20/05/2022
#तदेवलग्नम
लग्नात मंगलाष्टकातला हा शेवटचा श्लोक किंवा शेवटचं कडवं. हे म्हणताना मला वाटतं भटजी आपली शास्त्रोक्त गायकीची पुरेपुर हौस फेडुन घेतात. गोsssssssदावरी म्हणताना असा काही आलाप लावता की भीमसेन जोशी कुमार गंधर्वांची ऐशीकी तैशी.
परत त्यात नवरी कडचे नवरदेवकडचे हौशेनवशे पण हात धुऊन घेता. खर म्हणजे गळा धुऊन घेतात असच म्हणाव लागेल. मंगलाष्टक खर अंगात शेवटाला येतं. दोन्ही हात वर करुन तारा बलंम सुदीनंम तदेव. विद्या बलंम दैव बलंम तदेव वेळी.
मग वाजंत्री सावधान, फोटो ग्राफर पण सावधान म्हणतात. शेवटी लक्ष्मी पते... म्हटलं की टाळी वाजते. फटाके काय वाजंत्री काय, एकच बहु गलबला होतो.
सगळ्यात आश्चर्य म्हणजे लगेच माईक वर कुणीतरी सुचना दिली, मारुती 800 लाल रंगाची कुणाची आहे? त्यांनी त्वरित बाजुला करावी. मागची गाडी काढता येत नाही. हे म्हणजे आमरस खाताना मधेच कढीचा घोट घेतल्यासारख झालं 😀