Islampur digital

Islampur digital it's page is news updates only

06/09/2022

♦️इस्लामपूर परिसरासह महाराष्ट्रभरातील बातम्या घेऊन येतोय आपल्या सेवेत Islampur Digital ची नवीन सुरुवात..!♦️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

▪️आता इस्लामपूर शहरातील तसेच महाराष्ट्रातील काही महत्वाच्या प्रत्येक बातम्या पोहचतील आपल्यापर्यंत, कारण आम्ही घेऊन येत आहोत आपल्याच इस्लामपूर येथे आपल्या सेवेत digital media platforms ची एक नवी सुरुवात एक नवीन न्यूज चॅनेल🔹 Islampur Digital 🔹▪️
राजकीय, सामाजिक,औद्योगिक तसेच इतर सर्वच क्षेत्रातील ताज्या बातम्या लगेच जाणून घेण्यासाठी आपलं Islampur Digital हे न्यूज चॅनेल SUBSCRIBE करा तसेच हे 🔔 All icon ही प्रेस करा म्हणजे आमचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहचेल.
आम्ही अपेक्षा करतो की आपण सर्व इस्लामपूर वासीय तसेच भागातील सर्व नागरिक आम्हाला आपल्या सर्वांची सेवा करण्याची एक चांगली संधी द्याल,व आमच्या सोबत राहून सतत आम्हला सहकार्य व मार्गदर्शन करीत रहाल ही अपेक्षा व्यक्त करतो 🙏

https://youtube.com/channel/UC9H4_Faey5josoTUAKtB7NA

▪️ही ☝🏻वरील लिंक open करून चॅनेल SUBSCRIBE करा,म्हणजे आमचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहचेल🙏🏻▪️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

इंदुरीकर महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य! मुलांच्या लग्नाबाबतही म्हणाले..Islampur Digital ब्रेकिंग         प्रसिद्ध ...
06/06/2022

इंदुरीकर महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य! मुलांच्या लग्नाबाबतही म्हणाले..

Islampur Digital ब्रेकिंग

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) विविध विषयांवर आपल्या शैलीत मत मांडताना आपल्या काही वक्तव्यांमुळे सध्या जास्त चर्चेत असतात. आता त्यांच्या एका नवीन वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. जळगाव शहरातील पिंपळा येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात त्यांनी एक असंच वक्तव्य केलं आहे.
राज्यातील जळगावमध्ये बोलताना त्यांनी ऑनलाईन शिक्षणाविषयी आपलं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांनी शासकीय नोकरी असणाऱ्यांविषयीही बोलताना सांगितले की, आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. जो जास्त कष्ट करतो त्याला पगार कमी आहे आणि जे कमी काम करतात त्यांना पगार जास्त आहे. म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांच्या बुद्धीचं मोजमाप करुनच त्यानुसार त्यांचे पगार ठरवायला हवेत”, असं मत त्यांनी मांडलं.

इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले, “कोरोना काळात पोलिस होते म्हणून आपण सुरक्षित राहू शकलो. कोरोना काळात पोलिसांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. पोलिसांचे कार्य महान आहे”, असं इंदुरीकर महाराजांनी पोलीस प्रशासनाचं कौतूक करताना ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “मोबाईलच्या अति वापरामुळे विद्यार्थी शिक्षणापासून लांब चालले आहेत. कमी वयाच्या मुली पळून जात आहेत. याशिवाय तरुण पिढीला दारूचे गंभीर व्यसन लागले आणि यामुळे दारूचा खप जास्त वाढला आहे. भविष्यात या तरुणांना लग्नासाठी मुली मिळणार नाहीत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्राम या माध्यमांचा जास्त वापर केल्याने मुलांवर वाईट परिणाम देखील होत आहे यामुळे विपरीत घटना घडण्यास वाव मिळत आहे, हे सगळं थांबलं पाहिजे अशी चिंता देखील त्यांनी व्यक्त केली.
तसंच राज्यातील सर्व वारकरी एकत्र आले तर देश बदलू शकेल, विज्ञानाला अध्यात्माची जोड दिली की, पुढची पिढी घडेल, असे काही मुद्दे त्यांनी लोकांसमोर मांडले. पण शासकीय कार्यपद्धती, अधिकारी व त्यांची वेतनश्रेणी यावरुन बोलताना शासकीय कर्मचाऱ्यांची जानेवारी महिन्यांमध्ये विभागाने बुद्धी तपासून घ्यायला हवी आणि त्यावरूनच त्यांचा पगार ठरवायला पाहिजे. असं वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काही लोकांत आता नाराजीचा सूर उमटला आहे. आता पुढे काय होणार याकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

कोरोना वाढल्याने यंदाही शाळा बंद राहणार..? शिक्षणमंत्र्यांकडून महत्वाचे संकेत..!गेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा एकदा ...
06/06/2022

कोरोना वाढल्याने यंदाही शाळा बंद राहणार..? शिक्षणमंत्र्यांकडून महत्वाचे संकेत..!

गेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोके वर काढलंय. कोरोनाची चौथी लाट येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवून नुकत्याच काही सूचना केल्या होत्या. सध्या राज्यात मास्कसक्ती नसली, तरी मास्क वापराबाबत आवाहन केलं जात आहे. कदाचित लवकरच पुन्हा एकदा मास्क सक्तीचाही निर्णय होऊ शकतो..
राज्यात कोरोना हातपाय पसरत असताना, राज्यात 13 जूनपासून शाळा सुरु होत आहेत. मात्र, त्याच वेळी कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने यंदा तरी शाळा सुरु होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झालाय. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (रविवारी) महत्वाची माहिती दिली.
त्या म्हणाल्या, की “राज्यात पुन्हा कोरोनानं (Coronavirus) डोकं वर काढलंय. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं असून, कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनामुळे राज्याची चिंता पुन्हा वाढली असली, तरी यंदा शाळा बंद ठेवल्या जाणार नाही. आवश्यक ती सर्व काळजी घेऊन ठरलेल्या तारखेला शाळा सुरु केल्या जातील.”
शाळांसाठी ‘एसओपी’ जारी करु..
येत्या 13 जूनपासून राज्यातील शाळा सुरु होत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळांसाठी ‘एसओपी’ (SOP) जारी करण्यात येईल. शाळांमध्ये मास्क सक्ती करायची की नाही, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तसेच शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नवी कोविड नियमावली जारी करु, असे शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या..
कोरोनामुळे गेली 2 वर्षे शाळा बंद होत्या. त्यामुळं विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालंय. यंदा कोरोना संसर्ग वाढत असला, तरी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून नव्या नियमानुसार शाळा सुरु करणार आहोत. कोरोनाबाबत शाळांना खबरदारी घेण्याचे आदेश दिल्याची माहिती मंत्री गायकवाड यांनी दिली..
कोरोना वाढत असल्या, तरी पुन्हा शाळा बंद करणं योग्य नाही.. सध्या मास्क सक्ती नसली, तरी मास्कबाबत पुन्हा एकदा जनजागृती करावी लागणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून मास्क वापरावा, असं आवाहन गायकवाड यांनी केलं.

Address

Las Vegas, NV

Telephone

+17028868417

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Islampur digital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Islampur digital:

Videos

Share