EX7 News

EX7 News EX7 News is a Hindi National News Channel supported by India's largest News Agency, We have experime

15/09/2024
14/07/2024

Incessant rainfall causes waterlogging in residential areas of Bhiwandi, Thane

07/07/2024

पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करण्याचा निर्णय घेणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहे. याशिवाय लाखो शेतकऱ्यांना नॅनो-तंत्रज्ञान खतांचे वितरण करण्याची सुरवातही केली आहे. तृणधान्य अभियानात श्री अन्न म्हणून सावा, राळा-भुरका यांसह विविध तृणधान्यांना प्राधान्य देण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. त्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करणारे महाराष्ट्र हे अव्वल राज्य ठरले आहे. या तृणधान्यांना एमएसपी देण्याचा निर्णयही महाराष्ट्राने घेतला आहे. नुकताच देशातील विविध सहा ( महाराष्ट्रासह, राजस्थान, म.प्रदेश, गुजरात, गोवा आणि दमण) राज्यांच्या रब्बी पिकांच्या हमी भावाच्या शिफारशीकरिता मुंबईत केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपाल शर्मा यांच्या समोर झाली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे अशा बैठकीत उपस्थित राहिले. या दोघांनीही या बैठकीत ठोस अशी भूमिका मांडली. एमएसपी ठरवणाऱ्या बैठकीत आपल्या राज्याची भूमिका मांडणारे , सत्तर वर्षातील एकमेव मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे यांचा उल्लेख केला जाईल. या शिवाय केंद्रीय कृषी मुल्य आयोगाच्या अध्यक्षांनी आयोगांची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठविला जाईल, असे सुतोवाच केले. हे केवळ मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमुळेच शक्य झाले आहे, असेही श्री. पटेल यांनी नमूद केले आहे. अन्न सुरक्षा आणि पर्यावरणाची काळजी या दोन्ही आघाड्यांवर महाराष्ट्र सरकार काम करत आहे. त्यामागे मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचा पुढाकार कारणीभूत आहे. अलिकडेच औष्णिक वीज केंद्रांनी बायोमास मध्ये बाबुंचाही वापर करावे असे निर्देश दिले गेले आहेत. यासाठी राज्यातील बांबु लागवडीचे मिशनही उपयुक्त ठरणार आहे. बांबू लागवडीसाठी हेक्टरी सात लाख रुपायंचे अनुदान देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. शिर्डी आणि मुंबईसह शक्य त्या सर्वच विमानतळांच्या ठिकाणी कार्बन फुटप्रिंट कमी करण्याकरिता पोलाद आणि अन्य धातुंच्या ऐवजी बांबुचा वापर करण्यावर भर देण्याचेही राज्य सरकारने धोरण आखले आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणूनच महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मिळाला आहे.

यापुर्वी हा पुरस्कार २०२३ मध्ये तामिळनाडुला, २०२२ मध्ये उत्तर प्रदेशला मिळाला होता. समितीचे विद्यमान अध्यक्ष न्या. सदाशिवम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या पुरस्कार निवड समितीमध्ये समावेश आहे.

आतापर्यंत हा पुरस्कार केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, शिवराजसिंह चौहान, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अखिलेश यादव तसेच स्व. प्रकाशसिंह बादल, स्व. वर्गीस कुरियन, स्व. एमएस. स्वामिनाथन यांना दिला गेला आहे. अँग्रीकल्चर टुडेच्यावतीने या पुरस्कारांची सुरवात केली आहे. स्व. स्वामीनाथन यांनी दहा वर्षे या संस्थेचे अध्यक्षपद भुषवलेले आहे. सध्या डॉ. एम. जे. खान या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मानव जातीवरील संकट ओळखून, तिला वाचवण्यासाठी जे निर्णय घेतले आहेत, उपाययोजा केल्या आहेत. त्याबद्दल या तिघांचेही आणि महाराष्ट्राच्या या प्रयत्नांची दखल घेऊन, त्याला पुरस्कार दिल्याबद्दल डॉ. खान यांचे कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पटेल यांनी आभार मानले आहेत.

Daily News with Pandit Brahmanand Tiwari
11/02/2024

Daily News with Pandit Brahmanand Tiwari

बद्दल माहिती दिली.            यावेळी कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेले पोलीस पथकांच्या संचलनाने कर...
11/02/2024

बद्दल माहिती दिली.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेले पोलीस पथकांच्या संचलनाने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34 व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप झाल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस महासंचालक निखील गुप्ता यांनी केले तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मानले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

क्रीडा स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे….

20 व्या जागतिक पोलीस आणि फायर गेम्स, विनिपेग, कॅनडा येथील पोलीस संघाचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा झाला सन्मान :

कुस्ती क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक विजेते: सहाय्यक पोलीस आयुक्त नरसिंग यादव, सहाय्यक समादेशक राहुल आवरे, पोलीस उप अधीक्षक विजय चौधरी.

बॉडीबिल्डिंग मध्ये रौप्य व कांस्य पदक विजेते: सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे

34 व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा विजेते

हॉकी विजेता संघ : प्रशिक्षण संचालनालय

फुटबॉल विजेता संघ : राज्य राखीव पोलीस बल

महिला संघ : ऑल ओव्हर जनरल चॅम्पियनशीप : वीर जिजामाता शिल्ड - प्रशिक्षण संचालनालय संघ पहिल्या रँकवर तर मुंबई शहर (द्वितीय), पुणे आणि पिंपरी चिंचवड (तृतीय), कोल्हापूर रेंज (चौथा), नागपूर शहर (पाचवा), अमरावती रेंज (सहावा)

व्हॉलीबॉल: नागपूर शहर, कबड्डी : पुणे शहर/ पिंपरी चिंचवड आयुक्तालय

पुरूष संघ : कबड्डी : मुंबई शहर, बास्केटबॉल : नाशिक परीक्षेत्र, खो - खो व हँडबॉल : मुंबई शहर, ॲथलेटिक्स : प्रशिक्षण संचालनालय,

उत्कृष्ट नेमबाज (पुरुष) : वाशिम पोलीस अधीक्षक अनुज तारे

ऑल ओव्हर जनरल चॅम्पियनशीप : राज्य राखीव पोलीस बल (प्रथम), प्रशिक्षण संचालनालय संघ (द्वितीय), मुंबई शहर (तृतीय), कोल्हापूर रेंज (चौथा), पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड (पाचवा) तर नाशिक रेंज (सहावा).

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेस्व. सदाशिव गंगाराम भोरे कलामंदिरचे लोकार्पण नाशिक, 10: नाशिक महानगरपालिकेतर्...
11/02/2024

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

स्व. सदाशिव गंगाराम भोरे कलामंदिरचे लोकार्पण

नाशिक, 10: नाशिक महानगरपालिकेतर्फे 25 कोटी रूपये खर्चून हिरावाडी येथे साकारलेल्या स्व. सदाशिव गंगाराव भोरे कलामंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी फित कापून व कोनशिला अनावरण करून

यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह अधिकारी व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

हिरावाडी परिसरात महापालिकेच्या सहा एकर जागेत या कलामंदिराचे 2900 चौरस मीटरचे बांधकाम करण्यात आले आहे. या नाट्यगृहात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नाट्यगृहाच्या पश्चिम बाजूस वाहनतळाची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंना प्रसाधनगृहांची व्यवस्था, कलाकरांना तालीम करण्यासाठी दोन्ही मजल्यांवर स्वतंत्र हॉल, भव्य रंगमंच व सुसज्ज मेकअप रूमही आहे. नाट्यगृहात आधुनिक प्रकाशयोजना, ध्वनीयोजना, स्वयंचलित सरकते पडदे यासह एकूण 650 आरामदायी खुर्च्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. अत्याधुनिक सीसीटिव्ही यंत्रणा व सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्नीशमन यंत्रणाही येथे कार्यान्वित करण्यात आली आहे.

Without Fear or Favour
28/01/2024

Without Fear or Favour

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when EX7 News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share