15/10/2017
नाते जन्मांतरीचे
घरच्यांचा विरोध असूनही वैदेहीने सारंग सोबत पळून जाऊन लग्न केले. खरतर सारंग परप्रांतीय होता उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तो पुण्याला आला होता. आणि वैदेही पाटील घराण्यातील घरंदाज मुलगी होती. दहावी झाल्यानंतर ती ही पुढील शिक्षणासाठी पुण्याला आली तिथेच त्या दोघांची ओळख झाली. भाषा, रहाणीमान खाण्यापिण्याच्या सवयी सारे काही फार वेगवेगळे होते त्या दोघांचेही. पण म्हणतात ना प्रेम कसलीही बंधणे नियम पहात नाही व्हायचे असेल तर ते कुठेही कोणासोबतही होते. लग्न करून दोघेही पुण्याला निघूण आले. लग्न झाले तेव्हा ते दोघेही कॉलेजच्या दुस-याच वर्षाला होते. अचानक लग्न केल्यामुळे दोघांचेही शिक्षण थांबले. खरतर दोघांचीही पुढे शिकण्याची फार इच्छा होती पण वैदेहीच्या घरच्यांना त्या दोघांबद्दल कळाले आणि ते तिचे अर्धवट शिक्षण सोडून तिला कायमचे गावी घेऊण गेले आणि तिच्या लग्नाचे पाहू लागले. इकडे सारंगला तिच्या शिवाय एक क्षणही जगणे अशक्य झाले होते तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला आणि तिथूनच ते दोघे पुण्याला निघूण आले. पुण्यात आल्यानंतर सारंग नोकरी करू लागला. पुण्याला आल्यानंतर त्यानेही त्याच्या घरच्यांना वैदेही बद्दल सांगीतले पण त्याच्या घरच्यांनीही त्याला परजातीय मुली सोबत लग्न करण्यासाठी विरोध केला. वैदेहीला मात्र आशा होती की, कधी ना कधी तिच्या घरचे तिला समजून घेतील लग्न झाल्यापासून तिने एक दोन वेऴा घरी फोन ही केले पण तिचा आवाज ऐकून तिच्या घरचे सरळ फोन ठेऊन द्यायचे. सारंग तिच्यावर जिवापाड प्रेम करायचा तिला घरच्यांची आठवण होऊ नये म्हणून खुप प्रयत्न करायचा पण कोणी काहीही केले तरी आई वडीलांची जागा नाही भरून काढू शकत. सारंगने लग्न केल्यावरही त्याच्या घरी एकदा फोन केला पण त्याच्याही घरच्यांनी त्याच्या लग्नाबद्दल ऐकून त्याच्या सोबतची त्यांची सर्व नाती तोडली. दोघांचेही त्यांच्या घरच्यांसोबत सगळॆ संबंध संपले. पण तरीही कोणाच्याही आधारा शिवाय ते दोघेही खुप छान रहायचे. एक दिवस सारंगने आईची आठवण आली म्हणून सहज त्याच्या घरी फोन केला तेव्हा त्याला त्याची आई खुप आजारी असल्याचे कळाले. तो आईला पहाण्यासाठी गावी निघाला. वैदेहीला इथे एकटीला सोडून जाणे त्याला योग्य वाटत नव्हते पण वैदेही सोबत लग्नाला त्याच्या घरच्यांनीही विरोध केला होता आणि त्यात त्याची आई आजारी असल्याने त्याला वैदेहीला घेऊण जाणे बरोबर वाटले नाही. शेवटी तो एकटाच जायला निघाला. निघताना त्याने वैदेहीला घरखर्चासाठी थोडे पैसे दिले आणि दोन चार दिवसांत परत येतो सांगून निघाला. वैदेहीला खुप भिती वाटत होती सारंग पुन्हा येईल की नाही याची पण सारंगने तिला वचन दिले होते काहीही झाले तरी नक्की परत येईन. तो जाण्याआधी तिच्यावर कधीही एकटी रहाण्याची वेळ आली नव्हती पण तरीही ती एकटी राहीली सारंग येण्याची वाट पहात. सारंग जाऊण साधारण पंधरा दिवस झाले होते तरीही तो आला नाही त्याकाळात फक्त लँडलाईन फोन होते सारंगने निघताना तिला त्याच्या घरचा म्हणून एक फोन नंबर दिला होता. वैदेही रोज त्या नंबर वर फोन करायची पण, सारंग नावाचे कोणीही इथे रहात नाही असे सांगून समोरची व्यक्ती फोन ठेऊन द्यायची. पुढे पुढे तर तिचा आवाज ऐकला की, त्या नंबरवर जे कोणी यायचे ते फोन ठेऊन द्यायचे. वैदेहीला काय करावे काहीही सुचत नव्हते पण वाट पहाण्याशिवायही तिच्याकडे काहीही पर्याय नव्हता. पुन्हा घरी जाण्याचा तर ती विचार सुद्धा करू शकत नव्हती. सारंग जाऊन महीना होत आला घरमालक भाडे घेण्यासाठी आल्यावर वैदेहीने घर खर्चासाठी सारंगने जे काही पैसे दिले होते ते घरमालकाला देऊन टाकले. ते पैसे दिल्यानंतर तिच्याकडे आता घर खर्चासाठी काहीच शिल्लक नव्हती. शेवटी तिने काहीतरी कामधंदा करायचे ठरवले पण अंगावरच्या कपड्यांवर तिने घर सोडले असल्यामुळे तिच्याकडे कोणतेही शैक्षणीक कागदपत्र नव्हते त्यामुळे शिक्षण असूणही तिला नोकरी मिळणे अशक्य झाले होते. आता पोट भरण्यासाठी तिच्याकडे घरकामाशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता. पण तिथेही ती खचली नाही घरंदाज पाटील घराण्यातील पोर असूणही ती धुणीभांडी करायलाही लाजली नाही. पण म्हणतात ना वाईट वेळा आल्या की, चारीही दिशेने येतात तसेच काहीसे तिच्यासोबत घडत होते. दिसायला खुप सुंदर असल्याने एक तर तिला कोणी काम द्यायचे नाही आणि दिलेच तरी त्या घरातील पुरूष तिच्याकडे वाईट नजरेने बघायचे. नाईलाजाने तिला ते काम सोडावे लागायचे. दिवसें दिवस वैदेहीची अवस्था आणखीनच खराब होऊ लागली घरातील सर्व सामानही संपले होते. दोन महीणे झाल्यावर पुन्हा घरमालक भाडे घेण्यासाठी आला त्यावेळी वैदेहीकडे त्याला देण्यासाठी काहीही पैसे नव्हते घरमालकाने तिला सारंग बद्दल विचारले तिने सर्व हकीकत घरमालकाला सांगीतली सारंग आला की, पैसे देते असेही ती त्याला बोलली पण, घरमालकाला तिची दया आल