Manoj chandurkar

Manoj chandurkar President, DCC Wardha, (M.S.)

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Mangesh Ravandle, अविनाश सुभाषराव पिंपळेडॉ पंजाबराव उपाख्...
20/12/2023

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Mangesh Ravandle, अविनाश सुभाषराव पिंपळेडॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कृषीक्षेत्रातील
वास्तव आणि वेध .

सर्व महापुरुष सदैव उच्चभावाला असतात .आपणं साधक म्हणून ते आपल्याला प्रेरक आहेत. आपले जीवन उन्नत करण्यासाठी त्यांचे स्मरण करने व त्यांचे विचार प्रसारित करणे हे आपले कर्तव्य असते. अनेकदा असे वाटते की सर्वच महापुरुष केवळ मागच्याच का शतकात होऊन गेले. आजकाल अश्या विचारांची पेरणी करून समाजाला समृध्द करणारे व्यक्तिमत्व दिसेनासे आहे. आपल्या राज्याला पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून जी ख्याती होती किंबहुना अजूनही आहे ती केवळ हे असे सर्व महापुरुष ह्या भूमीत जन्माला आले व आपला संपन्न विचार वारसा पुढील पिढ्यांना देऊन गेले ते आपले स्वतःचे आयुष्य वेचलेल्या पैकी एक म्हणजे डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख. वऱ्हाडच्या या काळया कसदार जमीन असलेल्या भौगलिकदृष्ट्या एका छोट्या पापळ ह्या गावी भाऊसाहबांचा जन्म झाला. सामाजिक, कौटुंबिक व व्यवसायिकदृष्ट्या कुठलाही ख्यातकीर्त वारसा लाभला नसतानाही एकंदर परिस्थिती पाहता व तिथे जन्म घेता पुढील वाटचालीस अडसर ठरू दिला नाही. तनामनात कर्तृत्वाचे रोम असेल तर यशोशिखर गाठणे अवघड नसते हे भाऊसाहेबांनी जगासमोर सिद्ध केले व जगभर प्रसिद्ध झाले. मनात शिक्षणाची जन्मजात ओढ ही स्वस्थ बसू देईना म्हणून उच्च शिक्षण घेण्याची उर्मी मनात सातत्याने बाळगून पुणे येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परदेशातील शिक्षणासाठी मार्गस्थ झाले.उच्च कोटीच्या शिक्षणानंतर आपल्या असामान्य बुध्दी व बुध्दीवादाने एक न्हवे दोन न्हवे तर असंख्य विचार तेही विविध प्रकारच्या विषयांवर व्यक्त केले ,लिहून ठेवले . मी परिपूर्ण होईल अथवा नाही पण माझ्या आजूबाजूचा समाज ज्यात मी जन्मलो वाढलो मोठा झालो त्या समाजाला मात्र मी सर्वांगीणदृष्ट्या प्रगत केल्याशिवाय राहणार नाही अशी खूणगाठ मनाशी बांधली व त्या दिशेने भाऊसाहबांचे पावले पुढे अविरत सरसावले ते शेवटच्या प्रवासापर्यंत .एकच ध्यास की अज्ञान ,दारिद्र्य अन् अंधकाराच्या खाईत खितपत पडलेल्या ह्या बहुजनांना मी स्वतः बाहेर काढीन त्या करिता मी वाटेल ते करीन पण मी समाजावर पिढ्यांपिढ्यासाठी अनंत उपकार करून जाईल ते स्वकर्तृत्वाने, स्वकर्तर्व्याने.
वेळोवळी ही विचारसरणी पुस्तकरूपि भाऊसाहबांचे चरित्र वाचलं तर लक्षात येते. समाजोध्दरासाठी शिक्षण,सहकार व कृषीक्षेत्रात .मूलभूतरित्या संधी उपलब्ध करून दिल्याशिवाय बहुजन समाजातील अनेक घटकांची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक वाटचाल ही अतिशय कठीण बाब आहे हे सर्व तत्कालीन परिस्थितीत भाऊसाहेबांनी वेळीच हेरले होते त्यासाठी लागणारी तिक्ष्यबुध्दी व सामाजिक ओढ व तळमळ ही त्यांच्यात होती. आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या व कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्वाभिमानाने स्थान पटकावले होते व तेही काळया आईच्या सेवेत असलेल्या कष्टकरी भूमिपुत्रांच्या शेत,पिकं व कृषी ह्या कृषिप्रधान देशाचे कृषीमंत्री म्हणून. जेव्हाचे तेव्हा आणि जिथल्या तिथं हा विचार अंगिकारून इतरांचे आयुष्य कसे यशस्वी होईल हे मनात पक्के ठरवून मी स्वतः माझ्यापरीने या देशातील पिढीजात शेतीचा वारसा व धंदा म्हणून लाभलेल्या शेतकरी व शेतमजूर हे केंद्रस्थानी ठेवून त्यांना ज्ञान,विज्ञान ,तंत्रज्ञान आत्मसात करून देण्यात मी व माझे सरकार कुठेही कमी पडता कामा नये ही बाब मनात अधोरेखित करून देण्यात भाऊसाहेब कुठेही कमी पडले नाही त्यासाठी त्यांनी आपल्या सेवेला कधीही पूर्णविराम दिला नाही तो शेवटच्या क्षणापर्यंत. कोठल्याही सजिवाची मूलभूत गरज ही प्रामुख्याने अन्न व ह्याबाबतीत देश स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम करून तो ध्यास पूर्णत्वास नेण्यासाठी प्रचंड आशावाद बाळगून कार्य केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे वेळीच ओळखून आज राज्यातीलच नव्हे तर देशातील नामांकित अग्रेसर असलेल्या आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था ह्याची अभूतपूर्व निर्मिती केली व खऱ्या अर्थाने शिक्षण तळागाळातील लोकांपर्यंत पाझरले .आज ह्याची फळे या देशातील अनेक लोकं करोडोच्या संख्येने जगभरात स्थाईक होऊन उपभोगत आहेत. ज्यावेळी राज्यातील इतरत्र भागात कारखानदारी वाढत होती त्यावेळी विदर्भात मात्र शिक्षणाची गंगा दारोदारी पोहचविण्यासाठी भाऊसाहेब देशमुख आपले आयुष्य वेचत होते. भाऊसाहेब हे जणू शिक्षणाचे क्रांतिकारक म्हणून जर विदर्भात जन्माला आले नसते व गेल्या तब्बल ९३ वर्षांपूर्वी जर ही शिक्षणाची सोय म्हणा की संधी उपलब्ध करून दिली नसती तर विचार करा की आज आपली इथली माणसं कोणत्या सामाजिक, आर्थिक शैक्षणिक व राजकीय परिस्थितीत असती! केवळ हा एक साधा विचार जेव्हा मनाला स्पर्श करून जातो त्यावेळी क्षणभरासाठी मन सुन्न होऊन जाते! म्हणून वारंवार जो उल्लेख केला जातो की भाऊसाहबांनी अनेक पिढ्यंपासून अनेक पिढ्यांपर्यंत अनंत उपकार केले आहे.अनेकांचा एकाच वेळी सर्वांगीण प्रगतीचा दैदिप्यमान इतिहास रचता यावा म्हणून प्रगत ज्ञान व तंत्रज्ञान पोहोचणे आवश्यक आहे हे पाहून त्यांनी सन १९६० -६१ मधे तब्बल ८२ दिवसांचे देशाची राजधानी दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित केले.अतिभव्य असे कृषीप्रदर्शनात आपल्या देशातील जवळपास अनेक राज्यातील कृषीविषयक दालने उभी करण्यात आली होती त्यामुळे भौगलिकदृष्ट्या विशालकाय देशातील विविध प्रांतातील लोकांनाही विविध पिके एकाच वेळी एकाच ठिकाणी दररोज पाहता आली व त्यातून आत्मबोध घेता आला . अतिभव्य अश्या न भूतो न भविष्यती प्रदर्शनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व रशियाचे राष्ट्राध्यक्ष हजेरी लाऊन गेले . आपल्या देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले सर्वच महापुरुष ह्या भूमीत भरलेल्या ह्या दैदिप्यमान कृषी प्रदर्शनात सहभागी झाले होते. इतिहासावर एक धावता कटाक्ष टाकला तर ते सर्व आपल्याला दिसते. वर्ष २०२३ हे भाऊसाेबांचे शतकोत्तररौप्यमहोत्सवी म्हणजे १२५ वे जयंतीवर्ष व हे सर्वदूर साजरे होत आहे. भाऊसाहेबांच्या समाजाप्रती , शेतकऱ्यांप्रति हा जो मूलभुत विकासाचा विचार देशातील कानाकोपऱ्यातील जनमनात पोहचावा व तो आपापल्या परीने कणभर का होईना स्वयंपूर्ण होण्यासाठी आचरणात आणायला सुरुवात केली तर पुन्हा एकदा शेती ही सुजलाम सुफलाम.म्हणजे शेती ही उन्नत व शेतकरी हा समृध्द व्हावा. पुन्हा एकदा तो स्वाभिमानाने झळकणाऱ्या जणू तेजस्वी योग्यासारखा सिद्ध व्हावा अशी आशा बाळगून व भाऊसाहेबांनी जगासमोर यशस्वी केलेली दिल्लीतील कृषीप्रदर्शने त्यांच्याच पुढाकाराने सुरू केलेल्या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संचालित व भाऊसाहेबांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलंग्न तब्बल ६४ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथे आयोजित विस्तीर्ण अश्या परिसरातील कृषी प्रदर्शनास लवकरच दीं २७ डिसेंबर डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५व्या)वर्षानिमित्त प्रारंभ होत आहे.हे प्रदर्शन २७- ३० डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. वैशिषट्यपूर्ण बाब म्हणजे विदर्भात लागवड करण्यायोग्य विविध उभ्या पिकांचे प्रात्यक्षिक क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे .वातावरणाच्या प्रतिकूल परिस्थितीतही योग्य तंत्राचा अवलंब करून पिकं दगा देणार नाहीत यासाठी नेमके कसे तंत्र वापरावे यासाठी तज्ञ मार्गदर्शक उद्बोधन करणार आहेत. जवळपास ३००च्या विविध प्रकारचे कृषी निविष्ठा दालने व विक्रेत्यांची वैचारिक आदानप्रदान होणार आहे.उत्पादक ते उपभोक्ता ही शृंखला गळून पडली असताना ती पुन्हा एकदा कशी बळकट होईल असे प्रयत्न करण्यासाठीचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील व इतर राज्यातील १०० पेक्षा जास्त विविध जातीचे देशी, विदेशी नामांकित पशुधन एकत्र आणून पशुप्रदर्शन याच ठिकाणी आयोजित आहे .दुग्ध व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे असे व्यवसायिक यात समायोजित आहेत. विविध उपकरणांचे दालने बघण्यासाठी खुली असणार आहेत. हा संपूर्ण विस्तीर्ण कृषी प्रदर्शनाचा जवळपास शेकडो एकर क्षेत्राचा विस्तार बघतल्यावर सुग्रास भोजनाचा आस्वाद घ्यावा यासाठी जवळपास चार एकर क्षेत्रावर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रेते सहभागी होण्यासाठी पाचारण करण्यात आली आहे. युनो नी २०२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले आहे.मानवी आरोग्य अबाधित राहिले पाहिजे असे प्रयत्न करीत असताना ही पिकं प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहण्यासाठी भरड धान्य पिके उभी करण्यात आली आहे. चिया सारखी नावीन्यपूर्ण पिकं प्रात्यक्षिके प्रत्यक्ष उभी करण्यात आली आहे. विविध नामांकित कंपनीचे उभी पिकं व दालने बघण्यासाठी पुढील पंधरवड्यात शेवटच्या आठवड्यात २७ ते ३० ह्या तारखांचे विस्मरण होऊ देऊ नये ही एक नामी संधी आहे. विदर्भातील अमरावती येथे श्री शिवाजी कृषी महाविद्यालय प्रक्षेत्रावर आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला( उभी पिकं प्रात्यक्षिके व इतर सर्व)भेट देऊन गेल्या एक वर्षापासून सुरू करण्यात असलेली तयारी व सर्वांगीण सर्वतोपरी सर्वांचे प्रयत्न त्यातून आपल्याला प्रदर्शनाला भेट दिल्यानंतरचे प्राप्त होणारे समाधान हीच खरी आमची मनापासुन डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली ठरेल .

प्रा.आर.के.पाटील

20/12/2023
सिंदी रेल्वे
17/09/2023

सिंदी रेल्वे

जनसंवाद यात्रेदरम्यान समुद्रपूर येथील जाहीर सभा..
15/09/2023

जनसंवाद यात्रेदरम्यान समुद्रपूर येथील जाहीर सभा..

14/09/2023

जनसंवाद पदयात्रेचे जाम चौरस्त्यावर भव्य स्वागत...
माजी पालकमंत्री मा.आ. सुनिलभाऊ केदार, प्रदेश उपाध्यक्ष मा.सौ.चारुलताताई टोकस यांचा सहभाग..

जनसंवाद पदयात्रा....तरोडा ते सेवाग्राम.
14/09/2023

जनसंवाद पदयात्रा....तरोडा ते सेवाग्राम.

ग्रेट भेट...🙏अनाथांचे नाथ शंकरबाबा पापडकर,..
15/09/2022

ग्रेट भेट...🙏

अनाथांचे नाथ शंकरबाबा पापडकर,..

Address

Waifad
Wardha

Telephone

+918830243987

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manoj chandurkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category