Mouj Prakashan Griha

Mouj Prakashan Griha मराठी साहित्यक्षेत्रातील नामांकित त?
(1)

मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रकाशन संस्था म्हणून मौज प्रकाशन गृह ही संस्था गेली ५० हून अधिक वर्षे ख्यातनाम आहे. मौज प्रकाशन गृह नेहमीच नवनव्या प्रतिभावंतांच्या प्रयोगशील रुपांच्या निर्मितीला प्राधान्य देते. साहित्य, कला यातील नव्या-जुन्या विचारप्रवाहांना समजून घेत, त्यांना वाङ्मयात सामावून घेण्याचा प्रयत्न करत `मौज’ने मराठी साहित्यविश्र्वावर स्वत:ची अमीट नाममूद्रा उमटवली आहे. मौज प्रकाशनाने विविध प्रका

रचे निवडक परंतु महत्वाचे लेखन प्रकाशित केले आहे.
सर्वात जास्त साहित्य अकेदमी पारितोषिके मौजेच्या पुस्तकांना मिळाली आहेत. गेल्या २-३ पिढ्यांतील बहुतेक मान्यवर लेखकांची पुस्तके मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत. उत्कृष्ट संपादनाचा ध्यास, बिनचूकतेचा आग्रह आणि सुरेख छपाई यामुळे मौज प्रकाशनाची पुस्तके आगळी-वेगळी ठरतात. विष्णुपंत भागवतानी सुरुवात केलेल्या मौज प्रकाशन गृहाच्या आजपर्यंतच्या यशात श्री.पु. भागवत, राम पटवर्धन, श्रीनिवास विनायक कुळकर्णी, गुरुनाथ सामंत व मोनिका गजेंद्रगडकर यांच्या संपादनदृष्टीचा सिंहाचा वाटा आहे.

Address

Municipal Bhaji Market, Vallabhbhai Patel Road, LIC Colony, Suresh Colony
Vile Parle West
400056

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+919769526577

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mouj Prakashan Griha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mouj Prakashan Griha:

Share

Category