Maharashtra Majha News

  • Home
  • Maharashtra Majha News

Maharashtra Majha News Local News - Best News

06/11/2024

मुंब्य्रात छत्रपती शिवरायांचं मंदिर बांधा आम्ही मदत करू; देवेंद्र फडणवीस


06/11/2024

महाराष्ट्राच्या प्रचारात धडाडली योगी आदित्यनाथ यांची तोफ


विशेष निवडणूक निरीक्षक बी.आर.बालकृष्णन यांनी घेतला ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावाठाणे (दि.07): येत्या ...
06/11/2024

विशेष निवडणूक निरीक्षक बी.आर.बालकृष्णन यांनी घेतला ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा

ठाणे (दि.07): येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष ‍निवडणूक निरीक्षक (निवडणूक खर्च) बी.आर. बालकृष्णन यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. ठाणे हा राज्यातील महत्वाचा जिल्हा असल्याने सर्व 18 विधानसभा मतदारसंघातील निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.

या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त दत्ता शिंदे, ठाणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, 18 विधानसभा निवडणूक मतदारसंघांसाठी नियुक्त केलेले केंद्रीय खर्च निरीक्षक आशिषकुमार पांडेय, रविंदर सिंधू, सुरेंद्र पाल, श्री.जी मनीगंडासामी, जिल्हा समन्वय अधिकारी, नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत विशेष निवडणूक निरीक्षक बी.आर. बालकृष्णन यांनी निवडणूक प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच पोलीस, एसएसटी, एफएसटी, राज्य उत्पादन शुल्कामार्फत आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई याबाबतची माहितीही त्यांनी घेतली. तसेच त्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या. ठाणे जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्यांवर आतापर्यंत केलेल्या कारवाईत सापडलेला अवैध मद्यसाठा, तसेच अनधिकृतपणे ने-आण करण्यात असलेल्या रोख रक्कम याबाबतचा आढावा देखील त्यांनी घेतला. तसेच आतापर्यंत जी कारवाई करण्यात आलेली आहे त्याचा डेटाबेस तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून गोवा, दमण येथून अवैधरित्या येत असलेला मद्यसाठा, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, उल्हासनगर येथील हातभट्ट्यावरुन होणारी मद्याची अवैध विक्री याबाबतचा आढावा घेत असताना कारवाई दरम्यान ड्रोनचा वापर करावा, असेही त्यांनी नमूद केले. तसेच रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या तपासणीचा आढावा घेत असताना रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या व संशयास्पदरित्या आढळणाऱ्या प्रवाशांची देखील तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विशेष निवडणूक निरीक्षक बी.आर बालकृष्णन यांनी एकूणच जिल्ह्यात विविध पथकांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेत असतानाच सी-व्हीजीलवर प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकारण याबाबतची माहिती जाणून घेतली. विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करावी, असेही त्यांनी सूचित केले.

‍ ‍मतदानासाठी काहीच दिवस शिल्लक असून सर्वांनी 24 तास सतर्क राहून पूर्ण क्षमतेने काम करावे व संपूर्ण मतदान प्रक्रिया उत्साही वातावरणात सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या.

: महाराष्ट्र माझा न्यूज

06/11/2024

शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांची भव्य प्रचार रॅली

: महाराष्ट्र माझा न्यूज । ठाणे




नजीब मुल्ला यांच्या खारीगाव येथील निवडणुक प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसादप्रतिनिधी ౹ ठाणेराष्ट्रवादी काँग्रे...
06/11/2024

नजीब मुल्ला यांच्या खारीगाव येथील निवडणुक प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी ౹ ठाणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या निवडणुक प्रचारार्थ महायुती आणि घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक ९ येथून एकत्रित निवडणूक प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. त्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅलीत शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपनेते दशरथ पाटील, शहरप्रमुख नरेंद्र शिंदे उपशहरप्रमुख मनोज ल्हासे, स्थानिक नगरसेवक उमेश पाटील, राजेंद्र साप्ते, गणेश साळवी, विजया ल्हासे, अनिता गौरी, गणेश कांबळे यांच्यासह मोठ्यासंख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोशपूर्ण वातावरणात उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या निवडणुक प्रचाराची रॅलीची सुरुवात खारीगाव नाका येथून शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आली. यावेळी फटक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नजीब मुल्ला यांच्या विजयाच्या जोरदार घोषणाही दिल्या.

खारीगाव नाका, पाखाडी नाका, हिरादेवी मंदिर, आझाद चौक, होळीमाता चौक, मनोज ल्हासे जनसंपर्क कार्यालय, विठ्ठल मंदिर, केशव हाईटस, आदर्श पारसिक मित्र मंडळ, नंदनवन होम्स, नेचर ग्लोरी, रिलायन्स मार्केट, वास्तुआनंद सोसायटी, राजपार्क सोसायटी या मार्गावरून रॅली जाऊन चाव॔डाई मंदिर येथे नजीब मुल्ला यांच्या निवडणुक प्रचार रॅलीचा समारोप करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

05/11/2024

धर्मवीर 2 सिनेमा आता ZEE5 या OTT वर प्रदर्शित

: महाराष्ट्र माझा न्यूज


भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधीठाणे, ( दि.5 ) : भारतीय सैन्यदल नौदल व वा...
05/11/2024

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

ठाणे, ( दि.5 ) : भारतीय सैन्यदल नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाटी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि.02 डिसेंबर 2024 ते 11 डिसेंबर 2024 या कालावधीत SSB कोर्स क्रमांक 59 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे.

ठाणे व पालघर जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलाताल अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ठाणे येथे दि.27 नोव्हेंबर 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील SSB-59 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेवून व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

या SSB वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेवून यावेत.

(अ) कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाटी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतासाठी पात्र झालले असावे,

(ब) एनसीसी "C" सटिफीकेट "A' किंवा 'B' ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वाटरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी.

(क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतासाठो कॉल लेटर असावे.

(ड) विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठा एसएसबी कॉल लेटर असावे किवा SSB साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असाव. अधिक माहितीसाटी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: [email protected] व दूरध्वनी क्र. 0253-2451022 व भ्रमणध्वनी क्र. 9156073306 असून कायांलयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूर्ध्वनीवर संपर्क करावा अस आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालधर यांनी केले आहे.

: महाराष्ट्र माझा न्यूज

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दि.06 नोव्हेंबर पासून दररोज रक्तदान शिबिराचे आयोजनठाणे (दि.05 )ठाणे, मुंबई शहरामध्ये गरजू ...
05/11/2024

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दि.06 नोव्हेंबर पासून दररोज रक्तदान शिबिराचे आयोजन

ठाणे (दि.05 )ठाणे, मुंबई शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने गुरुवार, दि.6 नोव्हेंबर 2024 पासून रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), सिव्हिल रूग्णालय ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ, ठाणे येथे रक्तदान शिबिराचे दररोज आयोजन करण्यात येणार आहे.

तरी इच्छुक रक्तदात्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी, महाविद्यालयीन तरूण-तरूणींनी स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करावी व रक्तदान करून या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी केले आहे.

: महाराष्ट्र माझा न्यूज

05/11/2024

ठाणे जिल्ह्यातील मतदानासाठी प्रशासन सज्य; अशोक शिनगारे यांनी दिली माहिती

: महाराष्ट्र माझा न्यूज


05/11/2024

देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

05/11/2024

हा मतदार संघ माझ्यावर प्रेम करणारा,जनतेने पाच वेळा येथून विकासासाठी निवडून दिलं, यावेळी देखील जनता निवडून पाठवेल; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

05/11/2024

केदार दिघे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब ( पहा व्हिडिओ )



05/11/2024

मुख्यमंत्रीपद निवडणुकीनंतर निश्चित होईल; देवेंद्र फडणवीस


News Update : कळवा-मुंब्रा विधानसभेतून जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार  ज्योत्स्ना अमर हांडे यांना निवडणूक आयोगाने शिलाई ...
05/11/2024

News Update : कळवा-मुंब्रा विधानसभेतून जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार ज्योत्स्ना अमर हांडे यांना निवडणूक आयोगाने शिलाई मशीन हे निवडणूक चिन्ह दिल आहे. जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सुभाष सांबरे यांनी ठाणे व कळवा-मुंब्रा या विधानसभेत आपलेशिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. समाजकारणा सोबत राजकारणात हि चांगले कार्य करण्याचा निश्चय जिजाऊने समोर ठेवून विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले आहेत.

विशेष म्हणजे १४९ - कळवा-मुंब्रा विधानसभा निवडणूक २०२४ साठी ज्योत्स्ना अमर हांडे या तरुण व सुशिक्षित महिला उमेदवार आहेत त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे मत सुभाष सांबरे यांनी व्यक्त केले



05/11/2024

LIVE । देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक प्रचाररॅली

: महाराष्ट्र माझा न्यूज । नागपूर


मतदारांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने मतदान केंद्रांवर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध कराव्यात;-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी...
04/11/2024

मतदारांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने मतदान केंद्रांवर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध कराव्यात;-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, (दि.04):- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा जिल्हाधिकारी तथा ‍जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी आज घेतला. मतदान केंद्रावर मतदारांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोईचा सामना करावा लागणार नाही व मतदान शांततेत पार पडेल, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने व गांभीर्य लक्षात घेवून काम करण्याचे निर्देश सर्वांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज आश्वासित सोईसुविधांबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी ‍ तथा ‍जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, महापालिकांचे नगर अभियंता, तसेच ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर सोईसुविधांसाठी कार्यरत असलेले अभियंते उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिका हद्दीत 1 हजार 546 मतदान केंद्रे , कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत 1 हजार 261 मतदान केंद्रे, ग्रामीण भागात 1 हजार 124 मतदान केंद्रे, नवी मुंबई महापालिका हद्दीत 831 मतदान केंद्रे, मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत 755 मतदान केंद्रे, भिवंडी महानगरपालिका हद्दीत 586 मतदान केंद्रे, उल्हासनगर महानगरपालिका 399 मतदान केंद्रे, तर सर्व नगरपालिका हद्दीत 453 मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रावर पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांची जबाबदारी ही त्या त्या महानगरपालिका, नगरपालिका यांची असून ग्रामीण भागातील मतदान केंद्राची जबाबदारी ही जिल्हा परिषदेकडे आहे. या सर्व मतदान केंद्राची पाहणी ही त्या त्या आस्थापनातील अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून करण्याचे निर्देशही ‍जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी दिले.

ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी सूचना फलक,‍ दिशादर्शक, दिव्यांगासाठी रॅम्पची सुविधा, मतदार सहाय्य केंद्र, पुरेशी व्यवस्था, मंडप व्यवस्था,पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छ स्वच्छतागृहे, प्रतिक्षालय, रांगेतील मतदारांसाठी खुर्च्यांची व्यवस्था तसेच मंडपात असलेल्या मतदान केंद्रानजीक मोबाईल्‍ टॉयलेटची व्यवस्था, प्रथमोपचार सुविधा, मतदान केंद्रावर पाळणाघर, तसेच दिव्यांगासाठी व्हीलचेअरची सुविधा, पार्टीशन मध्ये तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर लावण्यात येणाऱ्या रांगांसाठी जागेची उपलब्धता आदी सर्व सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियोजन करावयाचे आहे. तसेच मतदान केंद्रावर आदल्या दिवशी पासून जाणाऱ्या मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना लागणारी आवश्यक साधनसामुग्री देखील उपलब्ध करुन देण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. तसेच त्या मतदान केंद्रावर काही अडचण निर्माण होत असतील तर त्याबाबतची माहिती तात्काळ कळवावी, त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असेही ‍जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले.

या बैठकीत ठाणे ‍जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील बूथ व त्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या सुविधा याबाबतची माहिती ‍जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी (PPT) सादरीकरणाच्या माध्यमातून अभियंत्यांकडून घेतली. तसेच विधानसभा मतदान केंद्राची पाहणी आपण स्वत: तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

: महाराष्ट्र माझा न्यूज

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात18 विधानसभा मतदारसंघातून वैध ठरलेल्या 334...
04/11/2024

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

18 विधानसभा मतदारसंघातून वैध ठरलेल्या 334 उमेदवारांपैकी 90 उमेदवारांचे अर्ज मागे

ठाणे, (दि.04 ) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस होता. ठाणे ‍जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 381 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एकूण 334 उमेदवारांचे अर्ज वैध तर 47 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. वैध ठरलेल्या 334 उमेदवारांपैकी आज एकूण 90 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

04/11/2024

सदा सरवणकर आणि अमित ठाकरे आमने सामने ; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Address


Telephone

+919930608000

Website

https://www.maharashtramajha.digital/, https://whatsapp.com/channel/0029V

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Majha News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maharashtra Majha News:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share