05/10/2021
*काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीना हुकूमशाही पद्धतीने अटक,मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे सांत्वन करण्यास जाणे हा गुन्हा आहे का?-काँग्रेस महिला अध्यक्षा अर्चनाताई पोळ*
चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 5 ऑक्टोबर 2021 रोजी काँग्रेस तर्फे उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे शेतकऱ्यांना चिरडून मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना अवैध रित्या अटक करण्यात आल्याच्या विरोधात शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा अर्चनाताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले
शेतकरी प्रधान देशात काही महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहे मात्र केंद्र सरकार ला काही जाग येत नाही त्यात उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे शेतकऱ्यांचा घात पात करत चिरडून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटून सांत्वन करण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना रात्री अटक करण्यात येते तेही हुकूमशाही पध्दतीने जर कायद्याचे रक्षक कायद्याचे पालन करत नसतील तर ही फार गंभीर बाब आहे प्रियांका गांधी यांच्या गुन्हा म्हणजे मृत्यू पावलेल्या शेतकरी कुटुंबाना सांत्वन करण्यास जाणे हा आहे असा सवाल शहर महिला काँग्रेस अध्यक्षा अर्चना ताई पोळ यांनी यावेळी उपस्थित केला तसेच या प्रकारची सखोल चौकशी व्हावी असे देखील सांगितले निवेदन देतांनी माजी आमदार ईश्वरभाई जाधव ,शिवलाल भाऊ साबणे साहेब,काँग्रेस सेवा दल आर डी चौधरी,अनुसूचित जाती प्रदेश महासचिव राहुल मोरे, रमेशभाऊ शिंपी , प्रदीपराव देशमुख , मा. युवक काँग्रेस अध्यक्ष रवींद्रभाऊ पोळ, तालुका अध्यक्ष मधु भाऊ गवळी , शहराध्यक्ष प्रज्वल जाधव ,कार्यअध्यक्ष निलेश भडक, तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर वाघ, नितीन पवार, मोहन बोरसे , बाप्पू चौधरी, पापालाल खरटमल, राहुल खरटमल , देविदास खरटमल , संतोष पोळ , सुनील मोची , नयन खरटमल , रवींद्र पाटील सर , राजेश येवले सर , चांगदेव खेमनार सर , अजय पालोडी या , अतिश खरटमल ,विकी खरटमल , दिनेश परदेशी ,शंकर लाल नगवारे , विशाल राठोड , संतोष पवार , कुसुमताई खरटमल , संगीता खरटमल , नीता खरटमल , लताबाई पगारे , मंदाबाई सूर्यवंशी , लता वाणी , आरती मोची , सुंदराबाई मोची , उषा जाधव , कल्पना मोची ,सुंदराबाई मोची , सुमन मोची , सीताबाई मोची , मीना नगवारे , पूजा नगवारे, सुमन नगवारे , भाविका पालोडीया, वैशाली येवले , गीता मोची तुळसा बाई मोहरकर व अनेक महिला कार्यकर्त्या व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते ...