Aapale Thane

Aapale Thane AapaleThane.com is a online medium giving social, political, cultural, events updates of Thane city

AapaleThane.com is a online medium giving social, political, cultural, events updates of Thane city and district.

13/04/2022

#धर्मवीर स्वर्गीय #आनंद_दिघे #साहेब यांच्या जीवनावर आधारित तसेच #मंगेश_देसाई निर्मित आणि #प्रविण_विठ्ठल_तरडे दिग्दर्शित #धर्मवीर_मुक्काम_पोस्ट_ठाणे या मराठी चित्रपटाचा पहिला ट्रेलर आज लॉंच करण्यात आला. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा...

Prasad Oak Pravin Vitthal Tarde Mangesh Desai Shrutii Marrathe Gashmeer Mahajani Ramesh P. Pardeshi - Pittya Sushant Shelar Jaywant Wadkar Snehal Tarde Sachiin Naarkar Kedar Gaekwad Viikas Pawar Mahesh Ogale Chinar-mahesh Composer Duo Chinar Kharkar Mandar Kamalapurkar Umesh Jaadhav Vishwajeet JoshiSaahil Desai Zee Music Marathi zee marathi Zee Talkies

09/03/2022

अनाथांचा नाथाने दिला मदतीचा हात

एकनाथ शिंदेचा ताफा जेव्हा एका अपंगासाठी भर रस्त्यात थांबला..

मुंबईसारख्या व्यस्त शहरात तसा कुणासाठी कुणालाच वेळ नसतो, कुणी नोकरीसाठी, कुणी कामासाठी, तर कुणी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम इकडून तिकडे धावत दिसतो, अशा या परिस्थितीत दुसऱ्याच्या वेदना आपल्या मानून त्याच्या मदतीला धावून जाणारे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच असतात. राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र त्याला अपवाद आहेत, आणि हीच बाब ते अगदी छोट्यात छोट्या गोष्टीतून सिध्द करून देत असतात. असाच एक प्रसंग नुकताच पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडा नगर जंक्शन येथे घडला. वाहतुकीने अत्यंत गजबजलेल्या या रस्त्यावर आज एक असा प्रसंग घडला की ज्यामुळे त्यांच्यातील माणुसकी आजही किती जिवंत आहे याचा प्रत्यय आला. मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज संपवून ठाण्याला परतत असताना एक अपंग व्यक्ती रस्त्या ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या ठिकाणी अनेक वाहने येत जात असल्याने या व्यक्तीला रस्ता ओलांडणे काही शक्य होत नव्हते. माणसांच्या या गर्दीत त्याची ती अडचण गाडीत बसलेल्या एकनाथ शिंदे यांच्यातील संवेदनशील मनाने अचूक हेरली. त्यांनी तातडीने आपला गाड्यांचा ताफा थांबवून या व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत करायची सूचना आपल्या बॉडिगार्डना केली. त्यानंतर सगळं ट्रॅफिक थांबवून त्यांनी या व्यक्तीला रस्ता ओलांडून देण्यात आला. रस्ता ओलांडल्यावर या व्यक्तीने मोठ्या कृतज्ञतेने मंत्री शिंदे यांचे आभार मानले. त्यानंतरच मंत्री शिंदे यांचा ताफा ठाण्याकडे रवाना झाला.

#एकनाथशिंदे #अनाथांचानाथ #शिवसेना

मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हा...
11/11/2021

मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा मुख्यमंत्री सन्माननीय ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहेत.
त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती.

- नगरविकास मंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे यांचे कार्यालय.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

 #ठाणे तसेच  #गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवादी संघटनेकडून सहकुटुंब जीवे मारण्याची धमकी....आमच्...
30/10/2021

#ठाणे तसेच #गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवादी संघटनेकडून सहकुटुंब जीवे मारण्याची धमकी....

आमच्या दलमच्या अनेक साथीदारांना तुम्ही आल्यापासून शहीद व्हावं लागलं. त्याचा बदला आम्ही लवकरच घेऊ, असे धमकीवजा पत्र #सिपीआय ( #माओवादी ) या नावाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या घरी पोहचल्याची माहिती आहे. शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारल्यावर गडचिरोली जिल्ह्यात काम सुरू केले, तेव्हापासून आमचा पैसा बंद झाला, असेही या पत्रात नमूद केले आहे. याचा करारा जवाब दिल्या जाईल असं म्हणत शिंदें व त्यांच्या परिवाराला याची पूर्ण किंमत चुकवावी लागेल अशी धमकी या पत्रात दिली आहे. आम्ही फक्त गडचिरोलीतच आहोत असं समजू नये, तर आमचे साथीदार सध्या अनेक शहरात असून तुमच्याही आसपास आहेत असे म्हणत समझनेवालों को इशारा काफी है लिहिले आहे. एकनाथ शिंदे हे भाषणात नक्षली संपवण्याचं जे बोलतात ते का होऊ शकत नाही हे सांगताना आपण देशातल्या अनेक राज्यांना माओवाद्यांनी व्यापले आहे असे ही हे पत्र सांगते.

सध्या गडचिरोलीत बराच चिरोध सुरू आहे तो म्हणजे सुरजागडच्या खाणकामाला. हा स्थानिक स्तरावर असला तरी इथे खदानीच्या कामाला विरोध हा नक्षलींचा ही आहे. त्यांनी ही भूमिका नुसती वेळोवेळी फक्त मांडलीच नाहीये तर इथे आधी माओवाद्यांनी जाळपोळही केलेली असून लॉईड कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटची इथे हत्या ही केली आहे. त्यामुळे इथे कामबंद होते, पण आता परत कामाची हालचाल सुरू झाली आहे. या पत्रात शिंदे यांच्या सुरजागड दौऱ्याबद्दल उल्लेख करत, त्याचे उत्तर आपण सोमाजीची हत्या करून दिले असल्याचे नमूद केले आहे. पण हा फक्त ट्रेलर असून, पिक्चर अभी बाकी है असे सूतोवाच ही केले आहे.

ही चेतावणी आपण दुसऱ्यांदा देत असल्याचे ही या पत्रात म्हटले आहे तसेच स्वतःकडे फक्त बंदुकाच नाही तर, इतर बरेच शस्त्र असल्याचाही दावा केला आहे. आपण मोठा धमाका करणार असल्याचं सांगत, पत्रात एस.पी. गडचिरोली यांना ही शेवटी निशाण्यावर घेतले आहे.

सवाल केला आहे की किती दिवस तुम्ही बुलेटप्रुफ गाडीत फिरणार? आम्ही बघून घेऊ! करारा जवाब देणार असे म्हणत जोपर्यंत तुम्हाला खत्म करत नाही तोपर्यंत आश्‍वस्त श्वास घेणार नाही असा शेवट यात केलेला आहे.

सीपीआय माओवादी भामरागड एरिया कमिटी असं खाली लिहिलं आहे.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

 #कल्याण तालुक्यातील  #कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच  तसेच काही सदस्यांनी  #उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आम...
24/10/2021

#कल्याण तालुक्यातील #कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच काही सदस्यांनी #उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पप्पू कलानी व ओमी कलानी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे असे आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकJitendra Awhad केले.

Jitendra Awhad

आपणां सर्वांना  #दसरा आणि  #विजयीदशमी च्या मंगलमय शुभेच्छा! - आपले ठाणे डॉट कॉम परिवार
15/10/2021

आपणां सर्वांना #दसरा आणि #विजयीदशमी च्या मंगलमय शुभेच्छा! - आपले ठाणे डॉट कॉम परिवार

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून शारदीय नवरात्रोत्सवा निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या जय अंबे माँ सार्वजनिक धर...
07/10/2021

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून शारदीय नवरात्रोत्सवा निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या जय अंबे माँ सार्वजनिक धर्मदाय संस्थेच्या मानाच्या नवरात्रोत्सवात टेंभीनाका मित्र मंडळाच्या आई भवानी मातेची आज विधीवत घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या भक्तीभावाने आई भवानीचे पूजन करित #कोरोना वैश्विक महामारीचे संकट दूर करून भक्तांचे जनजीवन पुन्हा एकदा पुर्ववत तसेच सुरळीत करण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली.

यासमयी महापौर नरेश म्हस्के, नगरसेवक सुधीर कोकाटे, शहरप्रमुख हेमंत पवार तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

#नवरात्रि #घटस्थापना #ठाणे

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

उंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार… खासदार डॉ. श्रीकांत शिंदेश्री सं...
16/06/2021

उंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार… खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

श्री संत सावळाराम महाराज वनश्री धामटाण, भाल, दावडी, सोनारपाडा, उंबार्ली येथील वनविभागाच्या जागेची आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली. येथील वातावरण पक्ष्यांना पोषक असून या जागेवर मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांचा अधीवास असल्यामुळे पक्षी अभयारण्य म्हणूनच हे ओळखले जात आहे. या पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असून या अभयारण्याचा अधिक प्रमाणात विकास करता येईल, यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मानस खासदार डॉ. शिंदे यावेळी व्यक्त केला.

यापूर्वीच या पक्षी अभयारण्यात उन्हाळ्यामध्ये येथील पक्ष्यांची तहान भागावी याकरिता डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ५ हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या बसविण्यात आल्या आहेत. आता पावसाळा सुरु झाला असून जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन करुन ते अडवून पाणी संवर्धन करण्याच्या दृष्टिने दोन बंधारे बांधण्याच्या तसेच अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यातून पाणी झिरपत असल्याने त्याची डागडूजी करण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी केल्या. या जागेवर अधिकाअधिक वृक्ष लागवड करणे तसेच पक्षी व वृक्षांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या अभयारण्याला संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना देखील यावेळी डॉ.शिंदे केल्या.

Dr Shrikant Eknath Shinde

ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊन झालेल्या दुर्घटनेत ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेची उच्च...
26/04/2021

ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊन झालेल्या दुर्घटनेत ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

आज ही दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीने या घटनेची दखल घेत वेदांत रुग्णालयाला भेट देत संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाकडून ही घटना नक्की कशी घडली याची माहिती घेतली. सदर घटना ही दुदैवी असली तरीही यात नक्की चूक कुणाची ते शोधून काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून समितीमध्ये आयएएस दर्जाचे अधिकारी असणारे भिवंडी महानगरपालिका आयुक्त, ठाण्याचे सिव्हिल सर्जन आणि अन्य चार डॉक्टर यांचा समावेश आहे. ही समिती आजच्या आज या घटनेची चौकशी करून आपला अहवाल प्रशासनाला सादर करेल. या अहवालात जे कुणी दोषी ठरेल त्याच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

 #कोरोना वैश्विक महामारीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई ...
25/04/2021

#कोरोना वैश्विक महामारीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उभारण्यासाठी नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात ३, कल्याण डोंबिवली व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येकी २ तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्लांट उभारण्यास सुरूवात. पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होणार आहेत.

19/04/2021

दुसऱ्यांदा #कोरोना ची लागण झाल्यानंतर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यावर रुग्णालयात डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांमुळे प्रकृती बरी असल्याचे नमूद करित आज रुग्णालयातून त्यांनी मतदारसंघातील जनतेसोबत संवाद साधला.

याप्रसंगी राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आवाहन केले.

 #कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यकुशल तसेच उच्च विद्याविभूषित खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा  #कोरोना संसर्ग...
15/04/2021

#कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यकुशल तसेच उच्च विद्याविभूषित खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा #कोरोना संसर्ग....

दोन महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले....

ठाणे : गेल्या वर्षभरापासून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघातील गरीब, गरजू, निराधार, आश्रित नागरिकांना स्वतः फ्रंट वर उतरून अन्नधान्य, औषधांचे वाटप केले. कोरोना रुग्णांना योग्य व उत्तम वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी रात्रंदिवस एक केले. पोलिस, पत्रकार, फ्रंटलाईन वर्कर्स यांच्या मोफत कोरोना चाचण्या केल्या तसेच त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली.

याव्यतिरिक्त कोरोनामुळे मतदारसंघातील अडकून राहिलेली पत्रीपूलासारखी विकासकामे त्यांनी व्यक्तीशः पाठपुरावा करून अस्तित्वात उतरवली. या सगळ्यात त्यांनी अक्षरशः स्वतःला झोकून दिले होते.

गेल्या दोन महिन्यात त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे लवकर बरे व्हावेत याकरिता समाजातील विविध स्तरांतून नागरिक प्रार्थना करत आहेत.


Dr Shrikant Eknath Shinde

 #कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना  #कोरोना ची लागण झाली असल्याचे त्यांनी त्यांच्या समाज माध्यमा...
01/03/2021

#कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना #कोरोना ची लागण झाली असल्याचे त्यांनी त्यांच्या समाज माध्यमांतून जाहीर केले. गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घेण्याचे तसेच #कोविड१९ रोगाची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ कोरोना चाचणी करण्याबाबत डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आवाहन केले आहे.

कोरोना महामारीच्या संकटकाळात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत अन्नधान्य, औषधे, जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी स्वतः जातीने लक्ष केंद्रित केले होते.

समाजातील प्रत्येक स्तरांतून त्यांच्या लवकर बरे होण्याकरिता प्रार्थना केल्या जात आहेत.


Shrikant Eknath Shinde Dr Shrikant Eknath Shinde

रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व समाधी स्थळावर रोज पुष्पहार अर्पण होणार... खासदार डॉ. श्रीकांत शिंदे...
18/02/2021

रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व समाधी स्थळावर रोज पुष्पहार अर्पण होणार... खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा संकल्प.

किल्ले रायगडावर नेत्रदीपक रोषणाईने उजळणार आसमंत...

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजधानी किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. राजसदरसह रायगडवरील विविध वास्तू उजळणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी किल्ले रायगडला भेट दिली होती. यावेळी किल्ल्यावरील महत्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे निदर्शनास आल्यावर तातडीने त्यांनी पुरातत्व विभागाचे राजेंद्र यादव यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधत रायगडवर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यासाठी मागणी केली. विद्युत रोषणाई करण्यासाठी आवश्यक निधी नसल्याचे यादव यांनी सांगितले. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठीचा निधी लागेल तो मी देतो, मात्र रायगड अंधारात ठेवू नका अशा सूचना केल्या. त्यानुसार मागणीचे पत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व विभागाला दिले. या मागणीवर पुरातत्व विभागाने तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार शिवजयंतीला किल्ले रायगडावरील विविध वास्तू नेत्रदीपक रोषणाईने उजळणार आहे. यापुढे किल्ले रायगड अंधारात राहणार नाही, असे अभिवचन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुरातत्त्व विभागाने दिले.

तसेच छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडवरील राजसदर व होळीचा माळ येथील शिवरायांचा पुतळा आणि समाधी स्थळाला रोज पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला असून उद्या शिवजयंतीचे औचित्य साधून या संकल्पाला सुरूवात होणार आहे.


Dr Shrikant Eknath Shinde Friends who like Dr Shrikant Eknath Shinde

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने १०० रुग्णवाहिकांचे मोफत वाटप...शिवसे...
10/02/2021

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने १०० रुग्णवाहिकांचे मोफत वाटप...

शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री आणि ठाणे व गडचिरोली जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेकरिता डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन च्या वतीने १०० रुग्णवाहिकांचे मोफत वाटप करण्यात येणार असून काल पहिल्या टप्प्यातील १६ रुग्णवाहिकांचा लोकर्पण सोहळा काल गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या १६ रुग्णवाहिकांच्या चाव्या संबंधित मतदारसंघातील मा.आमदार / खासदार तसेच समाजसेवी संस्था अथवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या हाती सुपुर्द करण्यात आल्या.

कोरोना महामारीच्या काळात शेकडोंच्या संख्येने कोरोनाबाधितांची दैनंदिन वाढ होत असताना त्यांना रुग्णालयात उपचाराकरिता नेण्याकरिता रुग्णवाहिकांवर देखील ताण पडल्यामुळे कमतरता जाणवत होती. याची दखल मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत तातडीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने तातडीने ३४ रुग्णवाहिकांचे मुंबई, ठाणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि अनेक जिल्ह्यातील रुग्णांकरिता वाटप केले होते.

यापुढे भविष्यात कुठल्याही परिस्थितीत राज्यभरात कुठेही रुग्णवाहिकांची कमतरता पडू नये यासाठी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी खारीचा वाटा उचलत या १०० रुग्णवाहिकांच्या वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे राज्यातील विविध जिल्हे, ग्रामीण व आदिवासी विभागांमधील रुग्णांना या रुग्णवाहिकांचा लाभ होईल, असा विश्वास यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

ठाण्याची  #श्रुतीका_माने ठरली  #ऑस्ट्रेलिया_मिस_इंडिया ची विजेती......ठाण्यातील सुप्रसिध्द डॉक्टर संदीप माने यांची कन्या...
06/01/2021

ठाण्याची #श्रुतीका_माने ठरली #ऑस्ट्रेलिया_मिस_इंडिया ची विजेती......

ठाण्यातील सुप्रसिध्द डॉक्टर संदीप माने यांची कन्या श्रुतिका माने (२०) ही #ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या #मिस_इंडिया सौंदर्य स्पर्धेत पहिली आली. श्रुतिका हिचा जन्म #इंग्लड ला झाला त्यानंतर #ठाणे येथे आल्यावर सिंघानिया स्कूलमधून पुढील शालेय शिक्षण तिने केले. श्रुतिका सध्या ऑस्ट्रेलिया येथील एडलेड विद्यापीठातून एडव्हान्स हेल्थ एन्ड मेडिकल सायन्सची पदवीचे शिक्षण घेत आहे.

ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय तरूणींसाठी मिस इंडिया स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या ७ स्पर्धकांची ऑनलाईन ऑडिशन व मुलाखत घेण्यात आली. ऑस्ट्रेलिया येथे राहत असलेले राज सुरी यानी सौदर्य स्पर्धेसाठी स्पर्धकाना मार्गदर्शन केले. श्रुतीकाने कत्थक नृत्याचे शिक्षण घेतले असून अनेक वक्तृत्व स्पर्धेत तिने यश संपादन केले आहे. तिला अभिनयाची आवड आहे. २००१ साली सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे ऑस्ट्रेलियास्थित भारतीय राज सुरी यानी मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला सुरूवात केली. ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबई येथे होत असलेल्या मिस इंडिया जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका माने ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधीत्व करणार आहे.

आपल्या यशाबद्दल बोलताना श्रुतिका म्हणाली की, मिस इंडिया ऑस्ट्रेलियासाठी माझी निवड झाली ही माझ्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. हा मुकुट म्हणजे एक जबाबदारी आहे ज्याची मला जाणीव आहे. भविष्यात आणखी काय असेल याची उत्सुकता मला लागली आहे. महाराष्ट्रातील बंधू भगिनींचा पाठींबा मिळाला त्यामुळे हे यश मी मिळवू शकले. जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करणे, त्यांच्यातील सामर्थ्य व कलागुण जगासमोर आणणे हा या स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश होता असे श्रुतिकाने सांगितले.

श्रुतिकाचे वडील डॉ.संदीप माने व आई डॉ.राजश्री माने हे आयव्हीएफ स्पेशॅलिस्ट आहेत. मुलीच्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मुलीच्या यशाबद्दल आम्हाला आनंद झाला असून मुली देखील सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. मुलींच्या कतृत्वाला साथ दिली पाहिजे.

New Year, New Hope, New Goals.....May this year filled with happiness, positivity and full of success.... Aapale Thane d...
01/01/2021

New Year, New Hope, New Goals.....

May this year filled with happiness, positivity and full of success.... Aapale Thane dot com.

#2020 #2021

 #मुंबई ते  #नवीमुंबई प्रवास करताना  #ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनांच्या ताफ्याला अपघात.....रस्त्...
25/12/2020

#मुंबई ते #नवीमुंबई प्रवास करताना #ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनांच्या ताफ्याला अपघात.....

रस्त्यावरील अचानक आलेल्या अडथळा चुकवताना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनांच्या ताफ्यास अपघातास सामोरे जावे लागले असून सुदैवाने त्यांना कोणत्याही प्रकारची मोठी दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Eknath Shinde

घराच्या किमती आवाक्यात येणार - नगरविकासमंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन राज्य सरकारने अलिकडेच...
12/12/2020

घराच्या किमती आवाक्यात येणार - नगरविकासमंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

राज्य सरकारने अलिकडेच मंजूर केलेल्या युनिफाईड डीसीपीआर संदर्भात नगरविकास विभागातील तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाले. एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाइड डीसीपीआर) सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून तयार केली असून सामान्य माणसाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, हा ध्यास त्यामागे आहे. परंतु, नियम चांगले असले तरी त्याची अमलबजावणीही तितक्याच काटेकोरपणे व प्रभावीपणे झाली पाहिजे. ती जबाबदारी तुमची असल्यामुळे ही नियमावली योग्य रितीने समजून घ्या व अमलबजावणी करा, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जीतेंद्र आव्हाड आणि नगरविकास विभाग १ चे प्रधान सचिव भूषण गगराणी, संचालक, नगर नियोजन श्री. नागमोडे, ठाणे मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा, एमसीएचआय क्रेडाईचे मुंबई अध्यक्ष दीपक गरोडिया, ठाणे अध्यक्ष अजय आशर याप्रसंगी उपस्थित होते.

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली सर्वसामान्य व्यक्तीचे हित डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आली आहे. यामुळे हाऊसिंग स्टॉक वाढून घराच्या किमती आवाक्यात येतील. १५० चौ. मी. पर्यंतच्या भूखंडावर स्ववापरासाठी घर बांधणाऱ्या व्यक्तीला बांधकाम परवान्याची आवश्यकता रद्द करण्याची महत्त्वाची तरतूद यात केली आहे. त्याचबरोबर पर्यटन आणि कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या तरतुदीही यात केल्या आहेत, असे श्री. शिंदे याप्रसंगी म्हणाले. क्लस्टर डेव्हलपमेंट, तसेच एसआरए योजना राज्यभरात लागू करण्यात आल्यामुळे धोकादायक, तसेच बेकायदा इमारती व झोपडपट्टयांमध्ये जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो लोकांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीच्या पहिल्या सरकारच्या वेळी ४० लाख झोपडीवासीयांना हक्काची घरे देण्याची घोषणा केली होती. बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एसआरएशी निगडित किचकट नियमांचे सुलभीकरण केले असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

हाऊसिंग स्टॉक वाढत असतानाच नगर नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. हा डीसीपीआर म्हणजे केवळ बांधकामांसाठीची नियमावली नसून आपल्या शहरांच्या शिस्तबद्ध विकासाचे, नियोजनाचे ते महत्त्वपूर्ण साधन आहे, असेही ते म्हणाले.

प्रत्येक शहरासाठी स्वतंत्र नियमावली असण्याऐवजी एकाच पुस्तकात तुम्ही अवघा महाराष्ट्र सामावला, त्याबद्दल तुमचे खास अभिनंदन अशा शब्दांत श्री. आव्हाड यांनी या युनिफाइड डीसीपीआरचे स्वागत केले. ही नियमावली म्हणजे साध्य नसून केवळ साधन आहे, त्याचा प्रभावी वापर करा, असे नगरविकास विभाग १ चे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी सांगितले.



Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

ठाण्याच्या नाट्य चळवळीतील अग्रगण्य अभिनेते, मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे वयाच्या ८२...
06/12/2020

ठाण्याच्या नाट्य चळवळीतील अग्रगण्य अभिनेते, मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली.

#रवी_पटवर्धन

जागतिक सन्मान असलेला “ग्लोबल टीचर प्राईज २०२०” पुरस्कार सोलापूरच्या रणजितसिंह डिसले यांना जाहीर...युनेस्को आणि वार्की फा...
03/12/2020

जागतिक सन्मान असलेला “ग्लोबल टीचर प्राईज २०२०” पुरस्कार सोलापूरच्या रणजितसिंह डिसले यांना जाहीर...

युनेस्को आणि वार्की फाउंडेशन,लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा जागतिक सन्मान असलेला “ग्लोबल टीचर प्राईज २०२०” पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी ही अधिकृत घोषणा केली. हा पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. सन्मानचिन्ह आणि ७ कोटी रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जगभरातील १४० देशांतील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनामधून अंतिम विजेता म्हणून डिसले यांना जाहीर करण्यात आले आहे.

ठाण्याच्या सुप्रसिद्ध  #मामलेदार_मिसळ चे मालक  #लक्ष्मण_मुर्डेश्वर यांचं नुकतेच निधन झाले.मुर्डेश्वर यांना  #कोरोना ची ल...
01/12/2020

ठाण्याच्या सुप्रसिद्ध #मामलेदार_मिसळ चे मालक #लक्ष्मण_मुर्डेश्वर यांचं नुकतेच निधन झाले.
मुर्डेश्वर यांना #कोरोना ची लागण झाल्यानं १५ दिवसांपासून ठाण्याच्या कौशल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

आज दुपारी १२.३० च्या सुमारास मुर्डेश्वर यांचं निधन झालं.

# #भावपूर्ण_श्रद्धांजली

महारोगी सेवा समितीच्या सीईओ तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शीतल आमटे यांनी चंद्रपूर येथे आत्महत्या केली असून त्यां...
30/11/2020

महारोगी सेवा समितीच्या सीईओ तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शीतल आमटे यांनी चंद्रपूर येथे आत्महत्या केली असून त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकले नाही.

पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेची मंजुरी... महिन्याभरात होणार कामाला सुरुवात - खासदार डॉ.श्रीकांत शिंदे...
28/11/2020

पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेची मंजुरी... महिन्याभरात होणार कामाला सुरुवात - खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

शिळ-कल्याण रस्त्यावरील पलावा जंक्शन परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासादरम्यान नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असून यासाठी महत्वाच्या असलेल्या पलावा येथील उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास (जीएडी) रेल्वेने मंजुरी दिल्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असल्याची माहिती या कामाचा सातत्याने पाठपुरावा करणारे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या उड्डाणपुलाच्या अंतिम आराखड्याला मंजुरी मिळून महिन्याभरात कामाला पुन्हा सुरुवात होईल.

शिळ-कल्याण रस्त्याच्या सहापदारीकरणाचे काम प्रगतीपथावर असून याचाच एक भाग म्हणून पलावा गृहसंकुल परिसरात देसाई खाडी ते काटई टोल नाका अशा उड्डाणपुलाचे काम देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या तर्फे सुरू करण्यात आले होते. परंतु, या उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अतिरिक्त २ मार्गिकांसाठी जागा सोडण्याची विनंती डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्राधिकरणाने केल्यामुळे पुन्हा या उड्डाणपुलाचा आराखडा बदलावा लागला. या उड्डाणपुलात एकूण ४५ फाऊंडेशन असून त्यापैकी ३७चे काम पूर्ण झाले आहे, तर ४५ पिलरपैकी १२ चे काम पूर्ण झाले आहे.

आराखडा बदलावा लागल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडे सर्वसाधारण आराखडा पुन्हा मंजुरीसाठी पाठवावा लागला होता. या आराखड्याला आता मंजुरी मिळाली असून अंतिम आराखडाही महिनाभरात मंजूर होऊन कामाला सुरुवात होईल. या वर्ष अखेरीपर्यंत पत्री पूल वाहतुकीसाठी खुला होत असून त्याच बरोबरीने पलावा उड्डाणपुलाच्या कामालाही सुरुवात होत असून वाहतुक कोंडीतून नागरिकांना यानंतर मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल, असा विश्वास यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

ऐरोली – डोंबिवली प्रवास होणार आता फक्त १० मिनिटात… शीळफाटा येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या घटनांमुळे त्रासलेल्या...
22/11/2020

ऐरोली – डोंबिवली प्रवास होणार आता फक्त १० मिनिटात…

शीळफाटा येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या घटनांमुळे त्रासलेल्या नागरिकांकरिता दिलासादायक बातमी असून शीळफाटा येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न ज्यामुळे निकाली लागणार आहे असा ऐेरोली - काटई नाका उन्नत मार्गाचे काम ८०% पूर्ण झाले असून नुकताच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA). च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी करत विस्तृत आढावा घेतला. शीळफाट्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने खासदार डॉ. शिंदे या पकल्पाचा्या कामाचा सातत्याने स्वतः पाठपुरावा करत आहेत.

या प्रकल्पातील टप्पा क्रमांक १ चे काम सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार असून बोगदा टप्पा क्रमांक १ चे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. ऐरोली ते मुंब्रा ( वाय जंक्शन ) या टप्प्यातील ६ मार्गिकांचे काम आणि बोगद्याचे काम अतिशय युद्धपातळीवर सुरू असल्याचे पाहून यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पात पुणे - मुंबई एक्सप्रेस मार्गावरील सर्व बोगद्यापेक्षा जास्त लांबीचा बोगदा आहे हेच प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचेही खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

ऐरोली ते मुंब्रा ( वाय जंक्शन ) आणि मुंब्रा ( वाय जंक्शन ) ते कटाई पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून याचा सर्वाधिक फायदा कल्याण-डोंबिवली- अंबरनाथ-बदलापूर येथील रहिवाशांना होणार आहे. कारण, या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर काटई ते ऐरोली हा प्रवास फक्त १० मिनिटांत पूर्ण होणार आहे.

टप्पा क्रमांक २ च्या कामासाठी नगरविकास विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला असून, त्यास मान्यता मिळाल्यानंतर सर्व आवश्यक परवानग्या घेऊन जमीन संपादनाची प्रक्रिया देखील लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. तसेच प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन देखील ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्यात खासदार डॉ. शिंदे यांनी उन्नत मार्ग १ (टप्पा १ ) - बोगदा टप्पा १ या दोनही कामांची पाहणी करत नियोजित वेळेच्या आधीच ऐरोली - काटई उन्नत मार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

कल्याण पूर्व – पश्चिम जोडणाऱ्या नविन पत्री पुलाच्या गर्डर लॉचिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेवर २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी मे...
20/11/2020

कल्याण पूर्व – पश्चिम जोडणाऱ्या नविन पत्री पुलाच्या गर्डर लॉचिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेवर २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी मेगा ब्लॉक…

पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांसंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक पार पडली…

२१ आणि २२ नोव्हेंबर रोजी मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांसंदर्भात नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक करण्यात आली. या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गर्डर उभारणीचे काम सुरळीत पार पडावे तसेच यादरम्यानची पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेत महत्वपूर्ण सूचना केल्या. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, पोलिस उपायुक्त, रेल्वे लोहमार्ग पोलिस तसेच ठाणे मनपा, कल्याण – डोंबिवली मनपा अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ७६.६ मीटर लांबी असलेल्या नविन पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने २१ व २२ नोव्हेंबर रोजी मेगा ब्लॉक जाहीर केला असून या दरम्यान या गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या काळात सुमारे २५० लोकल बंद राहणार असून नागरिकांना प्रवासासाठी अडचणी येऊ नयेत यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसेच ठाणे महानगरपालिका परिवहन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन यांच्या अतिरिक्त बस सेवा सुरु ठेवण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली. गर्डर उभारणीच्या कामादरम्यान सुरक्षेच्या तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी आणि जवान, पोलिस विभाग, वाहतूक अधिकारी घटनास्थळी तैनात केले जाणार आहेत.

कल्याण पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नविन पत्री पुलाच्या अंतिम टप्प्यातील आणि सर्वात महत्वाचा भाग असलेल्या पुलाच्या ७०० मेट्रिक टन वजनाच्या आणि ७६.६ मीटर लांबी असलेल्या गर्डरच्या प्रत्यक्ष उभारणीसाठी मेगा ब्लॉक मिळावा अशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची आग्रही मागणी रेल्वे हेडकॉर्टस व सेंट्रल रेल्वे बोर्डाने तात्काळ मान्य करत गर्डर उभारणीच्या कामासाठी २१ व २२ नोव्हेंबर रोजी दोन्ही दिवस ४ तासांचा मेगा ब्लॉक मंजूर केला. गर्डर लाँचिंग झाल्यानंतर गर्डर उभारणीचे काम ९० टक्के पुर्ण होणार असून २७ व २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळीस मेगा ब्लॉक घेऊन उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे. पत्री पुलाचे काम लवकर व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गर्डर उभारणीच्या कामासंदर्भात रेल्वे सुरक्षा आयुक्तांना केलेल्या विनंतीनुसार त्यांचे ना हरकत प्रमाण पत्र देखील एका आठवड्याच्या आत मिळाले होते त्यामुळे त्यासाठी लागणारा मोठा कालावधी देखील वाचला आहे.

भिवंडी – कल्याण शीळ रस्त्यावरील दळणवळणासाठी महत्वाचा असलेला हा नविन पत्री पूल लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी खुला होणार असून त्यामुळे नागरिकांना सध्या भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडीची समस्येतून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.

Dr Shrikant Eknath Shinde

शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे दाखवत शिवसेना नेते, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे अंतिम वर्ष पदवी परिक्षेत कला शाखेतून...
18/11/2020

शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे दाखवत शिवसेना नेते, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे अंतिम वर्ष पदवी परिक्षेत कला शाखेतून ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण…

शिवसेना नेते, नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिक्षणाची असलेली ओढ आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्ष पदवी परिक्षेत कला शाखेतून ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

शिक्षणाची आवड असताना देखील घरच्या परिस्थिती आणि जबाबदारींमुळे असताना त्यांना शिक्षण सोडावे लागले होते. परंतु इच्छा असेल तर मार्ग मिळतोच. मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत अतिशय व्यस्त वेळापत्रक असताना देखील त्यांनी त्यांची शिक्षण पूर्ण करण्याची महत्वकांक्षा आणि मेहनतीच्या जोरावर आज ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होत शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे दाखवून दिले आहे.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

अविरत रुग्णसेवाचे ध्येय उराशी बाळगून महाराष्ट्रभरातील १२ हजार हून अधिक गरजू रुग्णांना मोफत सेवा देणाऱ्या शिवसेना पक्षप्...
17/11/2020

अविरत रुग्णसेवाचे ध्येय उराशी बाळगून महाराष्ट्रभरातील १२ हजार हून अधिक गरजू रुग्णांना मोफत सेवा देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख व पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.नगरविकास मंत्री तथा ठाणे व गडचिरोली जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कला कळसुलकर टिम कडून मन:पूर्वक शुभेच्छा.... गरजू रुग्णांना प्रधानमंत्री सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध सरकारी योजना तसेच अनेक सामाजिक संस्थाकडून मदत घेत मोफत अथवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया व उपचार उपलब्ध करुन देणे, रुग्णालय बिलात सवलत मिळवून देणे, रुग्णांना कमी पैशामध्ये औषधे उपलब्ध करुन देणे अशा आणि अनेक आरोग्य व वैद्यकीय सेवा मोफत देणाऱ्या या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आधारवड असाच बहरत जावो आणि अधिकाअधिक गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळत राहो, ही सदिच्छा.... कला कळसुलकर टिम

अविरत रुग्णसेवाचे ध्येय उराशी बाळगून महाराष्ट्रभरातील १२ हजार हून अधिक गरजू रुग्णांना मोफत सेवा देणाऱ्या शिवसे...

 #शुभ_दिपावली...आपणा सर्वांना  #दिपावली च्या मंगलमय शुभेच्छा....... #दिवाळी  #दिवाळी२०२०
14/11/2020

#शुभ_दिपावली...

आपणा सर्वांना #दिपावली च्या मंगलमय शुभेच्छा.......

#दिवाळी #दिवाळी२०२०

७६.६ मीटर लांबी असलेल्या आणि ७०० मेट्रिक टन वजनाच्या  #महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लांबीच्या नवीन  #पत्री_पुलाच्या  #गर...
11/11/2020

७६.६ मीटर लांबी असलेल्या आणि ७०० मेट्रिक टन वजनाच्या #महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लांबीच्या नवीन #पत्री_पुलाच्या #गर्डर च्या प्रत्यक्ष उभारणीची तारीख ठरली.......

२१ – २२ नोव्हेंबर रोजी २ दिवसांचा #मेगाब्लॉक घेऊन होणार गर्डरचे लाँचिंग पूर्ण…..

#कल्याण – #शीळ रस्त्यावरील #काटई #रेल्वे उड्डाणपुलाच्या नकाशांना रेल्वे प्रशासनाकडून आठवड्याभरात मंजूरी मिळणार...

#कल्याण पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नवीन पत्री पुलाच्या अंतिम टप्प्यातील आणि सर्वात महत्वाचा भाग असलेल्या पुलाच्या ७०० मेट्रिक टन वजनाच्या आणि ७६.६ मीटर लांबी असलेल्या गर्डरच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर मेगा ब्लॉक मिळावा अशी आग्रही मागणी आज खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वे महाप्रबंधक श्री.संजीव मीत्तल यांच्या दालनात आयोजित बैठकीत केली.

या बैठकीस मध्य रेल्वे डी.आर.एम श्री.शलभ गोयल, एम.एस.आर.डी.सी. अधिकारी श्री.सोनटक्के, राईट्स संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. रेल्वे हेडकॉर्टस व सेंट्रल रेल्वे बोर्डाकडून या मागणीस तात्काळ मान्यता मिळाली असून गर्डर उभारणीच्या कामासाठी २१ व २२ नोव्हेंबर रोजी दोन्ही दिवस ४ तासांचा मेगा ब्लॉक मंजूर करण्यात आला आहे. गर्डर लाँचिंग झाल्यानंतर गर्डर उभारणीचे काम ९० टक्के पुर्ण होणार असून २७ व २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळीस मेगाब्लॉक घेऊन उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ७६.६ मीटर लांबी असलेल्या या नविन पत्री पुलाच्या गर्डर उभारणीचे मॉक ड्रिल नुकतेच यशस्वीरित्या पार पडले आहे. गर्डर उभारणीच्या कामासंदर्भात रेल्वे सुरक्षा आयुक्तांना केलेल्या विनंती त्यांचे ना हरकत प्रमाण पत्र एका आठवड्याच्या आत मिळाले असून यासाठी लागणार वेळ मोठ्या प्रमाणार वाचला आहे.

या गर्डर उभारणीच्या काम सुरळीत पार पडावे तसेच या दरम्यान सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासंदर्भात लवकरच ठाणे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक विभाग पोलिस आयुक्त यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून गर्डर उभारणीच्या कामा दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी आणि जवान, पोलिस विभाग, वाहतूक अधिकारी घटनास्थळी तैनात केले जाणार आहेत.

Address


Telephone

+917977471990

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapale Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aapale Thane:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share