अष्टपैलू विषयी सविस्तर:
प्रश्न:सुरुवात कशी झाली?
उत्तर: आजच्या धकाधकीच्या युगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. काही समस्या ह्या एखाद्या गोष्टीची योग्य माहिती नसल्यामुळे उद्भवत असतात. बऱ्याच समस्या आपण एकमेकांची मदत घेऊन सोडवू शकतो. त्याच बरोबर एखादा मोठा उपक्रम राबवायचा असेल तर सर्वांना एकत्र करावे लागते. विचारांची देवाण-घेवाण, एकमेकांमधील सुसंवाद, एकमेकांवरचा वि
श्वास वाढणे गरजेचे असते. हाच विचार समोर ठेवून आपण स्वतःसाठी आणि पर्यायाने सर्वांच्या विकासासाठी काय करू शकतो? याविषयी खळवट लिंबगाव येथील काही तरुणांनी १४/०१/२०२१ रोजी चर्चा केली, चर्चेअंती असं निश्चित करण्यात आलं की गावातील आणि पंचक्रोशीतील बहुतेक तरुण दैनंदिन जीवनात लागणाऱ्या व्यावहारिक कौशल्यात कमी पडत आहेत आणि त्यासाठीच जागरूक आणि जाणकार युवकांचे संघटन करायचे.
प्रश्न: अष्टपैलू नाव का?
उत्तर: आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनावर चर्चा करुन संबंधित समस्यांचे संभाव्य ऊत्तर शोधन्याचे काम गृप मध्ये केले जावे. पुढे चालून प्रत्येकजन अष्ठपैलू असला पाहिजे म्हणून गृपचे नाव अष्टपैलू असे ठेवण्यात आले.
प्रश्न:एकत्र येऊ समृद्ध होऊ, हे ब्रीद का?
उत्तर: एका काठीची ताकद मर्यादित असते पण तीच मोळी झाली तर ताकत वृद्धींगत होते म्हणूनच सर्वांच्या कौशल्याची ताकत जर एक झाली तर त्याची मोळी बनेल आणि तीच समृद्धीची गुरुकिल्ली ठरेल त्यामुळेच
एकत्र येऊ, समृद्ध होऊ
हे ब्रीद ठरले.
प्रश्न:तुम्ही सुरवात केलीत पण संकल्पनेवर काम कस केलंत?
उत्तर: वरील ब्रीद पुढे घेऊन जाण्यासाठी, प्रत्येक रविवारी आणि बुधवारी एकत्र येऊन विविध विषयावर चर्चा करायचे निश्चित केले. बैठकीचे स्वरूप औपचारिक असावे असे ठरले. प्रत्येक बैठकीमध्ये वेगवेगळे उपक्रम चर्चा करून ठरू लागले.
त्यामध्ये संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी पुढे येऊन स्वतः विषयी माहिती सांगणे , वेगवेगळ्या विषयावर निबंध लिहिने, कार्यालयीन अर्ज लिहिण्याचा सराव करणे, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून स्वतःला समृद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली. बोलत असताना काही चुका होत असतील तर त्या सांगण्यात आल्या. अशा सरावामुळे ग्रुपमधील प्रत्येकाचे स्टेज करेज वाढले, बोलण्यामध्ये आत्मविश्वास दिसू लागला, तसेच विविध विषयावर वाचन करण्याची गोडी निर्माण झाली.
वेळोवेळी काही ग्रुप सदस्यांनी वेगवेगळ्या विषया वर मार्गदर्शन केले. उदाहरणार्थ बँकिंग व्यवस्था कशी चालते, जीवन विमा ,संगणक, मोबाईल ॲप्लिकेशन, शेअर मार्केट, आभासी चलन, पीक विमा, gatt करार इत्यादी एक ना अनेक.
एका बैठकीमध्ये प्रत्येक सदस्याने आपापला शैक्षणिक प्रवास कसा झाला? हे सांगितले त्यामुळे प्रत्येक जन एकमेकांना ओळखू लागला. आत्तापर्यंत एका गावात असूनही अनोळखी असणारी माणसं आपली वाटू लागली. बोलत असताना मोकळेपणा जाणवू लागला. एकमेकांविषयी असणारा विश्वास व आदर अधिकच घट्ट झाला.
प्रश्न:फक्त विचारांवर समृद्ध कसे व्हाल?
उत्तर: ग्रुपचं काम फक्त वैचारिक न राहता, सदस्य जे काही कौशल्य आत्मसात करत आहेत त्यास वाव मिळावा आणि कौशल्यांचा सराव व्हावा म्हणून अष्टपैलूस कार्यात्मक स्वरूप देण्याच्या उद्देशाने ग्रुपने कार्यशाळा भरवाव्यात, पंचक्रोशीतील युवक जोडण्यासाठी संघटनात्मक उपक्रम हाती घ्यावेत असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
यानुसार आजपर्यंत संघटन बांधणी, अराजकीय शेतकरी आंदोलनास पाठिंबा देने, शेतकऱ्यांमध्ये तांत्रिक बाबींची जनजागृती करणे, गरज ओळखून माफक दरात लाईफ सेव्हिंग फ्लोटिंग वॉटर जॅकेट बनवणे, स्वामिनाथन आयोग अभ्यास कार्यशाळा, झाडांचा डेटाबेस तयार करणे, पंचक्रोशीतील युवकांच्या चालू स्वभावाचा स्टॅटिस्टिकल अभ्यास, अनगदी पिकांच्या बाजार भावावर अभ्यास करणे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा public relational database तयार करणे, युवकांशी व्यवसायिक अभ्यासक्रम शिकलेल्या विध्यार्थ्यांना जोडणे, आरोग्य शिबीर घेणे असे एक ना अनेक उपक्रम हाती घेतले असून त्यातील काही पार पडले आहेत तर काहीवर काम चालू आहे आणि बाकी नियोजित वेळेत पार पडतील अशी शक्यता दिसते.
सुरवातीला लिंबगावपूरता मर्यादित असलेला ग्रुप आता १० खेड्यांमध्ये विस्तारित झाला असून १०० च्या वर सदस्य ग्रुपशी जोडले गेले आहेत, सोबतच सर्व क्षेत्रातील मार्गदर्शक जोडणीवर ग्रुप काम करत आहेत जेणेकरून सर्वाना समृद्ध व्हायचं असेल तर एक ना अनेक कौशल्य असलेले बुद्धिमत्तेचे लोक ग्रुप मध्ये असणे अत्यावश्यक आहे.
प्रश्न:अष्टपैलूशी युवक, युवती, शेतकरी कशा प्रकारे जोडल्या जोडले जाऊ शकतात?
उत्तर:
३ पद्धतीत जोडल्या जाऊ शकतात
१. नियमित व सक्रिय सदस्य - आठवडी बैठकीत हजेरी लावणे क्रमप्राप्त आहे.
२. अनियमित सदस्य- आठवडी बैठकीस उपस्थिती बंधनकारक नाही पण अष्टपैलू ग्रुपच्या उपक्रमास हातभार लावणे.
३. निमंत्रीत - ग्रुप समविचारी लोकांना चर्चेसाठी आमंत्रित करू शकतो. सदस्य होण्याची गरज नाही.
४. मार्गदर्शक- अराजकीय, सामाजिक स्थान दृढ केलेले, स्वच्छ चारित्र्याचे आणि विविध विषयातील तज्ञ व्यक्ती सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकतात त्यांना मार्गदर्शक म्हणले जाईल, त्यांना ग्रुपचे सदस्य होणे बंधनकारक नाही.
प्रश्न:अष्टपैलूचा लोगो आहे का?
उत्तर: हो आहे.
प्रश्न:अष्टपैलू ग्रुप शासन स्तरावर society act प्रमाणे नोंदणीकृत आहे का?
उत्तर: नोंदणी प्रक्रिया चालू आहे?
प्रश्न:अष्टपैलूचे अंतिम ध्येय काय?
उत्तर:युवकांचा स्वयंविकास व्हावा त्यासाठी त्यांना एकत्रित आणून एकदुसऱ्यापासून कौशल्य शिकून ते योग्य ठिकाणी अमलात आणणे आणि समृद्ध होणे.
प्रश्न:अष्टपैलूची राजकीय भूमिका काय?
उत्तर:सध्यातरी कोणतीही राजकीय भूमिका नाही, अजून ग्रुप चालू होऊन खूप मोठा असा कालावधी लोटला नाही त्यामुळे राजकीय भूमिका घेण्याइतपत किंवा स्पष्ट करण्याइतपत ग्रुप निष्कर्षापर्यंत आलेला नाही, अराजकीय काम करण्यासारखं भरपूर आहे. पण ग्रुप मधील सदस्याला लोकशाही मार्गाने तिचा/त्याचा पर्याय निवडायचा, निर्णय घ्यायचा सर्वस्वी अधिकार आहे, ग्रुप पाठिंबा देईल किंवा देणार नाही याबद्दल कसलीही चर्चा झालेली नाही. या विषयावर अधिक बोलणे संयुक्तिक ठरणार नाही.
प्रश्न:बैठका कुठे होतात?
उत्तर:वेगवेगळ्या गावातील सक्रिय सदस्य जागा बदलून बैठक आपापल्या गावात घेतात.
प्रश्न:कधी बैठका होतात?
उत्तर:बुधवारी आणि रविवारी रात्री ८ ते १० या वेळेत. ऑनलाइन आणि ऑफलाईन मार्गाने.
प्रश्न:अष्टपैलू जे काही विविध उपक्रम हाती घेतो त्यास कोण आर्थिक पाठबळ पुरवत?
उत्तर:सदस्य वर्गणी करतात, दानशूर दान देतात. त्यातून उपक्रम पार पाडतात.
प्रश्न:अष्टपैलूत कोण सहभागी होऊ शकत?
उत्तर:कोणीही ज्याला एकत्र काम करायला आवडत.
प्रश्न:अष्टपैलुत सध्यातरी कोण कोणत्या क्षेत्रातील तरुण आहेत?
उत्तर:शेती, अभियांत्रिकी, सामाजिक, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, चळवळीतील कार्यकर्ते ई. ही यादी वाढत जाईल.
प्रश्न:आपण बैठकांचे टिपण ठेवता का?
उत्तर:अष्टपैलूच्या फेसबुक प्रायव्हेट ग्रुप वर आठवडी बैठकाचे टिपण, अष्टपैलू ग्रुपचे उपक्रम व त्यावरील अपडेट्स, सदस्यांनी एक दुसऱ्याला केलेली मदत किंवा केलेले मार्गदर्शन प्रसारित केले जाते.
प्रश्न:अष्टपैलूची प्रसिद्धीची जबाबदारी कोण घेत आहे?
उत्तर:सर्व सदस्य
प्रश्न:प्रसिद्धीसाठी कोणत्या माध्यमांचा वापर आपण करता?
उत्तर:सर्व समाज माध्यमं, वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमं, ऑडिओ माध्यमं, प्रत्यक्ष भेटून, मासिकांत लेख प्रसिद्ध करून आदी.
प्रश्न:तुम्हाला कोणी आर्थिक मदत करावयास तयार असेल तर कशी करावी?
उत्तर: कोणाकडूनही आर्थिक मदत घेतली जात नाही, अष्टपैलू सदस्य असाल तर उपक्रमात शक्य असल्यास जबाबदारी घेऊ शकता.
प्रश्न:अष्टपैलूमध्ये पदाधिकारी आहेत का?
उत्तर:नाही.
प्रश्न:ग्रुप मध्ये संस्थाथमक रचना नाही तर ग्रुप कसा चालेल?
उत्तर:हा एक प्रयोग आहे, करून पाहू.
प्रश्न:ग्रुपमध्ये अंतर्गत वाद होतात का
उत्तर: No internal questions please.
प्रश्न:ग्रुपला कोणी प्रवक्ता आहे का?
उत्तर:तुम्हाला,लवकरच कळेल.
प्रश्न:अष्टपैलूंचे कार्यालय कुठे आहे?,अष्टपैलुशी संपर्क कसा करावा?
व असे
अनेक प्रश्न
आजच्यापुरत एवढंच! आधी काम करू, नंतर बोलू.
धन्यवाद!