कल्याणमधील गांधारी पुलाजवळ वाहतूक पोलिसांचे चांगले काम. त्यांनी स्वतःच खड्डे बुजवले आहेत
डोंबिवलीत वाहन चालकाने वाहतूक पोलिसाला फरफटत नेले
डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणाचा प्रताप
डोंबिवली पूर्वेकडे असणाऱ्या टंडन रस्त्यावर चारचाकी वाहनामध्ये मोठ्यामोठ्याने गाणी लावून भरधाव वेगाने वाहन चालवत एका वाहतूक पोलिसाला जखमी केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात अल्पवयीन मुलावर रामनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असून बाल हक्क कायद्यांतर्गत त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती राम नगर पोलिसांनी दिली.
कल्याण येथील चार ते पाच शाळांनी एकत्र येऊन आषाढी एकादशी निमित्ताने पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना हा उत्सव साजरा करता आला नव्हता. यावर्षी मात्र पांडुरंगाच्या कृपेने आषाढी एकादशी निमित्ताने पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
कल्याण ब्रेकिंग
शहाड रेल्वे स्थानक मालगाडीचे कपलिंग तुटल्याने
कल्याण व शहाड रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेची वाहतूक ठप्प
वाहतूक सुरळित करण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरु
डोंबिवली मानपाडा रोडवर एमआयडीसीतील पाण्याचा पाइप तुटला आहे. जवळच्या दुकानदारांनी एमआयडीसी कार्यालयात तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही
चालत्या मेल मधून आपल्या नातेवाईकाला बॅग देत असताना तोल जाऊन गाडीतून प्लॅटफॉर्मवर कोसळलेल्या महिलेचा आरपीएफ जवानाने जीव वाचविला ..
डोंबिवलीत चाललंय तरी काय...आधी मानपाडा, आता विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना...
इंस्टाग्रामच्या माध्यमातून जवळीक साधत एका 13 वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्याला आरोपीला डोंबिवलीच्या विष्णूनगर बेड्या ठोकल्या...
पन्नास लाखांची गोवा मेड दारू मलंगगड भागात जप्त
मलंगगडच्या कुंभार्ली गावात गावात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
तिघा आरोपीना केली अटक तर तिघे विक्रेते देखील ताब्यात
गोव्यात मिळणारी स्वस्त दारू ठाणे जिल्ह्यात आणून विक्री करण्याचा पराक्रम शनिवारी उघडकीस आला. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने दारूचा साठा, दोन आलिशान वाहनांसह सुमारे पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त केला. नामांकित हॉटेल्स मध्ये गोवा बनावटीच्या दारूचा पुरवठा अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातून होत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये मोठे रॅकेट असून त्याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.
कल्याण जवळील मलंगगड भागात गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी येत आहे. विशेष म्हणजे डोंबिवली परिसरात निर्माण झालेले मोठं मोठे हॉटेल्स आणि त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूची मागणी होत आहे. त्यामुळे
राजधानी दिल्ली हादरली आहे. रोहिणी कोर्टात आज गँगवॉर पाहायला मिळाला आहे.
राजधानी दिल्ली हादरली आहे. रोहिणी कोर्टात आज गँगवॉर पाहायला मिळाला आहे. या गोळीबारात गँगस्टर गोगी ठार झाला आहे. या गोळीबाराचा आता Live Video समोर आला आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन हल्लेखोरांचाही समावेश आहे.
शुक्रवारी दि २४ दुपारी कोर्टात मोस्ट वॉन्टेड गँगस्टर जितेंद्र ऊरफ गोगी याची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. ज्यानंतर कोर्टात गोळीबार झाला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना ठार केलं आहे. गोगी तिहार जेलमध्ये होता, शुक्रवारी त्याला सुनावणीसाठी कोर्टात आणण्यात आलं होतं. याच दरम्यान रोहिणी कोर्टात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे न्यायाधीशांसमोर हा गोळीबार झाला आहे.
डोंबिवली स्टेशनबाहेरील परिसरात खुलेआम दारूचे सेवन ....
दारूच्या दुकानांमुळे दारूडयांना मोकळीक..
डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरात दोन देशी बारआहे.या बारमध्ये मद्यपी दारू विकत घेऊन त्याच बारच्या बाजूकडील कोपऱ्यात तर कधी समोरील कट्ट्यावर खुलेआम दारू डोसतात.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रोडवरील कशेळी टोल नाका फोडला.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
मुंबई महापालिका हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणाऱ्या पथकाच्या कर्मचाऱ्यांची आणि नागरिकांची हाणामारी.. व्हिडिओ व्हायरल..
अंबरनाथ मधील अपहरण झालेल्या मुलाची सुटका , वडिलांनी मानले पोलिसांचे आभार
अंबरनाथ - अंबरनाथच्या ग्रीन सिटी पार्कमध्ये राहणाऱ्या सोनू सरिता यांचा वडापावचा मोठा व्यवसाय आहे. त्यांचा 9 वर्षाचा मुलगा कृष्णा हा 8 सप्टेंबरच्या सायंकाळी घरातून ट्यूशनसाठी निघाला. मात्र तो पुन्हा घरी परतला नाही. घरच्या लोकांनी त्याची शोधाशोध सुरु केली. तो कुठेही आढळून आला नाही. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. दरम्यान कृष्णाचे काका सत्येंद्र यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने कृष्णाचे अपहरण केले असल्याचे सांगून मुलगा परत हवा असल्यास 40 लाख रुपये द्यावे लागतील, अशा शब्दांत खंडणीची मागणी केली.
पोलिसांना घटनेची माहिती
या प्रकरणाची माहिती मिळताच ठाणे क्राईम ब्रांच, कल्याण क्राईम ब्रांच, उल्हासनगर क्राईम ब्रांच आणि अंबरनाथ पोलीस यांच्याकडून मुलाच्या शो