठी 10 दिवस व नंतर संगमनेर तालुक्याला पाणी देण्यात आले. पाणी येत असताना अनेक अडचणी वर मात करून तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याची मदत घेऊन आपण आज देवगावच्या बंधाऱ्यात पाणी अडवले आहे. आपण कायम आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना ताकद देण्याचे काम केले आहे. देवगाव परिसरात पाणी आणण्याकरिता ग्रामस्थानी विशेषतः तरुणांनी मदत केली. त्यामुळे गावात पाणी आणणे शक्य झाले. काही विरोधी नेते धरणाचे व कालव्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर श्रेय घेण्याचे प्रयत्न करत आहेत परंतु तालुक्यातील जनतेला हे पूर्णतः माहिती आहे की पाण्याकरिता काँग्रेसचे नेते मा.महसुलमंत्री. आमदार बाळासाहेब थोरात यांनीच संघर्ष केला आहे म्हणून पुढील काळात कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपण आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

प्रास्ताविक करताना प्रकाश कोटकर म्हणाले की, पाणी आणण्याकरिता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याची मोठी मदत मिळाली असून गावातील तरुणांनी यासाठी उत्साह दाखवला. त्यामुळेच हे शक्य झाले आहे आमदार बाळासाहेब थोरात हे आपले जलनायक आहे. म्हणून आम्ही सर्व आ. थोरात साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे असे ते म्हणाले.

याप्रसंगी दिनेश बांगर ,शरद कोटकर, रमेश वरपे ,अजय पावसे, संतोष कोटकर, विक्रम कोटकर, सुखदेव पावसे ,बबन पावसे, संजय शिंदे ,देवगाव पाणी कृती समिती तसेच ग्रामस्थ तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Address

MI

Telephone

+19892872798

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Daily Charchakshu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share